Koha-Library-Management-System/C2/Create-a-SuperLibrarian/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Superlibrarian कसे तयार करावे या वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत
आहे. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Patron category जोडणे. |
00:11 | Patron तयार करणे, |
00:14 | Superlibrarian तयार करणे आणि, |
00:17 | एका विशिष्ट मॉड्यूलसाठी Staff ला ऍक्सेस देणे. |
00:22 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05. |
00:35 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:42 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावे. |
00:48 | आणि तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असणे आवश्यक आहे. |
00:53 | अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा. |
01:00 | आता जाणून घेऊ कि Patron category कसे जोडायचे या सह सुरवात करू. |
01:05 | तुमचे database administrator username आणि password वापरून Koha मध्ये लॉगइन करा. |
01:13 | Koha Administration वर क्लिक करा. |
01:18 | Patrons and circulation मध्ये, Patron categories वर क्लिक करा. |
01:24 | एक नवीन पेज Patron categories उघडते. |
01:28 | New Category वर क्लिक करा. |
01:31 | एक नवीन पेज New category उघडली आहे, ज्यात आपल्याला काही तपशील भरण्यासाठी विचारत आहे. |
01:38 | आधी सांगितल्याप्रमाणे, लक्षात ठेवा की लाल रंगात चिन्हांकित fields अनिवार्य आहे. |
01:45 | मी येथे काही तपशील भरले आहेत. कृपया तसेच करा. |
01:51 | Category type: साठी ड्रॉप-डाउन सूचीमधून, Staff निवडा. |
01:57 | Branches limitation: साठी All Branches निवडा. |
02:02 | पुढे, पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा. |
02:07 | category नाव जे आपण प्रविष्ट केले आहे, Patron categories पृष्ठावर दिसते. |
02:14 | माझ्या बाबतीत, हे Library Staff आहे. |
02:19 | या सह Patron Category तयार झाली आहे. |
02:23 | पुढे, आपण शिकूया कि Patron कसे जोडायचे. |
02:28 | वरच्या डाव्या कोपऱ्यात Home वर क्लिक करा. |
02:32 | Koha homepage एक डायलॉग बॉक्स सह उघडते जे आपल्याला Create a Patron साठी विचारते. |
02:39 | Patron तयार करण्यासाठी अनिवार्य आहे. अन्यथा database administrator भूमिका मध्ये, Koha चे काही भाग कार्य करणार नाहीत. |
02:50 | डायलॉग- बॉक्स विचारल्याप्रमाणे, Create Patron वर क्लिक करा. |
02:56 | वैकल्पिकरित्या, आपण Koha home page वर Patrons वर क्लिक करू शकता. |
03:02 | मी Create Patron वर क्लिक करेल. |
03:06 | एक नवीन पृष्ठ उघडते. New Patron टॅबवर क्लिक करा. |
03:12 | ड्रॉप-डाउन मधून, मी Library Staff निवडेन. |
03:17 | Add patron (Library Staff) नावाचा एक नवीन पृष्ठ उघडते. |
03:22 | आता, विविध विभागांअंतर्गत आवश्यक तपशील भरा जसे :
Patron iden tity, Main address, Contact इत्यादी. |
03:34 | येथे दर्शविल्याप्रमाणे मी काही तपशील भरले आहेत. |
03:39 | आपल्याकडे येथे सूचीबद्ध कोणत्याही field साठी माहिती नसल्यास, त्यास रिक्त सोडा. |
03:47 | व्हिडिओ थांबवा आणि सर्व तपशील भरा आणि त्यानंतर व्हिडिओ पुन्हा चालू करा. |
03:53 | Library management सेक्शन मध्ये, Card Number फील्ड पहा. |
04:01 | लक्ष द्या कि संख्या 1 Koha द्वारा स्वयं-निर्मित आहे. |
04:07 | म्हणून तुम्हाला तुमच्या Koha interface वर एक वेगळी संख्या दिसेल. |
04:13 | पुढे Library आहे. |
04:16 | ड्रॉप-डाउन मधून, मी Spoken Tutorial Library निवडेन. |
04:21 | आठवा कि: Spoken Tutorial Library या सिरीजमध्ये आधी तयार करण्यात आली. |
04:28 | जर तुम्ही वेगेळे नाव दिले असेल, तर ते नाव येथे निवडा. |
04:34 | Category साठी, मी ड्रॉप-डाउन मधून Library Staff निवडेन. |
04:40 | OPAC/Staff login सेक्शनमध्ये, Username आणि Password प्रविष्ट करा. |
04:47 | प्रत्येक नवीन वापरकर्त्याने एक नवीन Username आणि Password तयार करावा. |
04:53 | मी Username मध्ये Bella प्रविष्ट करेल. |
04:57 | Password मध्ये library. |
05:00 | पुन्हा, Confirm password: फील्डमध्ये समान पासवर्ड प्रविष्ट करा. |
05:06 | हे username आणि पासवर्ड लक्षात ठेवा. |
05:10 | याचा वापर थोड्या वेळाने Staff ला अधिकार / परवानग्या देण्यासाठी केला जाईल. |
05:17 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या शीर्षस्थानी जा आणि Save वर क्लिक करा. |
05:25 | Patron आणि card number च्या नावासह एक नवीन पृष्ठ उघडते. |
05:31 | या प्रकरणात, पूर्वी प्रविष्ट केल्याप्रमाणे, पृष्ठास card number 1 सह Ms Bella Tony म्हणून Patron असेल. |
05:41 | या सेक्शन्सना एडिट करण्यासाठी, Edit टॅबवर क्लिक करा, जो संबंधित सेक्शनच्या खाली स्थित आहे. |
05:49 | आता आपण शिकूया कि Patrons ला permissions कसे द्यायचे. |
05:55 | त्याच पृष्ठावर, More टॅबवर क्लिक करा आणि Set Permissions वर क्लिक करा. |
06:03 | Set permissions for Bella Tony टायटल सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
06:09 | (superlibrarian) Access to all librarian functions चेक-बॉक्स वर क्लिक करा. |
06:16 | त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा. |
06:21 | आता Superlibrarian Ms Bella Tony ला सर्व library functions मध्ये ऍक्सेस मिळाले आहेत. |
06:30 | superlibrarian अकाउंट सह, आपण Staff ला अधिकार / परवानग्या देऊ शकतो. |
06:37 | म्हणून, Koha Library Management System मध्ये ही एक महत्वाची भूमिका आहे. |
06:43 | आता एखाद्या विशिष्ट module साठी Staff ला ऍक्सेस कसा द्यावा ते शिकूया. |
06:50 | तुमच्या वर्तमान Database administrative user मधून लॉग आऊट करा. |
06:56 | असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा आणि No Library Set वर क्लिक करा. |
07:03 | ड्रॉप-डाउन मधून, Log out वर क्लिक करा. |
07:08 | आता, Superlibrarian account सह लॉगिन करा. |
07:13 | Superlibrarian कोणत्याही अन्य Staff ला module ऍक्सेस करण्यासाठी rights किंवा permissions देऊ शकते. |
07:22 | उदाहरणासाठी- Cataloging module, Circulation module, |
07:27 | Serial Control', Acquisition इत्यादी. |
07:32 | पूर्वी सांगितल्याप्रमाणे Patron तयार करा. |
07:36 | New Patron टॅबवर क्लिक करा. ड्रॉप-डाउन मधून, Library Staff निवडा. |
07:43 | Salutation मध्ये Ms निवडा. Surname मध्ये Samruddhi प्रविष्ट करा. |
07:51 | Category साठी, ड्रॉप-डाउन मधून, Library Staff निवडा. |
07:57 | इतर कोणताही पर्याय निवडू नका. |
08:01 | OPAC/Staff login सेक्शनमध्ये,
Username मध्ये Samruddhi आणि Password मध्ये patron प्रविष्ट करा. |
08:13 | पुन्हा, Confirm password फील्डमध्ये समान Password प्रविष्ट करा. |
08:19 | हे username आणि password लक्षात ठेवा, याचा वापर staff लॉगिन करण्यासाठी केला जाईल. |
08:27 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या वर Save वर क्लिक करा. |
08:34 | आता या विशिष्ट Patron ला परवान्या द्या. |
08:39 | More टॅबवर जा आणि Set Permissions वर क्लिक करा. |
08:45 | Set permissions for Samruddhi टायटल सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
08:52 | आम्ही तयार केलेल्या Patron चे हे नाव आहे. |
08:57 | (circulate) Check out and check in items चेक-बॉक्स वर क्लिक करा. |
09:04 | पुढे, (catalogue) Required for staff login चेक-बॉक्स वर क्लिक करा. |
09:12 | तसेच, (borrowers) Add, modify and view patron information वर क्लिक करा. |
09:19 | पुढे, येथे प्लस चिन्हावर क्लिक करा. |
09:24 | reserveforothers Place and modify holds for patrons वर क्लिक करा. |
09:31 | पुढे, Edit catalog टॅबवर या. |
09:35 | प्लस चिन्हावर क्लिक करा. आणि, (editcatalogue) Edit catalog (Modify bibliographic/holdings data) वर क्लिक करा. |
09:46 | पुढे, Acquisition टॅबवर क्लिक करा. प्लस चिन्हावर क्लिक करा. आणि, (acquisition) Acquisition and/or suggestion management वर क्लिक करा. |
09:59 | पुढे, tools टॅब साठी, येथे प्लस चिन्हावर क्लिक करा. |
10:05 | आणि, (batch_upload_patron_images) Upload patron images in a batch or one at a time वर क्लिक करा. |
10:16 | पुढे, (edit_patrons) Perform batch modification of patrons वर क्लिक करा. |
10:24 | तसेच, (import_patrons) Import patron data निवडा. |
10:30 | पुढे, Edit authorities वर देखील क्लिक करा. |
10:36 | पुढे, (reports), Allow access to the reports module टॅब वर या. |
10:43 | plus sign वर क्लिक करा आणि (execute _reports) Execute SQL reports निवडा. |
10:52 | त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Save वर क्लिक करा. |
10:57 | या सह आपण Ms. Samruddhi नावाच्या Library Staff ला सर्व आवश्यक अधिकार दिले आहेत. |
11:07 | आता, superlibrarian account मधून लॉग-आऊट करा. |
11:11 | असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा. spoken tutorial library वर क्लिक करा, ड्रॉप-डाउन मधून Log out वर क्लिक करा. |
11:23 | या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:27 | थोडक्यात, या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: |
11:33 | Patron category जोडणे,
Patron तयार करणे, |
11:39 | Superlibrarian तयार करणे, एका विशिष्ट module साठी Staff ला ऍक्सेस देणे शिकलो. |
11:47 | असाइन्मेंट साठी- 'Research Scholar’ नावाचा एक नवीन Patron Category जोडा. |
11:54 | Superlibrarian साठी असाइन्मेंट, खालील भूमिकांसाठी नवीन Staff जोडा. |
12:01 | सर्व Cataloging rights असाइन करा,
आणि सर्व Acquisition rights जोडा. |
12:09 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
12:17 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
12:28 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
12:32 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:45 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |