Koha-Library-Management-System/C3/Copy-cataloging-using-Z39.50/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:13, 27 February 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Copy Cataloging using Z39.50 वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे.
00:09 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Z39.50 वापरून catalog मध्ये records कसे जोडणे.
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे - Ubuntu Linux operating system 16.04
00:28 आणि Koha version 16.05.
00:33 कृपया खात्री करा कि तुम्ही इंटरनेट शी जुडलेले आहात.
00:38 ह्या ट्युटोरिलचे अनुसरण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे,
00:45 कॅटलॉगिंग स्टँण्डर्ड, AACR2 आणि MARC21 चे ज्ञान असावे.
00:54 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असले पाहिजे.
01:00 आणि, आपल्याकडे Koha मध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे.
01:05 अधिक माहितीसाठी, कृपया Koha Spoken Tutorial ह्या वेबसाइटवरील सीरिज पहा.
01:13 तर, Z39.50 काय आहे?
01:18 Z39.50 हे रिमोट कम्प्युटर डेटाबेसमधून माहिती शोधण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी हे एक client–server protocol आहे.

थोडक्यात, हे एक टूल आहे जे कॅटलॉगिंग कॉपी करण्यासाठी वापरले जाते.

01:37 सुरवात करू.

प्रथम मी Koha इंटरफेसवर जाते आणि Superlibrarian, Bella म्हणून लॉग इन करते.

01:47 Koha homepage वर, Koha administration वर क्लिक करा.
01:53 ह्या पृष्ठावर, खाली(तळाशी) स्क्रोल करा आणि Additional parameters वर जा..
01:59 मग, Z39.50/SRU server वर क्लिक करा.
02:07 एक नवीन पृष्ठ Z39.50/SRU servers administration उघडते.
02:16 तेथे दोन टॅब्स आहेत - +New Z39.50 server आणि +New SRU server.
02:26 +New Z39.50 server टॅबवर क्लिक करा.
02:32 New Z39.50 server शीर्षकासह नवीन पृष्ठ उघडते.
02:40 लक्षात ठेवा की, target Z39.50 Server जोडण्यासाठी, server चा तपशील आपल्याला माहित असला पाहिजे.
02:51 जर आपल्याला Z39.50 server चे कोणतेही तपशील माहित नसेल तर, आपण ह्या URL वर Z39.50 servers ची सूची शोधू शकतो.
03:05 आपल्याला काही तपशील भरण्यास उद्युक्त करण्यासाठी IRSpy पृष्ठ उघडले आहे.
03:12 सुरवात करू.
03:14 (Anywhere) फिल्ड रिक्त(ब्लँक) सोडा.
03:18 Name साठी, मी टाईप करेन: Library of Congress.
03:23 याचे कारण ही सर्वात मोठी लायब्ररी आहे आणि त्यात मोठा बिब्लिऑग्राफिकल डेटा आहे.
03:31 पुढे, Country साठी field मध्ये, ड्रॉप-डाऊनमधून United States निवडा.
03:38 Protocol साठी, ड्रॉप-डाऊनमधून Z39.50 निवडा.
03:46 आपण आपल्या आवश्यकतेनुसार उर्वरित तपशील भरू शकता.
03:51 त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Search बटणावर क्लिक करा.
03:57 शोध परिणामांसह (सर्च रिझल्ट्ससह) एक नवीन पृष्ठ उघडते.
04:01 वेगवेगळ्या शीर्षकाखालील 9 लायब्ररींची सूची दिसते -

Title, Host Connection Reliability, Host, Port आणि DB.

04:16 Koha मध्ये New Z39.50 server वर तपशील भरण्यासाठी ह्या तपशीलांचा वापर केला जाईल.
04:26 लक्षात घ्या की आपण लायब्ररींची एक भिन्न सूची पाहू शकता जे 10 पेक्षा जास्त असू शकतात.
04:32 लक्षात ठेवा, कोणताही target Z39.50 server जोडण्याआधी, कृपया Host Connection Reliability सुनिश्चित करा.
04:43 मी Title : Library of Congress वर क्लिक करेन.
04:48 Library of Congress शीर्षक असलेले नवीन पृष्ठ उघडते.
04:54 हे पृष्ठ उघडे ठेवा, कारण आपल्याला थोड्या वेळाने ह्या पृष्ठावरील तपशीलाची गरज भासेल.
05:01 आता पुन्हा New Z39.50 server पृष्ठावर जाऊ, जे आपण ह्या ट्युटोरिअलमध्ये आधीपासूनच उघडले होते.
05:12 आणि ह्या पृष्ठावर आवश्यक तपशील भरणे सुरू करा.
05:17 Library of Congress पृष्ठावरील माहिती जी आपण उघडली आहे.
05:23 तर सुरूवात करू.
05:25 New Z39.50 server पृष्ठावर, Server name साठी टाईप करा Library of Congress.
05:34 हे तपशील Library of Congress पृष्ठामधील Name सेक्शनमधून आहे.
05:41 New Z39.50 server पृष्ठावर मी काही इतर तपशील भरले आहेत, ज्याची मी Library of Congress पृष्ठावरून नोंद केली होती.
05:54 आपण व्हिडिओ थांबवू शकता आणि आपल्या आवश्यकतेनुसार तपशील भरू शकता.
06:01 कृपया लक्षात घ्या की लाल रंगातील field अनिवार्य आहेत.
06:06 पुढे, आपण Preselected (searched by default) चेक-बॉक्स पहातो.
06:12 आपल्याला ह्या विशिष्ट लायब्ररीचा डेटाबेस नेहमी डीफॉल्टनुसार शोधण्याची इच्छा असल्यास हे क्लिक करा.

मी ते अनचेक सोडेन.

06:23 आता आपण Rank (display order)साठी फिल्डमध्ये आलो आहोत.

लायब्ररी यादीच्या शीर्षस्थानी आपल्याला ही लायब्ररी सूचीबद्ध करायची असल्यास येथे 1 प्रविष्ट करा.

06:37 लक्षात घ्या की जर आपल्याला अनेक z39.50 targets जोडण्याचे असेल, तर आपण रँकच्या अनुसार त्यांची व्यवस्था करू शकता.
06:47 Syntax साठी, ड्रॉप-डाऊनवरून मी MARC21/USMARC निवडेल.

आपल्या आवश्यकतेनुसार आपण कोणताही Syntax निवडू शकता.

07:00 Encoding साठी, कोहा डीफॉल्टनुसार, utf8 निवडतो.

मी ते आहे तसे सोडून देईल.

07:08 परंतु आपल्या आवश्यकतेनुसार आपण इतर व्हॅल्यू निवडू शकता.
07:14 पुढील आहे - Time out (0 its like not set).
07:20 येथे, परिणाम प्रदर्शित होण्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करू इच्छित सेकंदांची संख्या टाईप करा.

मी 240 प्रविष्ट करेन .

07:32 Record type साठी कोहा डीफॉल्टनुसार, स्वयं Bibliographic निवडतो.

असे केल्यावर, प्रत्येक रेकॉर्डमध्ये Bibliographic तपशील असेल.

07:44 सर्व तपशील त्यात भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा.
07:51 Z39.50/SRU servers administration पृष्ठ पुन्हा उघडते.
08:00 आपण ह्या पृष्ठावर, विविध हेडिंग्सखाली जोडलेली माहिती पाहू शकतो.
08:06 आता, ह्या लायब्ररीमधील रेकॉर्ड शोधण्यासाठी, Koha homepage वर जा आणि Cataloging वर क्लिक करा.
08:16 दोन पर्यायांसह एक नवीन पृष्ठ उघडते.

+New record आणि New from Z39.50/SRU.

08:29 New from Z39.50/SRU वर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून BOOKS निवडा.
08:40 एक नवीन Z39.50/SRU search विंडो उघडते.
08:48 पृष्ठाच्या अगदी उजव्या बाजूस Search targets फिल्ड वर जा.
08:54 येथे आपण Z39.50 target पाहू शकता जो आपण ह्या ट्युटोरियलमध्ये आधी जोडला होता.

जो आहे - LIBRARY OF CONGRESS.

09:07 आता LIBRARY OF CONGRESS च्या समीप असलेल्या चेक-बॉक्सवर क्लिक करा.
09:14 त्याच पृष्ठाच्या डाव्या बाजूला विविध फिल्ड्सह Z39.50/SRU search आहे.
09:25 ह्या फिल्ड्समध्ये, Title वर जा आणि टाईप करा: Clinical Microbiology.
09:33 आपली इच्छा असेल तर आपण उर्वरित fields भरू शकता.

मी ते रिक्त(ब्लँक) सोडेन.

09:40 आता पृष्ठाच्या तळाशी Search बटणावर क्लिक करा.
09:46 तथापि क्लिक करण्यापूर्वी, कृपया खात्री करा कि तुम्ही इंटरनेट शी जुडलेले आहात.
09:52 आणखी एक नवीन पृष्ठ Results उघडेल, हेडिंगसह तपशील दर्शविते:

Server, Title, Author, Date, Edition, ISBN, LCCN, MARC आणि Card.

10:11 आता, पृष्ठाच्या अगदी उजव्या बाजूला जा आणि Import फिल्ड वर जा.
10:18 Title: Clinical Microbiology फिल्डसाठी मी Import वर क्लिक करेन.
10:25 आपण आपल्या आवश्यकतेनुसार, Import साठी अन्य कोणत्याही Title वर क्लिक करू शकता.
10:32 Import वर क्लिक केल्यावर, Add MARC record नामक एक नवीन विंडो उघडते.
10:39 आपण काही tags पाहाल जे Library of Congress डेटाबेसमधून इन्पोर्ट केले आहेत.
10:47 परंतु, आपल्या आवश्यकतेनुसार, संबंधित tags साठी रिक्त(ब्लँक) फिल्ड्स तुम्हांला भरावे लागतील.
10:55 लक्षात घ्या, आपण ह्या पृष्ठाचा तपशील आधीच्या ट्युटोरिअलमध्ये भरला आहे.
11:02 व्हिडिओ थांबवा आणि तपशील भरा.
11:06 तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या वरील भागातील Save बटणावर क्लिक करा.
11:13 एक नवीन पृष्ठ Items for Clinical microbiology by Ross, Philip W. उघडते.
11:22 आता, पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Add item बटणावर क्लिक करा.
11:28 Items for Clinical microbiology by Ross, Philip W. पृष्ठ उघडते.
11:36 यासह, आपण Library of Congress मधून Clinical microbiology पुस्तकाचे तपशील Koha मध्ये यशस्वीरित्या इम्पोर्ट केले आहे.
11:48 थोडक्यात -
11:50 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो - Z39.50. वापरून Catalog मधील रेकॉर्ड्स कसे जोडणे.
12:00 असाईनमेंटसाठी-

Z39.50. वापरून Catalog मध्ये Serial रेकॉर्ड्स जोडा.

12:10 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो.

कृपया तो डाऊनलोड करून पहा.

12:18 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
12:28 ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
12:32 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

12:45 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana