PhET/C3/Pendulum-Lab/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:25, 9 January 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Pendulum Lab सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात, Pendulum Lab , या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.


00:13 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:20 जावा वर्जन 1.8.0
00:25 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 62.0.3 वापरत आहे.


00:31 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:38 हे सिम्युलेशन वापरून, आपण सिंपल हार्मोनिक मोशनचे(सरल आवर्त गती) वर्णन करणार आहोत.
00:44 लंबकाच्या आंदोलनाचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
00:48 लंबकाच्या आंदोलनावर परिणाम करणारे घटक शोधणार आहोत.
00:54 लंबकाच्या गतीच्या संदर्भात ऊर्जा अक्षय्यतेचे स्पष्टीकरण करणार आहोत.
01:00 लंबकांच्या जोडीच्या आंदोलनांचे प्रात्यक्षिक बघु.
01:05 इतर खगोलीय वस्तूंवर लंबकाच्या दोलनांचे प्रात्यक्षिक बघु.
01:11 साध्या पेंडुलममध्ये जड गोळ्याला एक दोरी बध्द केलेली असते.
01:17 आता सरल आवर्त गतीची व्याख्या पाहू.
01:21 आंदोलक पदार्थावरील बल हे त्याच्या माध्य स्थितिपासूनच्या विस्थापनाशी समानुपाती असते तेव्हा सिंपल हार्मोनिक मोशन निर्माण होते.
01:33 म्हणजेच F α -x.
01:38 SHM मधे गतिज आणि स्थितिज उर्जेची सतत अदलाबदल होत असते.
01:45 येथे यांत्रिक ऊर्जा अक्षय्य राहते.
01:49 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
01:53 मी डाउनलोड्स फोल्डरमधे सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.
01:58 pendulum-lab_en.html फाईलवर राईट क्लिक करा.
02:02 Open with Firefox Web Browser हा पर्याय निवडा.
02:07 Pendulum Lab सिम्युलेशन उघडेल.
02:11 Pendulum lab सिम्युलेशनमधे, Intro ,Energy ,Lab हे तीन स्क्रीन आहेत.
02:21 Intro स्क्रीन उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
02:25 या स्क्रीनमधे निळ्या रंगाचा लंबक आहे.
02:30 लंबकाच्या कोनातील बदल दर्शवण्यासाठी कोनमापक आणि,
02:35 दोरीच्या बध्द बिंदूपासून वस्तुमान केंद्रापर्यंतचे अंतर मोजण्यासाठी मोजपट्टी आहे .
02:41 लंबकाची लांबी आणि वस्तुमान बदलण्यासाठी Length आणि Mass हे स्लायडर्स आहेत.
02:47 गुरुत्वाकर्षण आणि घर्षण यात बदल करण्यासाठी Gravity आणि Friction हे स्लायडर्स आहेत.


02:53 स्क्रीनच्या डावीकडील कोपऱ्यात खाली राखाडी रंगाचा बॉक्स आहे.
02:58 यामधे पुढील चेकबॉक्स आहेत.
03:02 Ruler , Stopwatch आणि Period Trace.
03:09 स्क्रीनच्या खालील भागात Pendulum आणि Pair of pendulum ही बटणे आहेत.
03:16 लंबकाचे दोलन थांबवण्यासाठी Stop बटण आहे.
03:21 Play/Pause आणि Step ही बटणे आहेत.
03:25 ऍनिमेशनचा वेग बदलण्यासाठी Normal किंवा Slow ही रेडिओ बटणे आहेत.
03:30 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटण आहे.
03:35 लंबकासाठी बॉबवरील संदर्भ रेषा वस्तुमानाचे केंद्र आहे.
03:41 लंबकाचा कोन 180 ते वजा 180 अंशापर्यंत बदलता येऊ शकतो.
03:47 लंबक एका विशिष्ट कोनावर जसे की, 30 अंशावर ड्रॅग करा आणि दोलन सुरू करा.
03:55 डिफॉल्ट रूपात लंबकाची लांबी 0.70 m आहे.
04:01 आता Length स्लायडरवर क्लिक करून तो डावीकडे 0.30 m पर्यंत ड्रॅग करा.
04:08 लक्षात घ्या की, लंबकाची लांबी कमी केल्यावर तो अधिक वेगाने दोलित होतो.
04:14 स्लायडर पुन्हा 0.70 m वर ड्रॅग करा.
04:19 डिफॉल्ट रूपात लंबकाचे वस्तुमान 1 किलोग्रॅम आहे.
04:24 मास स्लायडरवर क्लिक करून तो डावीकडे 0.50 किलोग्रॅमपर्यंत ड्रॅग करा.
04:32 वस्तुमानात बदल केल्यावर त्याचा लंबकाच्या दोलनावर कोणताही परिणाम झालेला नाही.
04:39 Friction स्लायडर None वर आहे.
04:43 आता Friction स्लायडरवर क्लिक करून तो Lots वर ड्रॅग करा.
04:48 लंबकाच्या दोलनांचा वेग कमी झाल्याचे निरीक्षण करा.
04:53 थोड्या वेळाने लंबकाचे दोलन थांबेल.
04:57 घर्षणात झालेल्या वाढीमुळे लंबकाच्या दोलनावर विपरीत परिणाम होतो.
05:04 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
05:09 आता वेगवेगळ्या लांबीच्या लंबकांच्या 10 दोलनांसाठी लागणारा वेळ मोजू या.
05:16 लंबकाची लांबी आणि 10 दोलनांसाठी लागणारा वेळ दाखवण्यासाठी एक सारणी बनवू.
05:24 पुढे 10 दोलनांसाठी लागणारा वेळ नोंदवण्यासाठी Stop watch निवडा.
05:31 आपण 0.70 m लांबीसाठी 10 दोलने मोजूया.
05:37 दोलनांची संख्या मोजण्यासाठी लंबकावर क्लिक करून तो 30 अंशाच्या कोनापर्यंत ड्रॅग करा.
05:44 आता 10 दोलने मोजूया.
05:47 एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा.
06:05 आलेली व्हॅल्यू टेबलमधे नमूद करा.
06:09 10 दोलनांसाठी लागणारा सरासरी वेळ काढण्यासाठी पुन्हा 0.70 m साठी वेळ मोजणे गरजेचे आहे.
06:19 पुढील 10 दोलने मोजण्यासाठी Stop watch च्या Reset बटणावर क्लिक करा.
06:26 दोलने थांबवण्यासाठी Stop बटणावर क्लिक करा.
06:31 लांबी बदलून 0.60 m करा.
06:35 0.60 m लांबीसाठी 10 दोलने मोजण्यासाठी त्याच स्टेप्स पुन्हा करा.
06:43 येथे मी दोन वेगळ्या लांबींसाठीची निरीक्षणे आधीच घेतली आहेत.
06:49 असाईनमेंट म्हणून, लंबकाची लांबी बदलून 0.50 m, 0.40 m आणि 0.30 m करा.
07:01 10 दोलने मोजा.
07:05 लागलेल्या वेळांच्या नोंदी करा.
07:08 पुढे आपण Energy स्क्रीनवर जाऊ.
07:12 इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या Energy स्क्रीन बटणावर क्लिक करा.
07:18 या स्क्रीनवर लंबकाच्या दोलनांच्या दरम्यान उर्जा कशी अक्षय्य राहते हे समजून घेऊ.
07:25 Energy Graph व्यतिरिक्त Intro स्क्रीन व Energy स्क्रीनमधील टुल्स जवळजवळ सारखीच आहेत.
07:34 लंबकावर क्लिक करून तो 60 अंशापर्यंत ड्रॅग करा आणि दोलन सुरू करा.
07:40 आलेखाचे निरीक्षण करा.
07:42 Gravity खालील ड्रॉपडाउनमधून Jupiter पर्याय निवडा.
07:47 आलेखातील बदलाचे निरीक्षण करा.
07:50 लंबकाच्या दोलनांच्या दरम्यान आलेखात होणारे बदल बघण्यासाठी Slow या रेडिओ बटणावर क्लिक करा.
07:58 येथे दिसेल की कडेच्या स्थानांवर स्थितिज उर्जा सर्वात जास्त आहे.
08:05 आणि माध्य स्थानी गतिज उर्जा सर्वात अधिक आहे.
08:10 म्हणून गती दरम्यान एकूण यांत्रिक उर्जा अक्षय्य राखली जाते.
08:16 Normal या रेडिओ बटणावर क्लिक करा.
08:19 आता आलेखात घर्षणाचा परिणाम बघणार आहोत.
08:23 Friction स्लाइडर Lots च्या दिशेने ड्रॅग करा.
08:28 लक्षात घ्या की घर्षण वाढल्यामुळे औष्णिक उर्जेत अचानक वाढ झालेली आहे.
08:35 काही काळाने एकूण यांत्रिक उर्जा आणि औष्णिक उर्जा समान होतील.
08:41 कारण की घर्षणामुळे लंबकाच्या दोलनांवर विपरीत परिणाम होतो.
08:47 आता आपण Lab स्क्रीनवर जाऊ.
08:50 मागील स्क्रीन्समधे असलेली टुल्स या स्क्रीनमधेही समाविष्ट आहेत.
08:57 तसेच डावीकडील कोपऱ्यात वरती velocity आणि Acceleration चे अतिरिक्त चेकबॉक्स आहेत.
09:04 आणि Period Trace च्या जागी Period Timer आहे.
09:08 लंबकांची जोडी निवडा.
09:11 येथे उजव्या कोपऱ्यात वरती दोन length आणि दोन mass स्लाइडर्स आहेत.
09:19 डिफॉल्ट रूपात दुसऱ्या लंबकाची लांबी 1 m आहे.
09:24 डिफॉल्ट रूपात वस्तुमान 0.50 kg आहे.
09:29 निळ्या रंगाचा लंबक 60 अंशापर्यंत ड्रॅग करून तो दोलित करा.
09:35 अशाचप्रकारे लाल लंबक ड्रॅग करा.
09:40 लक्षात घ्या की हिरवा रंग Velocity व्हेक्टरसाठी,
09:44 आणि पिवळा Acceleration साठी आहे.
09:47 Velocity चा चेकबॉक्स निवडा.
09:50 व्हेक्टरचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यासाठी Slow हे रेडिओ बटण सिलेक्ट करा.
09:56 येथे दिसेल की माध्यस्थानी वेग सर्वाधिक आहे.
10:01 तो कडेच्या स्थानांवर कमी होत जातो.
10:06 कारण माध्यस्थानी गतिज उर्जा सर्वाधिक आहे.
10:12 अशाचप्रकारे Acceleration व्हेक्टर निवडून त्वरणात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा.
10:20 असाईनमेंट म्हणून, कडेच्या स्थानांवर त्वरण सर्वाधिक का असते हे सांगा.
10:29 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
10:34 लंबक वापरुन, वेगवेगळ्या लांबीसाठी गणना केलेल्या आणि मोजलेल्या कालावधींची तुलना करू.
10:42 लांबी L, कालावधी T (गणना) आणि कालावधी T (मापन) अशाप्रकारे कॉलम असलेला तक्ता तयार करू.
10:51 T=2π√(l/g) हे सूत्र वापरून आपण कालावधी (Time period) मिळवू शकतो.
11:00 येथे ‘l’ म्हणजे लांबी आणि ‘g’ म्हणजे गुरुत्वीय त्वरण.
11:06 g ची किंमत = 9.81 m/s^2 आहे.
11:13 Period Timer पर्याय निवडा.
11:16 स्क्रीनच्या उजवीकडे Period Timer उघडेल.
11:21 कॉलममधे 0.70 m या लांबीची नोंद करा.
11:26 येथे मी आधीच सूत्र वापरून कालावधी मिळवला आहे.
11:32 आपण सिम्युलेशनमधून कालावधीचे मापन करणार आहोत.
11:38 आता लंबकावर क्लिक करून तो 40 अंशापर्यंत ड्रॅग करा.
11:43 Period Timer च्या स्टार्ट बटणावर क्लिक करा.
11:47 कालावधीची व्हॅल्यू स्क्रीनवर दिसेल.
11:51 मोजलेल्या कालावधीची कॉलममधे नोंद करा.
11:55 आता लांबी बदलून 0.60 m करा.
12:00 पुन्हा Period Timer वर क्लिक करा.
12:06 टेबलमधे व्हॅल्यूजची नोंद करा.
12:09 असाईनमेंट म्हणून, लंबकाची लांबी बदलून ती 0.50 m, 0.40 m, आणि 0.30 m करा.
12:21 मोजलेल्या कालावधींची नोंद करा.
12:24 सूत्राचा वापर करून कालावधी काढा.
12:27 सूत्राच्या सहाय्याने काढलेल्या आणि मोजलेल्या कालावधीच्या व्हॅल्यूजची तुलना करा.
12:34 पुढे सिम्युलेशन रिसेट करा.
12:37 लंबक 30 अंशावर नेऊन तो दोलित करा.
12:41 लक्षात घ्या की पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरण 9.81 मीटर प्रती सेकंद वर्ग आहे.
12:49 आता ड्रॉपडाउन सूचीतून ज्युपिटर पर्याय निवडा.
12:53 लंबकाच्या दोलनांमधील बदलाचे निरीक्षण करा.
12:58 गुरूवरील गुरुत्वीय त्वरण पृथ्वीपेक्षा अधिक आहे.
13:07 असाईनमेंट म्हणून, इतर खगोलीय वस्तूंवरील दोलनांचे निरीक्षण करा.
13:14 थोडक्यात,


13:16 या पाठात Pendulum lab PhET सिम्युलेशन कसे वापरायचे हे पाहिले.
13:24 सिम्युलेशनच्या मदतीने आपण सरल आवर्त गतीबद्दल जाणून घेतले.
13:30 लंबकाच्या दोलनांचे प्रात्यक्षिक बघितले.
13:34 लंबकाच्या दोलनांवर परिणाम करणारे घटक शोधले.
13:40 दोलनांच्या दरम्यान उर्जा कशी अक्षय्य राहते याचे प्रात्यक्षिक पाहिले.
13:45 लंबकांच्या जोडीच्या दोलनांचे प्रात्यक्षिक पाहिले.
13:50 इतर खगोलीय वस्तूंवर दोलनांचे निरीक्षण केले.
13:55 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
14:01 हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
14:04 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


14:14 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


14:18 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
14:22 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


14:30 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:37 अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
14:42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.


14:46 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali