Moodle-Learning-Management-System/C2/Getting-Ready-for-Moodle-Installation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 19:22, 8 March 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Getting ready for Moodle installation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण Moodle इन्स्टॉल करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींबद्दल जाणून घेऊ.
00:14 आपण हे देखील शिकू लोकलहोस्ट वर पॅकेजेस तपासणे आणि डेटाबेस सेटअप करणे.
00:22 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.

Ubuntu Linux OS 16.04

00:30 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP आणि Firefox वेब ब्राउजर.
00:42 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता.
00:46 Moodle 3.3 इन्स्टॉल करण्यासाठी, तुमच्या मशीनमध्ये दिलेले सपोर्ट असले पाहिजे.
00:52 Apache 2.x + (किंवा उच्च व्हर्जन)

MariaDB 5.5.30 +(किंवा कोणतेही उच्च व्हर्जन)आणि

PHP 5.4.4 +(किंवा कोणतेही उच्च व्हर्जन)

01:08 जर तुमच्याकडे वरील जुने व्हर्जन असेल, तर पुढे जाण्यापूर्वी हे अनइन्स्टॉल करा.
01:16 MariaDB हा सर्वात वेगाने वाढणारा ओपन सोर्स डेटाबेस आहे.
01:21 हे MySQL डेटाबेस साठी एक पर्याय आहे.
01:26 वेब सर्वर वितरण तुम्हाला Apache, MariaDB आणि PHP एकत्रित देते.
01:34 तुम्ही हे वेगेळे इन्स्टॉल करू शकता किंवा XAMPP, WAMPP किंवा LAMPP सारखे वेब सर्वर वितरण वापरून करू शकता.
01:44 मी आधीच माझ्या मशीनमध्ये XAMPP इन्स्टॉल केले आहे.
01:49 सर्वप्रथम, आपल्याला आपल्या मशीनवर XAMPP कार्य करत आहे कि नाही ते तपासले पाहिजे.
01:54 वेब ब्राउजरमध्ये, टाईप करा http colon double slash 127 dot 0 dot 0 dot 1 आणि एंटर

दाबा.

02:08 हे Unable to connect मेसेज दाखवते.
02:12 याचा अर्थ XAMPP सर्विस(सेवा) चालू नाही.
02:16 तर आपल्याला XAMPP service सुरु करावी लागेल.
02:20 Ctrl + Alt + T कीज एकत्र दाबून टर्मिनल उघडू.
02:26 sudo space slash opt slash lampp slash lampp space start टाईप करून XAMPP सुरु करा.
02:38 जेव्हा ही administrative पासवर्ड विचारले जाईल प्रविष्ट करा आणि Enter करा.
02:44 जर आपल्याला असा मेसेज मिळाला असेल

Starting XAMPP for Linux ….

XAMPP: Starting Apache...ok.

XAMPP: Starting MySQL...ok.

XAMPP: Starting ProFTPD...ok. तर

02:59 याचा अर्थ असा की आपल्या सिस्टममध्ये XAMPP इन्स्टॉल झाले आहे आणि आपण सर्विस सुरु केली आहे.
03:05 कृपया लक्षात घ्या XAMPP 5.6.30 हे MySQL च्या ऐवजी MariaDB चा वापर करते.
03:13 दोन्हीसाठी कमांड्स आणि टूल्स समान आहेत.
03:17 आता परत ब्राउजरवर जाऊ आणि पेज रीफ्रेश करू.
03:21 आपण आता XAMPP स्क्रीन पाहू शकतो.
03:25 तुम्हाला टर्मिनलमध्ये Command not found मेसेज मिळेल.
03:30 याचा अर्थ तुमच्या मशीनमध्ये XAMPP इन्स्टॉल केलेला नाही.
03:34 तसे असल्यास, या वेबसाईटवरील PHP and MySQL Series मधील XAMPP Installation ट्युटोरिअल पहा.
03:42 वरील ट्युटोरियलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करा आणि XAMPP चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करा.
03:49 आता टर्मिनलवर परत जाऊ.
03:52 आता XAMPP service सुरू करण्यास उपरोक्त स्टेप्सचे अनुसरण करा.
03:57 आता तुमच्या सिस्टमवर PHP चे व्हर्जन तपासू.
04:02 टर्मिनल वर टाईप करा sudo space slash opt slash lampp slash bin slash php space hyphen v आणि Enter दाबा.
04:17 जेव्हा ही administrative पासवर्ड विचारले जाईल प्रविष्ट करा आणि Enter करा.
04:23 माझे PHP चे व्हर्जन 5.6.30 आहे.
04:29 हा मेसेज सूचित करतो की PHP यशस्वीरित्या इन्स्टॉल झाला आहे.
04:34 जर आपल्याला 5.4.4 पेक्षा कमी व्हर्जन मिळते, तर आपण XAMPP चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करावे.
04:42 पुढे, आपल्या सिस्टिम वर MariaDB चे व्हर्जन तपासू.
04:48 टर्मिनल वर टाईप करा sudo space slash opt slash lampp slash bin slash mysql space hyphen v आणि Enter दाबा.
05:03 जेव्हा ही administrative पासवर्ड विचारले जाईल प्रविष्ट करा आणि Enter करा.
05:08 माझे MariaDB चे व्हर्जन 10.1.21 आहे.
05:14 जर आपल्याला 5.5.30 पेक्षा कमी व्हर्जन मिळते, तर आपण XAMPP चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करावे.
05:23 कृपया लक्षात ठेवा. PHP चे व्हर्जन् आणि डेटाबेस तपासण्यासाठी तुमच्या कडे XAMPP कार्यरत असावे.
05:29 हे देखील लक्षात घ्या की command prompt आता बदलला आहे.
05:34 MariaDB च्या बाहेर पडण्यासाठी backslash q टाईप करा आणि एंटर दाबा.
05:40 येथे दर्शविल्याप्रमाणे आपल्याला इतर एरर्स देखील मिळू शकतात.
05:44 तुम्हाला “An apache daemon is already running” असा मेसेज मिळेल.
05:50 याचा अर्थ म्हणजे स्टार्टअप स्क्रिप्ट XAMPP-Apache सुरु झाली नाही.
05:55 हे दर्शविते की आणखी एक Apache instance आधीच कार्यरत आहे.
06:01 XAMPP योग्यरित्या सुरू करण्यास, तुम्हाला प्रथम daemon थांबवावा लागेल.
06:06 Apache थांबवण्यासाठी ही कमांड आहे.

sudo space /etc/init.d/apache2 space stop

06:19 तुम्हाला MySQL daemon failed to start असा मेसेज मिळेल.
06:25 याचा अर्थ स्टार्टअप स्क्रिप्ट MySQL सुरु झाली नाही.
06:30 हे दर्शविते की आणखी एक database instance आधीच कार्यरत आहे.
06:36 XAMPP योग्यरित्या सुरू करण्यास, तुम्हाला प्रथम daemon थांबवावा लागेल.
06:41 MySQL थांबवण्यासाठी ही कमांड आहे: sudo space /etc/init.d/mysql space stop
06:54 सर्व एरर्सचे निराकरण करा आणि XAMPP यशस्वीरीत्या कार्यरत मिळेल.
06:59 नंतर तुमच्या वेब ब्राउजरवर जा आणि पेज रिफ्रेश करा.
07:03 जर भाषा निवडीसाठी विचारले असेल तर, English निवडा.
07:08 आता आपल्याला यूजर जोडण्याची गरज आहे आणि Moodle साठी database तयार करा.
07:14 आपण हे phpmyadmin मध्ये करू, जे MariaDB साठी ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे.
07:21 हे XAMPP च्या इंस्टॉलेशनसह येते.
07:25 आपण परत ब्राउजरवर जाऊ.
07:28 XAMPP पेजवर, वरच्या मेनूमधील phpMyadmin वर क्लिक करा.
07:34 वरच्या मेनूमधील User Accounts वर क्लिक करा आणि नंतर Add User Account वर क्लिक करा.
07:42 उघडणार्या नवीन विंडोमध्ये, तुमच्या पसंतीचे username प्रविष्ट करा.
07:48 मी माझे username म्हणून moodle hyphen st टाईप करेल.
07:53 Host ड्रॉप-डाउन सूचीमधून, Local निवडा.
07:57 Password टेक्स्ट-बॉक्स मध्ये तुमच्या पसंतीचा password प्रविष्ट करा.
08:02 मी माझे password म्हणून moodle hyphen st टाईप करेल.
08:07 Re-type टेक्सटबॉक्स मध्ये समान पासवर्ड टाईप करा.
08:12 Authentication Plugin पर्याय असेच ठेवा.
08:17 आता साठी विचारलेल्या Generate Password वर कृपया क्लिक करू नका.
08:22 Database for user account अंतर्गत, आपण पर्याय पाहू शकतो-
08:26 Create database with same name and grant all privileges.
08:31 आपण हा पर्याय चेक करू आणि या पेजच्या तळाशी उजवीकडे Go बटणवर क्लिक करू.
08:38 विंडोच्या शीर्षावर आपण “You have added a new user” हा मेसेज पाहु शकतो.
08:44 याचा अर्थ moodle-st नावासह एक नवीन database हे moodle-st यूजरसह तयार केले गेले आहे.
08:54 username, password आणि database नावांची एक सूची तयार करा.
08:59 नंतर Moodle इन्स्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक असेल.
09:04 कृपया लक्षात घ्याः Database चे नाव आणि username सारखेच असणे आवश्यक नाही.
09:10 भिन्न नावासाठी प्रथम database तयार करा आणि नंतर त्या database साठी एक यूजर तयार करा.
09:18 नावाच्या प्रकारासाठी, username मध्ये कोणतेही स्पेस नसावे.
09:25 आता आपल्याकडे XAMPP कार्यरत आहे आणि आपला database तयार आहे.
09:29 आता आपण Moodle इन्स्टॉल करण्यासाठी तयार आहोत.
09:32 पुढील ट्युटोरियलमध्ये आपण Moodle च्या इंस्टॉलेशनसह पुढे जाऊ.
09:37 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:41 थोडक्यात.
09:43 या ट्युटोरिअलमध्ये आपण
09:45 Moodle इन्स्टॉल करण्यास आवश्यक असलेल्या बाबींबद्दल शिकलो.
09:49 पूर्वीची तपासणी कशी करावी

डेटाबेस कसा सेट करावा आणि युजर कसा जोडावा.

09:57 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.
10:03 कृपया ते डाउनलोड करून पहा.
10:06 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

10:11 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:15 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
10:18 कृपया या http://forums.spoken-tutorial.org साईटला भेट द्या.
10:27 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
10:30 तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.

आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.

10:36 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
10:41 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
10:46 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल.
10:48 फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
10:54 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे.
11:01 या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
11:06 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
11:10 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana