Ubuntu-Linux-on-Virtual-Box/C2/Installing-VirtualBox-on-Ubuntu-Linux-OS/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:02, 25 July 2019 by Nancyvarkey (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Installing VirtualBox on Ubuntu Linux OS वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:09 या ट्युटोरिअलमध्ये, आपण Ubuntu Linux 16.04 Operating System वर VirtualBox इन्स्टॉल करणे शिकू.
00:18 हे ट्युटोरिअल Ubuntu Linux 16.04 OS
00:25 VirtualBox व्हर्जन 5.2,
00:29 gedit text editor वापरून रेकॉर्ड केले आहे. .
00:32 तुम्ही तुमच्या पसंतीचा इतर कोणताही text editor वापरू शकता.
00:37 सुरवात करण्यापूर्वी, कृपया खात्री करून घ्या की तुम्ही Internet शी जुडलेले आहात.
00:43 VirtualBox म्हणजे काय?

Virtualization साठी VirtualBox हे मुक्त आणि ओपन सोर्स (स्रोत) सॉफ्टवेअर आहे.

00:50 हे आपल्याला base machine i.e. (host) मध्ये एकाधिक OS इन्स्टॉल आणि वापरण्याची परवानगी देते.
00:57 base machine मध्ये एकतर Windows, Linux किंवा MacOS असू शकते.
01:03 VirtualBox मध्ये OS install करण्यासाठी, base machine मध्ये खालील कॉन्फिगरेशन असावे.
01:11 i3 processor किंवा उच्चतर,
01:14 RAM 4GB किंवा उच्चतर,
01:17 Hard disk मध्ये 50GB फ्री स्पेस किंवा अधिक आणि
01:22 Virtualization BIOS वर एनेबल असले पाहिजे.
01:27 हे खात्री करेल कि VirtualBox सहजतेने कार्य करेल.
01:32 जर base machine मध्ये Ubuntu Linux OS आहे, तर खालील व्हर्जन्सपैकी ती कोणतीही एक असावी:
01:40 Ubuntu Linux 14.04, Ubuntu Linux 16.04 किंवा Ubuntu Linux 18.04.
01:50 आता इंस्टॉलेशन सुरू करूया.
01:53 या ट्यूटोरियलमध्ये वापरलेले commands प्लेअरच्या खाली Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहेत.
02:00 मी ही फाईल माझ्या मशीनवर gedit text editor मध्ये उघडली आहे.
02:05 आणि, प्रदर्शनच्या दरम्यान commands कॉपी-पेस्ट करण्यासाठी मी त्याच फाइलचा वापर करेल.
02:11 महत्त्वपूर्ण टीप: VirtualBox इन्स्टॉल करण्यापूर्वी, आपल्या मशीनवर Virtualization एनेबल आहे याची खात्री केली पाहिजे.
02:21 Virtualization एनेबल आहे किंवा नाही ते पडताळून पाहू.
02:26 तुमच्या कीबोर्डवर एकत्रित Ctrl, Alt आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा.
02:35 या कमांडला कोड फाईल मधून कॉपी करा आणि त्यास टर्मिनल मध्ये पेस्ट करा.

कार्यान्वित करण्यासाठी Enter दाबा.

02:43 जर आउटपुटमध्ये vmx flags आहेत, तर Virtualization या कॉम्पुटरवर एनेबल आहे.
02:50 जर हे एनेबल नसेल, तर कृपया त्यास BIOS सेटिंग्समध्ये एनेबल करा.
02:55 जसे कि BIOS सेटिंग्स वेग वेगळ्या कॉम्पुटरमध्ये भिन्न असते, आपण याचा एक demo दर्शवू शकत नाही.
03:02 तुम्ही एक तांत्रिक व्यक्ती नसल्यास, कृपया System Administrator च्या मदतीने हे करा.
03:09 जर Virtualization ऑपशन BIOS मध्ये उपलब्ध नसेल तर, आपण त्या मशीनमध्ये VirtualBox इन्स्टॉल करू शकत नाही.
03:17 माझ्या बाबतीत हे आधीच एनेबल आहे.
03:21 प्रथम, आपण खालील कमांडच्या साहाय्याने base machine अपडेट करू.
03:27 त्यासाठी, टर्मिनलवर टाईप करा: sudo <space> apt-get <space> update

नंतर Enter दाबा.

03:38 तुम्हाला तुमचे system password प्रविष्ट करण्यास विचारले जाऊ शकते.

पासवर्ड टाईप करून Enter दाबा.

03:46 आता या इंस्टॉलेशन दरम्यान, जेव्हाही विचारले जाईल तेव्हा system password टाईप करा आणि एंटर दाबा.
03:55 पुढे आपण VirtualBox इन्स्टॉल करू.

आता आपल्याला VirtualBox repository, Ubuntu source list मध्ये जोडावे लागेल.

04:04 असे करण्यासाठी, ही command कॉपी करा आणि टर्मिनल वर पेस्ट करा.

नंतर Enter दाबा.

04:11 पुढे, आपल्याला apt source मध्ये VirtualBox repository key जोडावी लागेल.
04:17 असे करण्यासाठी, ह्या दोन commands एक एक करून कॉपी करा.

त्यांना टर्मिनलवर पेस्ट करा आणि Enter दाबा.

04:32 आता आपल्याला repository list अपडेट करावी लागेल.
04:36 त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा, sudo <space> apt-get <space> update

नंतर Enter दाबा.

04:50 पुढे टाईप करा: sudo space apt-get space install space virtualbox-5.2

आणि Enter दाबा.

05:04 terminal इन्स्टॉल करण्यासाठी packages ची सूची प्रदर्शित करेल.
05:09 file size इंटरनेटवरून डाउनलोड केले जाईल आणि इंस्टॉलेशननंतर disk space वापरले जाईल.
05:17 जेव्हा विचारले जाईल, “Do you want to continue?” तर Y टाईप करा आणि Enter दाबा.
05:23 तुमच्या इंटरनेट स्पीडच्या आधारावर इंस्टॉलेशन होण्यास काही वेळ लागू शकतो.
05:31 इंस्टॉलेशन आता पूर्ण झाले आहे.
05:34 आता Dash home वर जा. search bar मध्ये, Virtualbox टाईप करा.
05:42 आता Oracle VM VirtualBox आयकॉनवर डबल क्लिक करा.
05:47 VirtualBox एप्लिकेशन उघडते. हे सूचित करते की इंस्टॉलेशन यशस्वी झाली आहे.
05:54 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात

05:59 या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो: Virtualization एनेबल आहे कि नाही तपासणे आणि Ubuntu Linux 16.04 OS मध्ये VirtualBox इन्स्टॉल करणे.
06:11 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
06:19 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

06:27 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
06:31 कृपया या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
06:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

06:47 या ट्युटोरियलसाठी स्क्रिप्ट आणि व्हिडिओचे योगदान NVLI आणि स्पोकन ट्युटोरियल टीम द्वारे करण्यात आले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, Ranjana