Advance-C/C2/Command-line-arguments-in-C/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:40, 26 September 2019 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Advance – C मधील Command Line Arguments वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आरग्युमेंटस असलेले मुख्य फंक्शन उदाहरणासहित जाणून घेऊ. |
00:15 | येथे उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 11.10 आणि उबंटुवरील gcc कंपायलरचे 4.6.1 वर्जन वापरणार आहोत. |
00:27 | या पाठासाठी तुम्हाला C वरील पाठांचे ज्ञान आवश्यक आहे. |
00:33 | नसल्यास संबंधित पाठांसाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:39 | प्रोग्रॅमनी सुरूवात करण्यासाठी माझी कोड फाईल उघडत आहे. |
00:45 | 'main hyphen with hyphen args.c' हे फाईलचे नाव आहे. |
00:50 | हा प्रोग्रॅम समजून घेऊ. |
00:53 | ह्या हेडर फाईल्स आहेत. stdio.h हे core input आणि output फंक्शन्स घोषित करते. |
01:01 | stdlib.h ही हेडर फाईल- Numeric conversion function
Pseudo-random numbers, Generation function, Memory allocation, Process control functions घोषित करते. |
01:16 | हे मुख्य फंक्शन आहे. त्यामधे दोन आरग्युमेंटस आहेत.int argc, char asterisk asterisk argv (**argv). |
01:28 | “argc” हे प्रोग्रॅममधे पास केलेल्या command line arguments च्या संख्येचा संदर्भ घेते. |
01:34 | यामधे प्रोग्रॅमच्या मूळ नावाचाही समावेश असतो . |
01:38 | argv मधे index 0 पासून सुरू होणा-या मूळ आरग्युमेंटसचा समावेश होतो. |
01:44 | Index 0 हे प्रोग्रॅमचे नाव असते. |
01:48 | Index 1 हे प्रोग्रॅममधे पास केलेले पहिले आरग्युमेंट. |
01:53 | Index 2 हे प्रोग्रॅममधे पास केलेले दुसरे आरग्युमेंट आणि अशाच प्रकारे पुढे. |
01:59 | हे स्टेटमेंट प्रोग्रॅममधे पास केलेल्या एकूण आरग्युमेंटसची संख्या दाखवते. |
02:05 | हे प्रोग्रॅममधे पास केलेले पहिले आरग्युमेंट दाखवेल. |
02:09 | 1 हा अंक index 1 साठीचे आरग्युमेंट दाखवतो. |
02:13 | 'while' condition आरग्युमेंटसची संख्या कमी करत जाईल. |
02:18 | हे स्टेटमेंट प्रोग्रॅममधे पास केलेल्या सर्व आरग्युमेंटस प्रिंट करेल. |
02:23 | सर्वात शेवटी आपल्याकडे return 0 स्टेटमेंट आहे. |
02:27 | Ctrl+Alt+T ही बटणे दाबून टर्मिनल उघडा. |
02:35 | टाईप करा: gcc space main hyphen with hyphen args.c space hyphen o space args. एंटर दाबा. |
02:49 | टाईप करा : dot slash args. एंटर दाबा. |
02:54 | असे आऊटपुट दिसेल: "Total number of arguments are 1". "The first argument is null" "arguments are ./args" |
03:06 | Command line arguments कार्यान्वित करते वेळी दिल्या जातात. |
03:11 | Total number of arguments are 1 कारण कार्यान्वित होणा-या फाईलचे नावच शून्यावे आरग्युमेंट आहे. |
03:19 | The first argument is (null) कारण आपण प्रोग्रॅममधे कोणतेही आरग्युमेंट पास केलेले नाही. |
03:26 | Arguments केवळ एकच आहे ते म्हणजे dot slash args. |
03:31 | पुन्हा कार्यान्वित करू. |
03:34 | अप ऍरोचे बटण दाबा. स्पेस देऊन टाईप करा: Sunday space Monday space Tuesday. एंटर दाबा. |
03:47 | असे आऊटपुट दिसेल: Total number of arguments are 4 , The first argument is Sunday , Arguments are ./args Sunday Monday आणि Tuesday . |
04:04 | आऊटपुट समजून घेऊ. |
04:06 | ./args, Sunday, Monday आणि Tuesday ही एकूण चार आरग्युमेंटस आहेत. |
04:14 | पहिले आरग्युमेंट हे Sunday आहे. |
04:17 | शून्यावे आरग्युमेंट नेहमीच कार्यान्वित होणा-या फाईलचे नाव असेल. |
04:22 | पहिल्या आरग्युमेंटला Sunday प्रदान केले आहे. |
04:25 | दुस-या आरग्युमेंटला Monday प्रदान केले आहे. |
04:28 | तिस-या आरग्युमेंटला Tuesday प्रदान केले आहे. |
04:31 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात, |
04:37 | आपण शिकलो: Command line arguments, argc, argv. |
04:45 | असाईनमेंट म्हणून हा प्रोग्रॅम वेगवेगळी आरग्युमेंटस देऊन कार्यान्वित करा. |
04:51 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
04:54 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04:57 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:08 | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
05:18 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
05:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05:30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:36 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |