PhET/C2/Color-Vision/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:14, 9 January 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Color Vision, या PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्स वरील पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात, Color Vision, , या PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्सचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.


00:17 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04,

00:25 जावा वर्जन 1.8
00:29 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे.
00:35 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिक आणि जीवशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:41 सिम्युलेशनद्वारे आपण कलर व्हिजन पाहू- जेव्हा मानवी डोळा,

पांढरा प्रकाश

00:50 वर्णपटातील दिसणारे भिन्न रंग
00:55 वर्णपटातील भिन्न रंगांचा दृश्य प्रकाश आणि फिल्टर्स


01:00 तांबडा, हिरवा आणि निळा प्रकाश स्वतंत्रपणे किंवा एकत्र करून पाहतो.
01:06 कृपया या ट्युटोरियलबरोबर दिलेले अतिरिक्त माहिती बघा.

सुरूवात करूया.

01:14 दृश्य प्रकाश

विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमचा एक भाग मानवी डोळ्याद्वारे दृश्य प्रकाश म्हणून ग्रहण केला जातो.

01:25 ह्या भागाची व्याप्ती 380 पासून 760 नॅनोमीटर्सपर्यंत आहे.
01:33 दृश्य वर्णपटाचे रंग VIBGYOR म्हणून लक्षात ठेवले जाऊ शकतात.
01:39 जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी, तांबडा
01:47 सर्वात कमी तरंगलांबी (सर्वाधिक वारंवारता) जांभळ्या रंगाची असते.
01:53 सर्वाधिक तरंगलांबी (सर्वात कमी वारंवारता) तांबड्या रंगाची असते.
01:59 सर्व रंग एकत्र झाल्यावर पांढरा प्रकाश मिळतो.
02:04 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.


02:09 मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Color Vision हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
02:16 सिम्युलेशन उघडण्यासाठी, color-vision_en.html या फाईलवर राईट क्लिक करा.
02:23 Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा.

ब्राऊजरमधे फाईल उघडेल.

02:32 हा Color Vision सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.


02:37 आता आपण इंटरफेस पाहू.
02:41 इंटरफेसमधे दोन स्क्रीन्स आहेत-


Single Bulb

RGB Bulbs

02:49 Single Bulb स्क्रीनवर क्लिक करा.
02:53 Single Bulb स्क्रीनवर उजवीकडे तोंड असलेली एक व्यक्ती दिसेल.

गळ्याच्या खाली दोन लहान प्रतिमा आहेत.

03:04 त्यातली पहिली हायलाईट केली आहे.

ही आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा दाखवते.

03:11 दुसर्‍या प्रतिमेवर क्लिक करा.

हायलाईट केल्यावर ती व्यक्तीच्या मेंदूतील क्रॉस सेक्शन दाखवते.

03:20 डोळ्यापासून मेंदूच्या वेगवेगळ्या भागात पसरलेल्या optic मज्जातंतूंचे निरीक्षण करा.
03:28 कलर व्हिजन,

प्रकाशग्रहण करणाऱ्या रेटिनातील Cone पेशी तरंगलांबींच्या काही रेंजसाठी संवेदनशील असतात.

03:39 पाने हिरव्या सोडून दृश्य प्रकाशाच्या इतर सर्व तरंगलांबी शोषून घेतात.
03:46 520 नॅनोमीटर्स तरंगलांबीचा हिरवा प्रकाश परावर्तित केला जातो आणि डोळ्यापर्यंत पोहोचतो.
03:54 येथे M किंवा गॅमा प्रकारचे cones कार्यान्वित केले जातात.
03:59 cones कडून दृश्य माहिती optic मज्जातंतूमार्फत रेटिनल गॅंग्लियाला पाठविली जाते.
04:07 दोन optic मज्जातंतू optic chiasma मध्ये एकमेकांना भेटतात आणि पुढे जातात.
04:14 आता त्यांना optic' ट्रॅक्टस म्हटले जाते आणि ते थलॅमसमधील synapse मधे प्रवेश करतात.
04:21 त्यानंतर ते मेंदूच्या मागील बाजूस असलेल्या occipital lobe मध्ये primary visual cortex पर्यंत पोचतात.
04:30 आपण सिम्युलेशनवर परत जाऊ.
04:34 त्या व्यक्तीच्या मस्तकावरील लंबवर्तुळाचे निरीक्षण करा.
04:39 व्यक्तीस दिसणारे रंग तिथे भरलेले असतील.
04:44 लक्षात घ्या, तळाशी Play/Pause बटण आणि त्यापुढे Step बटण आहे.
04:51 रीसेट बटण आपल्याला परत सुरवातीस नेईल.
04:55 त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोरील टॉर्च किंवा फ्लॅशलाईट पहा.
05:01 चालू आणि बंद करण्यासाठी टॉर्चवर तांबडे बटण आहे.
05:06 फ्लॅशलाईटवरील पहिल्या बल्बवर क्लिक करा.
05:11 हा पांढरा प्रकाश आहे.

फ्लॅशलाईटच्या तांबड्या बटणावर क्लिक करा.

05:18 फ्लॅशलाईटच्याखाली असलेली पहिली प्रतिमा डीफॉल्टरूपात हायलाईट केलेली आहे.
05:24 ह्यात प्रकाशझोत(बीम) दाखवला जातो.
05:28 फ्लॅशलाईटच्याखाली असलेल्या दुसर्‍या प्रतिमेवर क्लिक करा.
05:33 हे फोटॉनच्या रूपात प्रकाश दर्शवेल.
05:38 Pause बटणावर क्लिक करा.

Step बटण सक्रिय असल्याचे पहा.

05:45 फोटॉन्सची पायरीपायरीने होणारी हालचाल पाहण्यासाठी Step बटणावर क्लिक करा.
05:51 फ्लॅशलाईटमधून बीमवर परत येण्यासाठी पहिल्या प्रतिमेवर क्लिक करा.
05:57 त्या व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या पांढर्‍या लंबवर्तुळाचे निरीक्षण करा.
06:02 म्हणजे त्या व्यक्तीला फ्लॅशलाईटमधून येणारा प्रकाश पांढरा दिसतो आहे.
06:08 फ्लॅशलाईटवरील दुसर्‍या बल्बवर क्लिक करा.

दृश्य वर्णपटाचे सर्व रंग स्लायडर बल्ब कलरवर पहा.

06:19 बल्ब कलर स्लायडर एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत न्या.
06:24 ज्या रंगावर हँडल ठेवलेले आहे ते फ्लॅशलाईटच्या प्रकाशाचा रंग ठरवते.
06:31 लक्षात घ्या, त्या व्यक्तीच्या डोक्यावरील लंबवर्तुळे त्याच रंगाने भरलेली आहेत.
06:38 बल्ब कलर स्लायडर ड्रॅग करून त्या व्यक्तीस दिसणारा रंग तुम्ही बदलू शकता.

बल्ब कलर स्लायडर उजवीकडील तांबड्या रंगावर ड्रॅग करा.

06:50 त्या व्यक्तीच्या समोर एक toggle switch आहे तो पहा.

तो Filter Color स्लायडरला जोडलेला आहे.

06:59 लक्षात घ्या की Filter Color स्लायडरमधे सुध्दा दृश्य वर्णपट आहे.
07:06 toggle switch वर क्लिक करा.

फ्लॅशलाईटपासून निघणाऱ्या बीमच्या मार्गावर एक फिल्टर दिसेल.

07:16 Filter Color स्लायडर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ड्रॅग करा.
07:21 ज्या रंगावर हँडल ठेवलेले आहे ते फिल्टरचा रंग दर्शविते.
07:28 लक्षात घ्या, फिल्टर तांबडा आहे आणि तो तांबडा बीम पुढे पाठवत आहे.

त्या व्यक्तीला देखील दिवा तांबडा दिसत आहे.

07:38 Bulb Color स्लायडर जांभळ्या रंगाकडे ड्रॅग करा.

फ्लॅशलाईटमधून जांभळा प्रकाश बाहेर येईल.

07:56 परंतु फिल्टर तांबडा असल्यामुळे, त्या व्यक्तीपर्यंत कोणताही प्रकाश पोचत नाही.
07:52 म्हणजेच त्या व्यक्तीला प्रकाश दिसत नाही.
07:56 फिल्टर कलर स्लायडर डाव्या टोकाकडील जांभळ्या रंगावर ड्रॅग करा.
08:02 फिल्टर जांभळ्या रंगाचे झालेले दिसेल आणि जांभळा प्रकाश त्या व्यक्तीकडे पाठवला जाईल.

त्या व्यक्तीला जांभळा प्रकाश दिसत आहे.

08:13 बल्ब कलर स्लायडर उजव्या टोकाकडील तांबड्या रंगावर ड्रॅग करा.
08:19 अजूनही फिल्टर जांभळाच राहिला आहे परंतु प्रकाशाचा बीम तांबडा झाला आहे.
08:26 परंतु जांभळा फिल्टर तांबड्या रंगाचा प्रकाश पुढे पाठवत नसल्याने,

त्या व्यक्तीस प्रकाश दिसत नाही.

08:35 दोन्ही स्लायडर्स विविध रंगांवर ड्रॅग करून कुठल्या रंगाचा प्रकाश पुढे पाठवला जातो ते पहा.
08:43 तुम्हाला दिसेल की जेव्हा दोन्ही स्लायडर्स एकाच किंवा जवळील रंगावर असतात तेव्हा प्रकाश पुढे पाठवला जातो.
08:53 फिल्टर स्वतःच्या रंगाची तरंगलांबी वगळता इतर सर्व तरंगलांबींचा प्रकाश अडवतो.
09:01 फिल्टरच्या रंगांसाठी ट्रान्समिशन जास्तीत जास्त असते तर जवळच्या तरंगलांबींसाठी कमी होते.
09:09 असाईनमेंट म्हणून, फ्लॅशलाईटसाठी पांढरा प्रकाश निवडा आणि विविध फिल्टर्समधून पुढे जाणाऱ्या प्रकाशाचे रंग पहा.
09:22 आता इंटरफेसच्या तळाशी असणाऱ्या RGB Bulbs स्क्रीनवर क्लिक करा.
09:29 येथेही तुम्हाला उजवीकडे तोंड असलेल्या व्यक्तीचे चित्र दिसेल.

माणसाच्या मेंदूचा क्रॉस सेक्शन दाखवण्यासाठी दुसऱ्या प्रतिमेवर क्लिक करा.

09:41 इंटरफेसच्या तळाशी Play/Pause, Step आणि Reset ही बटणे दिसतील.
09:49 स्क्रीनवर तीन स्लायडर्स आणि तीन फ्लॅशलाईटस दिसतील.

सर्व स्लायडर्स न्यूनतम पातळीवर सेट केलेले आहेत.

10:00 सर्वात वर एक तांबडा, मधे दुसरा हिरवा आणि सर्वात खाली निळा स्लायडर आहे.
10:10 तांबडा स्लायडर सर्वाधिक पातळीपर्यंत ड्रॅग करा.


10:15 तांबड्या स्लाइडरच्या पुढील फ्लॅशलाइटमधून तांबडे फोटॉन कसे बाहेर पडतात ते पहा.
10:22 फोटॉन त्या व्यक्तीच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि त्या व्यक्तीला दिवा तांबडा दिसतो.
10:28 हिरवा स्लायडर सर्वाधिक पातळीपर्यंत ड्रॅग करा.


तांबडे आणि हिरवे फोटॉन तांबड्या आणि हिरव्या स्लायडर्सच्या पुढील फ्लॅशलाईट्समधून बाहेर पडताना दिसतील.

10:41 तांबडा आणि हिरवा रंग मिळून पिवळा रंग तयार होतो.

तांबड्या आणि हिरव्या प्रकाशासाठी संवेदनशील cones सक्रिय असल्यामुळे त्या व्यक्तीला रंग पिवळा दिसेल.

10:53 Pause बटणावर क्लिक करा.
10:56 निळा स्लायडर सर्वाधिक पातळीपर्यंत ड्रॅग करा.
11:00 Play बटणावर क्लिक करा. तिन्ही रंग मिसळल्यामुळे त्या व्यक्तीला प्रकाश पांढरा दिसतो हे पहा.
11:11 थोडक्यात,
11:14 या पाठात, Color Vision, , या PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्सचे प्रात्यक्षिक बघितले.


11:22 सिम्युलेशनद्वारे आपण कलर व्हिजन पाहिली- जेव्हा मानवी डोळ्याने,

पांढरा प्रकाश

11:31 वर्णपटातील दिसणारे भिन्न रंग
11:35 वर्णपटातील भिन्न रंगांचा दृश्य प्रकाश आणि फिल्टर्स


11:40 तांबडा, हिरवा आणि निळा प्रकाश स्वतंत्रपणे किंवा एकत्र करून पाहिला.
11:46 असाईनमेंट म्हणून, हे 6 रंग मिळविण्यासाठी तांबडा, निळा आणि हिरवा स्लायडर ऍडजस्ट करा.
11:55 या स्कीम्सची रचना करण्यासाठी तुम्ही कोणती RGB रंगसंगती वापराल?
12:01 इंटरनेटवर रंगचक्राची प्रतिमा पहा.
12:06 पुढील स्कीम्ससाठी रंगसंगती निवडा.
12:11 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

12:20 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

12:35 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
12:40 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
12:49 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

13:03 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali