GeoGebra-5.04/C2/Introduction-to-GeoGebra/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 00:31, 3 October 2019 by Radhika (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Marathi Narration
00:01 Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे
00:05 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय टूल्सविषयी,
00:12 समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी
00:16 रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि Graphics view च्या गुणधर्मा विषयी.
00:22 येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04
00:28 GeoGebra version 5.0.438.0-d
00:33 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला मूलभूत गणिताची माहिती असावी.
00:40 Ubuntu Linux OS मध्ये GeoGebra अँप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा.
00:46 search bar मध्ये geogebra टाइप करा.GeoGebra आयकॉन दिसेल.
00:52 GeoGebra उघडण्यासाठी icon वर डबल-क्लिक करा.
00:57 Windows 10 OS मध्ये GeoGebra application उघडू
01:04 Search the web आणि Windows बॉक्समध्ये, geogebra टाइप करा.
01:09 GeoGebra यादीमध्ये दिसते.
01:12 GeoGebra  application उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
01:17 हा GeoGebra इंटरफेस आहे
01:20 त्यात मेनू आयटमसह स्टॅंडर्ड मेनू बार आहे.त्यात File, Edit, View, Options, Tools, Window आणि Help मेनू आहे.
01:37 menu bar च्या खाली, विविध भूमितीय tools सह एक टूल बार आहे.
01:43 tool bar च्या उजवीकडे Undo, Redo,  Help आणि Preferences  options आहेत.
01:53 tool bar च्या खाली आपल्याकडे Algebra view आणि Graphics view आहे.
01:58 जिओजेब्रामध्ये, भूमिती आणि बीजगणित एकत्र काम करतात.
02:03 toolbar वरील tools वापरून भूमितीच्या आकृती तयार करण्यासाठी Graphics view चा वापर केला जातो.
02:09 Algebra view काढलेल्या आकृत्यांचे संबंधित बैजिकराशी दाखवितात .
02:15 View menu वापरुन आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही view उघडू किंवा बंद करू शकतो.
02:25 window च्या तळाशी आपल्याकडे input bar आहे.
02:29 Input bar वापरुन आपण थेट बीजगणिताची कमांड आणि फंक्शन्स एंटर करू शकतो.
02:36 ग्राफिक व्यू वर grid आणि axes चे पर्याय आधीपासूनच सक्षम असतात.
02:42 आपण context menu वापरून  axes किंवा grid अक्षम करू शकता.
02:47  Graphics व्यू वर राईट क्लिक करा. Graphics मेनू उघडेल.
02:53 या मेनूमध्ये आपल्याकडे Axes आणि Grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय आहेत.
03:00 axes आणि  grid सक्षम किंवा अक्षम करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते.
03:05 ग्राफिक्सच्या जवळ टॉगल स्टाईल बार नावाचा एक छोटा त्रिकोण एरो पहा.
03:12 ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी त्रिकोणी एर्रोवर क्लिक करा.
03:16 येथे आपल्याला axes  आणि grid. निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय दिसतील.
03:22 पुढे आपण tool bar बद्दल तपशीलवार जाणून घेऊ.
03:26 toolbar च्या उजव्या टोकावरील  Move Graphics View टूलवर क्लिक करा.
03:31 लक्षात घ्या की टूलभोवती एक गडद निळा border दिसून येईल. हे सूचित करते की हे tool निवडलेले आहे.
03:38 टूलवर कर्सर फिरवा.त्याचे नाव आणि function टूल टीप बॉक्समध्ये दिसते
03:45 हे निवडलेले टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू हलवू शकतो. आवश्यकतेनुसार ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
03:53 प्रत्येक tool च्या कोपऱ्यावर एक लहान काळा त्रिकोण आहे.
03:58 जेव्हा कर्सर त्रिकोणावर ठेवला जातो तेव्हा ते लाल होते.
04:03 टूलबारवरील मूव्ह टूल वर क्लिक करा.संबंधित tools ची एक ड्रॉप-डाऊन यादी दिसते.
04:10 ग्राफिक्स व्यू मध्ये पॉईंट्स काढू.
04:13 Point टूल वर क्लिक करा आणि नंतर Graphics view वर क्लिक करा.बिंदू A काढला आहे.
04:20 पुन्हा एकदा दुसरा B बिंदू काढण्यासाठी क्लिक करा.
04:24 लक्षात घ्या की बिंदूचे संबंधित निर्देशांक Algebra view मध्ये दिसत आहेत.
04:29 आता रेषा काढायला शिकू. Line टूलच्या कोपऱ्यात असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा.
04:36 येथे आपण विविध प्रकारच्या रेषा काढण्यासाठी Line टूल्सची सूची पाहू शकता.
04:42 Line टूल वापरुन आपण बिंदू A आणि B मधून रेषा काढू.
04:47 Line टूल वर क्लिक करा आणि बिंदू A आणि B वर क्लिक करा.
04:53 रेषा f A आणि B मधून जाते.
04:57 Graphics view वरील सर्व objects डिलिट करू.
05:01 सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.कीबोर्ड वरील Delete key दाबा.
05:08 आता AB ही रेषा पुन्हा काढा.Line टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
05:17 रेषा AB काढण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा.
05:22 पुढे मी रेषा AB ला लंब रेषा काढेन .
05:27 त्यासाठी Perpendicular Line tool वर क्लिक करा.
05:31 बिंदू C काढण्यासाठी AB रेषेच्या वरील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
05:38 C ला ओलांडत जाणारी रेषा g रेषा AB ला लंब आहे.
05:43 आता रेषा AB ला समांतर रेषा काढू.
05:47 Parallel Line टूलवर क्लिक करा.
05:50 बिंदू D काढण्यासाठी AB च्या खालील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
05:57 ABच्या समांतर आणि बिंदू D मधून जाणारी एक रेषा h काढली जाईल.
06:02 आता आपण दोन रेषेसाठी छेदनबिंदू चिन्हांकित करू.
06:06 पॉइंट टूल ड्रॉप-डाउन मध्ये, इंटरसेक्ट टूल निवडा.
06:10 F आणि g रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
06:15 नंतर g आणि h या रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
06:20 आता आपण आपले रेखांकन थोडे आकर्षित बनवू .
06:24 मूव्ह टूल वर क्लिक करा.
06:27 बिंदू A वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
06:30 लक्षात घ्या की बिंदू E आणि F आणि सर्व रेषा बिंदू A बरोबर हलतात.
06:36 त्याचप्रमाणे आपण बिंदू बी आणि डी हलवू.
06:40 बिंदू E, F आणि रेषा, बिंदू B बरोबर हलतात.
06:45 बिंदू डी बरोबर फक्त बिंदू एफ आणि रेषा h हलतात.
06:50 बिंदू A, B आणि D स्वतंत्र ऑब्जेक्ट्स आहेत.
06:56 आता मी बिंदू E किंवा F हलविण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला कोणतीही हालचाल दिसत नाही.
07:03 हे सूचित करते की, बिंदू E किंवा F हे एकमेकांवर अवलंबून असलेले objects आहेत.
07:09 आता रेषेचे गुणधर्म बदलू.
07:13 रेषा AB वर राईट क्लिक करा. रेषेच्या सर्व गुणधर्मासह एक context menu उघडेल.
07:21 Object Properties निवडा. Preferences विंडो उघडते.
07:27 Graphics view वरील बदल पाहण्यासाठी Preferences विंडोचा आकार बदला.
07:33 मी Preferences विंडो मधील काही मूलभूत गुणधर्म समजावून सांगते.
07:38 नेम बॉक्समध्ये, आपण लाइन एबी असे नाव बदलू शकता.
07:43 आणि Caption म्हणून Original line लिहू शकता.
07:46 line दर्शविण्यासाठी किंवा न दर्शविण्यासाठी Show Object चा चेक बॉक्स क्लिक करा.
07:51 शो लेबल चेक बॉक्समध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन आहे.
07:55 मी Name आणि value निवडेन.लक्षातघ्या की name आणि value रेषेच्या खाली दिसेल.
08:03 नंतर कलर टॅब वर क्लिक करा.येथे आपल्याकडे रेषेला रंग देण्यासाठी कलर बॉक्स आहे.
08:10 कलर बॉक्सच्या खाली बदललेला रंग पाहण्यासाठी प्रीव्ह्यू बॉक्स आहे.
08:15 मी ग्रीन बॉक्स वर क्लिक करेन.लाइन एबीचा रंग हिरवा झाला आहे.
08:22 स्टाईल टॅबवर क्लिक करा.
08:25 येथे आपण Line Thickness, Line Opacity  आणि Line Style बदलू शकता.
08:33 Preferences विंडो बंद करा.
08:36 बदललेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सह लाइन एबी पहा.
08:41 मी लाइन h चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलेन.
08:45 ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करण्यासाठी लाईन h वर राईट क्लिक करा. Preferences विंडो उघडते.
08:53 येथे मी कलर बदलून गुलाबी आणि स्टाईल डॅश लाइनमध्ये बदलेन.
09:00 Preferences विंडो बंद करा.
09:03 आता फाईल सेव्ह करू. फाईल मेनूवर क्लिक करा आणि सेव्ह निवडा.
09:10 सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल.
09:13 मी माझ्या मशीनवर डॉक्युमेंट्स फोल्डर निवडेन.
09:17 आपण आपल्या मशीनवर आपल्या आवडीचे कोणतेही फोल्डर निवडू शकता.
09:22 फाईलचे नाव लाईन्स म्हणून टाइप करा.त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा
09:29 आपली फाईल .ggb extensionने सेव्ह झाली आहे.
09:34 ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.एक नवीन GeoGebra  विंडो उघडा.
09:40 सेगमेंट टूल वापरुन एक रेषाखंड एबी काढा.
09:44 रेषाखंड एबी ला लंब दुभाजक काढा.
09:48 रेषेचे नाव बदला आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदला
09:52 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
09:57 आता नवीन विंडो उघडू.
10:00 File menuवर क्लिक करा आणि New Window निवडा.
10:05 आता मी Graphics विंडो प्रॉपर्टीज बद्दल स्पष्टीकरण देईन. येथे मी Algebra व्यू बंद करेन
10:13 Graphics विंडो वर राइट क्लिक करा.
10:16 कॉन्टेक्स्ट मेनू विविध पर्यायांसह उघडेल.
10:20 Graphics पर्याय निवडा.
10:23 Preferences विंडो उघडते.
10:26 Preferences विंडोमध्ये आपण Basic, xAxis, yAxis आणि Grid  टॅब पाहू.
10:36  Preferences विंडोचा आकार बदला आणि Graphics पहा आणि त्यास सोबत ठेवा.
10:43 आपण बेसिक टॅबमधील Axes ची basic properties बदलू.
10:48 bold चेक बॉक्स वर क्लिक करा. हे अ‍ॅक्सेस बोल्ड करते.
10:54 Color बटणावर क्लिक करा.एक color बॉक्स निवडा
11:00 आपण कोणताही गडद रंग निवडू शकता आणि ओके बटणावर क्लिक करू शकता
11:05 त्यानुसार  axes चा रंग बदलतो
11:09 पुढे लाइन स्टाईल ड्रॉप डाऊन निवडा.मी दुतर्फा एरो पर्याय निवडेन.
11:17 आता आपण Miscellaneous properties कडे जाऊ.
11:21 चला ग्राफिक्स व्यूचा बॅकग्राउंड कलर बदलू
11:25 बॅकग्राउंड कलर बटणावर क्लिक करा. कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
11:31 मी हलका हिरवा निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
11:36 लक्षात घ्या की बॅकग्राउंड कलर हलका हिरव्या रंगात बदलला आहे.
11:40 आता ग्रिड टॅब वर क्लिक करा. डीफॉल्टनुसार, शो ग्रीड चेक बॉक्स चेक केला गेला.
11:47 ग्रीडचा रंग बदलू. कलर बटणावर क्लिक करा
11:53 कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
11:56 मी डार्क ग्रीन निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
12:02 ग्रिडचा रंग गडद हिरव्या रंगात बदलल्याचे पहा.
12:07 Preferences विंडो बंद करा
12:10 बदललेल्या propertiesसह जिओजेबरा इंटरफेस पहा.
12:15 असाईनमेंट एक्सप्लोर म्हणून,1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब
12:25 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
12:28 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय tools विषयी
12:35 समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि
12:41 ग्राफिक्स व्ह्यूच्या गुणधर्मा विषयी
12:44 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा.
12:52 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
13:01 या स्पोकन ट्यूटोरियलविषयी आपल्याकडे काही प्रश्न आहेत का?असल्यास कृपया या साइटला भेट द्या.
13:07 आपल्याला प्रश्न आहे तो मिनिट आणि सेकंद निवडा. आपला प्रश्न थोडक्यात सांगा.
13:14 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
13:18 स्पोकन ट्यूटोरियल फोरम या ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
13:23 कृपया त्यांच्याशी असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल.
13:31 कमी गोंधळ सह, आपण या चर्चा सूचनात्मक माहिती म्हणून वापरु शकतो
13:36 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:47 माधुरी गणपती आयआयटी बॉम्बे आपला निरोप घेते. धन्यवाद

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika