Koha-Library-Management-System/C2/Koha-installation-on-Linux-16.04/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:56, 19 February 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Ubuntu Linux OS वर Koha Installation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:09 या ट्युटोरिअलमध्ये, आपण Ubuntu Linux OS 16.04 वर Koha Library Management System इन्स्टॉल करणे शिकू आणि इन्स्टॉलेशनची तपासणी करू.
00:24 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे: Ubuntu Linux OS 16.04,

Koha version 16.05,

00:35 gedit text editor आणि Firefox web browser.
00:41 सुरवात करण्यापूर्वी, कृपया तुमच्या मशीनवर - Ubuntu Linux OS 16.04,
00:50 कोणताही text editor,

एकतर Firefox किंवा Google Chrome web browser असल्याची खात्री करा.

00:57 किमान hardware ची आवश्यकता आहे- i3 processor किंवा त्यापेक्षा जास्त,
01:05 500GB hard disk किंवा अधिक,
01:09 किमान 4GB RAM आणि Network सुविधा.
01:15 या ट्युटोरिअलमध्ये वापरले गेलेले कमांड्स player च्या खाली Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहे.
01:22 मी माझ्या मशीनवर gedit text editor मध्ये ही फाइल उघडली आहे.

आणि मी प्रदर्शनदरम्यान, commands पेस्ट करण्यासाठी त्याच फाईलचा वापर करेल.

01:33 सुरवात करूया.

कीबोर्डवरील Ctrl+Alt+T कीज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा.

01:43 आपल्याला सर्वप्रथम हे खात्री करावे लागेल की आपले Ubuntu Linux इन्स्टॉलेशन अप- टू-डेट(अद्ययावत) आहे.
01:50 त्यासाठी, ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा.
01:59 आता पासून इंस्टॉलेशन दरम्यान जेव्हा ही विचारले जाईल System password टाईप करा आणि एंटर दाबा.
02:10 ही कमांड koha.list नावाची फाइल तयार करेल आणि package repository अपडेट करेल.
02:19 कृपया लक्षात घ्या: या ट्यूटोरियलच्या निर्मितीच्या वेळी Koha 16.05 स्थिर व्हर्जन होते.
02:28 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा.
02:37 नंतर, ही gpg.asc फाईल डाउनलोड करेल आणि signature key अपडेट करेल.
02:47 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा.
02:57 आता ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा.
03:07 हे नवीन repositories अपडेट करेल.
03:11 आता, टाईप करा sudo apt-get install koha-common आणि एंटर दाबा.
03:22 जर तुमझला पुढे चालू ठेवायचे असेल तर Y दाबा आणि एंटर दाबा.
03:30 हे तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल करेल.

इंस्टॉलेशन पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा. यास काही वेळ लागेल.

03:40 आता आपल्याला Koha साठी पोर्ट नंबर बदलण्यासाठी text editor मध्ये conf file उघडावे लागेल.
03:49 मी gedit text editor वापरेल. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही text editor वापरू शकता.
03:57 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा.
04:06 फाईल text editor मध्ये उघडेल.
04:10 INTRAPORT = 80 लाईनवर जा.
04:16 80' ला 8080 वर बदला. हे port नंबर 8080 मध्ये बदलेल.
04:26 नंतर फाईल सेव्ह करून बंद करा.
04:30 terminal वर परत या.
04:33 आता आपल्याला database सेटअप करावा लागेल.
04:38 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा.
04:47 जर तुमझला पुढे चालू ठेवायचे असेल तर Y दाबा आणि एंटर दाबा.
04:57 पुढे database मध्ये, root user साठी पासवर्ड admin123 म्हणून सेट करा.
05:05 जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेगळा पासवर्ड देऊ शकता.
05:10 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. एंटर दाबा.
05:19 पुढे, या दोन कमांड्स एक एक करून कॉपी करा, त्यांना टर्मिनलवर पेस्ट करा आणि एंटर दाबा.
05:26 sudo a2enmod rewrite
05:35 sudo a2enmod cgi
05:43 हे Koha चे modules एनेबल करेल.
05:48 नंतर टाईप करा: sudo service apache2 restart
05:55 हे apache services रिस्टार्ट करेल नंतर एंटर दाबा.
06:02 library नावाचे Koha instance तयार करण्यासाठी-

ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा.

06:16 पुढे, आपल्याला Apache server ला सांगायचे आहे कि आपण port 8080 वापरत आहोत.
06:24 त्यासाठी, आपल्याला text editor मध्ये ports.conf फाईल उघडावी लागेल.
06:31 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा.
06:40 ports.conf फाईलमध्ये, Listen 80 लाईन शोधा.
06:47 त्या लाईनच्या पुढे, Listen 8080 जोडा.
06:53 नंतर फाईल सेव्ह करून बंद करा.
06:57 नंतर apache services रिस्टार्ट करा.
ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. एंटर दाबा. 
07:10 पुढे, ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा.
07:20 हे 000-default साईट डिसेबल(अक्षम) करणे आहे.
07:27 संदेश पुष्टी करतो की ते डिसेबल्ड आहे.

पुढे जाऊया.

07:34 या दोन कमांड्स एक एक करून कॉपी करा, त्यांना टर्मिनलवर पेस्ट करा आणि एंटर दाबा.
07:41 sudo a2enmod deflate आणि एंटर दाबा.
07:52 sudo a2ensite library आणि एंटर दाबा.
08:03 टर्मिनलवर संदेश पुष्टी करतो कि site library एनेबल आहे.
08:10 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा.
08:20 नंतर sudo su टाईप करा आणि एंटर दाबा.
08:26 आपण आता superuser मध्ये आहोत जो कि root user मोड आहे.
08:33 ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. एंटर दाबा.
08:41 संकेत दिल्यावर पासवर्ड टाइप करा, admin123 आणि एंटर दाबा.
08:49 आपण आता आपल्या MariaDB prompt मध्ये आहोत.
08:54 MariaDB prompt वर, टाईप करा: use mysql semicolon आणि एंटर दाबा.
09:03 हे MariaDB मध्ये mysql database वापरण्यासाठी आहे.
09:09 टर्मिनलवर Database changed संदेश प्रदर्शित होतो.
09:15 लक्षात घ्या की MariaDB mysql प्रॉम्प्ट करते.
09:22 आता खालील कमांड काळजीपूर्वक टाइप करा आणि एंटर दाबा.
09:30 हे user koha_library साठी koha123 म्हणून पासवर्ड सेट करेल.
09:39 आपण टर्मिनल वर “Query OK” संदेश पाहतो.
09:45 नंतर टाईप करा: flush privileges semicolon आणि एंटर दाबा.

हे नवीनतम बदल अपडेट करेल.

09:58 पुन्हा एकदा आपण टर्मिनल वर “Query OK” संदेश पाहतो.
10:04 शेवटी, quit semicolon टाईप करा आणि Mariadb मधून बाहेर पडण्यासाठी एंटर दाबा.
10:13 आता आपण root user प्रॉम्प्टमध्ये परत आलो आहोत.
10:17 आता आपण text editor मध्ये koha-conf.xml फाईल उघडू.
10:25 मी gedit text editor वापरुन असे करणार आहे
10:30 या फाईल मध्ये, keyword mysql शोधा.
10:37 खाली स्क्रोल करा आणि ही लाईन पहा.
10:41 अल्फान्यूमेरिक व्हॅल्यू च्या जागी koha123 टाईप करा.
10:47 आठवा कि हे पासवर्ड आहे, जे आपण आधी टर्मिनलच्या माध्यमशी आपल्या database साठी सेट केले होते.
10:55 फाईल सेव्ह करून editor विंडो बंद करा.
10:59 आता कोणताही web browser उघडा. मी Firefox web browser उघडणार आहे.
11:06 address bar मध्ये, टाईप करा: 127.0.0.1:8080 आणि एंटर दाबा.
11:21 ब्राउजरवर Koha web installer page प्रदर्शित होते.
11:26 login करण्यासाठी, आधी सेट केलेल्या credentials (अधिकारपत्रे)वापरा.
11:31 मी username मध्ये koha_library आणि password मध्ये koha123 टाईप करेल.
11:42 जर तुम्ही एक वेगळा username आणि password दिला असेल तर त्यास टाइप करा.
11:48 आता खाली उजव्या बाजूला Login बटणवर क्लिक करा.
11:53 आपण Koha web installer च्या Step 1 मध्ये आहोत.
11:58 language ड्रॉप-डाउन मध्ये, English साठी en निवडा, जर हे डिफॉल्टनुसार आधीपासून निवडलेले नसेल.
12:06 आता खाली उजव्या बाजूला Next बटणवर क्लिक करा.
12:10 विंडो आता 2 संदेश दाखवते.

संदेश पुष्टी करतो कि सर्व Perl modules आणि सर्व dependencies इन्स्टॉल केली जातात.

12:21 आता खाली उजव्या बाजूला Next बटणवर क्लिक करा.
12:25 आता आपण Step 2 – Database settings मध्ये आहोत.
12:30 येथे लक्ष द्या, सर्व व्हॅल्यूज आपण आधी दिली आहेत.
12:36 नंतर खालील Next बटणवर क्लिक करा.
12:40 असे केल्यावर, आपण “Connection established” संदेश पाहतो.
12:46 त्यानंतर 2 आणखी पुष्टीकरण संदेश आहेत.
12:51 खालील Next बटणवर क्लिक करा.
12:54 आपण Step 3 मध्ये येतो.
12:57 स्क्रीनवर काय प्रदर्शित होते ते वाचा आणि नंतर Next बटणवर क्लिक करा.
13:03 लवकरच आपण आपल्या स्क्रीनवर एक Success संदेश पाहूया.

हे पुष्टी करते कि आपले database tables तयार केली जातात.

13:13 पुढे सुरू ठेवण्यासाठी खालील Next बटणावर क्लिक करा.
13:18 लगेच, आपण या screen वर येतो.
13:21 प्रदर्शित टेक्स्ट वाचा आणि नंतर install basic configuration settings लिंकवर क्लिक करा.
13:29 असे केल्याने, आपण आपले MARC flavor निवडण्यास सांगितले जाते.

मी MARC21 निवडणार आहे.

13:38 नंतर खालील Next बटणवर क्लिक करा.
13:42 स्क्रीन मध्ये, Mandatory सेक्शन मध्ये खाली स्क्रोल करा.
13:47 येथे, आपण पाहू शकतो कि Default MARC21 चेक-बॉक्सेस निवडलेले आहे.
13:54 Optional सेक्शन मध्ये, दाखवल्याप्रमाणे सर्व पर्याय निवडा.
14:01 जसे आपण खाली स्क्रोल करतो, आपण पाहतो कि Other data मध्ये, सर्व चेक-बॉक्सेस आधीपासून निवडलेले आहेत.
14:09 पृष्ठाच्या खाली स्क्रोलिंग करत रहा.
14:13 खाली आणखी एक Optional सेक्शन आहे, जो खूप लांब आहे.
14:18 येथे, “Some basic currencies” पर्याय वर जा आणि ते निवडा.
14:24 या नंतर, “Useful patron attribute types” पर्याय निवडा.
14:30 आता पृष्ठाच्या खालील भागवर जा आणि Import बटणवर क्लिक करा.
14:36 हे Koha मध्ये सर्व निवडलेल्या फंक्शन्स एनेबल करेल.
14:41 आता आपण एका नवीन पृष्ठावर आलो आहोत. हे पृष्ठ खाली स्क्रोल करा आणि स्क्रीनवर प्रदर्शित सर्व टेक्स्ट वाचा.
14:50 आपण एक यशस्वी संदेश “All done” पाहू शकतो.
14:54 आता, Finish बटणवर क्लिक करा.
14:57 आपण आपल्या स्क्रीनवरील अंतिम संदेश पाहू, जो पुष्टि करतो कि आपली इंस्टॉलेशन यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
15:04 आपण आता Koha interface वर जाऊ.
15:08 username koha_library आणि पासवर्ड koha123 टाईप करा.
15:16 ड्रॉप-डाउन मधून My Library निवडा .
15:20 नंतर Login बटणवर क्लिक करा.
15:23 आपण Koha Administration page वर आलो आहोत.
15:27 आपण या पृष्ठावर विविध टॅब्स पाहू शकतो.
15:31 या सिरीजमध्ये आपण यापैकी बरेच कसे वापरावे ते शिकू.
15:37 आता, No Library Set वर क्लिक करा आणि Logout' पर्याय निवडा.
15:45 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत, थोडक्यात.
15:50 या ट्युटोरिअलमध्ये, आपण Ubuntu Linux OS 16.04 वर Koha Library Management System इन्स्टॉल करणे आणि इंस्टॉलेशन पुन्हा तपासणे शिकू.
16:03 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
16:12 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

16:22 या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
16:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

16:39 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana