PhET/C2/pH-Scale/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:12, 15 September 2019 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या pH scale या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात आपण, pH scale हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकणार आहोत.


00:15 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे.


00:22 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.

00:38 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:

1. दिलेले द्रावण आम्ल आहे की अल्कली हे ठरवणे.

00:49 2. आम्ल आणि अल्कली यांचा त्यांच्या तीव्रतेनुसार क्रम लावणे.

3. दिलेल्या pH वरून हायड्रॉक्साईड आयन, हायड्रोनियम आयन आणि पाणी यांची तीव्रता ठरवणे.

01:01 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:

4. द्रावणाचा pH म्हणजे काय? 5. विरलीकरणाचा द्रावणाच्या pH वर होणारा परिणाम 6.Logarithmic आणि Linear scale.

01:16 pH स्केल हे जलीय द्रावणाची आम्लता किंवा आम्लारिधर्मिता(basicity) दाखवण्यासाठी वापरले जाणारे एक न्युमरिक स्केल आहे.


01:25 pH म्हणजे हायड्रोजन आयनांची mol/L मधे मोजलेली तीव्रता(concentration).
pH म्हणजे हायड्रोजन आयनांच्या तीव्रतेचा 10 पाया असलेल्या ऋण लॉगॅरिथम होय.

pH = - log[H]

01:37 आम्लयुक्त द्रावणासाठी, pH व्हॅल्यू 7 पेक्षा कमी (< 7) असते.
01:42 अल्कलीयुक्त द्रावणासाठी, pH व्हॅल्यू 7 पेक्षा अधिक (> 7) असते.
01:47 उदासीन द्रावणासाठी, pH व्हॅल्यू 7 (= 7) असते.
01:52 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.

http://phet.colorado.edu

01:57 मी Downloads फोल्डरमधे pH Scale हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
02:02 सिम्युलेशन उघडण्यासाठी ph-scale या html फाईलवर राईट क्लिक करा.
02:08 Open With Firefox Web Browser पर्याय निवडा. फाईल ब्राऊजरमधे उघडेल.
02:16 हा pH scale सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
02:20 या इंटरफेसवर 3 स्क्रीन्स आहेत-

Macro Micro My solution

02:27 Macro स्क्रीन वापरून सिम्युलेशन सुरू करू. त्यासाठी Macro स्क्रीनवर क्लिक करा.
02:36 या स्क्रीनवर डाव्या बाजूला 0 ते 14 पर्यंत

pH श्रेणी दर्शवणारे pH scale आहे.

02:44 pH मोजण्यासाठी स्केलला हिरव्या रंगाचा probe जोडला आहे. द्रवांचे pH दर्शवणारा एक pH meter आहे.
02:54 पाणी घालण्यासाठी स्क्रीनच्या उजव्या बाजूला पाण्याचा पंप आहे.
02:59 पाण्याच्या अंशांकित भांड्यात डीफॉल्ट रूपात चिकनचे सूप भरलेले आहे.
03:05 द्रव काढून टाकण्यासाठी भांड्याच्या डावीकडे खाली एक पंप जोडलेला आहे.
03:11 द्रव घालण्यासाठी एक ड्रॉपर आहे.
03:14 द्रवांपैकी एक द्रव निवडण्यासाठी एक ड्रॉपडाऊन बॉक्स आहे. डीफॉल्ट रूपात चिकन सूप निवडलेले आहे.
03:22 उजवीकडील कोपऱ्यात खाली Reset चे बटण दिले आहे.
03:28 ड्रॉपडाऊनच्या बाणावर क्लिक करा.
03:31 स्क्रॉल करून Battery Acid या पर्यायावर क्लिक करा. भांडे Battery Acid ने 0.50 L (0.5 लिटर्स) पर्यंत भरलेले दिसेल.
03:42 हिरव्या रंगाचा probe भांड्यामधे ड्रॅग करा आणि pH बघा.
03:48 मीटर pH ची व्हॅल्यू 1.0. दाखवत आहे. pH 7 पेक्षा कमी असल्यामुळे (<7), Battery Acid हे आम्लयुक्त द्रावण आहे.
03:58 अजून पाणी घालण्यासाठी पाण्याच्या पंपावर क्लिक करा.
04:03 पाण्याने द्रवाची पातळी 1 लिटरपर्यंत वाढवा. पाणी घातल्यावर pH मधे होणारा बदल बघा.

आता pH मीटर pH ची व्हॅल्यू 1.30 दाखवत आहे.

04:16 लक्षात घ्या पाणी वाढवल्याने Battery Acid चा pH वाढतो.

कारण विरलीकरणामुळे हायड्रोजन[H] आयनांची तीव्रता कमी होते.

04:28 आता दुसरे द्रावण निवडूया.
04:32 ड्रॉपडाऊनच्या बाणावर क्लिक करा.
04:34 स्क्रॉल करून Hand Soap या पर्यायावर क्लिक करा. भांडे Hand Soap या द्रावणाने भरेल.
04:42 येथे, pH मीटर pH ची व्हॅल्यू 10.00 दाखवत आहे. Hand Soap हा नैसर्गिक रूपात आम्लारी (basic) आहे.
04:54 Hand Soap च्या द्रावणात पाणी घालण्यासाठी पाण्याच्या पंपावर क्लिक करा.
04:59 1 L, Hand Soap द्रावणासाठी pH ची व्हॅल्यू 9.70 दाखवत आहे.
05:06 Hand Soap द्रावणाची pH व्हॅल्यू विरलीकरणानंतर कमी झालेली दिसेल.
05:12 कारण विरलीकरणामुळे हायड्रॉक्साईड (OH) आयनांची तीव्रता कमी होते.
05:18 अर्धा लिटर Hand Soap चे द्रावण काढून टाकण्यासाठी खालील भागातील पंपावर क्लिक करा.
05:24 ड्रॉपरवर क्लिक करा आणि Hand Soap द्रावणाची पातळी 0.6 L पर्यंत वाढवा. pH मधील बदल बघा.
05:34 हायड्रॉक्साईड (OH) आयनांची तीव्रता वाढल्याने pH वाढला आहे.
05:39 आता आपण आम्ल आणि अल्कली त्यांच्या तीव्रतेनुसार क्रमाने लावूया.
05:45 त्यासाठी विविध द्रवांची pH व्हॅल्यू तपासणार आहोत.
05:50 ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Blood हा पर्याय निवडा. भांडे 0.50 L पर्यंत रक्ताने भरले जाईल.
05:59 मीटरवर 7.40 ही pH व्हॅल्यू दिसेल. pH व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त ( >7) असल्यामुळे रक्त हे अल्कलीयुक्त द्रावण आहे.
06:09 पुन्हा ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Orange Juice हा पर्याय निवडा.
06:14 0.50 L ज्यूससाठी मीटर 3.50 ही pH व्हॅल्यू दाखवत आहे. संत्र्यांचा रस आम्लयुक्त द्रावण असल्याचे हे स्पष्ट करत आहे.
06:26 वरील pH व्हॅल्यूजनुसार क्रम खालीलप्रमाणे आहे.

Hand soap > Blood > Orange Juice > Battery Acid.

06:38 असाईनमेंट म्हणून,

प्रत्येक द्रवाचा pH तपासा आणि pH श्रेणीनुसार क्रम लावा.

06:48 आता Micro स्क्रीनवर जाऊ. इंटरफेसच्या खालच्या भागातील Micro स्क्रीनवर क्लिक करा.
06:57 या स्क्रीनवर असलेली टूल्स अशाप्रकारे आहेत-

स्क्रीनच्या डावीकडे pH scale आहे,

07:04 pH स्केलच्या वरील भागात Concentration आणि Quantity यामधील पर्याय निवडण्यासाठी एक स्वीच आहे,

pH स्केल बंद करण्यासाठी वजाचे चिन्ह असलेले एक लाल बटण आहे.

07:16 खालील भागात Logarithmic किंवा Linear scale निवडण्यासाठी एक स्वीच आहे.
07:22 हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयन यांचे गुणोत्तर म्हणजेच (H3O+ / OH-) व Molecule count निवडण्यासाठी चेकबॉक्स आहेत.
07:30 pH meter मधे pH reader आणि व्हॅल्यू बंद करण्यासाठी वजाचे चिन्ह असलेले लाल बटण आहे.
07:38 ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Soda Pop हा पर्याय निवडा.

भांडे Soda Pop ने भरेल.

07:46 pH मीटर pH ची व्हॅल्यू 2.50 दाखवत आहे. म्हणजेच Soda Pop हे आम्लयुक्त द्रावण आहे.
07:54 Soda Pop आम्लयुक्त असल्यामुळे हायड्रोनियम आयनची तीव्रता जास्त तर हायड्रॉक्साईडची तीव्रता कमी आहे
08:02 त्यानंतर Quantity(mol) वर क्लिक करा.
08:05 हायड्रोनियम आयन, हायड्रॉक्साईड आयन आणि पाण्याच्या moles ची संख्या दिसेल.
08:12 आता Logarithmic स्केल बदलून Linear निवडूया. त्यासाठी Linear पर्यायावर क्लिक करा .
08:20 pH स्केल Linear मोडमधे बदलेल. pH व्हॅल्यूजदेखील Linear झालेल्या दिसतील.
08:28 परंतु pH लॉगॅरिथमिक स्केलमधे असल्यामुळे आपण Linear वापरणार नाही.
08:34 हायड्रोनियम आयन टु हायड्रॉक्साईड आयन रेशो (H3O+ / OH-) या चेकबॉक्सवर क्लिक करा.
08:39 भांड्यात मोठ्या संख्येने लाल ठिपके दिसतील. हे हायड्रोनियम आयन्स आहेत.
08:46 हायड्रॉक्साईड आयन्स (OH-) चे काही निळे ठिपके दिसतील.
08:51 सोडा पॉपमधील रेणूंची संख्या बघण्यासाठी Molecule count च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
08:57 सोडा पॉप स्क्रीनवर हायड्रोनियम आयन्स, हायड्रॉक्साईड आयन्स आणि पाण्याच्या रेणूंची संख्या दिसते.
09:05 विरलीकरणाचा रेणूंच्या संख्येवर होणारा परिणाम पाहू.
09:10 पाण्याच्या पंपावर क्लिक करून भांडे 1 L पर्यंत भरा. रेणूंच्या संख्येत होणारा बदल पहा.

pH व्हॅल्यू वाढलेली दिसेल. ती 2.80 झाली आहे.

09:25 असाईनमेंट म्हणून: रक्ताच्या नमुन्याचा pH मोजा.
09:30 विरलीकरणानंतर Molecule Count आणि H3O+ / OH- रेशो यामधील बदल बघा.
09:37 आता My Solution स्क्रीनवर जाऊ. इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या My Solution स्क्रीनवर क्लिक करा.
09:46 My Solution स्क्रीनमधे Macro आणि Micro स्क्रीन्स सारखीच टूल्स उपलब्ध आहेत.
09:53 या स्क्रीनवर काही अतिरिक्त टूल्सदेखील आहेत. जसे की-
09:57 स्क्रीनच्या उजवीकडे अंशांकित केलेले भांडे, pH हवा तसा बदलण्यासाठी pH meter.
10:05 या स्क्रीनवर pH किंवा आयन्सच्या तीव्रता हाताळता येतात.
10:11 या स्क्रीनवर दोन पध्दतीने आपण आपल्या पसंतीचे द्रावण बनवू शकतो-

1. pH स्केलवर H3O+ किंवा OH- स्लाईडर हलवून,

2. काळ्या रंगाचे वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला असणारे बाण क्लिक करून.

10:28 आता हायड्रोनियम आयन H3O+ चा स्लाईडर वरच्या दिशेला सरकवा.
10:32 लक्षात घ्या त्यावेळी हायड्रॉक्साईड आयन OH- स्लाईडर खालच्या बाजूला सरकेल.
10:38 खालच्या दिशेच्या काळ्या बाणावर क्लिक करून pH व्हॅल्यू 4.0 असलेले द्रावण बनवूया. हे आम्लयुक्त द्रावण आहे.
10:48 आता हायड्रोनियम आयन टु हायड्रॉक्साईड आयन H3O+ / OH- रेशो आणि Molecule count या चेकबॉक्सवर क्लिक करा.
10:55 हायड्रोनियम आयनच्या H3O+ रेणूंची संख्या 3.01 x 1019 आहे.
11:01 असाईनमेंट म्हणून:

7.0 आणि 9.0 ह्या pH व्हॅल्यूज असलेली द्रावणे बनवा. रेणूंमधील बदलांचे निरीक्षण आणि तुलना करा.

11:13 थोडक्यात,

या पाठात आपण pH स्केल या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनबद्दल शिकलो.

11:22 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो-

1.दिलेले द्रावण आम्ल आहे की अल्कली हे ठरवणे.

11:31 2. आम्ल आणि अल्कली यांचा त्यांच्या तीव्रतेनुसार क्रम लावणे.
11:36 3. दिलेल्या pH वरून हायड्रॉक्साईड आयन, हायड्रोनियम आयन आणि पाणी यांची तीव्रता ठरवणे.


11:43 4. द्रावणाचा pH म्हणजे काय?

5. विरलीकरणाचा द्रावणाच्या pH वर होणारा परिणाम 6. Logarithmic आणि Linear scale.

11:53 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


12:02 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
12:15 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.


12:21 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
12:29 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


12:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali