GeoGebra-5.04/C2/Basics-of-Triangles/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:51, 5 October 2019 by Radhika (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Marathi Narration
00:01 जिओजेब्रा मधील Basics of Triangles च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत त्रिकोण काढणे आणि त्याचे कोन मोजणे
00:13 परिमिती आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ दाखवणे
00:17 त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 अंश दर्शवणे
00:22 बाह्य कोन आतील विरुद्ध कोनांच्या बेरजे इतके असल्याचे दर्शवणे
00:28 तसेच आपण
00:31 त्रिकोणाला शिरोलंब काढणे आणि लंबसंपात शोधणे आणि त्रिकोणात अंतरवर्तुळ काढणे शिकणार आहोत
00:38 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू लिनक्स ओएस version 14.04 .
00:45 जिओजेब्रा version 5.0.438.0-डी
00:51 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी .
00:58 नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01:04 मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे
01:07 मी सुरू करण्यापूर्वी, icon स्पष्ट दिसण्यासाठी फॉन्ट साइझ वाढविते
01:13 Options मेनू वर जा आणि फॉन्ट साइझ निवडा.
01:17 सब मेनूमधून 18 pt रेडिओ बटण निवडा
01:22 या ट्यूटोरियल साठी मी ऍक्सेस अनचेक करेन. ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा.
01:29 आणि ग्राफिक्स मेनू मधून ऍक्सेस अनचेक करा.
01:33 आता आपण त्रिकोण एबीसी काढू.
01:36 पॉलीगॉन टूल वर क्लिक करा.
01:39 ए, बी आणि सी असे तीन शिरोबिंदू काढण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
01:49 नंतर त्रिकोण पूर्ण करण्यासाठी पुन्हा शिरोबिंदू ए वर क्लिक करा.
01:53 जसे आपण त्रिकोण काढत आहोत, अल्जब्रा व्यू मध्ये संबंधित व्हॅल्यूज पहा
01:59 ते शिरोबिंदूचे निर्देशांक, बाजूंची लांबी आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ दाखवते.
02:09 आता त्रिकोणाचे कोन मोजण्यास शिकू
02:13 एंगल टूल वर क्लिक करा. शिरोबिंदू वर क्लिक करा बी ए सी
02:23 C B A
02:29 A C B
02:35 अल्फा, बीटा आणि गामाच्या कोनाची मापे अल्जब्रा व्यू मध्ये दिसत आहेत.
02:42 आता आपण एकमेकांवरील लेबल्स हलवू.
02:46 मूव्ह टूलवर क्लिक करा आणि लेबल्स स्पष्टपणे पाहण्यासाठी ते ड्रॅग करा.
02:54 त्रिकोणाचे परिमिती आणि क्षेत्रफळ दाखवू.
02:58 एंगल टूल ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Distance or Length टूल निवडा.
03:05 त्रिकोण एबीसी वर क्लिक करा.
03:08 त्रिकोणाची परिमिती त्रिकोणावर दिसेल.
03:12 आता एरिया टूल निवडा आणि ते दाखवण्यासाठी त्रिकोण एबीसी वर क्लिक करा.
03:19 पुढे आपण इनपुट बार वापरुन त्रिकोण एबीसीच्या कोनांची बेरीज शोधू.
03:25 इनपुट बारमध्ये, कंस उघडा.
03:29 कंसाच्या आतमध्ये symbols table मधून अल्फा निवडा.आता अधिक चिन्ह टाइप करा, बीटा निवडा.
03:39 पुन्हा एकदा प्लस चिन्ह टाइप करा आणि गामा निवडा. एंटर दाबा.
03:47 अल्जीब्रा व्यू मध्ये कोन डेल्टाच्या मापाचे निरीक्षण करा. ते 180 अंश इतके आहे
03:54 आता स्लाइडर ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Text टूल निवडा. नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा.
04:03 ग्राफिक्स व्यू वर टेक्स्ट विंडो उघडेल.
04:07 Text टूल्समध्ये मजकूर टाइप करण्यासाठी Edit बॉक्स आहे
04:12 टाइप केलेल्या मजकूराचे पूर्वावलोकन दर्शविण्यासाठी Preview बॉक्स आहे. एक लेटेक्स फॉर्म्युला चेक बॉक्स
04:19 Symbols ड्रॉप-डाऊन आणि ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउन.
04:25 आता आपण हे दाखवू की त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 अंश असते.
04:30 एडिट मजकूर बॉक्स प्रकारात, Sum of the Angles is equal to
04:35 ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून अल्फा निवडा + ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून बीटा निवडा + ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून गामा निवडा equal to  ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून डेल्टा निवडा.
04:50 प्रिव्यू बॉक्स मध्ये एंटर केलेला मजकूर आणि निवडलेल्या कोनाची मापे पहा.
04:56 तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
04:59 मजकूर ग्राफिक्स व्ह्यू वर दिसेल.
05:03 मूव्ह टूल वापरुन बिंदू A, B किंवा C ड्रॅग करा.
05:08 निरीक्षण करा, त्रिकोणाच्या कोनांची बेरीज नेहमी 180 अंश दर्शवते.
05:14 आता आपण रेषाखंड बीसी मधून विस्तारित रेषा काढू.
05:18 लाइन टूलवर क्लिक करा, नंतर बिंदू बी आणि सी वर क्लिक करा.
05:24 पॉईंट टूल वापरुन आपण सी च्या पुढील line f वर बिंदू डी चिन्हांकित करू.
05:30 आता आपण त्रिकोण एबीसीचा बाह्य कोन मोजू.
05:35 एंगल टूल वर क्लिक करा आणि नंतर बिंदू डीसीए वर क्लिक करा.
05:45 मूव्ह टूल वापरुन, कोन आणि बिंदूंचे एकमेकांवरील लेबल्स ड्रॅग करा.
05:54 आता आपण कोन एप्सिलॉनचा रंग बदलण्यास शिकू.
05:58 कोन एप्सिलॉन वर राइट-क्लिक करा. सब मेनूमधून ऑब्जेक्ट प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
06:05 Preferences विंडो उघडेल.
06:08 कलर टॅबमधील रंग मरुनमध्ये बदला आणि ओपॅसिटी स्लायडर ड्रॅग करा.
06:15 Preferences विंडो बंद करा.
06:18 आता आपण बाह्य कोन आतील विरुद्ध बाजूच्या कोनांच्या बेरजेच्या बरोबर आहे का ते तपासू.
06:24 इनपुट बार मध्ये, कंस उघडा. कंसाच्या आतमध्ये symbols table मधून अल्फा निवडा.
06:33 कीबोर्डवरील प्लस चिन्ह दाबा आणि बीटा निवडा.एंटर दाबा.
06:41   Algebra view पहा, एप्सिलॉन बरोबर मापाचा नवीन कोन टाऊ तयार झाला आहे..
06:48 कोन ताऊ हा अल्फा आणि बीटा कोनांची बेरीज आहे.
06:53 मूव्ह टूल वापरून पॉईंट सी ड्रॅग करा आणि बदल पहा. आपल्याला दिसेल की कोन एप्सिलॉन हे कोन ताऊ च्या समान मापाचे आहे.
07:03 पुढे मी त्रिकोण एबीसी आणि आधीपासून काढलेल्या कोनांसह एक नवीन विंडो उघडेन.
07:09 आपण त्रिकोण एबीसी वर altitudes आणि ऑर्थोसेन्टर काढू.
07:14 यासाठी प्रथम आपण त्रिकोण एबीसीच्या सर्व बाजूंनी बाह्य रेषा काढू.
07:21 लाइन टूलवर क्लिक करा, नंतर बिंदू ए, बी वर क्लिक करा.
07:28 त्याचप्रमाणे बिंदू B, C आणि A, C वर क्लिक करा.
07:35 आता आपण त्रिकोण एबीसी वर altitudes काढू.
07:39 Perpendicular Line टूलवर क्लिक करा. बिंदू A आणि रेषा g वर क्लिक करा.
07:46 त्याचप्रमाणे बिंदू B आणि रेषा h वर क्लिक करा. बिंदू C आणि रेषा f वर क्लिक करा.
07:55 त्रिकोणाची तीन altitudes एका ठिकाणी छेदतात.
07:59 इंटरसेक्ट टूलवर क्लिक करा आणि छेदनबिंदू डी म्हणून चिन्हांकित करा.
08:06 बिंदू D हा त्रिकोण एबीसीचा ऑर्थोसेन्टर आहे.
08:10 बिंदू D चे नाव बदलून ऑर्थोसेन्टर करू. बिंदू D वर राइट-क्लिक करा.
08:17 सब-मेनूमधून Rename निवडा.
08:20 Rename text बॉक्स उघडेल.
08:23 Rename text बॉक्समध्ये ऑर्थोसेन्टर टाइप करा. तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
08:30 बदल पूर्ववत करण्यासाठी Ctrl + Z दाबा.
08:36 कोनातून त्रिकोण एबीसी तसेच ठेवा.
08:40 आता कोन दुभाजक काढू.
08:44 त्यासाठी टूलबार वरुन Angle Bisector टूल निवडा.
08:49 बिंदूवर क्लिक करा बी, ए, सी
08:56 C, B, A
09:02 A, C, B .
09:08 कोन दुभाजक एका बिंदूत छेदतात ते पहा.
09:12 इंटरसॅक्ट टूल वापरुन पॉईंट डी म्हणून चिन्हांकित करू
09:20 चला आपण रेषाखंड बीसी ला डी मधून जाणारी एक लंब रेषा काढू.
09:26 Perpendicular Line  tool निवडा, बिंदू डी वर क्लिक करा आणि नंतर रेषाखंड बीसीवर क्लिक करा.
09:34 लक्ष द्या की लंब रेषा एका बिंदूत बीसीला छेदते.
09:39 Intersect टूल वापरुन हा बिंदू E म्हणून चिन्हांकित करू.
09:45 आता मध्यभागी डी मधून एक वर्तुळ काढू जे ई मधून जाईल.
09:51 Circle with Centre through point   टूलवर क्लिक करा, बिंदू डी वर क्लिक करा आणि नंतर बिंदू ई वर क्लिक करा.
10:00 त्रिकोणाच्या सर्व बाजूंना स्पर्श करणारा एक वर्तुळ काढला आहे. हा वर्तुळ, त्रिकोण एबीसीला incircle आहे.
10:10 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
10:13 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत , त्रिकोण काढणे आणि त्याचे कोन मोजणे .
10:20 परिमिती आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ दाखवणे
10:24 त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 अंश दाखवणे
10:29 बाह्य कोन आतील विरुद्ध कोनांच्या बेरजे इतका आहे दाखवणे.
10:35 तसेच आपण त्रिकोणाला शिरोलंब काढणे आणि लंबसंपात शोधणे आणि
10:41 त्रिकोणात अंतरवर्तुळ काढणे देखील शिकलो आहे.
10:44 असाईनमेंट म्हणून, त्रिकोणाला एक circumscribed circle काढा.
10:50 सूचना : त्रिकोणाच्या बाजूंना लंबदुभाजक काढा.
10:55 आपली असाइनमेंट यासारखी दिसली पाहिजे
10:59 आणखी एक असाईनमेंट- त्रिकोणात मेडियन्स काढा.
11:04 मेडिसन्सचे छेदनबिंदू चिन्हांकित करा. पॉईंटचे नाव सेंट्रोइड म्हणून बदला.
11:10 सूचना: बाजूंचे मध्यबिंदू चिन्हांकित करा विरुद्ध शिरोबिंदू प्रत्येक बाजूच्या मध्यबिंदूमध्ये मिळावा.
11:18 आपली असाइनमेंट यासारखी दिसली पाहिजे.
11:22 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
11:30 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा
11:38 कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
11:42 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:53 मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika