PhET/C2/Energy-forms-and-changes/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:16, 9 January 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात दाखवणार आहोत: Energy Forms and Changes वरील PhET simulation.
00:15 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,

00:23 जावा वर्जन 1.7,
00:27 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
00:33 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:41 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:

1. वास्तविक जीवनातील उर्जेची अक्षय्यता.

00:50 2. विविध पदार्थांच्या औष्णिक वाहकतेची तुलना करणे.
00:55 3. उर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती घेणे.
00:58 हे सिम्युलेशन वापरून:

1. पदार्थ गरम किंवा थंड केले असता ऊर्जेचे वहन कसे होते ते पाहू.

01:07 2. उर्जा प्रणालीचा आराखडा बनवू.
01:10 3. ऊर्जा एका रूपातून दुसर्‍या रूपात कशी बदलते याचा अभ्यास करू.
01:15 ऊर्जा म्हणजे वस्तूंवर कार्य करण्याची क्षमता.
01:20 ही एक आदिश राशी आहे.
01:23 SI सिस्टीममध्ये ती ज्यूल्समध्ये मोजली जाते.
01:27 निसर्गात उर्जा अनेक प्रकारांमध्ये अस्तित्वात आहे. जसे की-
01:32 यांत्रिक ऊर्जा,
01:35 विद्युत ऊर्जा,
01:38 औष्णिक ऊर्जा,
01:40 प्रकाश ऊर्जा आणि
01:42 रासायनिक ऊर्जा.


01:45 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
01:50 मी डाऊनलोड्स फोल्‍डरमधे आधीच Energy Forms and Changes simulation डाउनलोड केले आहे.
01:57 सिम्युलेशन चालू करण्यासाठी, टर्मिनल उघडा.
02:01 प्रॉम्प्टवर टाइप करा: cd Downloads आणि एंटर दाबा.
02:08 टाइप करा: java space hyphen jar space energy hyphen forms hyphen and hyphen changes underscore en dot jar आणि एंटर दाबा.
02:24 एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस सिम्युलेशन उघडेल.
02:28 सिम्युलेशन स्क्रीनला वरती 2 टॅब आहेत- Intro आणि Energy Systems
02:35 डीफॉल्ट स्वरूपात, इंट्रो स्क्रीन उघडेल.
02:39 इंट्रो स्क्रीन आपल्याला पदार्थ गरम किंवा थंड केल्यास औष्णिक उर्जा कशी वाहते हे सांगेल.
02:47 स्क्रीनच्या डाव्या बाजूला तीन थर्मामीटर्सचा संच आहे.
02:52 स्क्रीनच्या उजव्या बाजूला Energy Symbols चा चेक बॉक्स आहे.
02:57 Energy Symbols च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
03:01 Iron ब्लॉक, Brick ब्लॉक आणि Water कंटेनरमधे उर्जा भाग दिसतील.
03:08 प्रत्येक पदार्थातील उर्जेच्या प्रमाणात त्यातील उर्जा भागांची संख्या असते.
03:14 या सेटअपमध्ये, औष्णिक उर्जेच्या स्वरूपात ऊर्जेचे संक्रमण होत आहे.
03:19 सिस्टीम गरम किंवा थंड करण्यासाठी दोन हीट रेग्युलेटर्स आहेत.
03:24 हीट रेग्युलेटर्स स्टँडसह दिले आहेत.
03:28 स्क्रीनच्या तळाशी ऍनीमेशनची गती नियंत्रित करण्यासाठी Normal आणि Fast Forward ही रेडिओ बटणे,
03:37 Play / Pause बटण,

Step बटण आणि

Reset All बटण आपल्याकडे आहे.

03:42 स्टँडवर Water कंटेनर ड्रॅग करा.
03:46 थर्मामीटर ड्रॅग करून कंटेनरला जोडा.
03:50 आता पाणी तापविण्यासाठी हीट रेग्युलेटरचा slider वरच्या दिशेने ड्रॅग करून धरून ठेवा.
03:57 तापमान वाढत असताना, पाण्याचे बाष्पीभवन होते आणि वाफ दिसून येते.
04:04 हेही लक्षात घ्या की काही ऊर्जा भाग वातावरणात पसरतात.
04:09 नंतर, पाणी थंड करण्यासाठी हीट रेग्युलेटरचा slider खालच्या दिशेने ड्रॅग करून धरून ठेवा.
04:16 तापमान कमी होत असताना, पाणी गोठते आणि बर्फ बनते.
04:22 कंटेनर ड्रॅग करा आणि workbench वर ठेवा.
04:26 आता Iron ब्लॉक ड्रॅग करा आणि पहिल्या स्टँडवर ठेवा.
04:31 थर्मामीटर ड्रॅग करून Iron ब्लॉकवर ठेवा.
04:35 Brick ब्लॉक आणि Water कंटेनर एका बाजूला हलवा.
04:40 गरम करायला सुरू करण्यापूर्वी, Iron ब्लॉकमधील उर्जा भागांची संख्या लक्षात ठेवा.
04:46 थर्मामीटरवर तापमानाचे निरीक्षण करा.
04:50 Iron ब्लॉक गरम करण्यासाठी हीट रेग्युलेटरचा स्लाइडर वरच्या दिशेने ड्रॅग करून होल्ड करा.
04:56 लक्षात घ्या, उष्णतेपासून उर्जा Iron ब्लॉकमधील उर्जा भागांमधे संक्रमित केली जाते.
05:03 येथे, Iron ब्लॉकची अंतर्गत उर्जा वाढते.
05:08 हे उष्णतेच्या स्त्रोतापासून Iron ब्लॉककडे जाणाऱ्या उष्णतेच्या प्रवाहामुळे होते.
05:13 Iron ब्लॉकमधील काही उर्जा भाग वातावरणात पसरल्याचे लक्षात घ्या.
05:19 त्यामुळे Iron ब्लॉकचे तापमान कमी होते.
05:25 पुन्हा Iron ब्लॉकला जास्तीत जास्त तापमानात गरम करा.
05:29 गरम केलेला Iron ब्लॉक ड्रॅग करा आणि Water कंटेनरमध्ये ठेवा.
05:34 उर्जा भाग गरम Iron ब्लॉककडून पाण्यात प्रवास करतात.
05:39 यामुळे Iron ब्लॉकचे तापमान कमी होते.
05:44 पाणी गरम होऊन पाण्याचे तापमान वाढते.
05:49 ही उष्णता संक्रमण प्रक्रिया पदार्थांमधे औष्णिक संतुलन होईपर्यंत चालूच राहते.
05:55 प्रक्रिया वेगाने करण्यासाठी Fast Forward पर्याय निवडू.
06:03 आता पुन्हा हीट रेग्युलेटरवर Iron ब्लॉक ठेवा.
06:08 Iron ब्लॉक थंड करण्यासाठी स्लाइडर खाली ड्रॅग करून होल्ड करा.
06:13 थर्मामीटर किमान तापमानात पोहोचेपर्यंत Iron ब्लॉक थंड करा.
06:19 पुन्हा थंड झालेला Iron ब्लॉक Water कंटेनरमध्ये ठेवा.
06:23 तापमानात झालेले बदल आणि ऊर्जा भागांचे झालेले संक्रमण लक्षात घ्या.
06:29 आता दोन्ही ब्लॉक्स स्टँडवर ठेवा.
06:33 थर्मामीटर ड्रॅग करून Brick ब्लॉकवर ठेवा.
06:37 तापमानात जास्तीत जास्त वाढ होताना दिसेपर्यंत ब्लॉक एक-एक करून गरम करा.
06:44 थर्मल संतुलन स्थापित होईपर्यंत प्रतीक्षा करा. तापमान कमी होत असल्याचे निरीक्षण करा.
06:53 Iron ब्लॉकमध्ये Brick ब्लॉकपेक्षा जास्त संख्येने उर्जा भाग आहेत हे लक्षात घ्या.
06:59 Iron मध्ये Brick पेक्षा जास्त औष्णिक वाहकता असल्याचे सूचित होते.
07:05 असाईनमेंट म्हणून:

Iron ब्लॉक आणि Brick ब्लॉक यांना एकाच वेळी उष्णता द्या.

07:13 गरम Brick ब्लॉकच्यावर गरम Iron ब्लॉक ठेवा आणि निरीक्षण करून स्पष्टीकरण द्या.
07:20 आता आपण Energy Systems स्क्रीनवर जाऊ.
07:24 Energy Systems टॅबवर क्लिक करा.
07:27 Energy Systems स्क्रीन उघडेल.
07:31 हा स्क्रीन दररोजच्या जीवनातील उर्जेच्या अक्षय्यतेबद्दल कल्पना देतो.
07:38 स्क्रीनच्या तळाशी उर्जा स्त्रोतांचा एक संच,
07:43 विद्युत ऊर्जानिर्मिती प्रणाली आणि रिसीव्हर्स आहेत.
07:50 Reset All बटण स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात उपलब्ध आहे.
07:56 डीफॉल्ट स्वरूपात, स्क्रीनमध्ये ऊर्जा स्त्रोत म्हणून नळ,
08:02 विद्युत ऊर्जानिर्मिती प्रणाली म्हणून टर्बाइन आणि थर्मामीटर बसवलेला Water कंटेनर रिसीव्हर म्हणून दाखवला जातो.
08:10 Energy Symbols चेकबॉक्सवर क्लिक करा.
08:14 Forms of Energy पॅनेल दिसेल.
08:18 Forms of Energy पॅनेल आपल्याला उर्जेचे विविध प्रकार ओळखण्यास मदत करते.
08:24 नळ चालू करण्यासाठी आता निळा स्लायडर ड्रॅग करा.
08:28 नळातून वाहणार्‍या पाण्यात यांत्रिक ऊर्जा आहे हे लक्षात घ्या.
08:34 या यांत्रिक ऊर्जेमुळे टर्बाइन फिरते ज्यामुळे विद्युत ऊर्जा तयार होते.
08:40 या उर्जेमुळे पाण्याचे तापमान वाढते.
08:45 तापमान वाढत असताना, पाण्याचे बाष्पीभवन होते आणि वाफ दिसते.
08:51 हे वातावरणात अधिक औष्णिक ऊर्जा देते.
08:56 येथे, सिस्टीमची संपूर्ण ऊर्जा स्थिर राहिल्यामुळे ऊर्जा अक्षय्यता पाळली गेली आहे.
09:02 चला आणखी एक ऊर्जा प्रणाली स्थापित करूया.
09:06 येथे आपण सूर्य हा उर्जा स्त्रोत म्हणून निवडू.
09:11 टर्बाइन काढून तिथे सोलर पॅनेल लावा.
09:14 आता Water कंटेनरऐवजी इनकँडेसंट बल्ब निवडा.
09:20 या प्रणालीमध्ये सुरुवातीला ढग नसतो.
09:24 येथे, सूर्य हा प्रकाश उर्जेचा स्रोत आहे.
09:28 ही उर्जा सोलर पॅनेलद्वारे विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी शोषली जाते.
09:34 या विद्युत उर्जेमुळे बल्ब प्रकाशमान होतात.
09:38 इनकँडेसंट बल्ब विद्युत ऊर्जेचे अधिक प्रमाणात औष्णिक उर्जेत आणि अगदी कमी प्रमाणात प्रकाश ऊर्जेत रूपांतर करतो.
09:47 कारण फिलामेंट गरम होत असते.
09:51 आता इनकँडेसंट बल्बच्या जागी फ्लोरोसंट बल्ब लावा.
09:56 फ्लोरोसंट बल्बच्या उर्जा निर्मितीचे निरीक्षण करा.
10:00 लक्षात घ्या की फ्लोरोसंट बल्ब अधिक प्रकाश उर्जा आणि कमी औष्णिक ऊर्जा देत आहे.
10:07 म्हणून फ्लोरोसंट बल्ब अधिक कार्यक्षम आहे.
10:11 आता सोलर पॅनेलवर ढगांचा परिणाम पाहूया.
10:15 Clouds स्लायडर None ते Lots असा हळूहळू ड्रॅग करा.
10:20 स्लाइडर ड्रॅग करताच ढग दिसू लागतील.
10:24 ढगांच्या उपस्थितीमुळे, सोलर पॅनेलवर प्रकाश उर्जा पोहोचत नाही.
10:30 म्हणून विद्युत उर्जेची निर्मिती थांबते.
10:34 असाईनमेंट म्हणून:

cycle-generator system निवडा.

10:41 पायडल मारण्यासाठी सायकलस्वाराने खाणे का गरजेचे आहे हे सांगा.
10:47 वेगवेगळ्या सिस्टीम्स सेट करा आणि त्या काही काळ चालू राहू द्या.
10:52 प्रत्येक यंत्रणेतील उर्जेतील बदलांचे निरीक्षण करा आणि आपली निरीक्षणे तक्त्यात लिहा.
10:59 थोडक्यात,
11:02 एनर्जी फॉर्म्स आणि चेंजेस यावरील PhET सिम्युलेशन कसे वापरायचे हे या पाठात पाहिले.
11:11 सिम्युलेशन वापरून आपण शिकलो,

1. वास्तविक जीवनातील उर्जेची अक्षय्यता.

11:19 2. विविध पदार्थांच्या औष्णिक वाहकतेची तुलना करणे.


11:24 3. उर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती घेणे.


11:27 सिम्युलेशन वापरून आपण,

1. पदार्थ गरम किंवा थंड होत असता ऊर्जेचे वहन कसे होते हे पाहिले.


11:35 2. उर्जा प्रणालीचा आराखडा बनवला.
11:38 3. ऊर्जा एका रूपातून दुसर्‍या रूपात कशी बदलते हे अभ्यासले.
11:43 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
11:52 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


12:01 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
12:05 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
12:09 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
12:17 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
12:29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali