PhET/C3/Natural-Selection/Marathi
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Natural Selection या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.
|
00:08 | या पाठात, Natural Selection, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. |
00:17 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04
|
00:26 | जावा वर्जन 1.8.0,
|
00:30 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे. |
00:35 | हा पाठ समजण्यासाठी, जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राचे ज्ञान असावे. |
00:41 | हे सिम्युलेशन वापरून, पुढील गोष्टींचा सशांच्या लोकसंख्येवरील परिणाम बघणार आहोत जसे की,
म्युटेशन्स (उत्परिवर्तन) आणि सिलेक्शन(निवड) घटक, |
00:52 | पर्यावरण,
पेडिग्री(वंशावळ). |
00:55 | आता सुरूवात करू या. |
00:58 | Mutations-
म्युटेशन्स हे जेनेटिक घटकांमधील nucleotide sequence चे बदल होत. ते संततीमधे संक्रमित केले जातात. |
01:11 | म्युटेशन्स हे सजीवाच्या दृश्य गुणधर्मात किंवा phenotype मधे बदल घडवतात किंवा घडवत नाहीत. |
01:18 | म्युटेशन्सची आनुवांशिकता डॉमिनंट (प्रभावी) किंवा रिसेसिव्ह (अप्रभावी) असू शकते. |
01:25 | सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा. |
01:30 | मी डाउनलोड्स फोल्डरमधे Natural Selection सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे. |
01:37 | jar फाईल उघडण्यासाठी टर्मिनल उघडा. टर्मिनल प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा. |
01:48 | java space hyphen jar space natural-selection_en.jar टाईप करून एंटर दाबा. |
02:03 | बाउजरमधे html फॉरमॅटमधे फाईल उघडेल. |
02:08 | Natural Selection सिम्युलेशनचा हा इंटरफेस आहे. |
02:13 | सिम्युलेशन पॅनेलमधे ससा उड्या मारत असल्याचे दिसेल.
इंटरफेस खालील भागात असलेल्या Pause बटणावर क्लिक करा. |
02:22 | आता इंटरफेस समजून घेऊया. |
02:25 | इंटरफेसमधे सिम्युलेशन पॅनेल आहे. |
02:29 | डावीकडे, Add Mutation आणि
Edit Genes, |
02:35 | मध्यभागात आलेख,
Time until next generation हा प्रोग्रेस बार, |
02:42 | Play/Pause बटण, Step बटण, |
02:46 | उजवीकडे, Selection Factor,
Environment, आणि Chart आहेत. |
02:54 | Reset All button बटणावर क्लिक केल्यावर हे तुम्हाला परत मूळ बिंदूवर घेऊन जाईल. |
02:59 | येथे डिफॉल्ट सेटिंग्ज ठेऊया: Selection Factor साठी None,
Environment साठी Equator, Chart साठी Population . |
03:11 | Population विरूध्द Time या आलेखाचे निरीक्षण करा. |
03:15 | हा y अक्षावर सशांची संख्या आणि x अक्षावर time दाखवतो. |
03:22 | इंटरफेसच्या तळाशी असलेल्या Play बटणावर क्लिक करा. |
03:26 | आलेखात काळ्या रंगाची रेष उजवीकडे कशाप्रकारे सरकत आहे याचे निरीक्षण करा. |
03:31 | सिम्युलेशन अधिक वेगाने चालवण्यासाठी Step बटणावर क्लिक करत रहा. |
03:37 | एकही ससा शिल्लक न राहिल्यास 'Game Over असा पॉप अप बॉक्स दिसेल.
ज्यामधे “All of the bunnies died!” असा मेसेज दिसेल. |
03:48 | सिम्युलेशन पुन्हा सुरू करण्यासाठी Play Again बटणावर क्लिक करा. |
03:53 | सिम्युलेशनमधे आणखी एक ससा समाविष्ट करण्यासाठी Add a Friend बटणावर क्लिक करा. |
03:58 | इंटरफेसच्या खालील भागातील Pause बटणावर क्लिक करा. |
04:03 | Generations of Progeny (संततींच्या पिढ्या).. |
04:06 | प्रत्येक ओळीत उजवीकडील लेबल्स आणि डावीकडील रोमन अंकांचे निरीक्षण करा.
P ही पिढी पहिल्या ओळीत दाखवली आहे. |
04:17 | F1 ही पिढी दुसऱ्या ओळीत आहे जी P या पिढीच्या संततीपासून बनली आहे.
आणि अशाप्रकारे हे पाचव्या ओळीपर्यंत आहे. |
04:30 | F3 पर्यंत संख्येतील वाढ होऊ देणार आहोत. जोडीच्या मेटिंगनंतर या तीन पायऱ्या आहेत. |
04:41 | इंटरफेसच्या खालील भागातील Play बटणावर क्लिक करा. |
04:45 | जेव्हा नवी पिढी सुरू होते तेव्हा प्रोग्रेस बार पूर्ण भरलेला दिसेल. |
04:52 | नव्या पिढीची वाढ होण्यास सुरूवात होताच प्रोग्रेसबार डावीकडे सरकू लागेल. |
04:58 | Pause बटणावर क्लिक करा. |
05:01 | झूम आऊट करण्यासाठी आलेखाच्या डाव्या कोपऱ्यात वरती असलेल्या दुसऱ्या बटणावर क्लिक करा. |
05:08 | पुढच्या पायरीची उंची आपण पाहू शकतो. |
05:12 | काळ्या रंगाची रेष आलेखात सशांची एकूण संख्या दर्शवते. |
05:17 | Selection Factor खालील 'Food रेडिओ बटणावर क्लिक करा. |
05:22 | Add Mutation खालील Long Teeth बटणावर क्लिक करा. |
05:27 | सिम्युलेशन पॅनेलच्या खालील भागात Mutation coming असा टेक्स्ट बॉक्स उघडेल. |
05:33 | चमकणाऱ्या विजेचे चित्र असलेला पिवळ्या रंगाचा त्रिकोण दिसेल. |
05:37 | हे म्युटेशन दर्शवते. टेक्स्ट बॉक्समधे आपल्याला लांब दात असलेले चित्र दिसेल. |
05:45 | Edit Genes खालील Teeth या लेबलच्या पुढील ओळी सक्रिय झालेल्या आहेत. |
05:52 | तेथे आता रेडिओ बटणांवर क्लिक करता येईल. |
05:56 | प्रत्येक ओळीसाठी Dominant आणि Recessive या स्तंभांखाली दोन पर्याय दिसतील. |
06:03 | प्रत्येक ओळीच्या डावीकडे लांब आणि आखूड दातांची चित्रे आहेत. |
06:09 | डिफॉल्ट रूपात dominant म्युटेशनसाठी लांब दात आणि recessive साठी आखूड दात निवडलेला आहे. |
06:17 | म्युटेशन समाविष्ट केल्यावर प्रोग्रेसबार आणि आलेखाचे निरीक्षण करा. |
06:22 | म्युटेशननंतर आणखी तीन पिढ्यांसाठी लोकसंख्या वाढू द्या.
Step बटणावर क्लिक करत रहा. |
06:33 | आलेखातील दोन अरूंद स्टेप्समधील अंतर हे एका पिढीशी संबंधित आहे. |
06:41 | जोपर्यंत स्टेप्स दिसत नाहीत तोपर्यंत आलेखामधील दुसऱ्या Zoom Out बटणावर क्लिक करा. |
06:47 | म्युटेशन आणि फुड निवडल्यावर आलेखामधे वेगवेगळ्या रंगाच्या रेषा कशा दिसतात ते बघा. |
06:56 | म्युटेशन्स आणि सिलेक्शन घटक यांच्या घडण्याच्या वेळा लोकसंख्या वाढीवर परिणाम करतील. |
07:03 | आलेखाखालील संकेत सूची विविध रंग आणि त्यांचे अर्थ दर्शवते. |
07:09 | आपण लांब दातांसाठी डॉमिनंट म्युटेशन समाविष्ट केलेले आहे. |
07:14 | लांब दातांसाठी मॅजेंटा रंगाची आणि आखूड दातांसाठी ऑलिव्ह रंगाची रेष दिसेल. |
07:23 | सुरूवातीला ऑलिव्ह रंगाची रेष मॅजेंटा रंगाच्या रेषेच्या वर आहे.
आखूड दातांच्या सशांची संख्या लांब दातांच्या सशांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. |
07:36 | नंतर मॅजेंटा रंगाची रेषा ऑलिव्ह रंगाच्या रेषेच्या वर आहे. |
07:41 | आखूड दात असलेल्या सशांच्या तुलनेत लांब दातांच्या सशांची संख्या वाढली आहे. |
07:49 | याचा अर्थ उपलब्ध अन्न खाऊन जगण्यासाठी सशांना लांब दात मदत करतात. |
07:57 | Fur Mutation: सशांच्या जगण्यावर फर म्युटेशनचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी कंडिशन्स सेट करा. |
08:06 | dominant म्युटेशन म्हणून तपकिरी फर आणि recessive म्युटेशनसाठी पांढरी फर ठेवा. |
08:13 | selection factor मधे wolves (लांडगे) पर्याय निवडा. |
08:17 | म्युटेशन नंतर आणखी तीन पिढ्यांसाठी लोकसंख्या वाढू द्या. |
08:25 | लांडगे कशाप्रकारे आत बाहेर करत आहेत, सशांना मारत आहेत याचे निरीक्षण करा. |
08:31 | म्युटेशन समाविष्ट केल्यावर तपकिरी रंगाचे ससे दिसायला लागले. |
08:37 | लक्षात घ्या, तपकिरी फर व्यतिरिक्त डॉमिनंट लांब दाताच्या म्युटेशनचा परिणाम अजूनही दिसत आहे. |
08:46 | आलेख आणि सिम्युलेशन पॅनेलमधे पांढऱ्या आणि तपकिरी फर असलेल्या सशांच्या संख्येची तुलना करा. |
08:55 | सुरूवातील तपकिरी सशांपेक्षा पांढरे ससे अधिक आहेत. |
09:02 | नंतर पांढऱ्यांच्या तुलनेत तपकिरी रंगांच्या सशांची संख्या वाढली आहे. |
09:10 | लांडगे सशांना मारत असल्यामुळे विषुववृत्तावर तपकिरी फर ही जगण्यासाठी फायदेशीर ठरते. |
09:18 | पर्यावरणाशी रंग जुळवून घेण्याच्या धोरणाला camouflage असे नाव आहे. |
09:24 | लांब आणि आखूड दातांच्या सशांच्या संख्येविषयी तुम्ही काय सांगाल? |
09:31 | कधीकधी म्युटेशन हे सर्व सशांचे phenotype बदलतात. |
09:37 | असे झाल्यास आलेख म्युटेशन झालेले आणि म्युटेशन न झालेले (जंगली) फेनोटाईप्समधे फरक दाखवणार नाही. |
09:45 | येथे लहान दाताच्या सशांपेक्षा लांब दातांचे ससे अधिक आहेत. |
09:53 | Tail Mutation-
सशांच्या जगण्यावर टेल म्युटेशनचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी कंडिशन्स सेट करा. |
10:02 | dominant म्युटेशन म्हणून लांब शेपटी आणि recessive म्युटेशन म्हणून आखूड शेपटी निवडा. |
10:09 | selection factor मधे wolves पर्याय निवडा. |
10:13 | म्युटेशननंतर आणखी तीन पिढ्यांसाठी लोकसंख्या वाढू द्या. |
10:20 | सिम्युलेशन अधिक वेगाने चालवण्यासाठी Step बटणावर क्लिक करत रहा. |
10:28 | दुसऱ्या झुम आऊट बटणावर क्लिक करा. |
10:31 | तपकिरी रंगाची फर, लांब दात आणि लहान शेपटी असलेल्या सशांच्या संख्यांची नोंद करा. |
10:38 | ही संख्या पांढऱ्या रंगाची फर, आखूड दात आणि लांब शेपूट असलेल्या सशांपेक्षा अधिक आहे. |
10:49 | तपकिरी फर आणि आखूड शेपूट लांडग्यांपासून वाचण्यास मदत करतात. |
10:55 | लांब दात वनस्पती खाण्याची क्रिया सोपी करून जगण्यास मदत करतात. |
11:01 | Chart खालील Pedigree वर क्लिक करा. |
11:04 | वरच्या भागात “Click a Bunny” हे टेक्स्ट दिसेल. |
11:08 | सिम्युलेशन पॅनेलच्या डाव्या कोपऱ्यात खाली असलेल्या सशावर क्लिक करा. |
11:16 | निवडलेला ससा निळ्या आयतांच्या आत कशाप्रकारे चौकटीबध्द केला आहे ते बघा. |
11:22 | निळ्या आयतात चौकटीबध्द केलेल्या सशासाठी pedigree chart दिसेल. |
11:28 | Pedigree विंडोमधे उजव्या कोपऱ्यात वरती असलेल्या बटणावर क्लिक करा. |
11:33 | Pedigree विंडो वेगळी होईल आणि त्याच्या मागे Population चार्ट उघडेल. |
11:41 | आता Pedigree विंडोचा आकार बदलू शकतो. |
11:46 | निवडलेल्या सशाच्या आधीच्या चार पिढ्यांच्या सशांचा रंग लक्षात घ्या. |
11:54 | सशांवरील लाल रंगाच्या फुल्या ते ससे मृत झाल्याचे दाखवतात. |
11:59 | चमकणाऱ्या विजेचे चिन्ह असलेला पिवळा त्रिकोण म्युटेशन दाखवतो. |
12:06 | हे त्या सशाचे म्युटेशन झाल्याचे दर्शवत असल्यामुळे त्याचा genotype आणि phenotype बदलला आहे. |
12:14 | Pedigree विश्लेषण, फेनोटाईप्सच्या डेटाच्या आधारे जीनच्या वारश्याचा अभ्यास करण्यास मदत करते. |
12:23 | Step बटणावर क्लिक करत रहा.
पृथ्वीवरील सर्व खंडांमधील ससे आपल्याला बघता येतील. |
12:33 | “Bunnies have taken over the world!” हा मेसेज दिसेल. |
12:38 | हे या परिस्थितीत केलेल्या सिम्युलेशनचे दीर्घकालीन परिणाम आहेत. |
12:44 | या ट्युटोरियलमधे दिलेली अतिरिक्त माहिती बघा. |
12:50 | थोडक्यात, |
12:52 | या पाठात Natural Selection PhET सिम्युलेशन कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक बघितले. |
13:00 | हे सिम्युलेशन वापरून, पुढील गोष्टींचा सशांच्या लोकसंख्येवरील परिणाम बघितला:
म्युटेशन्स आणि सिलेक्शन घटक पर्यावरण पेडिग्री (वंशावळ). |
13:13 | असाईनमेंट म्हणून -
Arctic वातावरणात म्युटेशन्स आणि सिलेक्शन फॅक्टर्सचा परिणाम बघण्यासाठी सशांचे निरीक्षण करा. |
13:23 | dominant आणि recessive म्युटेशन्सची अदलाबदल केल्यानंतर भिन्न परिस्थितींमधे,
pedigree मधील बदलांचे निरीक्षण करा. |
13:34 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
13:43 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
13:55 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
13:59 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
14:08 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
14:21 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |