Blender/C2/3D-Cursor/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:05, 4 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.03 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.07 हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 2.59 मधील 3D कर्सर विषयक आहे.
00.15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00.25 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3Dकर्सर म्हणजे काय?
00.32 ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि 3D कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय, हे शिकू.
00.46 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे.
00.51 जर नसेल तर कृपया आमचे Installing Blenderवरील ट्यूटोरियल पहा.
00.57 3D कर्सर क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता.
01.06 चला ब्लेण्डर मध्ये 3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल.
01.12 ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे.
01.15 पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा . ब्लेण्डर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर लेफ्ट क्लिक करा.
01.27 ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
01.42 हे ब्लेण्डर 2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
01.54 ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले सर्व पर्याय समजू शकता.
02.01 इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया, यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा.
02.12 यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
02.20 स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा
02.25 स्प्लॅश स्क्रीन च्या शिवाय, ब्लेण्डर इंटरफेस वर इतर कुठेही माउस लेफ्ट -क्लिक करा.
02.32 आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता.
02.37 3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे.
02.43 आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही, म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल.
02.48 डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
02.51 यास डिलीट करण्यास, कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा , डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा.
02.58 येथे आता तुम्ही 3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल.
03.04 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश, 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट करणे आहे.
03.15 ADDवर जा. Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा.
03.19 तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता.
03.27 3D व्यू मध्ये नवीन क्यूब जुडलेली आहे.
03.30 तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे.
03.38 आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु.
03.44 प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे.
03.48 त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा.
03.53 मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे.
03.59 नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा.
04.10 3D कर्सर च्या नवीन स्थानावर UV स्फियर दिसत आहे.
04.15 आता आपण 3Dकर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु.
04.22 Object वर जा. Snap वर जा. हे स्नॅप मेन्यू आहे.
04.29 येथे अनेक पर्याय आहेत.
04.31 तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता.
04.38 Selection to cursor - निवडलेले आइटम 3D कर्सर मध्ये आणते.


04.45 उदाहरणार्थ, 3D कर्सर मध्ये क्यूब ला आणू.
04.50 क्यूब वर राइट-क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.
04.58 Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये आले आहे.
05.06 आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा.
05.17 कीबोर्ड शॉर्टकट साठी Gआणि Y दाबा.
05.23 3D व्यू मध्ये मूविंग ऑब्जेक्ट्स विषयक अधिक माहिती साठी Basic description of Blender interface हे ट्यूटोरियल पहा.
05.35 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा.
05.43 3D कर्सर नवीन स्थानामध्ये क्यूब च्या मध्यभागी आले आहे.
05.50 समजा तुमच्याकडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे,
05.59 Cursor to selected- 3D कर्सर ला दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्यभागी आणते.
06.07 मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
06.12 UVस्फियर निवडण्यासाठी Shift आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे.
06.22 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा.
06.30 3Dकर्सर दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी आले आहे.
06.36 lamp वर Shift आणि राइट क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
06.47 Cursor to Selected वर क्लिक करा. तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर आले आहे.
06.58 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका बिंदू वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे.
07.07 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
07.12 Cursor to Center वर क्लिक करा. 3Dकर्सर, 3D व्यू च्या मध्य भागी आले आहे.
07.22 ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा.
07.28 आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा.
07.39 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
07.44 Cursor to active वर क्लिक करा.
07.47 3Dकर्सर मागील सक्रिय निवड केलेल्या स्फियर च्या मध्य भागी दिसते.
07.56 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते.
08.03 परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08.08 आता 3D व्यू मध्ये विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करा.
08.16 या नंतर स्नॅप मेन्यू मधील स्नॅपिंग पर्यायाचा शोध घ्या. शुभेच्छा.


08.26 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08.31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
08.40 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09.00 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09.02 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.06 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते.
09.11 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09.17 आमच्या सह जुडण्यासाठी,
09.19 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana