PhET/C2/Graphing-Lines/Marathi
Time | Narration |
00:01 | ग्राफिक लाईन्स सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत.
|
00:05 | या पाठात, Graphing Lines हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकणार आहोत.
|
00:12 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील गणिताचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:20 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:35 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:
1. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमविषयी माहिती. 2. आलेख रेषेच्या slope ची गणना कशी करावी. 3. आलेख रेषा save करणे. |
00:48 | 4. रेषेचा slope आणि intercept बदलणे.
5. linear समीकरणात, variable च्या बदलण्याचा रेषेवर होणारा परिणाम. |
00:58 | y=mx+b हे x आणि y या दोन व्हेरिएबल्सचे रेषीय समीकरण आहे. येथे, m हा रेषेचा slope आणि b हा intercept आहे. |
01:12 | x ची किंमत बदलली असता y च्या किंमतीतील बदल स्लोप दर्शवतो.
x = 0 असताना y च्या मूल्यास y-intercept म्हणतात. |
01:26 | आपण प्रात्यक्षिक सुरू करूया. |
01:29 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू. |
01:33 | मी Downloads फोल्डरमधे Graphing Lines simulation आधीच डाऊनलोड करून घेतले आहे.
|
01:39 | सिम्युलेशन उघडण्यासाठी graphing-lines_en.html या फाईलवर राईट क्लिक करा.
Open With Firefox Web Browser पर्याय निवडा. फाईल ब्राऊजरमधे उघडेल. |
01:53 | हा Graphing Lines सिम्युलेशनचा इंटरफेस आहे. |
01:57 | या इंटरफेसवर चार स्क्रीन्स आहेत- Slope, Slope-Intercept, Point-Slope आणि
Line Game.
|
02:06 | Slope स्क्रीनवर क्लिक करा. |
02:10 | स्क्रीनवर x आणि y अक्षांसह कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. |
02:16 | उजवीकडील फॉर्म्युला बॉक्स रेषेचा slope काढण्याचे सूत्र दर्शविते. |
02:23 | slope मोजण्यासाठी आपण y2, y1 आणि x2, x1 या व्हॅल्यूज इनपुट म्हणून वापरतो. |
02:31 | y2, y1 च्या डीफॉल्ट व्हॅल्यूज 4 आणि 2, आणि x2, x1 च्या 3 आणि 1 आहेत. |
02:41 | डीफॉल्ट मूल्यांचा वापर करून आलेख काढला आहे. येथे आपण स्लोप 1 आहे हे पाहू शकतो. |
02:49 | अप आणि डाऊन अॅरो बटण वापरून आपण y2, y1 आणि x2, x1 च्या व्हॅल्यूज बदलू शकतो. |
02:57 | Save Line बटण वापरून आलेख रेषा सेव्ह करता येते. |
03:02 | लाल वजा चिन्हावर क्लिक करून फॉर्म्युला बॉक्स स्क्रीनवरून काढू शकतो आणि हिरव्या अधिक बटणावर क्लिक करून दाखवू शकतो. |
03:11 | फॉर्म्युला बॉक्सच्याखाली Slope, Hide lines आणि Hide grid हे चेक बॉक्सेस आहेत. |
03:19 | Hide lines आणि Hide grid या चेक बॉक्सेसवर क्लिक केल्यास graph आणि grid दिसणार नाहीत. Slope चेकबॉक्स आपोआप नाहीसा होईल. |
03:32 | Slope चेकबॉक्स दिसण्यासाठी Hide lines आणि Hide grid चेक बॉक्सेस अनचेक करूया. |
03:40 | लक्षात घ्या की आलेख slope ची किंमत दाखवतो. जांभळे आणि पिवळे बिंदू हलवून x1, y1 आणि x2, y2 चे मूल्य बदलता येते हे पहा. |
03:54 | जसजसे आपण पॉइण्टस हलवितो, रेषांचा slope बदलत जातो.
x आणि y च्या मूल्यांमधील बदल फॉर्म्युला बॉक्समधे पहा. |
04:04 | स्क्रीनच्या तळाशी, पॉईंटचे कोऑर्डिनेट दाखवण्यासाठी असलेल्या राखाडी रंगाच्या बॉक्सला Point टूल्स म्हणतात. |
04:14 | कोऑर्डिनेट्स पाहण्यासाठी जांभळ्या आणि पिवळ्या बिंदूंवर Point टूल्स ड्रॅग करून ठेवा. |
04:20 | Point टूल्स परत तळाशी ड्रॅग करा. |
04:24 | (0, 0) या आरंभबिंदूशी जुळण्यासाठी जांभळा बिंदू ड्रॅग करा
टूलपैकी एक ड्रॅग करा आणि आरंभबिंदूवर ठेवा. |
04:33 | (5,5) या बिंदूशी जुळण्यासाठी पिवळा बिंदू ड्रॅग करा. रेषेचा स्लोप 1 असल्याचे दिसेल. |
04:42 | फॉर्म्युला बॉक्समधील Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे. |
04:49 | पिवळा बिंदू (2,8) पर्यंत ड्रॅग करा.
point टूल ड्रॅग करून पिवळ्या बिंदूवर ठेवा. पिवळा बिंदू (2,8) वर असल्याची खात्री होईल. |
05:02 | आता स्लोप 4 आहे. |
05:05 | फॉर्म्युला बॉक्समधील Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.
|
05:11 | पिवळा बिंदू (-5,5) पर्यंत ड्रॅग करा. point टूल ड्रॅग करून पिवळ्या बिंदूवर ठेवा.
|
05:19 | आता स्लोप -1 आहे. |
05:22 | फॉर्म्युला बॉक्समधील Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.
|
05:28 | point टूल पुन्हा आपल्या जागेवर ड्रॅग करा. पिवळा बिंदू (-2,8) पर्यंत ड्रॅग करा. |
05:36 | आता स्लोप -4 आहे.
|
05:39 | Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.
|
05:44 | आपण वेगवेगळ्या स्लोप्सच्या 4 रेषा काढल्या आहेत. लक्षात घ्या की रेषेच्या चढ/उताराचा संबंध स्लोपशी आहे. |
05:53 | असाईनमेंट म्हणून:
1. स्लोप कधी शून्य आहे आणि केव्हा अगणित आहे ते शोधा. 2. स्पष्टीकरण द्या. |
06:04 | इंटरफेसच्या खालील Slope-Intercept स्क्रीन पाहूया. |
06:10 | Slope-Intercept वर क्लिक करा. y= 2/3x+1 (2 by 3 x plus 1) रेषा असलेला स्क्रीन दिसेल. |
06:21 | येथे इंटरसेप्टची व्हॅल्यू 1 आहे. |
06:25 | या स्क्रीनमध्ये आपण 'm' आणि 'b' च्या व्हॅल्यूज बदलू शकतो. |
06:30 | जांभळा बिंदू y अक्षावर ड्रॅग करा. लक्षात घ्या हा बिंदू इंटरसेप्ट दर्शवितो.
जेव्हा आपण जांभळा बिंदू हलवितो तेव्हा रेषेचा इंटरसेप्ट बदलतो. |
06:44 | निळा बिंदू आलेखावर फिरण्यासाठी मुक्त आहे.
जेव्हा आपण निळा बिंदू हलवितो, तेव्हा रेषेचा स्लोप बदलतो. |
06:53 | सिम्युलेशन रीसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.
|
07:02 | फॉर्म्युला बॉक्समधे m च्या सूत्रातील अंशाचे मूल्य 2 चे 3 करा.
लक्षात घ्या की स्लोप 1 आहे तर इंटरसेप्ट अजूनही 1 आहे. |
07:14 | आता पुन्हा m ची किंमत 2/3 करून घ्या आणि b ची व्हॅल्यू 4 करा.
लक्षात घ्या की नवीन रेष पहिल्या रेषेला समांतर आहे परंतु ती y अक्षाला 4 वर इंटरसेप्ट करते. |
07:31 | Save Line बटणावर क्लिक करा. रेष सेव्ह झाली आहे. |
07:35 | b ची व्हॅल्यू -2 करा, Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.
|
07:43 | आपल्याकडे 3 समांतर रेषा आहेत ज्या y अक्षावर 3 वेगवेगळ्या बिंदूंवर इंटरसेप्ट करतात. |
07:50 | सिम्युलेशन रीसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
|
07:55 | b ची व्हॅल्यू शून्य करू. लक्षात घ्या, जांभळा बिंदू आरंभबिंदू आहे. |
08:03 | रेषा आता आरंभबिंदूतून जाते. |
08:06 | स्लोपच्या खालील चेकबॉक्सेस y=x आणि y=-x वर क्लिक करा.
लक्षात घ्या आपल्याकडे आरंभबिंदूतून जाणाऱ्या तीन रेषा आहेत. |
08:19 | आता Point-Slope स्क्रीनवर जाऊ. |
08:23 | इंटरफेसच्या तळाशी असलेल्या Point-Slope वर क्लिक करा. |
08:28 | Point-Slope स्क्रीनवर (x, y) मूल्यांचा संच समीकरणात भरला जातो .
या पद्धतीत x आणि y व्हॅल्यूज निश्चित असतात. |
08:41 | (x, y) च्या दिलेल्या मूल्यासाठी, y-y1 = m(x-x1) या सूत्राचा उपयोग करून m मोजता येऊ शकतो. |
08:53 | जेनेरिक पॉईंट (x1, y1) जांभळ्या बिंदूद्वारे दर्शविला आहे. |
08:59 | कोऑर्डिनेट्स पाहण्यासाठी Point टूल जांभळ्या बिंदूवर ड्रॅग करा. |
09:04 | Point टूल पुन्हा त्याच्या जागी नेऊन ठेवा. |
09:07 | रेषेचे समीकरण बदलण्यासाठी जांभळा आणि निळा हे दोन्ही बिंदू आलेखावर मुक्तपणे ड्रॅग करा.
जांभळा बिंदू (5,0) वर ड्रॅग करा आणि ठेवा. |
09:20 | नंतर निळा बिंदू (5,5) वर ड्रॅग करा. |
09:24 | लक्षात घ्या की रेषा y-अक्षाला समांतर आहे आणि स्लोप अगणित आहे. |
09:31 | Save Line बटणावर क्लिक करा. रेषा सेव्ह झाली आहे.
|
09:35 | x अक्षावर जांभळा बिंदू ड्रॅग करा.
लक्षात घ्या की x अक्षावर सर्वत्र स्लोप अगणित आहे. |
09:45 | आता लाइन गेम स्क्रीन वर जाऊ. |
09:49 | Line Game स्क्रीनवर क्लिक करा. |
09:52 | Line Game स्क्रीनमध्ये खेळण्यासाठी 6 विविध काठिण्य पातळ्या आहेत.
हे गेम या सिम्युलेशनचा वापर करून मिळवलेल्या ज्ञानाची चाचणी घेतील. |
10:02 | या खेळात स्क्रीनच्या तळाशी Timer आणि Sound बटणे आहेत. |
10:08 | प्रत्येक गेमवर क्लिक करा आणि खेळ खेळून बघा. |
10:20 | थोडक्यात, |
10:22 | या पाठात आपण Graphing Lines हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकलो. |
10:29 | सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकलोः
1. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमविषयी माहिती
3. आलेख रेषा save करणे |
10:43 | 4. रेषेचा slope आणि intercept बदलणे
|
10:47 | 5. linear समीकरणात variable च्या बदलण्याचा रेषेवर होणारा परिणाम
|
10:53 | असाईनमेंट म्हणून:
1. Slope-Intercept स्क्रीन वापरुन, स्लोपचे मूल्य 1 केव्हा असेल ते शोधा. 2. Point-Slope स्क्रीन वापरून कोणत्या क्वाड्रंट्समधे स्लोप धन आहे ते शोधा. |
11:09 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
11:17 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
11:29 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
11:32 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
11:41 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
11:53 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |