PhET/C2/Color-Vision/Marathi
Time | Narration |
00:01 | Color Vision, या PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्स वरील पाठात आपले स्वागत.
|
00:08 | या पाठात, Color Vision, , या PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्सचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
|
00:17 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04, |
00:25 | जावा वर्जन 1.8 |
00:29 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे. |
00:35 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिक आणि जीवशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:41 | सिम्युलेशनद्वारे आपण कलर व्हिजन पाहू- जेव्हा मानवी डोळा,
पांढरा प्रकाश |
00:50 | वर्णपटातील दिसणारे भिन्न रंग |
00:55 | वर्णपटातील भिन्न रंगांचा दृश्य प्रकाश आणि फिल्टर्स
|
01:00 | तांबडा, हिरवा आणि निळा प्रकाश स्वतंत्रपणे किंवा एकत्र करून पाहतो. |
01:06 | कृपया या ट्युटोरियलबरोबर दिलेले अतिरिक्त माहिती बघा.
सुरूवात करूया. |
01:14 | दृश्य प्रकाश
विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमचा एक भाग मानवी डोळ्याद्वारे दृश्य प्रकाश म्हणून ग्रहण केला जातो. |
01:25 | ह्या भागाची व्याप्ती 380 पासून 760 नॅनोमीटर्सपर्यंत आहे. |
01:33 | दृश्य वर्णपटाचे रंग VIBGYOR म्हणून लक्षात ठेवले जाऊ शकतात. |
01:39 | जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी, तांबडा |
01:47 | सर्वात कमी तरंगलांबी (सर्वाधिक वारंवारता) जांभळ्या रंगाची असते. |
01:53 | सर्वाधिक तरंगलांबी (सर्वात कमी वारंवारता) तांबड्या रंगाची असते. |
01:59 | सर्व रंग एकत्र झाल्यावर पांढरा प्रकाश मिळतो. |
02:04 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
|
02:09 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Color Vision हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे. |
02:16 | सिम्युलेशन उघडण्यासाठी, color-vision_en.html या फाईलवर राईट क्लिक करा. |
02:23 | Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा.
ब्राऊजरमधे फाईल उघडेल. |
02:32 | हा Color Vision सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
|
02:37 | आता आपण इंटरफेस पाहू. |
02:41 | इंटरफेसमधे दोन स्क्रीन्स आहेत-
RGB Bulbs |
02:49 | Single Bulb स्क्रीनवर क्लिक करा. |
02:53 | Single Bulb स्क्रीनवर उजवीकडे तोंड असलेली एक व्यक्ती दिसेल.
गळ्याच्या खाली दोन लहान प्रतिमा आहेत. |
03:04 | त्यातली पहिली हायलाईट केली आहे.
ही आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा दाखवते. |
03:11 | दुसर्या प्रतिमेवर क्लिक करा.
हायलाईट केल्यावर ती व्यक्तीच्या मेंदूतील क्रॉस सेक्शन दाखवते. |
03:20 | डोळ्यापासून मेंदूच्या वेगवेगळ्या भागात पसरलेल्या optic मज्जातंतूंचे निरीक्षण करा. |
03:28 | कलर व्हिजन,
प्रकाशग्रहण करणाऱ्या रेटिनातील Cone पेशी तरंगलांबींच्या काही रेंजसाठी संवेदनशील असतात. |
03:39 | पाने हिरव्या सोडून दृश्य प्रकाशाच्या इतर सर्व तरंगलांबी शोषून घेतात. |
03:46 | 520 नॅनोमीटर्स तरंगलांबीचा हिरवा प्रकाश परावर्तित केला जातो आणि डोळ्यापर्यंत पोहोचतो. |
03:54 | येथे M किंवा गॅमा प्रकारचे cones कार्यान्वित केले जातात. |
03:59 | cones कडून दृश्य माहिती optic मज्जातंतूमार्फत रेटिनल गॅंग्लियाला पाठविली जाते. |
04:07 | दोन optic मज्जातंतू optic chiasma मध्ये एकमेकांना भेटतात आणि पुढे जातात. |
04:14 | आता त्यांना optic' ट्रॅक्टस म्हटले जाते आणि ते थलॅमसमधील synapse मधे प्रवेश करतात. |
04:21 | त्यानंतर ते मेंदूच्या मागील बाजूस असलेल्या occipital lobe मध्ये primary visual cortex पर्यंत पोचतात. |
04:30 | आपण सिम्युलेशनवर परत जाऊ. |
04:34 | त्या व्यक्तीच्या मस्तकावरील लंबवर्तुळाचे निरीक्षण करा. |
04:39 | व्यक्तीस दिसणारे रंग तिथे भरलेले असतील. |
04:44 | लक्षात घ्या, तळाशी Play/Pause बटण आणि त्यापुढे Step बटण आहे. |
04:51 | रीसेट बटण आपल्याला परत सुरवातीस नेईल. |
04:55 | त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोरील टॉर्च किंवा फ्लॅशलाईट पहा. |
05:01 | चालू आणि बंद करण्यासाठी टॉर्चवर तांबडे बटण आहे. |
05:06 | फ्लॅशलाईटवरील पहिल्या बल्बवर क्लिक करा. |
05:11 | हा पांढरा प्रकाश आहे.
फ्लॅशलाईटच्या तांबड्या बटणावर क्लिक करा. |
05:18 | फ्लॅशलाईटच्याखाली असलेली पहिली प्रतिमा डीफॉल्टरूपात हायलाईट केलेली आहे. |
05:24 | ह्यात प्रकाशझोत(बीम) दाखवला जातो. |
05:28 | फ्लॅशलाईटच्याखाली असलेल्या दुसर्या प्रतिमेवर क्लिक करा. |
05:33 | हे फोटॉनच्या रूपात प्रकाश दर्शवेल. |
05:38 | Pause बटणावर क्लिक करा.
Step बटण सक्रिय असल्याचे पहा. |
05:45 | फोटॉन्सची पायरीपायरीने होणारी हालचाल पाहण्यासाठी Step बटणावर क्लिक करा. |
05:51 | फ्लॅशलाईटमधून बीमवर परत येण्यासाठी पहिल्या प्रतिमेवर क्लिक करा. |
05:57 | त्या व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या पांढर्या लंबवर्तुळाचे निरीक्षण करा. |
06:02 | म्हणजे त्या व्यक्तीला फ्लॅशलाईटमधून येणारा प्रकाश पांढरा दिसतो आहे. |
06:08 | फ्लॅशलाईटवरील दुसर्या बल्बवर क्लिक करा.
दृश्य वर्णपटाचे सर्व रंग स्लायडर बल्ब कलरवर पहा. |
06:19 | बल्ब कलर स्लायडर एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत न्या. |
06:24 | ज्या रंगावर हँडल ठेवलेले आहे ते फ्लॅशलाईटच्या प्रकाशाचा रंग ठरवते. |
06:31 | लक्षात घ्या, त्या व्यक्तीच्या डोक्यावरील लंबवर्तुळे त्याच रंगाने भरलेली आहेत. |
06:38 | बल्ब कलर स्लायडर ड्रॅग करून त्या व्यक्तीस दिसणारा रंग तुम्ही बदलू शकता.
बल्ब कलर स्लायडर उजवीकडील तांबड्या रंगावर ड्रॅग करा. |
06:50 | त्या व्यक्तीच्या समोर एक toggle switch आहे तो पहा.
तो Filter Color स्लायडरला जोडलेला आहे. |
06:59 | लक्षात घ्या की Filter Color स्लायडरमधे सुध्दा दृश्य वर्णपट आहे. |
07:06 | toggle switch वर क्लिक करा.
फ्लॅशलाईटपासून निघणाऱ्या बीमच्या मार्गावर एक फिल्टर दिसेल. |
07:16 | Filter Color स्लायडर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ड्रॅग करा. |
07:21 | ज्या रंगावर हँडल ठेवलेले आहे ते फिल्टरचा रंग दर्शविते. |
07:28 | लक्षात घ्या, फिल्टर तांबडा आहे आणि तो तांबडा बीम पुढे पाठवत आहे.
त्या व्यक्तीला देखील दिवा तांबडा दिसत आहे. |
07:38 | Bulb Color स्लायडर जांभळ्या रंगाकडे ड्रॅग करा.
फ्लॅशलाईटमधून जांभळा प्रकाश बाहेर येईल. |
07:56 | परंतु फिल्टर तांबडा असल्यामुळे, त्या व्यक्तीपर्यंत कोणताही प्रकाश पोचत नाही. |
07:52 | म्हणजेच त्या व्यक्तीला प्रकाश दिसत नाही. |
07:56 | फिल्टर कलर स्लायडर डाव्या टोकाकडील जांभळ्या रंगावर ड्रॅग करा. |
08:02 | फिल्टर जांभळ्या रंगाचे झालेले दिसेल आणि जांभळा प्रकाश त्या व्यक्तीकडे पाठवला जाईल.
त्या व्यक्तीला जांभळा प्रकाश दिसत आहे. |
08:13 | बल्ब कलर स्लायडर उजव्या टोकाकडील तांबड्या रंगावर ड्रॅग करा. |
08:19 | अजूनही फिल्टर जांभळाच राहिला आहे परंतु प्रकाशाचा बीम तांबडा झाला आहे. |
08:26 | परंतु जांभळा फिल्टर तांबड्या रंगाचा प्रकाश पुढे पाठवत नसल्याने,
त्या व्यक्तीस प्रकाश दिसत नाही. |
08:35 | दोन्ही स्लायडर्स विविध रंगांवर ड्रॅग करून कुठल्या रंगाचा प्रकाश पुढे पाठवला जातो ते पहा. |
08:43 | तुम्हाला दिसेल की जेव्हा दोन्ही स्लायडर्स एकाच किंवा जवळील रंगावर असतात तेव्हा प्रकाश पुढे पाठवला जातो. |
08:53 | फिल्टर स्वतःच्या रंगाची तरंगलांबी वगळता इतर सर्व तरंगलांबींचा प्रकाश अडवतो. |
09:01 | फिल्टरच्या रंगांसाठी ट्रान्समिशन जास्तीत जास्त असते तर जवळच्या तरंगलांबींसाठी कमी होते. |
09:09 | असाईनमेंट म्हणून, फ्लॅशलाईटसाठी पांढरा प्रकाश निवडा आणि विविध फिल्टर्समधून पुढे जाणाऱ्या प्रकाशाचे रंग पहा. |
09:22 | आता इंटरफेसच्या तळाशी असणाऱ्या RGB Bulbs स्क्रीनवर क्लिक करा. |
09:29 | येथेही तुम्हाला उजवीकडे तोंड असलेल्या व्यक्तीचे चित्र दिसेल.
माणसाच्या मेंदूचा क्रॉस सेक्शन दाखवण्यासाठी दुसऱ्या प्रतिमेवर क्लिक करा. |
09:41 | इंटरफेसच्या तळाशी Play/Pause, Step आणि Reset ही बटणे दिसतील. |
09:49 | स्क्रीनवर तीन स्लायडर्स आणि तीन फ्लॅशलाईटस दिसतील.
सर्व स्लायडर्स न्यूनतम पातळीवर सेट केलेले आहेत. |
10:00 | सर्वात वर एक तांबडा, मधे दुसरा हिरवा आणि सर्वात खाली निळा स्लायडर आहे. |
10:10 | तांबडा स्लायडर सर्वाधिक पातळीपर्यंत ड्रॅग करा.
|
10:15 | तांबड्या स्लाइडरच्या पुढील फ्लॅशलाइटमधून तांबडे फोटॉन कसे बाहेर पडतात ते पहा. |
10:22 | फोटॉन त्या व्यक्तीच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि त्या व्यक्तीला दिवा तांबडा दिसतो. |
10:28 | हिरवा स्लायडर सर्वाधिक पातळीपर्यंत ड्रॅग करा.
|
10:41 | तांबडा आणि हिरवा रंग मिळून पिवळा रंग तयार होतो.
तांबड्या आणि हिरव्या प्रकाशासाठी संवेदनशील cones सक्रिय असल्यामुळे त्या व्यक्तीला रंग पिवळा दिसेल. |
10:53 | Pause बटणावर क्लिक करा. |
10:56 | निळा स्लायडर सर्वाधिक पातळीपर्यंत ड्रॅग करा. |
11:00 | Play बटणावर क्लिक करा. तिन्ही रंग मिसळल्यामुळे त्या व्यक्तीला प्रकाश पांढरा दिसतो हे पहा. |
11:11 | थोडक्यात, |
11:14 | या पाठात, Color Vision, , या PhET इंटरऍक्टिव्ह सिम्युलेशन्सचे प्रात्यक्षिक बघितले.
|
11:22 | सिम्युलेशनद्वारे आपण कलर व्हिजन पाहिली- जेव्हा मानवी डोळ्याने,
पांढरा प्रकाश |
11:31 | वर्णपटातील दिसणारे भिन्न रंग |
11:35 | वर्णपटातील भिन्न रंगांचा दृश्य प्रकाश आणि फिल्टर्स
|
11:40 | तांबडा, हिरवा आणि निळा प्रकाश स्वतंत्रपणे किंवा एकत्र करून पाहिला. |
11:46 | असाईनमेंट म्हणून, हे 6 रंग मिळविण्यासाठी तांबडा, निळा आणि हिरवा स्लायडर ऍडजस्ट करा. |
11:55 | या स्कीम्सची रचना करण्यासाठी तुम्ही कोणती RGB रंगसंगती वापराल? |
12:01 | इंटरनेटवर रंगचक्राची प्रतिमा पहा. |
12:06 | पुढील स्कीम्ससाठी रंगसंगती निवडा. |
12:11 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
12:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
12:35 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
12:40 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. |
12:49 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
13:03 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |