Health-and-Nutrition/C2/Pre-pregnancy-Nutrition/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Marathi Narration |
0:01 | गर्भधारणापूर्व पोषण विषयी स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
0:05 | या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रजनन वयाच्या दरम्यान आणि गर्भधारणेच्या पूर्व काळातील पौष्टिक आहाराच्या गरजांबद्दल शिकू. |
0:14 | प्रथम आपण प्रोटीनपासून सुरुवात करूया. |
0:17 | स्नायूंच्या ऊतींच्या वाढीसाठी आणि देखभाल करण्यासाठी Protein आवश्यक असते. |
0:22 | हे पेशींच्या दुरुस्ती आणि हाडांच्या विकासामध्ये तसेच सांध्यासाठी मदत करते. |
0:27 | हे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यात आणि निरोगी यकृत राखण्यास मदत करते आणि ऊर्जा देखील देते. |
0:34 | Protein अशी रसायने बनवतात जी पचनक्रिया, शरीरातील विषारी पदार्थांचे विभाजन करण्यास मदत करते |
0:41 | रक्तातील साखरेची देखभाल करणे आणि मेंदूकडे संदेश घेऊन जाणे आणि परत आणण्याचे काम करते |
0:47 | Protein च्या कमतरते मुळे - गर्भाची वाढ त्याच्या वयाच्या मानाने कमी होते , |
0:52 | बाळामध्ये कमी उंची, स्मरणशक्ती आणि हालचाल कौशल्यांसह संक्रमणाचा उच्च धोका उद्भवतो. |
1:00 | प्रौढांमधे, त्वचेवरील सुरकुत्या, केस गळणे, |
1:05 | थकवा आणि अशक्तपणा, |
1:08 | असे संक्रमण वारंवार होणे आणि स्नायू नष्ट होणे यास कारण ठरते. |
1:11 | केराटिन नावाची आणखी एक protein केस, नखे आणि त्वचेचा एक महत्त्वाचा भाग आहे. |
1:18 | विशेष म्हणजे, protein अमीनो acids नावाच्या वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेले असतात. |
1:24 | एकूण 22 अमीनो acids आहेत त्यापैकी 9 अमीनो acids आहारातून घ्यावे लागतील. |
1:33 | आता आपण प्रोटीनचे दोन प्रकार पाहूया - संपूर्ण प्रोटीन आणि अपूर्ण प्रोटीन. |
1:41 | पूर्वी नमूद केलेले सर्व 9 अमीनो acids प्राण्यांच्या प्रोटीनमध्ये आहेत. |
1:46 | म्हणूनच प्राण्यांच्या प्रोटीनला संपूर्ण प्रोटीन म्हणतात. |
1:51 | दुसरीकडे, वनस्पती आधारित प्रोटीनांमध्ये यापैकी आवश्यक 9 अमीनो acids कमी प्रमाणात असतात |
2:00 | उदाहरणार्थ, तृणधान्यामध्ये लायझिन कमी असतात तर डाळींमध्ये मेथिनिन कमी असतात. |
2:07 | म्हणून वेगवेगळ्या वनस्पती प्रोटीन एकत्रितपणे खाणे महत्वाचे आहे. |
2:13 | उदाहरणार्थ, धान्य आणि डाळींचे मिश्रण एकत्र केले पाहिजे कारण ते दोन्ही आवश्यक प्रमाणात अमीनो acids प्रदान करतात. |
2:23 | आता आपण आणखी एक महत्त्वपूर्ण पोषक घटक म्हणजे Fat बद्दल शिकू. |
2:28 | चांगल्या आरोग्यासाठी खाद्यपदार्थांमधून चांगले fats घेणे आवश्यक आहे. |
2:32 | ओमेगा-3 फॅटी acid सारखे काही fats शरीराद्वारे तयार केले जाऊ शकत नाहीत. म्हणून ते आहारातून घेतले पाहिजे. |
2:40 | या fats मुळे हृदयाचे आरोग्य टिकते, |
2:42 | शरीरात दाह कमी करण्यात आणि गर्भवती होण्याची शक्यता सुधारण्यात मदत करू शकते. |
2:48 | तसेच ते बाळाच्या अकाली जन्म होण्याचा धोका देखील कमी करतात आणि बाळामध्ये बुद्धिमत्ता वाढवतात. |
2:56 | protein आणि fat बद्दल जाणून घेतल्यानंतर आपण आता व्हिटॅमिन-एबद्दल शिकू. |
3:01 | व्हिटॅमिन-ए निरोगी डोळे राखण्यास मदत करते.हे पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवते, |
3:07 | गर्भधारणेची शक्यता वाढवते आणि गर्भधारणेपूर्वीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती सुधारते. |
3:14 | व्हिटॅमिन ए प्रमाणेच संपूर्ण व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये महिलांच्या सामर्थ्य आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. |
3:24 | सर्व बी-व्हिटॅमिनपैकी आपण प्रथम व्हिटॅमिन बी-6 म्हणजे पायरीडॉक्सिन पाहू. |
3:31 | व्हिटॅमिन बी -पायरीडॉक्सिन मज्जासंस्थेच्या कामकाजासाठी आवश्यक आहे ज्यायोगे मेंदूचा विकास सुधारित होतो. |
3:39 | तसेच, यामुळे गरोदरपणाशी संबंधित मळमळ होण्यापासून आराम मिळतो. |
3:44 | अजून एक पौष्टिक घटक म्हणजे व्हिटॅमिन बी 12 जो फोलेट आणि कोलीनबरोबर Anemia आणि Neural tube defects टाळण्यास मदत करतो. |
3:54 | Neural tube defects हे जन्म दोष आहे जे बाळाच्या पाठीचा कणा आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतात जे गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात तयार होतात. |
4:04 | लक्षात घ्या की Neural tube गर्भाचा एक भाग आहे जो मेंदू आणि पाठीचा कणा यामध्ये विकसित होतो. |
4:11 | म्हणूनच, गर्भवती होण्यापूर्वी शरीरात पुरेसे फोलेट, व्हिटॅमिन-बी 12 आणि कोलीन असणे आवश्यक आहे. |
4:20 | व्हिटॅमिन बी -12 ची कमतरता देखील Anemia, वंध्यत्व आणि गर्भपात होण्यास कारण ठरते. |
4:27 | आता आपण फोलेट या दुसर्या महत्त्वपूर्ण पोषक घटका विषयी शिकू. |
4:31 | फोलेट हे व्हिटॅमिन-बी 9 म्हणून देखील ओळखले जाते, ते शरीराला नवीन निरोगी पेशी बनविण्यास मदत करते. |
4:38 | या पेशी फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागात ऑक्सिजन घेऊन जातात. |
4:43 | गर्भवती मातांमध्ये फोलेटच्या कमतरतेमुळे होणाऱ्या Anemia आणि मेंदू आणि मणक्याच्या दोषांना Neural Tube Defects म्हणतात. |
4:52 | लक्षात घ्या की याच ट्युटोरियलमध्ये यापूर्वी Neural Tube Defects स्पष्ट केले आहे. |
4:58 | आपण आता Iron च्या कार्याविषयी शिकू.रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आणि गर्भाच्या वाढीसाठी Iron आवश्यक आहे. |
5:07 | गरोदरपणात कमी प्रमाणातील हिमोग्लोबिनमुळे गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब, |
5:13 | मुदतीच्या आधी प्रसूती होणे, |
5:15 | कमी वजनाचे बाळ जन्माला येणे आणि गर्भपात होण्यास कारण ठरते. |
5:18 | या व्यतिरिक्त, हीमोग्लोबिन इतर ऊती आणि पेशींमध्ये ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. |
5:25 | हिमोग्लोबिन किंवा ironच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. |
5:30 | शिवाय, मासिक पाळीमुळे, जंतांच्या प्रादुर्भावामुळे - स्त्रियांमध्ये Iron कमी असू शकते. |
5:36 | जंतांच्या प्रादुर्भावामुळे - स्त्रियांमध्ये Iron कमी असू शकते. |
5:38 | Iron आहारात कमी असणे आणि कमी शोषण हे आहारातील फायटिक acid आणि ऑक्सॅलेट्समुळे होते |
5:45 | फायटिक acid आणि ऑक्सॅलेट्स कमी करण्यासाठी आणि पोषक तत्वांचे शोषण वाढविण्यासाठी - |
5:52 | स्वयंपाक करण्यापूर्वीच्या पद्धती वापरा - जसे भिजवणे, मोड आणणे, भाजणे आणि आंबवणे. |
6:00 | Ironच्या कमतरतेमुळे येणाऱ्या Anemia ची पुढील लक्षणे आहेत- थकवा आणि ऊर्जेची कमतरता |
6:06 | दम लागणे,हृदयाची गती वाढणे |
6:10 | आणि त्वचा निसतेज होणे. |
6:11 | लक्षात ठेवा, Iron बरोबर नेहमी व्हिटॅमिन-सी समृध्द पदार्थांचे सेवन करतात जे लोह शोषणात मदत करते. |
6:19 | व्हिटॅमिन-सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि त्यामुळे संक्रमण कमी करते. |
6:25 | पुढे आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे महत्त्व जाणून घेऊ. |
6:30 | हाडांच्या विकासास मदत होते म्हणून कॅल्शियमचे सेवन करण्यास सूचविले जाते. |
6:35 | हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी गर्भास कॅल्शियमची आवश्यकता असते. |
6:39 | कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. |
6:43 | तथापि, हे लक्षात ठेवा- शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन-डी आवश्यक आहे. |
6:50 | सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 दरम्यान 15 ते 20 मिनिटांकरिता सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे हा व्हिटॅमिन-डी मिळण्याचा उत्तम मार्ग आहे. |
6:59 | पुढे आपण कोलीन बद्दल शिकू. |
7:02 | बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी कोलीन महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष वाढवते. |
7:09 | कोलीनच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये यकृतामध्ये अनावश्यक चरबी वाढू शकते , |
7:13 | हे गर्भपात आणि गर्भातील Neural tube defects या ट्यूटोरियल मध्ये पूर्वी उल्लेखलेले आहे. |
7:20 | चला पुढे जाऊया आणि झिंकचे महत्त्व जाणून घेऊ. |
7:24 | झिंक हे रोग प्रतिकारशक्ती आणि पेशींच्या वाढीसाठी जास्त महत्वाचे आहे. हे शरीरात अनुवांशिकता आणि protein तयार करण्यास मदत करते. |
7:31 | हे जखमा बरे करण्यास मदत करते. तसेच हे स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन आणि प्रजननक्षमतेमध्ये योगदान देते. |
7:37 | आणि गर्भाच्या वाढीसाठी हे महत्वाचे आहे. |
7:40 | लक्षात घ्या की आहारातील झिंकचा अभाव - चव आणि वासाच्या जाणीवेवर परिणाम करू शकतो, |
7:46 | तसेच नाळेच्या वाढीस उशीर करतो जे आईपासून गर्भापर्यंत पोषकद्रव्ये वाहून नेणारी दोरखंड आहे. |
7:53 | झिंकचा अभाव देखील गर्भाच्या वाढीवर परिणाम करते आणि परिणामी कमी वजनाचे बाळ होते. |
8:00 | आयोडीन हे आणखी एक महत्त्वपूर्ण पौष्टिक तत्व आपण पाहू.
|
8:05 | थायरॉईड ग्रंथीद्वारे तयार होणार्या थायरॉईड संप्रेरकाची सामान्य पातळी राखण्यासाठी शरीरात आयोडीन आवश्यक असते. |
8:13 | मातांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भपात आणि मृत बाळाचा जन्म होण्याचा धोका वाढतो. |
8:21 | तसेच यामुळे जन्म-विकृती, बाळाचे वजन कमी होणे, वाढ खुंटणे आणि मानसिक दुर्बलता येणे देखील होऊ शकते . |
8:30 | मॅग्नेशियम हे आणखी एक पोषक घटक आहे जे मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते. |
8:35 | हे मेंदूतील रक्तवाहिन्यांना आराम देऊन पेटके आणि तीव्र डोकेदुखीस प्रतिबंध करते. |
8:41 | हे निरोगी रक्तदाब आणि हृदयाची लय देखील राखते. |
8:45 | हे अनुवांशिकतेच्या निर्मितीस मदत करते आणि हाडांच्या विकासास वाढवते. |
8:51 | निरोगी गर्भधारणेसाठी निरोगी पोषण व्यतिरिक्त अल्कोहोल टाळणे देखील महत्वाचे आहे कारण यामुळे गर्भपात किंवा अशक्त भ्रुण होऊ शकते. |
9:00 | टाळण्यासारख्या इतर गोष्टी म्हणजे - तंबाखू, |
9:03 | सिगारेट, अंमली पदार्थ, |
9:06 | स्व-औषधोपचार, साखर, चहा आणि कॉफीचा जास्त वापर, जंक फूड आणि गोड पेये |
9:15 | कारण हे पदार्थ प्रजनन आरोग्यावर आणि गर्भधारणेवर प्रतिकूल परिणाम करतात. |
9:20 | लक्षात घ्या की गर्भवती होण्यापूर्वी वजन नियंत्रित करणे देखील आवश्यक आहे. |
9:25 | कमी वजनाच्या स्त्रिया लहान बाळांना किंवा प्रसूतीच्या मुदतीपूर्वी म्हणजेच गर्भावस्थेच्या 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीत बाळांना जन्म देतात. |
9:34 | अशा बाळांना अकाली मृत्यूचा धोका जास्त असतो. |
9:38 | तथापि, दुसरीकडे, वजन वाढलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेचा मधुमेह आणि रक्तदाब जास्त असतो. |
9:45 | तसेच, यामुळे नवजात शिशु गुंतागुंतीचे होऊ शकते. |
9:49 | म्हणूनच गर्भवती होण्यापूर्वी आरोग्यदायी तज्ञांचा सल्ला महिलांनी घ्यावा. |
9:55 | यासह, शाकाहारी आणि / किंवा मांसाहारयुक्त आरोग्यपूर्ण, संतुलित आहाराचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. |
10:05 | लक्षात ठेवा की सर्व मांसाहारी पदार्थ - प्रोटीन, ओमेगा -3 फॅटी acid, व्हिटॅमिन बी -12, व्हिटॅमिन बी -9, zinc, iron, कॅल्शियम, कोलीन आणि व्हिटॅमिन-डी ने समृद्ध आहेत. |
10:18 | प्राण्यांपासून मिळालेल्या अन्नपदार्थाबरोबरच वनस्पती पासून मिळालेले अन्नपदार्थ, डाळी, बाजरी, तृणधान्ये, शेंगदाणे आणि बियाणे हे देखील |
10:30 | रोगप्रतिकारक शक्ती, स्नायू, हाडे, |
10:33 | यकृत, केस, त्वचा, डोळे आणि मेंदूची वाढ होण्यास मदत करतात. |
10:36 | याशिवाय, दुग्धजन्य पदार्थ देखील बाळाची हाडे आणि दात तयार करण्यास मदत करतात. |
10:43 | वैकल्पिकरित्या, पालेभाज्या आणि बियाणे देखील कॅल्शियमने समृद्ध असतात आणि बाळाची हाडे आणि दात तयार करण्यास मदत करतात. |
10:52 | पालेभाज्यांप्रमाणे फळांमध्येही व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते आणि ते - रोग प्रतिकारक शक्ती सुधारणे, लोह शोषणे आणि संक्रमण प्रतिबंधित करण्यास मदत करतात. |
11:04 | स्त्रीच्या प्रजननासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी, सोयाबीन, शेंगदाणे आणि बियाणांचे इतर मांसाहारी आहाराबरोबर सेवन करावे. |
11:14 | मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ सारख्या विविध मांसाहारी पदार्थांमुळे सामान्य थायरॉईड संप्रेरक राखण्यासाठी, वाढ सुधारण्यासाठी आणि शारीरिक दोष टाळण्यासाठी मदत होते. |
11:27 | शेंगदाणे आणि बियाणे मॅग्नेशियमने समृद्ध आहेत आणि मज्जासंस्थेचे कार्य करण्यासाठी आणि पायातील पेटके रोखण्यासाठी आवश्यक आहेत. |
11:35 | आता आपण गर्भधारणापूर्व पोषण विषयी tutorial च्या अंतिम टप्प्यात पोहचलो आहे. धन्यवाद. |