GeoGebra-5.04/C2/Types-of-Symmetry/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
0:01 | जिओजेब्रा मधील Types of Symmetry वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
0:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण विविध प्रकारच्या सममिती विषयी शिकू जसे:
Line Point |
0:15 | Rotation
Translational Scale |
0:22 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे,
उबंटू लिनक्स ओएस version 14.04 जिओजेब्रा version 5.0.438.0-डी. |
0:36 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी
नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
0:49 | आपण सममितीच्या व्याख्येसह प्रारंभ करूया. |
0:53 | भौमितिक आकृती सममितीय असते, जेव्हा ती दोन किंवा अधिक समान भागात विभागली जाते आणि त्यांच्या भागांची संघटित पद्धतीने व्यवस्था करता येते. |
1:08 | मी जिओजेबरा इंटरफेस आधीच उघडला आहे. |
1:12 | या ट्यूटोरियल साठी मी axes अनचेक करेन. |
1:16 | असे करण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा.
ग्राफिक्स मेनू दिसेल. |
1:23 | या मेनूमधील, अॅक्सेस चेक बॉक्स अनचेक करा. |
1:27 | या ट्यूटोरियलसाठी, आपण Reflect about Line टूल खाली उपलब्ध असलेली सर्व टूल्स वापरू. |
1:35 | आता आपण रेषीय सममिती परिभाषित करू. |
1:38 | एखाद्या आकृती मधील, वस्तूचा अर्धा भाग हा दुसर्या अर्ध्या भागाचे प्रतिबिंब असतो तेव्हा रेषीय सममिती असते. |
1:46 | ज्या रेषेवर आकृती प्रतिबिंबित होते त्यास सममितीची रेषा म्हणतात. |
1:52 | उभी रेषा AB काढण्यासाठी सेगमेंट टूल वर क्लिक करा आणि नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा. |
2:00 | बिंदू A ग्राफिक्स व्ह्यू मध्ये काढला आहे. |
2:04 | रेषाखंड एबी काढण्यासाठी बिंदू A च्या खाली पुन्हा क्लिक करा.
लक्षात घ्या की ते f चे लेबल आहे. |
2:13 | Semicircle through 2 Points टूल निवडा. |
2:17 | रेषाखंड AB च्या डाव्या बाजू वर क्लिक करा.बिंदू C काढला आहे. |
2:24 | अर्धवर्तुळ CD पूर्ण करण्यासाठी C च्या खाली पुन्हा क्लिक करा, त्याला c म्हणू |
2:30 | हे अर्धवर्तुळ रेषाखंड f च्या डाव्या बाजूस असावे. |
2:35 | आता रेषाखंड f ला अर्धवर्तुळ प्रतिबिंबित करू. |
2:40 | Reflect about Line टूलवर क्लिक करा.अर्धवर्तुळावर क्लिक करा, त्यानंतर रेषा f वर क्लिक करा. |
2:50 | अर्धवर्तुळ c' (c प्राइम) रेषाखंड f च्या उजव्या बाजूस दिसते.ही अर्धवर्तुळ c ची प्रतिबिंबित प्रतिमा आहे. |
3:00 | C आणि c '(c prime) चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलू. |
3:05 | C वर राइट-क्लिक करा आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टी निवडा. |
3:11 | Preferences विंडो उघडली |
3:14 | कॉनिक अंतर्गत डाव्या पॅनेलमध्ये c आधीच निवडलेले आहे. |
3:19 | Ctrl की दाबून ठेऊन c '(c prime) वर क्लिक करा. |
3:23 | Basic टॅबमध्ये,Show Trace चेक बॉक्स क्लिक करा. |
3:28 | Color टॅब मध्ये मी गुलाबी रंग निवडेन |
3:33 | आपण आपल्या आवडीचा कोणताही रंग निवडू शकता.नंतर Preferences विंडो बंद करा. |
3:40 | मूव्ह टूल वापरुन अर्धवर्तुळ ड्रॅग करा. |
3:46 | जेव्हा आपण c हलवतो तेव्हा अर्धवर्तुळ c' (c प्राइम) हालेल. |
3:52 | c '(c prime) हे c चे प्रतिबिंब आहे आणि रेषाखंड f आरशा प्रमाणे आहे. |
3:58 | ट्रेस मिटवण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू ड्रॅग करा. |
4:03 | ग्राफिक्स व्यू मधील सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू. |
4:07 | सर्व ऑब्जेक्ट निवडण्यासाठी Ctrl + A की दाबा. |
4:11 | नंतर कीबोर्डवरील डिलीट की दाबा. |
4:15 | आता आपण बिंदू प्रतिबिंबित करण्यास शिकू. |
4:19 | सेगमेंट टूल वर क्लिक करा. |
4:22 | रेषाखंड AB काढण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दोनदा क्लिक करा. |
4:28 | Reflect about Point टूल निवडा.बिंदू A वर, नंतर बिंदू B वर क्लिक करा. |
4:38 | A '(ए प्राइम) जी A ची प्रतिबिंबित प्रतिमा आहे बिंदू B च्या दुसऱ्या बाजूला दिसते. |
4:45 | A '(प्राइम) पाहण्यासाठी, आवश्यक असल्यास ग्राफिक्स व्ह्यू ड्रॅग करा. |
4:50 | A'(प्राइम) A ची प्रतिमा आहे हे दर्शविण्यासाठी आपण AB आणि A' (A प्राइम)B चे अंतर मोजू. |
4:58 | एंगल अंतर्गत,Distance or Length टूलवर क्लिक करा. |
5:03 | बिंदू A वर क्लिक करा, नंतर B वर क्लिक करा. |
5:08 | पुन्हा A' (A प्राइम) वर क्लिक करा आणि नंतर B वर क्लिक करा. |
5:15 | लक्षात घ्या की AB आणि A '(A प्राइम) B मधील अंतर समान आहेत. |
5:20 | मूव्ह टूल वापरुन मी रेषाखंड AB वरच्या दिशेने ड्रॅग करेन. |
5:27 | A '(A प्राइम) देखील AB बरोबरच फिरते हे पहा. |
5:32 | पुढे आपण वर्तुळाचे बिंदू प्रतिबिंबित करण्यास शिकू. |
5:36 | Circle with centre and radius टूल निवडा. ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा. |
5:43 | Circle with Centre and Radius टेक्स्ट बॉक्स दिसेल. |
5:48 | टेक्स्ट बॉक्समध्ये रेडियस 2 टाइप करा आणि खाली असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
5:56 | ग्राफिक्स व्यू मध्ये केंद्रबिंदू C आणि रेडियस 2 सेमी असलेले वर्तुळ रेखाटले आहे. |
6:02 | पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या बाहेर बिंदू D काढा. |
6:09 | Reflect about Circle टूल निवडा.बिंदू D वर क्लिक करा आणि नंतर वर्तुळ c वर क्लिक करा |
6:19 | D '(D प्राइम), जी D ची प्रतिमा आहे, वर्तुळाच्या आत दिसते. |
6:24 | मूव्ह टूल वर क्लिक करा आणि वर्तुळाभोवती बिंदू D ड्रॅग करा |
6:31 | D '(D प्राइम) देखील प्रतिबिंबित D च्या वर्तुळात फिरते हे पहा. |
6:37 | वर्तुळाच्या आत बिंदू D ड्रॅग करा आणि काय होते ते पहा.D आणि D '(D प्राइम) च्या जागेची अदलाबदल होते |
6:47 | आता चक्रीय सममितीबद्दल जाणून घेऊ. |
6:51 | जर एखादी वस्तू एकूणच आकार न बदलता एका निश्चित बिंदूभोवती फिरवता येते, तर ती चक्रीय सममिती असते. |
7:02 | आपण नवीन GeoGebra विंडो उघडू. |
7:06 | File वर क्लिक करा आणि नंतर New Window वर क्लिक करा. |
7:11 | आता आपण बिंदूभोवती एखादी वस्तू फिरवू.यासाठी मी एक चौरस काढेन. |
7:18 | पॉलीगॉन टूल वर क्लिक करा. |
7:21 | बिंदू A काढण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा.तसेच B,C आणि D बिंदू काढण्यासाठी क्लिक करा. |
7:33 | बहुभुज पूर्ण करण्यासाठी पुन्हा बिंदू A वर क्लिक करा. |
7:37 | चतुर्भुज ABCD ला q1 असे नाव दिले. |
7:42 | q1 चौरस मध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्याला लांबी adjust करावी लागेल. |
7:47 | मूव्ह टूलवर क्लिक करा आणि बिंदू A, B, C आणि D ड्रॅग करा. |
7:54 | Algebra view मध्ये लांबी मधील बदल पहा.सर्व लांबी समान असणे आवश्यक आहे. |
8:01 | आता आपण चौरसाला लंबदुभाजक काढू. |
8:05 | Perpendicular Bisector टूलवर क्लिक करा. |
8:08 | बिंदू A, B आणि B, C वर क्लिक करा. |
8:14 | दोन लंब दुभाजक एका बिंदूत छेदतात. |
8:18 | इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि त्या छेदनबिंदूवर क्लिक करा.बिंदू E हा छेदनबिंदू आहे. |
8:28 | एंगल स्लाइडर बनवू.स्लाइडर टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये क्लिक करा. |
8:37 | स्लाइडर डायलॉग बॉक्स उघडेल. |
8:40 | Angle रेडिओ बटण निवडा. |
8:43 | अल्फा नेम फील्डमध्ये दिसतो |
8:47 | Min, Max आणि Increment ची डीफॉल्ट मूल्ये तशीच सोडा.
आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
8:58 | अल्फा स्लाइडर ग्राफिक्स व्यू मध्ये तयार केले गेले आहे. |
9:02 | आता रोटेट अराउंड पॉइंट टूल वर क्लिक करा.चौरस q1 वर क्लिक करा आणि नंतर बिंदू E वर क्लिक करा. |
9:12 | Rotate around Point टेक्स्ट बॉक्स 45 डिग्री कोनात दिसून येईल. |
9:18 | आपल्याकडे असलेल्या text boxच्या खाली, Counter clockwise आणि clockwise रेडिओ बटणे आहेत. |
9:25 | आपण आपल्या आवडीनुसार रेडिओ बटणांपैकी एक निवडू शकता.
मी clockwise निवडेन. |
9:33 | Angle text boxमधून 45 अंश हटवा. |
9:37 | एंगल text boxमध्ये उजव्या बाजूला अल्फा चिन्ह पहा. |
9:43 | symbols चे table दर्शविण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
9:47 | टेबलमधून अल्फा निवडा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा |
9:54 | ग्राफिक्स व्यू मध्ये नवीन चौरस q1' (prime) दिसेल ते पहा |
10:00 | चौरस q1' (prime) हा चौरस q1 च्या संबंधित कोन अल्फा येथे फिरविला जाईल. |
10:07 | आता अल्फा स्लायडर 0 डिग्री ते 360 डिग्री दरम्यान ड्रॅग करा. |
10:13 | ड्रॅग केल्यावर E बिंदूभोवती q1' (prime)चे रोटेशन पहा. |
10:20 | असाईनमेंट म्हणून,
षटकोन काढा आणि त्याची चक्रीय सममिती दर्शवा. |
10:28 | आता सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू. |
10:31 | Edit मेनूवर जा आणि select all निवडा.
नंतर डिलीट पर्याय निवडा. |
10:41 | पुढे आपण वेक्टर वापरुन ऑब्जेक्ट हलवू. |
10:45 | आपण ट्रान्सलेशनल सममिती परिभाषित करू |
10:49 | एखादी वस्तू ट्रान्सलेशनल सममिती असते,जर ती संपूर्ण आकार न बदलता हलविली जाऊ शकते. |
10:58 | पॉलीगॉन टूल वापरुन t1 नावाचा त्रिकोण ABC काढा. |
11:08 | वेक्टर काढण्यासाठी टूलबारवरील वेक्टर टूलवर क्लिक करा. |
11:13 | बिंदू D वर आणि नंतर बिंदू E वर क्लिक करा. |
11:19 | वेक्टर म्हणून u दर्शविले आहे. |
11:23 | Translate by Vector tool निवडा.t1 त्रिकोणावर क्लिक करा आणि नंतर वेक्टर u वर क्लिक करा. |
11:33 | येथे t1' (prime) ही t1 ची भाषांतरित प्रतिमा आहे. |
11:38 | t1 आणि t1' (prime) मधील अंतर वेक्टर u च्या लांबीइतकेच आहे |
11:45 | मूव्ह टूल वापरुन वेक्टर u चा E बिंदू ड्रॅग करा.
लक्ष द्या की प्रतिमा त्रिकोण t1' (prime)वेक्टर u समवेत भाषांतरित आहे. |
11:59 | असाईनमेंट म्हणून,
|
12:04 | Translate by Vector टूल वापरून बिंदूचे भाषांतर करा. |
12:08 | मूळ बिंदू आणि भाषांतरित बिंदूमधील अंतर मोजा. |
12:13 | स्केल सममिती परिभाषित करू. |
12:16 | एखादी वस्तू विस्तारीत किंवा संकुचित केली असता आपला आकार बदलत नाही. तेव्हा ती स्केल सममिती असते. |
12:25 | आपण नवीन Geogebra विंडो उघडू.File वर क्लिक करा आणि New Window निवडा. |
12:34 | आता ऑब्जेक्ट कसे आकाराने मोठे करायचे ते शिकू. |
12:38 | Circle with centre and radius tool वर क्लिक करा.नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा. |
12:45 | सर्कल विथ सेंटर and radius टेक्स्ट बॉक्स मध्ये रेडियस 1 म्हणून टाइप करा. |
12:50 | तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
12:53 | पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या बाहेर बिंदू B काढा. |
12:59 | Dilate from Point टूल निवडा. |
13:02 | युनिट वर्तुळाच्या परिघावर क्लिक करा आणि नंतर बिंदू B वर क्लिक करा. |
13:09 | Dilate from Point टेक्स्ट बॉक्स दिसेल. फॅक्टर 2 टाइप करा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
13:20 | दुप्पट त्रिज्यासह एक विस्तृत वर्तुळ ग्राफिक्स व्ह्यू मध्ये दिसते. |
13:26 | असाईनमेंट म्हणून,
त्याच विंडोवर पंचकोन आणि षटकोन काढा. |
13:32 | पंचकोनाला 0.5 च्या गुणकाने विभाजित करा
षट्कोनाला 3 च्या गुणकाने विभाजित करा |
13:40 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
13:44 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो
सममिती आणि सममितीचे विविध प्रकार Line Point |
13:56 | Rotation
Translational Scale. |
14:02 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.
कृपया डाउनलोड करुन पहा. |
14:10 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
14:20 | कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा. |
14:24 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14:36 | मी राधिका आपला निरोप घेते.
धन्यवाद |