LaTeX-Old-Version/C2/LaTeX-on-Windows-using-TeXworks/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:04, 16 October 2019 by Nancyvarkey (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे |
00:12 | TeXworks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे |
00:15 | न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे. |
00:19 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX2.9 वापरत आहे. |
00:27 | आपण आता TeXworks ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या. |
00:31 | ते स्वतंत्र व्यासपीठ आहे |
00:34 | तो एम्बेडेड PDF रिडर आहे |
00:36 | ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते. |
00:40 | आपण TeXworks सुरू करण्यापूर्वी, आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल. |
00:45 | MikTeX ही एक विंडोजसाठी TeX किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे. |
00:52 | विंडोजवर LaTex मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे. शिवाय, TeXworks हे MikTeX इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले मुलभूत एडीटर आहे. |
01:04 | www.miktex.org संकेतस्थळावर जा. |
01:10 | MikTeX इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा. हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल. |
01:19 | डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. |
01:22 | ती, सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे. त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल. |
01:28 | मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे. ती इथे आहे. |
01:32 | इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा. |
01:36 | चेक बॉक्स तपासा आणि Next वर क्लिक करा. |
01:40 | सर्व मुलभूत पर्याय निवडा. |
01:44 | इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील. |
01:47 | मी आधीच माझ्या संगणकावर MikTex इंस्टॉल केले आहे. त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही. |
01:55 | MikTex आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर, |
01:58 | MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया. |
02:04 | Windows start बटणावर क्लिक करा. |
02:07 | All Programs वर क्लिक करा. |
02:10 | MikTeX2.9 वर क्लिक करा |
02:12 | TeXworks वर क्लिक करा |
02:15 | TeXworks एडीटर उघडेल. |
02:18 | आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा. |
02:22 | मी फाईलवर क्लिक करून नंतर Open वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन. मग मी फाईल hello.tex उघडेन. |
02:33 | आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता. |
02:38 | ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात. हे LaTeX वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते. |
02:47 | LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा |
02:52 | टेक्सवर्क्स विंडोमध्ये, मेनू बारवर उपलब्ध असलेल्या Format बटणावर क्लिक करा. |
02:59 | वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा. |
03:03 | प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTex डॉक्युमेंटमध्ये TeXworks च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास, खालीलप्रमाणे करू या. |
03:11 | मेनू बारवर, Edit वर क्लिक करा नंतर Preferences वर क्लिक करा. |
03:16 | एडीटर टॅबमध्ये, ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते. |
03:22 | LaTeX निवडा आणि नंतर OK वर क्लिक करा. |
03:27 | अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्या सर्व डॉक्युमेंट्सना, वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल. |
03:33 | आता आपण आपले LaTeX दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत. |
03:37 | कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T कीज एकत्र दाबा . |
03:43 | एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल. |
03:49 | हे PDF रिडर या TeXworks सोबत येते हे लक्षात ठेवा. |
03:53 | हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे. |
04:00 | आपले LATEX चे मूलभूत इंस्टॉलेशन पूर्ण झाले. |
04:04 | हे बर्याच फॉर्मॅटिंग आवश्यकतांसाठी पुरेसे आहे. |
04:07 | तुम्ही आता या ट्युटोरिअलच्या बाहेर येऊ शकता. प्लेलिस्टवरील उर्वरित LATEX ट्यूटोरियल्सचा सराव करा. |
04:14 | इतर ट्युटोरियल्सचा अभ्यास करताना त्या दरम्यान तुम्हाला खालील एरर मेसेज मिळवू शकतात: “The required file ABC is missing. It is a part of the following package: XYZ” |
04:25 | येथे ABC हे पॅकेज XYZ मधील एक फाइल आहे |
04:29 | ABC आणि XYZ तुमच्या केसमध्ये विशिष्ट असतील |
04:33 | जेव्हा तुम्हाला असा एरर मेसेज मिळतो, तेव्हा या उर्वरित ट्यूटोरियलना ऐका. |
04:38 | या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोन मार्ग बाकीच्या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केले आहेत. त्यापैकी किमान एकाने तुमच्यासाठी कार्य केले पाहिजे. |
04:46 | आतासाठी एवढच. |
04:48 | तुम्हाला जाणून घ्याचे आहे का कि खालील प्रकारचे समस्या कसे सोडवायचे आहे: उर्वरित ट्युटोरिअलना ऐका आणि माझ्यासोबत अभ्यास करा. |
04:56 | आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू. |
04:59 | आपण इन्स्टॉल केलेल्या MikTex सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही. |
05:05 | ह्याचा अर्थ असा की आपल्याला: काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल. |
05:12 | उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत. |
05:16 | एक मार्ग म्हणजे आपण LaTex डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल करणे |
05:21 | MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत. |
05:28 | MikTex चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे. |
05:35 | चला आता आपण पहिली पद्धत पाहूया. |
05:37 | आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल करणे आवश्यक आहे. |
05:44 | प्रथम TeXworks एडीटर बंद करा. |
05:48 | हे आवश्यक आहे की आपण tex फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे. |
05:53 | start बटणावर क्लिक करा. यानंतर All programs वर क्लिक करा. MikTeX2.9 वर क्लिक करा |
06:02 | TeXworks वर राईट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा. |
06:08 | हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल. |
06:13 | आता फाईलवर क्लिक करा. मग Open वर क्लिक करा. beamer.tex फाईल निवडा. |
06:21 | कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T किज् एकत्र दाबा. |
06:26 | पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:30 | ते मिसींग पॅकेज beamer.cls इंस्टॉल करण्यास सूचित करेल. |
06:35 | ह्या डायलॉग बॉक्सवरील Change बटणावर क्लिक करा. |
06:40 | चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:44 | पॅकेजेस इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा. |
06:49 | कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा. |
06:52 | हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल. |
06:56 | जर आपण प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा. |
07:03 | मी एका प्रॉक्सी नेटवर्क वर आहे, मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते. |
07:09 | मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते . |
07:13 | मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते . |
07:16 | मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते . |
07:23 | ओके (Ok) वर क्लिक करा. आणि नंतर नेक्स्टवर (Next) क्लिक करा |
07:27 | ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल. |
07:31 | मी माहिती दाखल करते आणि OK वर क्लिक करते . |
07:36 | ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल . |
07:41 | सूचीमधून एक निवडा आणि Finish वर क्लिक करा. |
07:45 | Install वर क्लिक करा. |
07:48 | ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल. |
07:52 | पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:57 | ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल. |
08:03 | आपण “नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा” हा पर्याय अनचेक करू शकता. |
08:09 | आपण असे केल्यास, मिसींग पॅकेज आढळल्यास, MikTeX पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही. |
08:16 | Install वर क्लिक करा. |
08:18 | आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता, तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल. |
08:28 | इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तो कंपाइलेशन समाप्त करेल व PDF आऊटपुट उघडेल. |
08:35 | आपण पाहू शकतो की आपण Beamer डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे. |
08:39 | आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू. |
08:44 | Windows start बटण क्लिक करा. |
08:47 | यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा. |
08:49 | MikTeX2.9 वर क्लिक करा |
08:52 | मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन) |
08:55 | पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन) |
09:00 | तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल |
09:04 | आता या यादीवर एक लक्ष टाकू. |
09:07 | या यादीत सहा रकाने आहेत. |
09:10 | ते आहेत, Name, Category, Size, Packaged date, Installed on date आणि Title.. |
09:18 | इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. |
09:22 | ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत. |
09:29 | चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू. |
09:33 | उदाहरणार्थ , मी पॅकेज abc निवडते . |
09:38 | लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले. |
09:45 | अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे. plus बटणावर क्लिक करा. |
09:50 | एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल. |
09:58 | Proceed क्लिक करा. |
10:01 | मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे, तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो. |
10:08 | मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते . |
10:11 | OK वर क्लिक करा |
10:13 | एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल. |
10:20 | कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही. |
10:26 | त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा. |
10:31 | आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे. |
10:36 | close क्लिक करा. |
10:38 | पॅकेजची यादी रीफ्रेश होईल. |
10:41 | आपल्या लक्षात येईल की ABC पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल. |
10:49 | येथे LaTeX on Windows using TeXworks वरील ट्युटोरिअल पूर्ण होते. |
10:54 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे |
10:59 | TeXworks वापरून प्राथमिक LaTeX डॉक्युमेंट लिहिणे |
11:03 | २ वेगवेगळ्या प्रकारे मिसींग पॅकेजेस डाऊनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे |
11:08 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial |
11:12 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:18 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:28 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा |
11:33 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:45 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org / NMEICT-Intro |
11:56 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |