PhET/C2/Graphing-Lines/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:50, 2 December 2019 by Manali (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 ग्राफिंग लाईन्स सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत.


00:05 या पाठात, Graphing Lines हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकणार आहोत.


00:12 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील गणिताचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:20 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.

00:35 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:

1. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमविषयी माहिती.

2. आलेख रेषेच्या slope ची गणना कशी करावी.

3. आलेख रेषा save करणे.

00:48 4. रेषेचा slope आणि intercept बदलणे.

5. linear समीकरणात, variable च्या बदलण्याचा रेषेवर होणारा परिणाम.

00:58 y=mx+b हे x आणि y या दोन व्हेरिएबल्सचे रेषीय समीकरण आहे. येथे, m हा रेषेचा slope आणि b हा intercept आहे.
01:12 x ची किंमत बदलली असता y च्या किंमतीतील बदल स्लोप दर्शवतो.

x = 0 असताना y च्या मूल्यास y-intercept म्हणतात.

01:26 आपण प्रात्यक्षिक सुरू करूया.
01:29 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
01:33 मी Downloads फोल्डरमधे Graphing Lines simulation आधीच डाऊनलोड करून घेतले आहे.


01:39 सिम्युलेशन उघडण्यासाठी graphing-lines_en.html या फाईलवर राईट क्लिक करा.

Open With Firefox Web Browser पर्याय निवडा. फाईल ब्राऊजरमधे उघडेल.

01:53 हा Graphing Lines सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
01:57 या इंटरफेसवर चार स्क्रीन्स आहेत- Slope, Slope-Intercept, Point-Slope आणि

Line Game.


02:06 Slope स्क्रीनवर क्लिक करा.
02:10 स्क्रीनवर x आणि y अक्षांसह कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे.
02:16 उजवीकडील फॉर्म्युला बॉक्स रेषेचा slope काढण्याचे सूत्र दर्शविते.
02:23 slope मोजण्यासाठी आपण y2, y1 आणि x2, x1 या व्हॅल्यूज इनपुट म्हणून वापरतो.
02:31 y2, y1 च्या डीफॉल्ट व्हॅल्यूज 4 आणि 2, आणि x2, x1 च्या 3 आणि 1 आहेत.
02:41 डीफॉल्ट मूल्यांचा वापर करून आलेख काढला आहे. येथे आपण स्लोप 1 आहे हे पाहू शकतो.
02:49 अप आणि डाऊन अ‍ॅरो बटण वापरून आपण y2, y1 आणि x2, x1 च्या व्हॅल्यूज बदलू शकतो.
02:57 Save Line बटण वापरून आलेख रेषा सेव्ह करता येते.
03:02 लाल वजा चिन्हावर क्लिक करून फॉर्म्युला बॉक्स स्क्रीनवरून काढू शकतो आणि हिरव्या अधिक बटणावर क्लिक करून दाखवू शकतो.
03:11 फॉर्म्युला बॉक्सच्याखाली Slope, Hide lines आणि Hide grid हे चेक बॉक्सेस आहेत.
03:19 Hide lines आणि Hide grid या चेक बॉक्सेसवर क्लिक केल्यास graph आणि grid दिसणार नाहीत. Slope चेकबॉक्स आपोआप नाहीसा होईल.
03:32 Slope चेकबॉक्स दिसण्यासाठी Hide lines आणि Hide grid चेक बॉक्सेस अनचेक करूया.
03:40 लक्षात घ्या की आलेख slope ची किंमत दाखवतो. जांभळे आणि पिवळे बिंदू हलवून x1, y1 आणि x2, y2 चे मूल्य बदलता येते हे पहा.
03:54 जसजसे आपण पॉइण्टस हलवितो, रेषांचा slope बदलत जातो.

x आणि y च्या मूल्यांमधील बदल फॉर्म्युला बॉक्समधे पहा.

04:04 स्क्रीनच्या तळाशी, पॉईंटचे कोऑर्डिनेट दाखवण्यासाठी असलेल्या राखाडी रंगाच्या बॉक्सला Point टूल्स म्हणतात.
04:14 कोऑर्डिनेट्स पाहण्यासाठी जांभळ्या आणि पिवळ्या बिंदूंवर Point टूल्स ड्रॅग करून ठेवा.
04:20 Point टूल्स परत तळाशी ड्रॅग करा.
04:24 (0, 0) या आरंभबिंदूशी जुळण्यासाठी जांभळा बिंदू ड्रॅग करा

टूलपैकी एक ड्रॅग करा आणि आरंभबिंदूवर ठेवा.

04:33 (5,5) या बिंदूशी जुळण्यासाठी पिवळा बिंदू ड्रॅग करा. रेषेचा स्लोप 1 असल्याचे दिसेल.
04:42 फॉर्म्युला बॉक्समधील Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.
04:49 पिवळा बिंदू (2,8) पर्यंत ड्रॅग करा.

point टूल ड्रॅग करून पिवळ्या बिंदूवर ठेवा. पिवळा बिंदू (2,8) वर असल्याची खात्री होईल.

05:02 आता स्लोप 4 आहे.
05:05 फॉर्म्युला बॉक्समधील Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.


05:11 पिवळा बिंदू (-5,5) पर्यंत ड्रॅग करा. point टूल ड्रॅग करून पिवळ्या बिंदूवर ठेवा.


05:19 आता स्लोप -1 आहे.
05:22 फॉर्म्युला बॉक्समधील Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.


05:28 point टूल पुन्हा आपल्या जागेवर ड्रॅग करा. पिवळा बिंदू (-2,8) पर्यंत ड्रॅग करा.
05:36 आता स्लोप -4 आहे.


05:39 Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.


05:44 आपण वेगवेगळ्या स्लोप्सच्या 4 रेषा काढल्या आहेत. लक्षात घ्या की रेषेच्या चढ/उताराचा संबंध स्लोपशी आहे.
05:53 असाईनमेंट म्हणून:

1. स्लोप कधी शून्य आहे आणि केव्हा अगणित आहे ते शोधा.

2. स्पष्टीकरण द्या.

06:04 इंटरफेसच्या खालील Slope-Intercept स्क्रीन पाहूया.
06:10 Slope-Intercept वर क्लिक करा. y= 2/3x+1 (2 by 3 x plus 1) रेषा असलेला स्क्रीन दिसेल.
06:21 येथे इंटरसेप्टची व्हॅल्यू 1 आहे.
06:25 या स्क्रीनमध्ये आपण 'm' आणि 'b' च्या व्हॅल्यूज बदलू शकतो.
06:30 जांभळा बिंदू y अक्षावर ड्रॅग करा. लक्षात घ्या हा बिंदू इंटरसेप्ट दर्शवितो.

जेव्हा आपण जांभळा बिंदू हलवितो तेव्हा रेषेचा इंटरसेप्ट बदलतो.

06:44 निळा बिंदू आलेखावर फिरण्यासाठी मुक्त आहे.

जेव्हा आपण निळा बिंदू हलवितो, तेव्हा रेषेचा स्लोप बदलतो.

06:53 सिम्युलेशन रीसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.

Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.


07:02 फॉर्म्युला बॉक्समधे m च्या सूत्रातील अंशाचे मूल्य 2 चे 3 करा.

लक्षात घ्या की स्लोप 1 आहे तर इंटरसेप्ट अजूनही 1 आहे.

07:14 आता पुन्हा m ची किंमत 2/3 करून घ्या आणि b ची व्हॅल्यू 4 करा.

लक्षात घ्या की नवीन रेष पहिल्या रेषेला समांतर आहे परंतु ती y अक्षाला 4 वर इंटरसेप्ट करते.

07:31 Save Line बटणावर क्लिक करा. रेष सेव्ह झाली आहे.
07:35 b ची व्हॅल्यू -2 करा, Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.


07:43 आपल्याकडे 3 समांतर रेषा आहेत ज्या y अक्षावर 3 वेगवेगळ्या बिंदूंवर इंटरसेप्ट करतात.
07:50 सिम्युलेशन रीसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.


07:55 b ची व्हॅल्यू शून्य करू. लक्षात घ्या, जांभळा बिंदू आरंभबिंदू आहे.
08:03 रेषा आता आरंभबिंदूतून जाते.
08:06 स्लोपच्या खालील चेकबॉक्सेस y=x आणि y=-x वर क्लिक करा.

लक्षात घ्या आपल्याकडे आरंभबिंदूतून जाणाऱ्या तीन रेषा आहेत.

08:19 आता Point-Slope स्क्रीनवर जाऊ.
08:23 इंटरफेसच्या तळाशी असलेल्या Point-Slope वर क्लिक करा.
08:28 Point-Slope स्क्रीनवर (x, y) मूल्यांचा संच समीकरणात भरला जातो .

या पद्धतीत x आणि y व्हॅल्यूज निश्चित असतात.

08:41 (x, y) च्या दिलेल्या मूल्यासाठी, y-y1 = m(x-x1) या सूत्राचा उपयोग करून m मोजता येऊ शकतो.
08:53 जेनेरिक पॉईंट (x1, y1) जांभळ्या बिंदूद्वारे दर्शविला आहे.
08:59 कोऑर्डिनेट्स पाहण्यासाठी Point टूल जांभळ्या बिंदूवर ड्रॅग करा.
09:04 Point टूल पुन्हा त्याच्या जागी नेऊन ठेवा.
09:07 रेषेचे समीकरण बदलण्यासाठी जांभळा आणि निळा हे दोन्ही बिंदू आलेखावर मुक्तपणे ड्रॅग करा.

जांभळा बिंदू (5,0) वर ड्रॅग करा आणि ठेवा.

09:20 नंतर निळा बिंदू (5,5) वर ड्रॅग करा.
09:24 लक्षात घ्या की रेषा y-अक्षाला समांतर आहे आणि स्लोप अगणित आहे.
09:31 Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.


09:35 x अक्षावर जांभळा बिंदू ड्रॅग करा.

लक्षात घ्या की x अक्षावर सर्वत्र स्लोप अगणित आहे.

09:45 आता लाइन गेम स्क्रीन वर जाऊ.
09:49 Line Game स्क्रीनवर क्लिक करा.
09:52 Line Game स्क्रीनमध्ये खेळण्यासाठी 6 विविध काठिण्य पातळ्या आहेत.

हे गेम या सिम्युलेशनचा वापर करून मिळवलेल्या ज्ञानाची चाचणी घेतील.

10:02 या खेळात स्क्रीनच्या तळाशी Timer आणि Sound बटणे आहेत.
10:08 प्रत्येक गेमवर क्लिक करा आणि खेळ खेळून बघा.
10:20 थोडक्यात,
10:22 या पाठात आपण Graphing Lines हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकलो.
10:29 सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकलोः

1. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमविषयी माहिती


2. आलेख रेषेच्या slope ची गणना कशी करावी

3. आलेख रेषा save करणे

10:43 4. रेषेचा slope आणि intercept बदलणे


10:47 5. linear समीकरणात variable च्या बदलण्याचा रेषेवर होणारा परिणाम


10:53 असाईनमेंट म्हणून:

1. Slope-Intercept स्क्रीन वापरुन, स्लोपचे मूल्य 1 केव्हा असेल ते शोधा.

2. Point-Slope स्क्रीन वापरून कोणत्या क्वाड्रंट्समधे स्लोप धन आहे ते शोधा.

11:09 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


11:17 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
11:29 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
11:32 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


11:41 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


11:53 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya