LaTeX-Old-Version/C2/Beamer/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:56, 16 October 2019 by Nancyvarkey (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:03 ले टेक आणि बीमर वापरून सादरीकरण करण्याच्या प्रशिक्षणात आपले स्वागत.
00:08 मी आधी तुम्हाला पडद्यावर दिसणारी योजना समजावून देते. इथे मूळ फाईल आहे,
00:15 इथे मी पीडीएफ ले टेक ही आज्ञा वापरून संकलन करीन आणि तयार होणारे उत्पादन या कोपऱ्यात दिसेल.
00:22 आपण आधी इतर गोष्टी पाहून मग पुन्हा इथे परत येऊ. हे आधी करू.
00:28 इथली पहिली पारदर्शिका या मूळापासून येते -
00:32 बिगिन फ्रेम, एन्ड फ्रेम, टायटल पेज. मुख्य पान हे शीर्षक, लेखक व दिनांक देऊन निश्चित केले जाते.
00:54 मी वापरत असलेला दस्तऐवज प्रकार बीमर हा आहे. आपण इथे दस्तऐवजाची सुरुवात केली.
01:01 आता ही पहिली पारदर्शिका झाली, दुसरी पाहू.
01:07 ही रुपरेखा आहे ती कशी तयार होते ? बिगिन फ्रेम, एन्ड फ्रेम ने एक पारदर्शिका बनते.
01:14 फ्रेम शीर्षक ही रुपरेखा असते. ती येथे येते. मग मी नेहमी प्रमाणे आयटेमाइझ आज्ञा वापरते.
01:24 तिसऱ्या पारदर्शिकेकडे वळूयात. ही पारदर्शिका ले टेक वरील अजून एका प्रशिक्षणाबद्दल आहे.
01:31 ले टेक वरील अशी बरीच प्रशिक्षणे उपलब्ध आहेत.
01:34 तुम्हाला ले टेक वापरणे अवघड जात असल्यास तुम्ही ती प्रशिक्षणे जरूर पहावीत हे मी सुचवते.
01:40 ही प्रशिक्षणे विंडोज मध्ये लेटेक कसे बसवावे, चालवावे व वापरावे ते सांगतात.
01:46 आणि फॉसी.इन वापरून ती कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही आशावादी आहोत.
01:52 इथे हे संपले, हे या पारदर्शिकेचे मूळ आहे.
01:57 आपण दस्तऐवजाच्या शेवटी पोचलो हे तुम्ही पाहू शकता.
02:12 बीमर वापरून हा दस्तऐवज अधिक आकर्षक करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या अनेक सुविधा मी आता तुम्हाला दाखवते.
02:19 आपण आधी सुरुवातीला जाऊ. या फाईल मध्ये सर्वात वरती जाऊ.
02:30 आता मी जे काही बदल, ज्या काही सुधारणा या मध्ये करणार आहे त्या सर्व इथे.
02:36 मी एका वेळी एक सुधारणा करुन ती समजावणार आहे.
02:39 मी बीमर थीम स्प्लिट ही आज्ञा वापरली की काय होते ते पाहू.
02:45 हे मी कट करते, पुन्हा इथे परत येते. आता मी सेव्ह करून संकलित करते.
02:57 पीडीएफ ले टेक बीमर. आता इथे क्लिक करते,
03:04 तुम्ही इथे तयार झालेले एक निशाण आणि इतरत्र तयार झालेली निशाणे पाहू शकता. इथेही, ठीक आहे.
03:15 आता आपण इथे येऊ आणि हे पॅकेज वापरू. आता बीमर थीम शॅडो वापरू. मी हे कट करते,
03:27 येथे जाते, पेस्ट करते. हे सर्व दस्तऐवजाच्या आज्ञेपूर्वी पेस्ट केले आहे. मी हे संकलित करते.
03:40 ठीक, आता आपण पाहू की मी हे क्लिक केल्यावर काय होते. हे मोठे झाले.
03:47 तुम्ही पाहू शकता की येथील रंग बदलला आहे.
03:51 म्हणजे हे बीमर थीम शॅडो या आज्ञेमुळे झाले. अशी बरीच पॅकेजेस आहेत,
03:58 मी त्यापैकी काहींची इतर वैशिष्ट्ये समजावून देणार आहे.
04:02 इथे लिहिल्याप्रमाणे आम्ही पुढील वाचनासाठी काही संदर्भ देणार आहोत –
04:13 रेफरन्सेस फॉर फर्दर रीडिंग.
04:16 या भाषणाची रुपरेखा पुढीलप्रमाणे आहे. आपण काही काळ शीर्षक पान, लेखकाचे नाव, रंग, चिन्ह या करिता देऊ.
04:26 तुमच्या भाषणासाठी किमान चलचित्र, दोन कॉलम , आकृत्या आणि तालिका, समीकरणे, शब्दशः इत्यादी.
04:35 ठीक तर मग आपण पुन्हा सुरुवातीला जाऊ.
04:41 पुढील वैशिष्ट्य आहे लोगो. आता इथून लोगो कट आणि पेस्ट करू.
04:48 हा सुद्धा बिगिन डॉक्युमेंट या आज्ञेपूर्वीच असावा लागतो.
04:54 आता हा लोगो कसा दिसतो ते पाहू. आय आय टी बी लोगो.
05:00 पीडीएफ ही फाईल उघडून पाहू. मी इथे हेच नाव देत आहे.
05:04 मी हे उघडले की तुम्हाला कळेल की मी ज्या विषयी बोलत आहे ती चित्र फाईल हीच आहे.
05:11 या आज्ञेमुळे एक सेंटीमीटर आकाराचा लोगो या कोपऱ्यात दिसेल.
05:17 बघुया तर तो कसा दिसतो. इथे क्लिक करु.
05:31 आयआयटी मुंबईचा लोगो इथे आला हे तुम्ही पाहू शकता. हा इथून पुढे प्रत्येक पानावर येईल.
05:40 आता आपण ही अाज्ञा देऊ. सादरीकरणांसाठी कधी कधी सर्व अक्षरे मोठी करणे उपयुक्त असते.
05:53 म्हणून मी याचा अंतर्भाव करतो, कट, पेस्ट. प्रत्यक्षात मी हे बिगिन डॉक्युमेंट आज्ञेपूर्वी देणे आवश्यक होते.
06:08 मी हे सेव्ह करते. संकलित करते.
06:18 आता मी हे क्लिक करताना नीट पहा - सर्व अक्षरे मोठी होतील.
06:26 ती मोठी झाली हे तुम्ही पाहू शकता.
06:31 आता यानंतर मी येथील लिखाण सुधारणार आहे. उदाहरणार्थ हे येथे बऱ्याच गोष्टी भरण्याचा प्रयत्न करते.
06:39 शीर्षक इथे येते, लेखकाची माहिती इथे येते पण बरीच माहिती इथे येते आहे.
06:45 कधी कधी मला इथे छोटे शीर्षक हवे असते. उदाहरणार्थ ही जागा पुरेशी नसते तेव्हा.
06:51 मग मी काय करावे हा प्रश्न हे वापरून सुटतो. उदाहरणार्थ हे सलग शीर्षक आहे ते मी तोडतो.
07:01 हे टायटल या आज्ञेनंतर यायला पाहिजे, टायटल या आज्ञेनंतर आणि प्रत्यक्ष शीर्षकापूर्वी.
07:11 मी हे इथे पेस्ट करते.
07:17 तुम्ही पाहू शकता की मी जे पेस्ट केले ते चौकटी कंसात आले आहे. आपण हे सेव्ह करू. रन करू.
07:41 मी तसेच करते, हे क्लिक करते, मी हे क्लिक केल्यावर या भागाचे काय होते ते पहा.
07:51 शीर्षक बदलले हे तुम्ही पाहू शकता. मी फक्त खालचा भाग दिला आहे कारण मी तोच चौकटी कंसात ठेवला आहे -
08:01 प्रेझेंटेशन यूजिंग ले टेक अँड बीमर. मग मी लिहिले आहे एच- स्पेस अर्धा सेंटीमीटर आहे.
08:08 आता मी इथे पृष्ठ क्रमांक दिले. हे पहा १ तिरकी रेघ ३. मग २ तिरकी रेघ ३ तीन तिरकी रेघ ३ याप्रमाणे.
08:18 यासाठी वापरा इन्सर्ट फ्रेम नंबर डिव्हायडेड बाय इन्सर्ट टोटल फ्रेम नंबर
08:27 आता मी हीच गोष्ट लेखकाच्या माहितीसाठी करते. इथे येऊ.
08:36 हे कट करू. आणि ऑथर नंतर हे येते.
08:44 सेव्ह करू. संकलित करू. हे क्लिक करू. तुम्ही बघू शकता की कण्णन मौद्गल्य दिसू लागले.
08:58 हेच मी चौकटी कंसात दिले होते. आता हे प्रत्येक पानावर येईल.
09:05 आता आपण पुढल्या पाठाकडे वळू. हा समीकरणे अंतर्भूत करण्यासाठी आहे.
09:13 ही सर्व गोष्ट एका चौकटीच्या स्वरूपात आहे-एक संपूर्ण चौकट. आता मी काय करते, हे सर्व कट करते.
09:27 इथे परत येते, या दस्तऐवजाच्या शेवटी जाते. सेव्ह करते. अशा प्रकारे मी एक नवीन पारदर्शिका तयार केली.
09:39 आता ती कशी दिसते ते पाहू. इथे ही चौकट सुरू होते. हे संकलित करू, आता इथे चार पाने दिसली पाहिजेत.
09:57 अजून इथे तीनच दिसत आहेत मी पुन्हा एकदा क्लिक करते आता इथे चार झाली.
10:08 ही समीकरण असलेली पारदर्शिका आहे. मी समीकरण कसे लिहावे हे समजावणार नाही आहे.
10:14 समीकरणे कशी लिहावी हे सांगणाऱ्या अन्य एका प्रशिक्षणात हे मी समजावून दिलेले आहे.
10:19 मी फक्त इतकेच केले की त्या ले टेक दस्तऐवजात गेले कट केले आणि ते इथे पेस्ट केले.
10:25 आणि अर्थातच त्या समीकरणातले सर्व आकडे मी काढून टाकले आहेत.
10:31 तसेच रंग ठळक करणे तुमच्यासाठी कधी कधी उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ, मला हा रंग निळा हवा आहे, मी त्यासाठी हे करीन.
10:43 आज्ञा आहे- कलर, ब्ल्यू - मग मी हे बंद करीन. सेव्ह करीन. संकलित करीन. आणि इथे क्लिक करीन.
11:14 पहा हे निळे झाले आहे.
11:17 म्हणजे तुम्ही समीकरणातले आकडे सांगण्या ऐवजी निळ्या रंगातील समीकरण पहा असे म्हणू शकता किंवा मास बॅलन्स समीकरण पहा म्हणू शकता किंवा अन्य काही.
11:28 तुम्ही असे काहीतरी म्हणू शकता की जे लोकांच्या सहज लक्षात राहील.
11:32 आता आपण यामध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करूयात. ते पायरी पायरीने कल्पना समजावून देण्यास उपयुक्त ठरेल.
11:41 मी हे कट करून इथे पेस्ट केले. आता हे कसे दिसते ते पाहू.
12:05 प्रथम हे संकलित करू आणि काय होते ते पाहू.
12:14 हे पत्रलेखनाच्या प्रशिक्षणामधील आहे. ही माहिती पण तेथे आहे.
12:20 मी फक्त एकच बदल केला आणि तो म्हणजे, बिगिन एन्युमरेट आणि एन्ड एन्युमरेट यांच्या मध्ये
12:27 मी हे आयटेम प्लस मायनस अलर्ट टाकले.
12:31 हे काय करते ते आपण पाहू. मी येथे पॉज ही आज्ञा दिली हे तुम्ही पाहू शकता ते इथे थांबते.
12:39 आता बिगिन एन्युमरेटची सुरूवात होते. मी आता पुढे जाते. पेज डाउन, पुढील पान, पुढील पान, पुढील पान.
12:52 मी खाली जात असताना तुम्ही पाहिले असेल की अद्ययावत माहिती लाल रंगात आहे तर इतर सर्व माहिती सामान्य असलेल्या काळ्या रंगात आहे.
13:02 मी या दस्तऐवजाच्या शेवटी पोचले आहे. हा थोडक्या वेळात माहिती प्रदर्शित करण्यासाठी तुमच्या सादरीकरणामध्ये चलचित्राचा परिणाम निर्माण करण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे.
13:15 यानंतर मला लक्षवेधी रंग निळा करायचा आहे. उदाहरणार्थ, येथे लक्षवेधी रंग लाल आहे त्याला लक्षवेधी रंग म्हणतात.
13:26 मला हा रंग निळा करायचा आहे. म्हणजे तो मी निवडलेल्या या रंगाशी जुळणारा होईल.
13:39 मी इथे येते व हे कट करते. हे या दस्तऐवजाच्या सुरुवातीला, बिगिनींग डॉक्युमेंट आज्ञेपूर्वी जाऊदे.
13:58 मी हे संकलित करते, हे क्लिक करताना तुम्ही पाहू शकता की लक्षवेधी रंग निळा झाला आहे.
14:08 हे सेट बीमर कलर-अलर्टेड टेक्स्ट या आज्ञेमुळे शक्य होते. पृष्ठ भूमी चा रंग निळा करा, एफ जी इक्वल्स ब्ल्यू.
14:19 मी आता तुम्हाला संपूर्ण दस्तऐवजाचा रंग बदलणे किती सोपे आहे ते दाखवते.
14:24 मी इथे येते, या तिरक्या रेघेनंतर दस्तऐवज प्रकारात बीमर या शब्दापूर्वी मी ब्राऊन लिहिते. सेव्ह करते.
14:46 संकलित करते. तुम्ही पाहू शकता की ते तपकिरी झाले. खूप काम करण्याची गरज नाही.
14:55 मी आता काय करते, याचा मूळ रंग पुन्हा देते. सामान्य रंग निळा असल्यामुळे मी पुन्हा ते टंकित करणार नाही.
15:16 पुन्हा निळा रंग आला.
15:21 आता इथे येऊ मी हे खोडते. मी आता आकृत्यांचा अंतर्भाव करते. कट करू. इथे येऊ. याच्या शेवटी जाऊ.
15:38 सर्वात शेवटी. हे संकलित करू, आता पुढच्या पानावर जाऊ. इथे अाकृतीचे उदाहरण येथे दिलेले आहे.
15:51 आकृती अंतर्भूत करण्यासाठी काय करावे लागेल. काही महत्वपूर्ण सूचना आहेत.
15:56 त्या आपण नंतर पाहू. हे कट करू. पेस्ट करू. संकलित करू. हे तयार झाले.
16:20 अाकृती अंतर्भूत करण्यासाठी काही युक्त्या. आपण जिथे आकृती तयार केली त्या मूळ जागी जाऊ.
16:33 आपण आकृती अशी तयार केली. मग सूचना काय आहेत?
16:38 सादरीकरणामध्ये तरंगती संरचना वापरू नका, उदाहरणार्थ ले टेक दस्तऐवजामध्ये आवश्यक आकृती करता बिगिन फिगर, एन्ड फिगर या आज्ञा वापरू नका
16:49 तुम्हाला आकृती अंतर्भूत करण्याबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास
16:53 तुम्ही तालिका आणि आक्ृत्यांसंबंधीचे प्रशिक्षण पहाणे उपयुक्त ठरेल. सध्या हे वापरू नका.
17:01 थेट इन्क्लूड ग्राफिक्स वापरा. उदाहरणार्थ इन्क्लूड ग्राफिक्स ही आज्ञा वापरली
17:08 आणि मी म्हटले की संपूर्ण अक्षरांची रुंदी वापरा आणि आय आय टी बी ही फाईल वापरा.
17:15 बीमर मध्ये सर्व आवश्यक पॅकेजेस येतात, तुम्हाला कोणते ही पॅकेज अंतर्भूत करण्याची गरज नाही, फक्त पॅकेज वापरा,
17:22 ते आधीपासून आहेच. आणि आता हे सर्व आपण मध्यभागी आणू. ही चौकट संपली.
17:35 शीर्षक, आकृती क्रमांक टाकू नका. पुन्हा लक्षात घ्या की लोक त्यातील अंक लक्षात ठेवणार नाहीत.
17:47 तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या एखाद्या आकृतीचा संदर्भ द्यायचा असल्यास ती परत दाखवा.
17:53 अजून एक पारदर्शिका तयार करण्यासाठी तुम्हाला फारसे कष्ट पडणार नाहीत.
17:58 आधी दाखवलेल्या पारदर्शिकेची कॉपी बनवा आणि एक पारदर्शिका बनवा. आता आपण या दस्तऐवजाच्या शेवटी आलो.
18:08 आता आपण दोन स्तंभ कसे अंतर्भूत करावे ते पाहू. इथे येऊ. दस्तऐवजाच्या शेवटी जाऊया.
18:27 सेव्ह करू. मी हे सोपे करण्यासाठी सध्या हे काढून टाकणार आहे. मी आता अशी आज्ञा देणार आहे की थोडी माहिती दाखवा.
18:41 आता हे संकलित करू आणि काय होते ते पाहू. हे पहा मला दोन स्तंभ मिळाले.
18:56 हे सेव्ह केलेले नाही म्हणून या चांदण्या दिसत आहेत. मी आता सर्वप्रथम हे सेव्ह करते.
19:02 तुम्ही संकलन करण्यापूर्वी सेव्ह न केल्यास ही समस्या निर्माण होते. तुमची तयार होणारी पीडीएफ फाईल आणि मूळ फाईल या असंबद्ध होतात.
19:12 आता हे संकलित करू. इथे येऊ. आता तुमची मूळ फाईल याच्याशी जुळते.
19:27 हे मी मध्यभागी घेते. चौकट शीर्षक, दोन स्तंभ, मी वापरत असलेली आज्ञा आहे
19:54 मिनि पेज, मी हे मध्यभागी घेत आहे आणि मी अक्षरांची रुंदी ४५ टक्के ठेवत आहे.
20:14 बिगिन एन्युमरेट. हे दोन आणि मग एन्ड एन्युमरेट. पूर्वीप्रमाणे मी लक्षवेधी बनवतो. हे दोन्ही पहा.
20:25 हा या दस्तऐवजाचा शेवट आहे. मी आता इथे येऊन हे सर्व काही इथे शेवटी जोडते.
20:32 इथे पूर्वीचे मिनी पेज संपले आहे. आता मी अजून एक मिनी पेज बनवून तेथे आय आय टी बी टाकते,
20:45 आपण यापूर्वी पाहिलेले चित्र. इथेही मी ४५ टक्के आकारमान वापरत आहे. हे आपण संकलित करू.
20:55 त्याआधी हे सेव्ह करूया. आता मी हे क्लिक करते. हे पहा आले.
21:11 पण त्यात एक छोटी समस्या आहे की मी जेव्हा हे पान पहाते तेव्हा मला मुद्दा आणि आकृती हे दोन्ही दिसते.
21:18 आकृती नंतर येते तरीही तो ती दाखवतो कारण मी ले टेक ला आकृती नंतर दाखव हे सांगितलेले नाही.
21:25 हे आपोआप आहे. तुम्ही हे सांगणे गरजेचे आहे की माहिती आधी दाखव आणि आकृती नंतर दाखव. पण आपण हे कुठेच सांगितले नाही.
21:33 आपल्याला अशा चुका टाळण्यासाठी सावध रहाणे आवश्यक आहे. हे सोडवण्याचा एक मार्ग म्हणजे पॉज ही आज्ञा देणे.
21:56 हे मी संकलित करते. रक्षित करते. आता हे ठीक झाले.
22:06 हा प्रश्न सुटला. पहिले दुसरे आणि मग अजून एक हे एकदा झाले आणि तुम्ही पहाल की हा प्रश्न सुटला.
22:23 चला तर आता इथे येऊ. पुढील बाब आहे तालिका. हे रक्षित करू. हे संकलित करू.
22:43 तुम्ही पाहू शकता की तालिका दिसू लागली. मी तुम्हाला तालिका कशी तयार करावी हे सांगणार नाही कारण
22:52 ते तालिकांवरील प्रशिक्षणात दिलेले आहे. मी फक्त ते कट करून इथे पेस्ट केले.
23:07 चौकटीच्या सुरुवातीला जाऊ. ही आपण पूर्वी वापरलेली तालिका आहे. मी फक्त ती कट आणि पेस्ट केली.
23:14 तुम्ही पाहू शकता की बिगिन टॅब्युलर आणि एन्ड टॅब्युलर मध्यभागी िदसत आहेत.
23:19 यासाठी काय सूचना आहेत? त्या सूचना आकृती साठी असलेल्या सूचनांप्रमाणेच आहेत. आता त्या पण पाहू.
23:28 सूचना अशा आहेत. मी हे संकलित करते. हे पहा, पुढे चला. पुन्हा एकदा आपण तरंगती संरचना वापरणार नाही.
23:56 तालिकांवरील प्रशिक्षणामधे आपण तालिका संरचनेमधे आपण तालिका ठेवतो.
24:01 तालिका संरचना ही तरंगती असते ती इथे अंतर्भूत करू नका. हे थेट तिथे ठेवा.
24:08 उदाहरणार्थ आपण हे थेट मध्य संरचनेत ठेवू. शीर्षक, तालिका क्रमांक इत्यादी देऊ नका
24:18 त्याची गरज भासल्यास कॉपी करा. चलचित्र कसे होतो ते मी इथे सांगते. या पारदर्शिकेमधे हे भिन्न रंगानी लक्ष वेधत नाही.
24:34 आपण पूर्वी लक्ष वेधण्यासाठी निळा रंग वापरला आहे. हे का होते? कारण आपण इथे वेगळी संरचना वापरली आहे.
24:45 बिगिन आयटेमाइझ व, एन्ड आयटेमाइझ च्या दरम्यान आपण आयटेम प्लस मायनस वापरले.
24:52 पूर्वी आपण लक्ष वेधणे हा शब्द वापरला होता. तो आठवा. आपण तो आता वापरत नाही.
25:01 त्यामुळे, हे काळ्या रंगात येते. चलचित्र अंतर्भूत करण्याचा हा सोपा मार्ग आहे.
25:07 तुम्ही हे निवडू शकता. म्हणून मी हे इथे लिहिले आहे. आधिच्या पारदर्शिकेमधील विविध चलचित्र दाखवा.
25:18 आता याचे हस्तपत्रिकेत रूपांतर करणे आवश्यक आहे.
25:24 तुम्ही हे छापण्याचा प्रयत्न केला तर इथे असलेले सारे फक्त १० पाने असताना २४ पानांमधे छापले जाईल.
25:35 इथे फक्त १० चौकटी आहेत पण पाने मात्र २४ आहेत. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे हँडआउट ही कळ वापरणे. मी हे केले.
26:00 आता संकलन करते आता फक्त १० पाने राहिली. पुन्हा एकदा हे संकलित करू. आता चलचित्र राहिले नाही.
26:16 पुढले पान, पुढले पान, पुढले पान, पुढले पान, पुढले पान, आणि पुढे.
26:23 मला हा रंग बदलायचा असला तर मग पुन्हा तपकिरी ही आज्ञा द्या. तुम्ही पाहू शकता की तो बदलला गेला.
26:36 प्रत्येक कार्यक्षेत्र सीमे नंतर स्वल्पविराम देणे आवश्यक आहे. मी हे परत निळे करते, संकलित करते.
26:52 कधी कधी आपल्याला शब्दशः पर्यावरण वापरावे लागते. मी उदाहरणा दाखल हे घेते.
27:01 इते जाऊ, शेवटी जाऊ. रक्षित करू. इथे शब्दशः ला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता की शब्दशः नि र्माण झाले.
27:25 इथे मी सायलॅब मधील काही अाज्ञा वापरून हे प्रदर्शित केले. मी इथे रंग निळा केला आमि इतरही काही केले.
27:36 तुम्हाला एकच करायचे आहे ते म्हणजे बिगिन फ्रेम चौकटी कंसात लिहा - फ्रजाइल.
27:49 तुम्ही हे केले नाहीत तर समस्या निर्माण होईल. तरा आता हे पहा. आपण परत येऊ आणि हे तपासू.
27:59 मी हे खोडते. रक्षित करते. संकलित करते. हे सांगेल की काहीतरी चुकले आहे.
28:14 आता परत हे लिहू - फ्रजाइल. रक्षित करू. इथून बाहेर पडू. पुन्हा संकलित करू. हे आाता व्यवस्थित आले.
28:28 बीमर प्रकारात बरीच माहिती आहे. इतर गोष्टींबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळेल.
28:33 म्हणून मी इथे काही माहिती दिली आहे, आपण सर्वात खाली जाऊ. अावश्यक असलेली अधिक माहिती कुठून मिळवावी हे या पारदर्शिकेत दिलेले आहे.
28:43 आपण हे संकलित करू आणि नीटपणे पाहू.
28:55 बीमर करता अधिकारिक स्त्रोत म्हणजे बीमर यूजर गाईड डॉट पीडीएफ. मी हे या ठिकाणी ठेवले आहे परंतु हे
29:04 बीमर प्रकल्पाच्या संकेतस्थळावर बीमर प्रकार विकासकांनी ठेवलेले आहे.
29:10 मी हे उतरवून धेतलेले आहे पण हे आधी सांगितलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे मार्गदर्शक एकूण २२४ पानांचे आहे.
29:26 ते फारच मोठे आहे. मला इथे दाखवायचे आहे की तुम्ही इथली माहिती थेट वापरू शकता.
29:33 आपण इथे येऊ. पहिल्याच पानात लेखकाने सोप्या पारदर्शिका कशा बनवाव्या हे सांगितले आहे व त्यांचे मूळ सुद्धा दिलेले आहे.
29:53 आपण हे कट करू, कॉपी करू, मी हे लहान करते. मी या दस्तऐवजाच्या शेवटी जाते.
30:08 पेस्ट करते. रक्षित करते, संकलित करते. आता आपण पुढल्या पानावर जाऊ.
30:21 तुम्ही पाहू शकता की तिथे असलेले सारे इथे आले. इथे लेखकाने प्रमेय पर्यावरण वापरलेले आहे.
30:30 बिगिन थिअरम, एन्ड थिअरम येथे येते. लेखकाने चौकट उपशीर्षक वापरले आहे ते इथे लहान अक्षरात दिसते.
30:41 मग बिगिन प्रूफ आणि एन्ड प्रूफ या आज्ञा येथे येतात.
30:45 लेखक लिहितो प्रूफ त्यामुळे एक नवीन चौकट उघडते, त्याला प्रूफ डॉट हे नाव दिले.
30:52 अशा रितीने हे पर्यावरण ठरवले जाते. लेखक लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या गोष्टी वापरतो.
30:59 आपल्याला हे पहायचे असल्यास परत जा, हॅन्डआऊट काढून टाका म्हणजे चलचित्र दिसू शकेल.
31:10 संकलित करा. आिता पान ३४ वर जाऊमागे जाऊन आता चलचित्र पाहू. हे पहा दिसू लागले. लेखकाने असे केले आहे की
31:34 या दोन बाबींना एक क्रमांक दिला आणि इतरांना दोन व तीन दिला. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्हाला हव्या असलेल्या बाबी पारदर्शिकेमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या क्रमाने दिसू शकतात.
31:53 अधिक तपशिलात जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. मी तुम्हाला सुचवते की अधिक माहितीसाठी
31:59 इथे दिलेले संदर्भ साहित्य तुम्ही जरूर वाचा. हे मार्गदर्शक अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे.
32:10 बीमर दस्तऐवज प्रकारात अनेक उपप्रकार आहेत आणि तुम्ही त्यातील काही वापरून पाहू शकता.
32:20 मी हे पुन्हा हॅन्डआऊट मधे बदलते. सादरीकरण मार्गाची एक अडचण आहे, आपण आता हॅन्डआऊट मार्गाने जाऊ,
32:33 सादरीकरण मार्गात तुम्ही चलचित्र दाखवत असल्यास दस्तऐवज संकलित होण्यास फार वेळ लागतो.
32:39 म्हणून शक्य तितका अधिक काळ तुम्ही हॅन्डआऊट मार्गाचा वापर करावा,
32:43 आणि तुम्हाला जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हाच सादरीकरण मार्गाचा वापर करावा.
32:48 अर्थात अखेरीस जेव्हा तुम्ही सादरीकरण कराल तेव्हा तुम्हाला सादरीकरण मार्गाचा वापर करावा लागेल.
32:55 आणि तुम्हाला जेव्हा मुद्रण करायचे असेल तेव्हा तुम्ही हॅन्डआउट मार्गाचा वापर करा.
33:00 आता शेवटाला जाऊ. आपण या प्रशिक्षणाच्या अखेरीस पोचलो आहे.
33:08 आता आपण ऋणनिर्देश करु, किंबहुना मी हे सर्व कॉपी करते, इथे येते. ठीक आहे.
33:41 या प्रशिक्षणासाठीचे अनुदान राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमातून आयसीटी द्वारा आलेले आहे.
33:47 हे या कार्यक्रमाचे संकेतस्थळ आहे.
33:50 या प्रशिक्षणात सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते.
33:53 आपल्या प्रतिक्रिया कृपया कण्णन डॉट आयआयटीबी डॉट एसी डॉट इन येथे जरूर कळवा.
34:00 मी चैत्राली जोगळेकर आपली रजा घेते. पुन्हा एकदा धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey