PhET/C3/Photoelectric-Effect/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:30, 9 January 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Photoelectric Effect या PhET सिम्युलेशन वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात- Photoelectric Effect हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन कसे वापरायचे हे शिकणार आहोत.
00:15 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:22 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,


00:28 जावा वर्जन 1.7,
00:32 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
00:38 हे सिम्युलेशन वापरून विद्यार्थी पुढील गोष्टी करू शकतील,

1. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा अभ्यास,

00:44 2. Threshold frequency काढणे.
00:47 3. स्टॉपिंग पोटेंशियल आणि वर्क फंक्शन काढणे.
00:51 4. इलेक्ट्रॉन्सच्या करंट आणि उर्जेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास.
00:56 जेव्हा विशिष्ट वारंवारतेचा प्रकाश धातुच्या पृष्ठभागावर पडतो तेव्हा इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकले जातात.
01:04 बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या गतिज ऊर्जा मोजणाऱ्या डिटेक्टरद्वारे मोजली जाते.
01:11 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.


01:15 मी डाऊनलोड्स फोल्डरमधे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.


01:22 टर्मिनल उघडा.
01:24 प्रॉम्प्टवर: cd Downloads टाईप करून एंटर दाबा.
01:29 पुढे: java space hyphen jar space photoelectric_en.jar टाईप करून एंटर दाबा.
01:40 Photoelectric Effect सिम्युलेशन उघडेल.
01:44 टर्मिनल बंद करू नका अन्यथा ही चालू प्रक्रिया बंद होईल.
01:49 पुढे जाण्यासाठी Cancel वर क्लिक करा.
01:52 हा फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
01:57 या स्क्रीनच्या मेनूबारमधे- File, Options आणि Help हे मेनू आयटेम्स आहेत.
02:05 Options मेनूमधे, Show photons आणि Control photon number instead of intensity हे पर्याय आहेत.
02:14 स्क्रीनमधे एक दिवा आहे जो धातूच्या पृष्ठभागावर प्रकाश टाकतो.
02:19 संबंधित स्लायडर्स हलवून प्रकाशाची तीव्रता आणि तरंगलांबी बदलू शकतो.
02:26 संबंधित बॉक्सेसमधे प्रकाशाची तीव्रता आणि तरंगलांबीच्या व्हॅल्यूज देऊ शकतो.
02:33 Photoelectric इफेक्ट प्रयोग निर्वात कक्षात केला जातो.
02:38 एका निर्वात कक्षात धातूचा पृष्ठभाग आणि इलेक्ट्रॉन्सची गतिज उर्जा मोजणारा डिटेक्टर ठेवला आहे.
02:48 विद्युत मंडलात एक बॅटरी आणि विद्युतप्रवाह(करंट) मोजणारे उपकरण जोडलेले आहे.
02:53 बॅटरीबरोबर एक व्होल्टेज स्लायडर दिला आहे.
02:58 स्क्रीनच्या खालील भागात Play/Pause आणि Step ही बटणे आहेत.
03:04 स्क्रीनच्या उजवीकडे आपल्याला धातू निवडण्यासाठी Target ड्रॉप डाऊन बॉक्स दिसेल.
03:11 डीफॉल्ट रूपात, सोडियम हा Target धातू निवडला आहे.
03:16 निकालांच्या अचूकतेसाठी Intensity स्लायडर 50% वर हलवू.
03:23 Options मेनूमधे Show photons पर्यायावर क्लिक करा.
03:28 प्रकाश हा फोटॉन्सच्या रूपात पडत आहे.
03:34 Show photons पर्याय अनचेक करा.
03:36 डीफॉल्ट रूपात, wavelength स्लायडर 400 नॅनोमीटरवर आहे.
03:42 प्रकाश सोडियम धातूच्या पृष्ठभागावर पडताच इलेक्ट्रॉन्स बाहेर पडताना दिसत आहेत.
03:48 येणारे रेडिएशन आणि इलेक्ट्रान्सचे बाहेर पडणे यात वेळाचे अंतर नसते.
03:54 हे इलेक्ट्रान्स डिटेक्टरकडे जातात.
03:58 शून्य व्होल्टेजसाठी करंटची व्हॅल्यू 0.071 दाखवत आहे.
04:05 Graphs खाली पुढील चेक बॉक्सेस आहेत -
04:09 Current Vs battery voltage,
04:12 Current Vs light intensity,
04:15 Electron energy Vs light frequency.
04:19 Current vs battery voltage चेकबॉक्सवर क्लिक करा.
04:23 current vs battery voltage चा आलेख आपल्याला दिसेल.
04:29 आलेखावरील लाल ठिपक्याचे निरीक्षण करा.
04:32 voltage स्लायडर हळूहळू 0 पासून 6 व्होल्ट्स पर्यंत ड्रॅग करा.
04:38 आपण व्होल्टेज वाढवत नेले तरी करंट स्थिर राहतो हे लक्षात घ्या.
04:44 हे लाल रंगाच्या रेषेने दाखवले आहे.
04:48 जसे आपण व्होल्टेज वाढवत जातो, फोटोइलेक्ट्रॉन्सची गती वाढते.
04:53 प्रकाशाची तीव्रता करंटवर कसा परिणाम करते ते पाहू.
04:58 Current vs light intensity चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:03 Intensity स्लायडर 90% पर्यंत ड्रॅग करा.
05:08 तीव्रता वाढवली असता करंट सरळ रेषेत वाढतो हे लक्षात घ्या.
05:14 हे हिरव्या रंगाच्या रेषेने दाखवले आहे.
05:18 प्रकाशाची तीव्रता वाढवली असता फोटोइलेक्ट्रिक करंटचे परिमाण वाढते.
05:24 आता करंटची व्हॅल्यू 0.127 आहे.
05:30 Intensity स्लायडर पुन्हा 50% वर ड्रॅग करा.
05:35 आता Electron energy Vs light Frequency आलेखाच्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:42 wavelength स्लायडर UV भागाच्या दिशेला ड्रॅग करा.

आलेखाचे निरीक्षण करा.

05:49 इलेक्ट्रॉन्सची उर्जा वारंवारतेनुसार सरळ रेषेत वाढत आहे हे बघा.
05:55 हे निळ्या रेषेने दाखवले आहे.
05:59 करंटमधील बदलाचे निरीक्षण करा.
06:02 वारंवारतेतील वाढ फोटोइलेक्ट्रॉन्सची उर्जा वाढवते.
06:08 वारंवारता वाढल्यामुळे फोटॉन्सकडून इलेक्ट्रॉन्सला मिळालेली उर्जा वाढलेली आहे.
06:15 याचा परिणाम इलेक्ट्रॉन्सची गतिज उर्जा वाढण्यावर होतो.
06:21 Camera आयकॉनवर क्लिक करा.
06:24 स्नॅपशॉट विंडो उघडेल.
06:27 हा Graphs आणि Experimental Parameters बद्दलची माहिती देईल.
06:33 हा स्नॅपशॉट वापरून आपण आलेखातील विविध सेटिंग्जची तुलना करू शकतो.
06:39 स्नॅपशॉट विंडो बंद करा.
06:42 आता आपण Threshold Frequency कशी मिळवायची याबद्दल जाणून घेऊ.


06:48 फोटोइलेक्ट्रिक परिणामासाठी प्रत्येक धातूला एक न्यूनतम वारंवारता आहे.
06:55 ह्या वारंवारतेला Threshold Frequency म्हणतात जी ʋ०(न्यू झिरो) ने दाखवली जाते.
07:01 Threshold Frequency च्या खाली फोटोइलेक्ट्रीक इफेक्ट दिसू शकत नाही.
07:07 wavelength स्लायडर विजिबल रिजनच्या दिशेला ड्रॅग करा.
07:12 कोणत्या तरंगलांबीला इलेक्ट्रॉन बाहेर पडणे थांबते याचे निरीक्षण करा.
07:18 आपल्या लक्षात येईल की 540 nm ला सोडियममधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणे बंद झाले आहे.
07:25 wavelength च्या बॉक्समधे 539 nm टाईप करून निरीक्षण करा.
07:32 सोडियम धातूच्या पृष्ठभागावरून 539 nm वर इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला सुरूवात होईल.
07:39 याचा अर्थ सोडियमसाठी 539 nm ही threshold wavelength आहे.
07:45 येथे करंटची व्हॅल्यू शून्य आहे.
07:49 आता threshold frequency ची व्हॅल्यू मिळवू.
07:54 येथे wavelength नॅनो मीटर्स(nm) मधे दाखवली आहे.
07:58 मी 10 च्या वजा 9 व्या घाताने गुणून ती व्हॅल्यू मीटर्समधे रूपांतरित करणार आहे.
08:05 पुढील सूत्र वापरून Threshold frequency काढता येऊ शकते.
08:10 0.56 गुणिले 10 चा 15 वा घात Hz इतकी सोडियमची Threshold frequency आहे.
08:18 आता Target म्हणून Platinum निवडू.
08:22 ड्रॉप डाऊन ऍरोवर क्लिक करून Platinum हा पर्याय निवडा.
08:26 या wavelength वर आपल्याला फोटोइलेक्ट्रॉन्स बाहेर पडताना दिसत नाहीत.
08:31 इलेक्र्टॉन बाहेर पडायला सुरूवात होईपर्यंत स्लायडर UV भागात ड्रॅग करा.
08:39 कमी wavelength च्या भागात wavelength स्लायडर ड्रॅग करा.
08:45 लक्षात घ्या की विविध उर्जेचे इलेक्ट्रॉन्स मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.
08:52 सर्वोच्च उर्जा असलेले इलेक्ट्रॉन्स बघण्यासाठी Show only highest energy electrons च्या चेकबॉक्स वर क्लिक करा.
09:00 विविध उर्जांचे इलेक्ट्रॉन्स दाखवण्यासाठी तो बॉक्स अनचेक करा.
09:05 असाईनमेंट म्हणून, Platinum ची Threshold Frequency काढा.
09:11 आता आपण work function आणि stopping voltage ची किंमत काढू.
09:17 वर्क फंक्शन म्हणजे फोटोइलेक्ट्रिक परिणाम सुरू होण्यासाठी लागणारी न्यूनतम उर्जा.
09:24 वेगवेगळ्या धातूंसाठी वेगवेगळ्या वर्क फंक्शन व्हॅल्यूज असतात.
09:29 हे ϕ0(फाय झिरो) ने दाखवले जाते.
09:32 ϕ0= hʋ0 (फाय झिरो बरोबर h गुणिले न्यु झिरो) हे वर्क फंक्शनचे सूत्र आहे.
09:38 low ionization enthalpy व्हॅल्यूज असलेल्या मूलद्रव्यांची वर्कफंक्शन कमी असतात.

उदाहरणार्थ: लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम.

09:51 सोडियमचे वर्क फंक्शन काढूया.
09:55 w0 = hʋ0 हे सूत्र वापरून वर्क फंक्शन काढता येते.
10:04 सोडियमचे वर्क फंक्शन 2.31 eV (इलेक्ट्रॉन व्होल्टस) इतके आहे.
10:10 तसेच कॅल्शियमचे वर्क फंक्शन 2.9 eV (इलेक्ट्रॉन व्होल्टस) इतके आहे.


10:17 स्टॉपिंग पोटेंशियल हे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या बाजूला पोचण्यापासून रोखणारे ऋण व्होल्टेज असते.
10:26 स्टॉपिंग पोटेंशियलला फोटोइलेक्ट्रिक करंट शून्य होतो.
10:31 सोडियमचे स्टॉपिंग पोटेंशियल कसे काढायचे ते पाहू.
10:37 टारगेट ड्रॉपडाऊनमधे सोडियम धातू निवडा.
10:41 wavelength स्लायडर, सोडियमची threshold wavelength,

539 नॅनो मीटर पर्यंत ड्रॅग करा.

10:51 व्होल्टेज स्लायडर ऋण व्होल्टेजकडे ड्रॅग करा.
10:56 कुठल्या व्होल्टेजला इलेक्ट्रॉन्स डिटेक्टरपासून उलट फिरतील?
11:01 -0.01 V(व्होल्टस) ला इलेक्ट्रॉन्स डिटेक्टरपासून उलट फिरतील.
11:08 -0.04 व्होल्टसवर सोडियममधून एकही इलेक्ट्रॉन उत्सर्जित होत नाही याचे निरीक्षण करा.
11:16 असाईनमेंट म्हणून, झिंक, कॉपर आणि कॅल्शियमचे वर्क फंक्शन काढा.
11:22 त्याच धातूंचे स्टॉपिंग पोटेंशियलदेखील काढा.
11:27 थोडक्यात,

या पाठात आपण,

Photoelectric Effect, या PhET सिम्युलेशनबद्दल शिकलो.

11:36 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो :

फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट,

11:41 Threshold Frequency काढणे,
11:44 स्टॉपिंग पोटेंशियल आणि वर्क फंक्शन काढणे,
11:48 आणि इलेक्ट्रॉन्सच्या करंट आणि उर्जेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास.


11:54 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

12:03 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
12:13 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
12:17 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
12:22 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


12:31 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

12:43 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali