Moodle-Learning-Management-System/C2/User-Roles-in-Moodle/Marathi
Time | Narration |
00:01 | User Roles in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: user ला admin role कसे द्यावे? |
00:13 | एक course साठी teacher ला असाइन कसे करावे आणि एक course साठी student ची नावनोंदणी(एन्रॉल) कशी करावी. |
00:20 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:Ubuntu Linux OS 16.04 |
00:28 | XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर. |
00:42 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
00:54 | या ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांकडे त्यांच्या Moodle वेबसाइटवर तयार केलेले काही courses असावेत. |
01:01 | नसल्यास, कृपया या वेबसाइटवरील आधीचे Moodle ट्यूटोरियल पहा. |
01:08 | ब्राउजर वर जा आणि तुमचे admin username आणि password वापरून तुमच्या Moodle वेबसाइटवर लॉगइन करा. |
01:16 | आता आपण admin dashboard मध्ये आहोत. |
01:19 | आता Course and Category Management पेजवर जाऊ. |
01:24 | तुमच्याMoodle interface वर हे अभ्यासक्रम आहेत याची खात्री करा.
नसल्यास, त्यांना तयार करण्यासाठी ट्यूटोरियल थांबवा आणि नंतर पुन्हा सुरु करा. |
01:34 | आपण बनविलेले सर्व users ना पाहू. |
01:38 | Site Administration वर क्लिक करा. |
01:41 | नंतर Users टॅबवर क्लिक करा. |
01:44 | Accounts सेकशन अंतर्गत, Browse list of users वर क्लिक करा. |
01:50 | आपल्याकडे आता 4 users आहेत. |
01:53 | user Priya Sinha वर क्लिक करू आणि तिची profile एडिट करू. |
01:59 | तर User details सेकशनमध्ये, Edit Profile link वर क्लिक करा. |
02:04 | खाली स्क्रोल करा आणि Optional सेकशनवर जा.
मग त्याचा विस्तार करण्यास त्यावर क्लिक करा. |
02:11 | लक्षात घ्या की फील्ड Institution, Department, Phone आणि Address स्वयं आपोआप भरले जाते .
हे आपण CSV फाईलमध्ये प्रविष्ट केले आहे. |
02:23 | पुन्हा users च्या यादीत परत जाऊ.
असे करण्यासाठी, Site Administration -> Users -> Browse list of users वर क्लिक करा. |
02:33 | आपण या System Admin2 user ला administrator role देऊ. |
02:39 | डाव्या मेनूवर, Site Administration वर क्लिक करा आणि नंतर Users टॅबवर क्लिक करा. |
02:46 | Permissions सेकशनपर्यंत खाली स्क्रोल करा आणि Site Administrators वर क्लिक करा. |
02:52 | येथे users चे 2 सेट आहेत.
पहिल्या सेटमध्ये वर्तमान site administrators चे नावे आहेत आणि दुसर्या सेटमध्ये इतर सर्व users ची यादी आहे. |
03:05 | दोन याद्या दरम्यान, विविध क्रिया करण्यासाठी बटणे आहेत. |
03:11 | Users box मधून, आपण System Admin2 user वर क्लिक करू. |
03:17 | जर बरेच यूजर्स असतील तर शोध घेण्यासाठी Users' बॉक्सच्या खाली Search box चा वापर करा. आणि नंतर, Add बटणवर क्लिक करा. |
03:26 | Confirm बॉक्समध्ये, Continue बटणवर क्लिक करा. |
03:30 | आता येथे 2 admin users आहेत.
आपल्याला पाहिजे तितके admin users असू शकतात. |
03:38 | तथापि, केवळ एक Main administrator असू शकतो.
Main administrator कधीही सिस्टममधून डिलीट केले जाऊ शकत नाही. |
03:48 | आता आपण Rebecca Raymond Calculus course साठी teacher म्हणून असाइन करू. |
03:55 | हे करण्यासाठी, येथे दर्शविल्याप्रमाणे Course and category management पेजवर जा. |
04:02 | 1st Year Maths subcategory मधील courses पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
04:09 | Calculus कोर्सवर क्लिक करा. कोर्सचे तपशील पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
Enrolled Users वर क्लिक करा. |
04:19 | आपण पाहु शकतो की user Priya Sinha या कोर्समध्ये दाखल झाली आहे. |
04:25 | आपण हे upload user CSV द्वारे केले. |
04:29 | Moodle मध्ये शिक्षक समवेत प्रत्येकास, कोर्समध्ये नावनोंदणी करणे आवश्यक आहे. |
04:35 | त्यांना असाइन करणारे नवीन रोल कोर्समधील सध्याच्या रोलवर अवलंबून असते. |
04:41 | एकतर वरील उजव्या किंवा तळाशी उजव्या बाजूला Enrol users बटणवर क्लिक करा. |
04:48 | एक पॉप-अप विंडोज उघडते. |
04:51 | त्यात Assign roles साठी ड्रॉपडाउन आहे, Enrolment options आणि Search बटणसाठी फिल्ड्स आहेत. |
05:00 | आपण सर्व युजर्सची यादी पाहू शकतो ज्यांना सध्या course असाइन केलेले नाही. |
05:06 | Assign roles ड्रॉपडाउनमध्ये, Teacher निवडा. |
05:11 | नंतर Rebecca Raymond च्या पुढील Enrol बटणवर क्लिक करा. |
05:16 | शेवटी, पेजच्या तळाशी Finish Enrolling users बटणवर क्लिक करा. |
05:24 | विद्यार्थ्यांना समान पद्धतीने course असाइन करू शकता. |
05:28 | Teacher role मधून Rebecca Raymond अन-असाइन करण्यासाठी, Roles column मधील Trash आयकॉनवर क्लिक करा. |
05:36 | Confirm Role Change पॉपअप बॉक्समध्ये, Remove बटणवर क्लिक करा. |
05:42 | ज्यांची आधीच नाव नोंदणी झाली आहे त्यांच्यासाठी देखील Assign role आयकॉन वापरून role देऊ शकतो. |
05:50 | सर्व role नावांसह एक लहान पॉप-अप विंडो उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
05:56 | Rebecca Raymond ला teacher role असाइन करण्यासाठी Teacher वर क्लिक करा.
बॉक्स आपोआप बंद होते. |
06:04 | अगदी उजव्या बाजूच्या trash आयकॉनवर क्लिक करून एका कोर्स मधून Users ची नाव नोंदणी रद्द करू शकतो. |
06:11 | user enrolment तपशील एडिट करण्यासाठी उजवीकडे gear आयकॉन आहे,
त्यावर क्लिक करा. |
06:20 | यात user साठी निलंबित करण्याचा पर्याय आहे आणि enrolment start आणि end dates बदला. |
06:28 | enrolment पेजवर परत जाण्यासाठी Cancel बटणवर क्लिक करा. |
06:33 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात. |
06:39 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: user ला admin role कसे द्यावे
course साठी teacher ला असाइन कसे करावे course साठी student ची नावनोंदणी(एन्रॉल) कशी करावी. |
06:52 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे:
Linear Algebra course साठी Rebecca Raymond ला teacher म्हणून असाइन करा. |
07:00 | Linear Algebra course साठी Priya Sinha ला student म्हणून असाइन करा. |
07:06 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाउनलोड करून पहा. |
07:14 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:22 | कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
07:26 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:38 | या स्क्रिप्टचे योगदान प्रियंकाने केले आहे. आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |