PhET/C2/The-Greenhouse-Effect/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | ग्रीनहाऊस इफेक्ट या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात, ग्रीनहाऊस इफेक्ट हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन दाखवणार आहोत.
|
00:14 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:20 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, |
00:26 | जावा वर्जन 1.7,
|
00:30 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:36 | हे सिम्युलेशन वापरून तुम्ही शिकणार आहात:
1. ग्रीनहाऊस वायूंचा वातावरणीय तापमानावर होणारा परिणाम |
00:44 | 2. Ice age आणि आजच्या वातावरणाची माहिती घेऊन तुलना करणे. |
00:49 | 3. Glass panes आणि Clouds यांचा वातावरणीय तापमानावर होणारा परिणाम
|
00:55 | 4. वातावरणीय वायूंबरोबर फोटॉन्सची आंतरक्रिया |
00:59 | 5. ग्रीनहाऊस परिणामामध्ये वातावरणातील वायूंचे योगदान. |
01:04 | हरितगृह( ग्रीनहाऊस) परिणाम म्हणजे,
सूर्याकडून येणारे प्रारण (रेडिएशन) पृथ्वीच्या वातावरणाने अडवून शोषून घेण्याची क्रिया. |
01:13 | हा परिणाम वातावरणातील वायूंमुळे होतो. |
01:17 | ते वायू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परत येणारी उष्णता टिकवून ठेवतात. |
01:22 | या स्लाइडमध्ये हरितगृह वायू आणि त्यांची टक्केवारी दर्शविली गेली आहे. |
01:27 | ही प्रक्रिया ग्रीनहाऊसमध्ये जे घडते त्या प्रमाणेच आहे. |
01:32 | थंड प्रदेशात, फळे आणि भाज्या काचेच्या झाकलेल्या भागात पिकविल्या जातात त्याला ग्रीनहाऊस म्हणतात . |
01:40 | ग्रीनहाउसमध्ये, सूर्यकिरणे पारदर्शक काचेमधून जातात आणि माती गरम करतात. |
01:47 | यापैकी काही उष्णता काचेच्या द्वारे शोषली जाते आणि काही परावर्तित होते. |
01:52 | ही यंत्रणा सूर्याच्या उर्जेला ग्रीनहाऊसमध्ये अडकवून ठेवते. |
01:58 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू. |
02:02 | मी Downloads फोल्डरमधे Greenhouse Effect हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
|
02:08 | सिम्युलेशन उघडण्यासाठी मी टर्मिनल वापरत आहे. |
02:12 | टर्मिनल उघडू. |
02:14 | प्रॉमप्टवर टाइप करा: cd Downloads आणि एंटर दाबा. |
02:20 | त्यानंतर टाईप करा: java space hyphen jar space greenhouse_en.jar आणि एंटर दाबा. |
02:31 | ग्रीनहाऊस इफेक्ट सिम्युलेशन उघडेल. |
02:35 | सिम्युलेशनला 3 स्क्रीन्स आहेतः
Greenhouse Effect, Glass Layers आणि Photon Absorption. |
02:45 | ग्रीनहाऊस इफेक्ट स्क्रीन पृथ्वीचे वातावरण दर्शवितो. |
02:49 | सूर्यापासून मिळणारा प्रकाश दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे फोटॉन वापरले आहेत. |
02:54 | पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित झालेली उष्णता लाल इन्फ्रारेड फोटॉन्स म्हणून दाखवली आहे. |
03:00 | पॅनेलवर उजव्या बाजूला वातावरणाची माहिती घेण्यासाठी आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत. |
03:06 | डीफॉल्ट रूपात, Atmosphere during Today म्हणून सेट केले आहे. |
03:11 | आजच्या वातावरणासाठी ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांचे निरीक्षण करा. |
03:16 | तापमान नोंदवण्यासाठी केल्विन आणि फॅरेनहाइट मापनश्रेणीतील तापमापी आहे. |
03:23 | ऑप्शन्स या पॅनेलमधे तापमान फॅरेनहाइट किंवा सेल्सियस या एककात दर्शवण्यासाठी रेडिओ बटणे आहेत. |
03:31 | स्क्रीनच्या खालील भागात सिम्युलेशन पॉज आणि प्ले करण्यासाठी बटणे आहेत. |
03:37 | जास्त वेगातील ऍनिमेशनचा वेग कमी करण्यासाठी स्लायडर fast ते slow असा ड्रॅग करा. |
03:44 | तापमापीवरील तापमानाचे निरीक्षण करा. |
03:48 | Adjustable concentration बटणावर क्लिक करा. |
03:52 | ह्याने ग्रीनहाऊस वायूंची तीव्रता वाढवता येईल. |
03:57 | नंतर Greenhouse Gas Concentration चा स्लायडर Lots च्या दिशेने ड्रॅग करा. |
04:03 | तापमापीवर तापमानाचे निरीक्षण करा. |
04:07 | ग्रीनहाऊस वायूंची तीव्रता जशी वाढेल, तसे तापमान वाढेल. |
04:13 | वातावरणातील ढग ग्रीनहाऊस इफेक्ट कमी करतात का? |
04:18 | Options मेनूमधून सिम्युलेशनमधे Clouds समाविष्ट करा. |
04:23 | तापमानाचे निरीक्षण करा. लक्षात घ्या की ढग वातावरणात उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात. |
04:30 | तसेच तुम्ही 18 व्या शतकातील आणि हिमयुगातील वातावरणाची तुलना करू शकता. |
04:36 | 1750 या रेडिओ बटणावर क्लिक करा. |
04:40 | ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांचे निरीक्षण करा. |
04:44 | Ice age या रेडिओ बटणावर क्लिक करा. |
04:47 | ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांतील बदलाचे निरीक्षण करा. |
04:52 | हिमयुगातील ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांची टक्केवारी खूपच कमी आहे. |
04:58 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी स्क्रीनच्या खालील भागात असलेल्या Reset All बटणावर क्लिक करा. |
05:04 | तुमच्या कृतीची पुष्टी करण्यासाठी Yes वर क्लिक करा. |
05:08 | आता या विंडोमधील इतर स्क्रीन वापरून बघूया. |
05:13 | Glass Layers टॅबवर क्लिक करा. |
05:16 | येथे सिम्युलेशनमधे ग्लास पेन्स समाविष्ट करण्याचा पर्याय आहे. |
05:22 | हे ग्लास पेन्सचा वातावरणातील तापमानावर होणारा परिणाम समजण्यास मदत करेल. |
05:28 | ग्लास पेन समाविष्ट करून तापमानातील बदलाचे निरीक्षण करा. |
05:33 | आणखी ग्लास पेन्स समाविष्ट करून काय होते ते बघा. |
05:38 | Photon Absorption टॅबवर क्लिक करा. |
05:41 | फोटॉन्स सोडण्यासाठी इन्फ्रारेड फोटॉन स्लायडर ड्रॅग करा. |
05:46 | Atmospheric Gases खालील रेडिओ बटणांवर एकेक करून क्लिक करा आणि कंपनांचे निरीक्षण करा. |
06:00 | Build Atmosphere या रेडिओ बटणावर क्लिक करा. |
06:04 | संबंधित अणूंसाठी स्लायडर्स ड्रॅग करा. |
06:19 | नंतर Infrared किंवा Visible Photons सोडण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा. |
06:25 | रेणूंच्या कंपनांचे निरीक्षण करा. |
06:29 | थोडक्यात, |
06:31 | या पाठात आपण शिकलो- ग्रीनहाऊस वायूंचा वातावरणातील तापमानावर होणारा परिणाम, |
06:38 | हिमयुग आणि आजच्या वातावरणाची तुलना, |
06:43 | वातावरणातील तापमानावर ग्लास पेन्स आणि ढगांचा परिणाम, |
06:48 | वातावरणातील गॅसेसची फोटॉनबरोबर होणारी आंतरक्रिया |
06:52 | वातावरणातील वायूंचा ग्रीनहाऊस इफेक्टमधील सहभाग. |
06:57 | असाईनमेंट म्हणून: 18 व्या शतकातील आणि हिमयुगातील वातावरणातील तापमानाची तुलना करा. |
07:05 | सिम्युलेशनमधे ढग समाविष्ट करून तापमानातील बदलाचे निरीक्षण करा. |
07:11 | Glass layers आणि Photon Absorption हे स्क्रीन वापरून बघा. |
07:16 | ग्लास पेन्स वातावरणाचे तापमान का वाढवतात हे समजावून सांगा. |
07:22 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
07:31 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
07:41 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
|
07:45 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
|
07:49 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
07:57 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
08:09 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद.
|