PHP-and-MySQL/C2/Arithmatic-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Arithmetic Operators
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
|
|
---|---|
0:00 | basic arithmetic operators वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
0:03 | आपण प्रथम बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार बघणार आहोत. |
0:09 | हे अशा प्रकारे लिहिले जाते. बेरीज, वजाबाकी, गुणाकारासाठी asterisk आणि भागाकारासाठी forward slash |
0:17 | आपल्याकडे दोन variables असतील. |
0:20 | आपण num1नामक variable बनवून त्याला 10ही value देऊ. आणि num2या व्हेरिएबलला 2 ही value देऊन ते सेव्ह करू या. |
0:30 | हे दोन्ही दशांश चिन्ह नसलेले integer numbers आहेत. |
0:34 | आता समजा आपल्याला num1 आणि num2 यांची बेरीज करायची आहे. |
0:40 | मग आपण num1 अधिक num2 हे उत्तर echo करू या. |
0:44 | हे तपासून बघू. |
0:47 | येथे 12दिसत आहे. num1 आणि num2 म्हणजेच10 and 2यांची बेरीज केल्यावर त्याचे उत्तर 12 येते. |
0:55 | आता वजाबाकी करून बघू या. आपण येथे केवळ चिन्ह वजाने बदलू. |
1:01 | Refresh केल्यावर येथे 8 हे उत्तर दिसेल. |
1:05 | आता गुणाकार करू या. 10 X 2 = 20 आणि आपल्याला 20 हे उत्तर मिळालेले आहे. |
1:11 | पुढे 10 / 2 म्हणजेच 10 च्या निम्मे = 5. |
1:18 | आता आपल्याला याच्या शेवटी काही समाविष्ट करायचे असल्यास ते आपण कसे करू शकतो. |
1:24 | समजा याला num2 ने भागायचे आहे. |
1:27 | मला असे वाटते की हे operation अशा प्रकारे होईल. येथे num1आणि num2म्हणजे 10 and 2 यांची बेरीज होईल आणि उत्तर 12 मिळेल. 12 ला 2 ने भागले जाईल. |
1:39 | आता 12 / 2 म्हणजेच आपल्याला 6 उत्तर मिळेल. |
1:43 | परंतु येथे प्रत्यक्षात काय होते आहे तर num2 / num2 = 1 हे उत्तर मिळाले जे num1 मध्ये मिळवले गेले. |
1:56 | म्हणजेच आपल्याला 6 ऐवजी 11 हे उत्तर मिळाले. |
2:00 | याचे कारण असे की भागाकाराची क्रिया बेरजेच्या क्रियेच्या आधी होते. गुणाकाराचेही तसेच असते. |
2:10 | अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी आपण कंस समाविष्ट करू या. |
2:16 | कंस कसे कार्य करेल? तर कंसातील क्रिया आधी केली जाईल. नंतर भागाकार केला जाईल जो एखादा integer किंवा variable असू शकतो. |
2:29 | म्हणजेच येथे num1 + num2 म्हणजेच 10 + 2 = 12 हे उत्तर मिळेल याला 2 ने भागल्यावर आपल्याला 6 हे उत्तर मिळेल. |
2:39 | त्यासाठी रिफ्रेश करा. आपल्याला योग्य उत्तर मिळाले आहे. |
2:43 | हे काही basic arithmetic operators आहेत, जे वापरण्यासाठी अगदी सोपे आहेत. |
2:48 | तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा हे नीट कार्य करते की नाही हे तपासून बघण्यासाठी तुमची आकडेमोड calculator द्वारे तपासून पहा. |
2:55 | लवकरच आपण अजून अशा प्रकारच्या काही क्रिया बघणार आहोत. |
2:58 | एकने वाढणा-या increment arithmetic operator बद्दल आपण जाणून घेणार आहोत. |
3:05 | याचा सराव करा आणि तुम्हाला नीट समजले आहे याची खात्री करून घ्या. |
3:09 | सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे. |