PhET/C2/States-of-Matter/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:58, 10 September 2019 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या स्टेटस् ऑफ मॅटर सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: पदार्थांच्या अवस्था, इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन.
00:13 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञान विषयाचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:20 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04

जावा वर्जन 1.7

फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.

00:37 हे सिम्युलेशन वापरून विद्यार्थी पुढील गोष्टी करू शकतील-


1. पदार्थाच्या अवस्थांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन.

2. तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे कणांच्या हालचालीतील परिवर्तनाचे भाकीत.

3. विविध पदार्थांच्या विलय बिंदु, गोठणांक, उत्कलनांक यांचा अभ्यास.

00:58 4. कणांच्या तीन वेगवेगळ्या फेजेसची तुलना.
01:02 5. पदार्थाच्या स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेतील कणांमधील आंतरक्रियेची तुलना.
01:09 6. तापमान आणि रेणूंची गतिज उर्जा यांच्यातील संबंधांचा अभ्यास.
01:15 आपल्या आजूबाजूला असलेले पदार्थ स्थायू, द्रव, वायू या अवस्थांमधे असतात.
01:22 पदार्थाच्या या अवस्था कणांमधील इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे निर्माण होतात.

अवस्थांतर क्रिया पदार्थाला दिलेल्या उष्णता आणि दाबामुळे होते.

01:34 आता आपण सिम्युलेशन सुरू करू.
01:37 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी ही लिंक वापरा.

http://phet.colorado.edu

01:42 मी डाउनलोड फोल्डरमधे आधीच स्टेटस् ऑफ मॅटर सिम्युलेशन डाउनलोड केले आहे.
01:49 सिम्युलेशन उघडण्यासाठी States-of-Matter html फाईलवर क्लिक करा.

फायरफॉक्स ब्राउजरमधील ओपन हा पर्याय निवडा.

02:00 फाईल ब्राउजरमधे उघडेल.
02:03 सिम्युलेशन 3 स्क्रीन्समधे उघडेल-

स्टेटस्, फेज चेंजेस आणि इंटरऍक्शन.

02:13 स्टेटस् स्क्रीनवर क्लिक करा.
02:16 डीफॉल्ट स्वरूपातील स्क्रीन निऑन अणूंनी भरलेला कंटेनर आहे.
02:22 कंटेनरला थर्मामीटर सुध्दा जोडलेला आहे.

हा केल्विन स्केलमधील तापमान दर्शवतो.

सेल्सियसमधे तापमान पाहण्यासाठी काळ्या बाणावर क्लिक करा.

02:36 कंटेनरच्या खाली, सिस्टीमला गरम किंवा थंड करण्यासाठी हीट रेग्युलेटर आहे.
02:43 कंटेनर गरम करण्यासाठी स्लाइडर वरच्या बाजूला ड्रॅग करून होल्ड करा.

कंटेनर थंड करण्यासाठी स्लाइडर खालच्या बाजूला ड्रॅग करून होल्ड करा.

02:53 स्क्रीनच्या उजव्या बाजूला अणू आणि रेणूंची यादी आहे.
02:59 या यादीच्या खाली सॉलिड, लिक्विड आणि गॅससाठी बटणे आहेत.
03:07 सिम्युलेशनच्या तळाशी-डाव्या कोपर्यात दोन बटणे आहेत.

सिम्युलेशन चालू आणि पॉज करण्यासाठी मोठे बटण आहे.

03:16 लहान बटण सिम्युलेशन पायरीपायरीने पुढे नेण्यासाठी आहे.

रिसेट बटण तळाशी-उजव्या कोपर्यात आहे.

03:25 येथे फेजमधील बदल पाहण्यासाठी आपण अणू किंवा रेणू गरम किंवा थंड करू शकतो.
03:32 कंटेनरमध्ये निऑन अणू आहेत. Solid बटणावर क्लिक करा.
03:38 स्क्रीनवर पहा. सॉलिडमध्ये, निऑन कण घट्ट बांधलेले आहेत.
03:43 अणूंची हालचाल मर्यादित आहे. कंपने किमान आहेत.
03:50 हीट रेग्युलेटरवरील स्लायडर वर नेऊन तापमान वाढवा.
03:56 तापमान 27 K पर्यंत वाढवा. आपण अणूंमध्ये होणारी हालचाल पाहू शकतो.
04:04 हे निऑन द्रव स्थितीत असल्याचे सूचित करते. तापमान आणखी वाढवा. अणू कंटेनरमध्ये मुक्तपणे फिरत आहेत.
04:15 निऑन गॅस फेजमधे आहे.
04:18 गॅस फेजमधे अणू उच्च वेगाने यादृच्छिकपणे(रँडमली) हालचाल करतात.
04:24 या यादृच्छिक गतीमुळे, अणू एकमेकांवर तसेच कंटेनरच्या भिंतींवर आदळतात.
04:30 रिसेट बटणावर क्लिक करून सिम्युलेशन रिसेट करा.
04:35 सूचीमधून पाण्याचे रेणू निवडा. सॉलिड बटणावर क्लिक करा.
04:41 कंटेनरमधील रेणूंचे तापमान आणि हालचाल पहा. पुन्हा लिक्विड बटणावर क्लिक करून कंटेनरमधील रेणूंचे निरीक्षण करा.
04:53 तसेच गॅस बटणावर क्लिक करा.

रिसेट बटणावर क्लिक करून सिम्युलेशन रिसेट करा.

05:01 आता इंटरफेसच्या तळाशी फेज चेंजेस स्क्रीनवर क्लिक करा.
05:08 सिस्टीम गरम वा थंड होताना, आकुंचित होताना किंवा त्यात अधिक अणू समाविष्ट होत असताना अणू किंवा रेणूंचे वर्तन, हा स्क्रीन वापरुन तपासता येईल.
05:20 या स्क्रीनमधील कंटेनरला प्रेशर गेज जोडलेला आहे.
05:25 गॅसचे अणू किंवा रेणू, आत ढकलण्यासाठी कंटेनरला पंप जोडलेला आहे.
05:32 स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकतो.

1.इंटरऍक्शन पोटेन्शियल कर्व्ह किंवा लेनार्ड जोन्स पोटेन्शियल कर्व्ह

2. फेज डायग्राम कर्व्ह.

05:44 प्रयोग सुरू करण्यापूर्वी, प्रेशर गेजवरील प्रारंभिक दाब पाहून घ्या.
05:51 थर्मामीटरवरील तापमान पहा. फेज डायग्रामवरील लाल ठिपका निऑन स्थायू अवस्थेत असल्याचे दाखवतो.
06:02 हळूहळू बोट खाली दाबून दाब वाढवा. फिंगरवर क्लिक करा. माउस सावकाश खाली ड्रॅग करा.
06:13 झाकणाचा रेणूंना स्पर्श होताच तापमान आणि दाबाचे निरीक्षण करा.
06:19 जसजसा दाब वाढतो, रेणूंची गतिज उर्जा वाढते. फेज डायग्रामवर लाल ठिपका पहा.
06:28 पंप दाबून कंटेनरमध्ये निऑन अणू वाढवा.
06:43 कणांमधील टकरा वाढत असताना तापमान आणि दाब वाढतो.फेज डायग्रामचे निरीक्षण करा, निऑन आता गॅस फेजमधे आहे.
06:55 या क्षणी, दाब वाढविल्यास झाकण उडते.यामुळे काही अणू कंटेनरमधून बाहेर पडू शकतात.
07:06 झाकण परत बसवण्यासाठी पिवळ्या रिटर्न लिड बटणावर क्लिक करा.
07:11 तापमानाचा रेग्युलेटर कुलिंग अवस्थेत आणण्यासाठी खाली ड्रॅग करा.
07:16 कंटेनरचे तापमान आता कमी होत आहे. निऑन आता द्रव स्थितीत आहे. प्रेशर गेजचे निरीक्षण करा, दाब देखील कमी होत आहे.
07:28 फेज स्थायूरूप होईपर्यंत कंटेनर थंड करा.

फेज डायग्रामवरील लाल बिंदुकडे लक्ष ठेवा.

07:39 त्याचप्रमाणे यादीतील इतर अणू आणि रेणूंसाठी फेजमधील बदल पहा.
07:49 इंटरफेसच्या तळाशी असलेल्या इंटरऍक्शन स्क्रीनवर क्लिक करा.
07:54 हा स्क्रीन स्थितिज उर्जा व अणूंमधील अंतर यांच्यांतील संबंधांचा आलेख दाखवतो.
08:01 या स्क्रीनचा वापर करून, बाँडिंग अंतर आणि स्थैर्य यांच्यातील संबंध आपण पाहू शकतो.
08:08 अणू वेगळे करण्यासाठी क्लिक करून ड्रॅग करा.

चलनक्षम अणूला पिन केलेल्या अणूपासून दूर ड्रॅग करा.

08:17 अणू जवळ येत असताना स्थितिज उर्जेचा आलेख पहा.

अणूंमधली आकर्षण आणि प्रतिकर्षण शक्ती बदलल्यास स्थितिज उर्जा बदलते.

08:29 असाईनमेंट म्हणून,
08:31 फेज चेंजेस स्क्रीनमधे अणू आणि रेणूंच्या यादीमधून Adjustable Attraction सिलेक्ट करा.
08:38 इंटरऍक्शन स्ट्रेंथ weak ते strong अशी बदलण्यासाठी स्लायडरचा उपयोग करा.

आणि तापमान व दाब यांचा या रेणूंवर काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करा.

08:50 फेज चेंजेस स्क्रीन वापरून, कुठल्या पदार्थाच्या अणू वा रेणूंमधील बल सर्वाधिक आहे ते शोधा.
08:59 या पाठात स्टेट्स ऑफ मॅटर इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकलो.
09:07 सिम्युलेशन वापरून आपण शिकलो,

1. पदार्थाच्या अवस्थांची वैशिष्ट्ये

09:14 2. तापमान किंवा दाबातील बदलामुळे कणांच्या हालचालीतील होणारा फरक.
09:21 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
09:30 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा:

09:45 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
09:51 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
10:00 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
10:14 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali