Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-4/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:33, 11 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00.04 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.07 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बदद्ल आहे.
00.15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00.28 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00.33 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Material panel म्हणजे काय?


00.37 प्रॉपर्टीस विंडो च्या Material panel मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू.
00.44 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00.49 जर नसेल तर आमचे अगोदरचे, Basic Description of the Blender Interface हे ट्यूटोरियल पहा.
00.57 प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
01.03 आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे.
01.10 चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया.
01.14 प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया.
01.20 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01.28 आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01.33 ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे, How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01.43 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
01.51 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर असलेल्या sphere आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा.
01.58 हे Material panel आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मध्ये एक मटेरियल जोडू शकतो.
02.05 डिफॉल्ट द्वारे स्टॅंडर्ड मटेरियल क्यूब मध्ये जोडले आहे.
02.10 हे मटेरियल निळ्या रंगात चिन्हांकीत असलेल्या मटेरियल स्लॉट चा एक भाग आहे.
02.15 नवीन मटेरियल स्लॉट जोडण्यासाठी, मटेरियल पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस (+) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा.
02.24 नवीन मटेरियल जोडण्यासाठी new वर लेफ्ट क्लिक करा. डिफॉल्ट द्वारे, सर्व नवीन मटेरियल मूलभूत सेट्टिंग्स सह जोडले आहे.
02.34 नवीन मटेरियल स्लॉट डिलीट करण्यासाठी, प्लस (+) चिन्हाच्या खाली असलेल्या माइनस (-) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा.
02.41 आपण आपल्या मूळ मटेरियल वर पुन्हा आलो आहोत. यास आपण White नाव देऊ.
02.46 मटेरियल स्लॉट बॉक्स आणि प्रीव्यू विंडो च्या मध्ये असलेल्या ID नेम बार मध्ये Material वर लेफ्ट क्लिक करा.
02.55 तुमच्या कीबोर्ड वर White टाइप करा आणि enter की दाबा.
03.01 मटेरियल आणि मटेरियल स्लॉट या दोन्हीची नावे white मध्ये बदलली आहे.
03.06 तुम्ही नवीन मटेरियल स्लॉट न जोडता नवीन मटेरियल जोडू शकता.
03.12 मटेरियल ID नेम बार च्या उजव्या बाजूला प्लस (+) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा.
03.18 मटेरियल स्लॉट मध्ये नवीन मटेररियल जुडला आहे . यास red हे नवीन नाव देऊ.
03.27 आपण या मटेरियल चा रंग white वरुन red मध्ये बदलणार आहोत.
03.31 परंतु, प्रथम आपण मटेरियल IDनेम बार च्या खाली, रो च्या बटनांवर एक नजर टाकु.
03.37 Surface सक्रिय ओब्जेकटच्या मटेरियल ला त्याच्या सर्फेस च्या रूपात रेंडर करते.
03.44 हे ब्लेंडर मध्ये डिफॉल्ट रेंडर मटेरियल आहे.
03.48 Wire मटेरियल ला एक तार युक्त जाळी मध्ये रेंडर करते, जे ऑब्जेक्ट बहभूजाच्या फक्त किनार दर्शविते.
03.55 हे उपयुक्त असे टूल आहे, जे मॉडेलिंग आणि रेंडरिंग वरील वेळेची बचत करते.
04.00 आपण ब्लेंडर मध्ये, मॉडेलिंग बद्दल अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये, wired mesh, edges आणि polygons या बद्दल विस्तृत पणे शिकू.
04.09 Volume मटेरियल सक्रिय ऑब्जेक्ट ला संपूर्ण वॉल्यूम च्या रूपात रेंडर करते.
04.15 surface आणि wire साठी मटेरियल सेट्टिंग वेगळी आहे.
04.20 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये Volume मटेरियल चा वापर करू, तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु.
04.26 Halo मटेरियल ला सक्रिय ऑब्जेक्ट च्या भोवती हॅलो कणाच्या रूपामध्ये रेंडर करते.
04.32 पुन्हा मटेरियल सेट्टिंग्स बदलली आहे.
04.36 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये Halo मटेरियल चा वापर करू, तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु.
04.42 लक्ष द्या यामधील कोणताही पर्याय 3D व्यू मध्ये दर्शित नाही.
04.47 कारण यास फक्त रेंडर डिसप्ले मध्ये पाहिल्या जाऊ शकते.
04.52 रेंडर डिसप्ले बदद्ल शिकण्यासाठी Types of windows Properties part 1 हे ट्यूटोरियल पहा.
05.02 Surface वर पुन्हा जा. आपण Surface मटेरियल साठी सेट्टिंग्स पाहु.
05.05 खाली प्रीव्यू ( पूर्वेक्षण ) विंडो आहे, जे रेंडर्ड मटेरियल चे प्रीव्यू दर्शविते.
05.17 उजव्या बाजूला, विविध प्रीव्यू पर्यायासाठी बटनाचे कॉलम आहे.
05.22 Plane
05.24 Sphere
05.26 Cube
05.29 Monkey
05.32 Hair
05.34 आणि Sky. आता आपल्या मटेरियल चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलू.
05.42 Diffuse वर जा. Diffuse च्या खाली White Bar वर लेफ्ट क्लिक करा.
05.49 कलर मेन्यू दिसेल. आपल्याला हवा असलेला कोणताही कलर आपण या मेन्यू वरुन निवडू शकतो. मी लाल निवडते.
05.59 लेफ्ट क्लिक करा आणि white डॉट ला कलर सर्कल च्या मध्यभागी पकडा.
06.05 माउस सर्कल च्या लाल क्षेत्राच्या च्या दिशेने ड्रॅग करा.
06.11 Material पॅनल, मध्ये 3Dव्यू आणि प्रीव्यू विंडो मधील क्यूब चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलला आहे.
06.22 दुसरी पद्धत - Diffuse च्या खाली लाल बार वर पुन्हा लेफ्ट क्लिक करा.
06.28 तुम्हाला कलर सर्कल च्या खाली R, G आणि B नामक तीन बार्स दिसत आहेत का?
06.35 R. वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि enter की दाबा.
06.43 G वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा.


06.52 B वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा.
आता क्यूब चा कलर पूर्णपणे लाल झाला आहे.
07.05 याप्रमाणे, specular च्या खाली पांढऱ्या बार वर लेफ्ट क्लिक करा. color मेन्यू मधून कोणताही कलर निवडा.
07.14 मी हिरवा निवडते.
07.17 क्यूब वरील चमक पांढऱ्या वरुन फिक्कट हिरव्या मध्ये बदलली आहे.
07.22 आता जर मला पांढरा मटेरियल पुन्हा वापरायचा असेल, तर काय? मला ते पुन्हा कसे मिळेल?
07.29 Material ID name bar वर जा. येथे नेम बार च्या डाव्या बाजूला आणखीन एक स्फियर आइकान आहे.
07.37 sphere icon वर लेफ्ट क्लिक करा. हे Material menu आहे.
07.43 sceneमध्ये वापरलेले सर्व मेटीरियल्स येथे सूचीबद्ध आहे. आता येथे फक्त दोन मटेरियल दिसत आहे- Red आणि White.
07.53 White वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा एकदा क्यूब लाल वरुन पांढऱ्या मध्ये बदलली आहे.
08.00 दोन्ही Diffuse आणि specular बार खाली Intensity बार्स आहे.
08.05 डिफॉल्ट द्वारे, Diffuse साठी इंटेन्सिटी 0.8 आहे आणि Specularसाठी 0.5 आहे.
08.15 हे फिनिश मटेरियल प्रकाराच्या आवश्यकते नुसार बदलले जाऊ शकते.
08.21 Matt finish म्हणजे Diffuse आणि specular या दोन्हीची कमी इंटेन्सिटी
08.27 उदाहरणार्थ, नैसर्गिक लाकडाच्या मटेरियल मध्ये मॅट फिनिश असते.
08.33 Glossy finish म्हणजे Diffuse आणि specular या दोन्हीची अधिक इंटेन्सिटी.


08.39 उदाहरणार्थ, कारपेंट मटेरियल मध्ये ग्लॉसी फिनिश असते.
08.46 ' ब्लेंडर मध्ये Diffuse साठी Lambert' हे डिफॉल्ट शेडर आहे.
08.52 Lambert वर लेफ्ट क्लिक करा. हे Diffuse shader मेन्यू आहे.
08.57 येथे आपण आपल्याला आवश्यक असलेले शेडर जसे, Fresnel, Minnaert, Toon, Oren-Nayar आणि Lambert निवडू शकतो.
09.08 इंटेन्सिटी प्रमाणे, विविध प्रकारच्या मटेरियल साठी शेडर्स सुद्धा विविध असतात. उदाहरणार्थ, Fresnel शेडर साठी ग्लास मटेरियल वापरला जातो.
09.19 त्याचप्रमाणे , ब्लेंडर मध्ये specularसाठी Cooktorr डिफॉल्ट शेडर आहे.
09.25 Cooktorr वर लेफ्ट क्लिक करा. हे Specular Shader menu आहे.
09.32 Blinn आणि phong हे सर्वाधिक समान शेडर्स आहेत, जे 90% मटेरियल साठी वापरले जाते.
09.40 Hardness ओब्जेक्टची स्पेक्युलॅरिटी किंवा चमक ची तीव्रता निर्धारित करते.
09.48 Hardness 50' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter की दाबा.
09.57 स्पेक्युलर क्षेत्र स्फियर च्या प्रीव्यू वर, लहान वर्तुळात रुपांतरित झाले आहे.
10.04 पुन्हा Hardness 100' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 10 टाइप करा आणि enter की दाबा.
10.13 आता स्पेक्युलर क्षेत्र मोठे झाले आहे आणि स्फियर प्रीव्यू वर पसरले आहे.
10.20 ही मटेरियल पॅनेल ची मूलभूत सेट्टिंग्स होती.
10.25 उरलेल्या सेट्टिंग्स नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
10.29 आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता.
10.33 क्यूब मध्ये नवीन मटेरियल जोडा आणि त्याचे रंग आणि नाव निळ्या मध्ये बदला.
10.39 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
10.48 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
11.08 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
10.11 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.14 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11.19 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11.25 आमच्या सह जुडण्यासाठी,


11.27 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana