GeoGebra-5.04/C2/Types-of-Symmetry/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 02:19, 20 January 2020 by Radhika (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
0:01 जिओजेब्रा मधील Types of Symmetry वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
0:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण विविध प्रकारच्या सममिती विषयी शिकू जसे:

Line

Point

0:15 Rotation

Translational

Scale

0:22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे,

उबंटू लिनक्स ओएस version 14.04

जिओजेब्रा version 5.0.438.0-डी.

0:36 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी

नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.

0:49 आपण सममितीच्या व्याख्येसह प्रारंभ करूया.
0:53 भौमितिक आकृती सममितीय असते, जेव्हा ती दोन किंवा अधिक समान भागात विभागली जाते आणि त्याच्या भागांची संघटित पद्धतीने व्यवस्था करता येते.
1:08 मी जिओजेबरा इंटरफेस आधीच उघडला आहे.
1:12 या ट्यूटोरियल साठी मी axes अनचेक करेन.
1:16 असे करण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा.

ग्राफिक्स मेनू दिसेल.

1:23 या मेनूमधील, अ‍ॅक्सेस चेक बॉक्स अनचेक करा.
1:27 या ट्यूटोरियलसाठी, आपण Reflect about Line टूल खाली उपलब्ध असलेली सर्व टूल्स वापरू.
1:35 आता आपण रेषीय सममिती परिभाषित करू.
1:38 एखाद्या आकृती मधील, वस्तूचा अर्धा भाग हा दुसर्‍या अर्ध्या भागाचे प्रतिबिंब असतो तेव्हा रेषीय सममिती असते.
1:46 ज्या रेषेवर आकृती प्रतिबिंबित होते त्यास सममितीची रेषा म्हणतात.
1:52 उभी रेषा AB काढण्यासाठी सेगमेंट टूल वर क्लिक करा आणि नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
2:00 बिंदू A ग्राफिक्स व्ह्यू मध्ये काढला आहे.
2:04 रेषाखंड एबी काढण्यासाठी बिंदू A च्या खाली पुन्हा क्लिक करा.

लक्षात घ्या की ते f चे लेबल आहे.

2:13 Semicircle through 2 Points टूल निवडा.
2:17 रेषाखंड AB च्या डाव्या बाजू वर क्लिक करा.बिंदू C काढला आहे.
2:24 अर्धवर्तुळ CD पूर्ण करण्यासाठी C च्या खाली पुन्हा क्लिक करा, त्याला c म्हणू
2:30 हे अर्धवर्तुळ रेषाखंड f च्या डाव्या बाजूस असावे.
2:35 आता रेषाखंड f ला अर्धवर्तुळ प्रतिबिंबित करू.
2:40 Reflect about Line टूलवर क्लिक करा.सेमी वर्तुळावर क्लिक करा, त्यानंतर रेषा f वर क्लिक करा.
2:50 अर्धवर्तुळ c' (c प्राइम) रेषाखंड f च्या उजव्या बाजूस दिसते.ही अर्धवर्तुळ c ची प्रतिबिंबित प्रतिमा आहे.
3:00 C आणि c '(c prime) चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलू.
3:05 C वर राइट-क्लिक करा आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टी निवडा.
3:11 Preferences  विंडो उघडली
3:14 कॉनिक अंतर्गत डाव्या पॅनेलमध्ये c आधीच निवडलेले आहे.
3:19 Ctrl की दाबून ठेऊन c '(c prime) वर क्लिक करा.
3:23 Basic टॅबमध्ये,Show Trace चेक बॉक्स क्लिक करा.
3:28 Color टॅब मध्ये मी गुलाबी रंग निवडेन
3:33 आपण आपल्या आवडीचा कोणताही रंग निवडू शकता.नंतर  Preferences  विंडो बंद करा.
3:40 मूव्ह टूल वापरुन अर्धवर्तुळ ड्रॅग करा.
3:46 जेव्हा आपण c हलवितो तेव्हा अर्धवर्तुळ c' (c प्राइम) हालेल.
3:52 c '(c prime) हे c चे प्रतिबिंब आहे आणि रेषाखंड f आरशा प्रमाणे आहे.
3:58 ट्रेस मिटवण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू ड्रॅग करा.
4:03 ग्राफिक्स व्यू मधील सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू.
4:07 सर्व ऑब्जेक्ट निवडण्यासाठी Ctrl + A की दाबा.
4:11 नंतर कीबोर्डवरील डिलीट की दाबा.
4:15 आता आपण बिंदू प्रतिबिंबित करण्यास शिकू.
4:19 सेगमेंट टूल वर क्लिक करा.
4:22 रेषाखंड AB काढण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दोनदा क्लिक करा.
4:28 Reflect about Point टूल निवडा.बिंदू A वर, नंतर बिंदू B वर क्लिक करा.
4:38 A '(ए प्राइम) जी A ची प्रतिबिंबित प्रतिमा आहे बिंदू B च्या दुसऱ्या बाजूला दिसते.
4:45 A '(प्राइम) पाहण्यासाठी, आवश्यक असल्यास ग्राफिक्स व्ह्यू ड्रॅग करा.
4:50 A'(प्राइम) A ची प्रतिमा आहे हे दर्शविण्यासाठी आपण AB आणि A' (A प्राइम)B चे अंतर मोजू.
4:58 एंगल अंतर्गत,Distance or Length टूलवर क्लिक करा.
5:03 बिंदू A वर क्लिक करा, नंतर B वर क्लिक करा.
5:08 पुन्हा A' (A प्राइम) वर क्लिक करा आणि नंतर B वर क्लिक करा.
5:15 लक्षात घ्या की AB आणि A '(A प्राइम) B मधील अंतर समान आहेत.
5:20 मूव्ह टूल वापरुन मी रेषाखंड AB वरच्या दिशेने ड्रॅग करेन.
5:27 A '(A प्राइम) देखील AB बरोबरच फिरते हे पहा.
5:32 पुढे आपण वर्तुळाचे बिंदू प्रतिबिंबित करण्यास शिकू.
5:36 Circle with centre and radius टूल निवडा. ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा.
5:43 Circle with Centre and Radius टेक्स्ट बॉक्स दिसेल.
5:48 टेक्स्ट बॉक्समध्ये रेडियस 2 टाइप करा आणि खाली असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
5:56 ग्राफिक्स व्यू मध्ये केंद्रबिंदू C आणि रेडियस 2 सेमी असलेले वर्तुळ रेखाटले आहे.
6:02 पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या बाहेर बिंदू D काढा.
6:09 Reflect about Circle टूल निवडा.बिंदू D वर क्लिक करा आणि नंतर वर्तुळ c वर क्लिक करा
6:19 D '(D प्राइम), जी D ची प्रतिमा आहे, वर्तुळाच्या आत दिसते.
6:24 मूव्ह टूल वर क्लिक करा आणि वर्तुळाभोवती बिंदू D ड्रॅग करा
6:31 D '(D प्राइम) देखील प्रतिबिंबित D च्या वर्तुळात फिरते हे पहा.
6:37 वर्तुळाच्या आत बिंदू D ड्रॅग करा आणि काय होते ते पहा.D आणि D '(D प्राइम) च्या जागेची अदलाबदल होते
6:47 आता चक्रीय सममितीबद्दल जाणून घेऊ.
6:51 जर एखादी वस्तू एकूणच आकार न बदलता एका निश्चित बिंदूभोवती फिरवता येते, तर ती चक्रीय सममिती असते.
7:02 आपण नवीन GeoGebra विंडो उघडू.
7:06 File वर क्लिक करा आणि नंतर New Window वर क्लिक करा.
7:11 आता आपण बिंदूभोवती एखादी वस्तू फिरवू.यासाठी मी एक चौरस काढेन.
7:18 पॉलीगॉन टूल वर क्लिक करा.
7:21 बिंदू A काढण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा.तसेच B,C आणि D बिंदू काढण्यासाठी क्लिक करा.
7:33 बहुभुज पूर्ण करण्यासाठी पुन्हा बिंदू A वर क्लिक करा.
7:37 चतुर्भुज ABCD ला q1 असे नाव दिले.
7:42 q1 चौरस मध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्याला लांबी adjust करावी लागेल.
7:47 मूव्ह टूलवर क्लिक करा आणि बिंदू A, B, C आणि D ड्रॅग करा.
7:54 Algebra view मध्ये लांबी मधील बदल पहा.सर्व लांबी समान असणे आवश्यक आहे.
8:01 आता आपण चौरसाला लंबदुभाजक काढू.
8:05 Perpendicular Bisector टूलवर क्लिक करा.
8:08 बिंदू A, B आणि B, C वर क्लिक करा.
8:14 दोन लंब दुभाजक एका बिंदूत छेदतात.
8:18 इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि त्या छेदनबिंदूवर क्लिक करा.बिंदू E हा छेदनबिंदू आहे.
8:28 एंगल स्लाइडर बनवू.स्लाइडर टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये क्लिक करा.
8:37 स्लाइडर डायलॉग बॉक्स उघडेल.
8:40 Angle रेडिओ बटण निवडा.
8:43 अल्फा नेम फील्डमध्ये दिसतो
8:47 Min, Max आणि Increment ची डीफॉल्ट मूल्ये तशीच सोडा.

आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.

8:58 अल्फा स्लाइडर ग्राफिक्स व्यू मध्ये तयार केले गेले आहे.
9:02 आता रोटेट अराउंड पॉइंट टूल वर क्लिक करा.चौरस q1 वर क्लिक करा आणि नंतर बिंदू E वर क्लिक करा.
9:12 Rotate around Point टेक्स्ट बॉक्स 45 डिग्री कोनात दिसून येईल.
9:18 आपल्याकडे असलेल्या text boxच्या खाली, Counter clockwise आणि clockwise रेडिओ बटणे आहेत.
9:25 आपण आपल्या आवडीनुसार रेडिओ बटणांपैकी एक निवडू शकता.

मी clockwise निवडेन.

9:33 Angle text boxमधून 45 अंश हटवा.
9:37 एंगल text boxमध्ये उजव्या बाजूला अल्फा चिन्ह पहा.
9:43 symbols चे table दर्शविण्यासाठी त्यावर क्लिक करा.
9:47 टेबलमधून अल्फा निवडा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा
9:54 ग्राफिक्स व्यू मध्ये नवीन चौरस q1' (prime) दिसेल ते पहा
10:00 चौरस q1' (prime) हा चौरस q1 च्या संबंधित कोन अल्फा येथे फिरविला जाईल.
10:07 आता अल्फा स्लायडर 0 डिग्री ते 360 डिग्री दरम्यान ड्रॅग करा.
10:13 ड्रॅग केल्यावर E बिंदूभोवती q1' (prime)चे रोटेशन पहा.
10:20 असाईनमेंट म्हणून,

षटकोन काढा आणि त्याची चक्रीय सममिती दर्शवा.

10:28 आता सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू.
10:31 Edit मेनूवर जा आणि select all निवडा.

नंतर डिलीट पर्याय निवडा.

10:41 पुढे आपण वेक्टर वापरुन ऑब्जेक्ट हलवू.
10:45 आपण ट्रान्सलेशनल सममिती परिभाषित करू
10:49 एखादी वस्तू ट्रान्सलेशनल सममिती असते,जर ती संपूर्ण आकार न बदलता हलविली जाऊ शकते.
10:58 पॉलीगॉन टूल वापरुन t1 नावाचा त्रिकोण ABC काढा.
11:08 वेक्टर काढण्यासाठी टूलबारवरील वेक्टर टूलवर क्लिक करा.
11:13 बिंदू D वर आणि नंतर बिंदू E वर क्लिक करा.
11:19 वेक्टर म्हणून u दर्शविले आहे.
11:23 Translate by Vector tool निवडा.t1 त्रिकोणावर क्लिक करा आणि नंतर वेक्टर u वर क्लिक करा.
11:33 येथे t1' (prime) ही t1 ची भाषांतरित प्रतिमा आहे.
11:38 t1 आणि t1' (prime) मधील अंतर वेक्टर u च्या लांबीइतकेच आहे
11:45 मूव्ह टूल वापरुन वेक्टर u चा E बिंदू ड्रॅग करा.

लक्ष द्या की प्रतिमा त्रिकोण t1' (prime)वेक्टर u समवेत भाषांतरित आहे.

11:59 असाईनमेंट म्हणून,


वेक्टर काढा.

12:04 Translate by Vector  टूल वापरून बिंदूचे भाषांतर करा.
12:08 मूळ बिंदू आणि भाषांतरित बिंदूमधील अंतर मोजा.
12:13 स्केल सममिती परिभाषित करू.
12:16 एखादी वस्तू विस्तारीत किंवा संकुचित केली असता आपला आकार बदलत नाही. तेव्हा ती स्केल सममिती असते.
12:25 आपण नवीन Geogebra विंडो उघडू.File वर क्लिक करा आणि New Window निवडा.
12:34 आता ऑब्जेक्ट कसे आकाराने मोठे करायचे ते शिकू.
12:38 Circle with centre and radius tool वर क्लिक करा.नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
12:45 सर्कल विथ सेंटर and radius टेक्स्ट बॉक्स मध्ये रेडियस 1 म्हणून टाइप करा.
12:50 तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
12:53 पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या बाहेर बिंदू B काढा.
12:59 Dilate from Point टूल निवडा.
13:02 युनिट वर्तुळाच्या परिघावर क्लिक करा आणि नंतर बिंदू B वर क्लिक करा.
13:09 Dilate from Point टेक्स्ट बॉक्स दिसेल. फॅक्टर 2 टाइप करा आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
13:20 दुप्पट त्रिज्यासह एक विस्तृत वर्तुळ ग्राफिक्स व्ह्यू मध्ये दिसते.
13:26 असाईनमेंट म्हणून,

त्याच विंडोवर पंचकोन आणि षटकोन काढा.

13:32 पंचकोनाला 0.5 च्या गुणकाने विभाजित करा

षट्कोनाला 3 च्या गुणकाने विभाजित करा

13:40 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
13:44 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो

सममिती आणि सममितीचे विविध प्रकार Line Point

13:56 Rotation

Translational Scale.

14:02 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.

कृपया डाउनलोड करुन पहा.

14:10 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.

14:20 कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
14:24 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:36 मी राधिका आपला निरोप घेते.

धन्यवाद

Contributors and Content Editors

Radhika