Koha-Library-Management-System/C2/How-to-create-a-library/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | How to create a Library in Koha वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण library तयार करणे आणि ग्रुप तयार करणे शिकणार आहोत: |
00:16 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux Operating System 16.04 |
00:24 | आणि Koha version 16.05. |
00:29 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, विद्यार्थ्यांना Library Science चे ज्ञान असावे. |
00:35 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असले पाहिजे. |
00:41 | आणि तुम्हाला Koha मध्ये Admin एक्सेस देखील असले पाहिजे. |
00:46 | अधिक माहितीसाठी, कृपया या वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial ची सिरीज पहा. |
00:53 | आता सुरुवात करू. मी आधीच माझ्या सिस्टिमवर Koha इन्स्टॉल केले आहे. |
00:59 | मी Koha इंटरफेस वर जाते. |
01:03 | इंस्टॉलेशनच्या वेळी दिलेले username आणि password वापरून Koha मध्ये लॉग इन करा. |
01:10 | माझ्या सिस्टिमवर, मी Username ला koha underscore library म्हणून दिले आहे. |
01:17 | आता Password टाईप करा ज्याला conf.xml फाईलमधून दिले होते. |
01:25 | Koha चे मुख्य पृष्ठ उघडते. |
01:27 | लक्षात ठेवा की Koha सेट करताना, आपल्याला प्रत्येक Branch library ची माहिती टाकावी लागेल, जी आपण Koha मध्ये तयार करू. |
01:38 | ह्या डेटाचा वापर नंतर Koha च्या बर्याच भागात वापरला जातो. |
01:43 | आता, एक नवीन library तयार करूया. |
01:47 | Koha इंटरफेस वर परत जा. |
01:50 | Home वर जा आणि Koha Administration वर क्लिक करा. |
01:56 | Basic parameters सेक्शनवर जा. |
02:00 | Libraries and groups वर क्लिक करा. |
02:04 | एक नवीन लायब्ररी जोडण्यासाठी, '+ New Library' टॅबवर क्लिक करा. |
02:10 | आपण आतासाठी groups सेकशन वगळू. |
02:15 | या पृष्ठामध्ये, लक्षात ठेवा की सर्व fields लाल रंगात चिन्हांकित केलेली आहे. |
02:21 | आपल्या लायब्ररीसाठी फील्ड Library code आणि Name भरा, जसे कि मी येथे केले आहे. |
02:29 | लक्षात घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत- Library code मध्ये स्पेस नसले पाहिजे. |
02:36 | आणि ते 10 वर्णांपेक्षा कमी असावे. |
02:40 | या कोडचा वापर database मध्ये एक वेगळी ओळखकरताच्या रूपात केले जाईल. |
02:46 | पुढील सेकशन म्हणजे आपल्याला आपल्या लायब्ररीचा संपर्क तपशील भरावा लागेल जसे की-
पत्ता, फोन नंबर इत्यादी. |
02:58 | मी येथे दाखविल्याप्रमाणे तपशील भरला आहे. |
03:01 | जर तुमच्याकडे येथे सूचीबद्ध कोणत्याही field साठी माहिती नसेल, तर हे रिक्त सोडा. |
03:08 | त्याचप्रमाणे, या पृष्ठावर तुमच्या लायब्ररीचा तपशील भरा. |
03:13 | address आणि phone तपशीलांचा वापर तुमच्या लायब्ररीसाठी नंतर कस्टम नोटीस बनविण्यासाठी केला जाऊ शकतो. |
03:20 | जेव्हा त्यांना लायब्ररीशी संपर्क साधायचा असेल तेव्हा सदस्यांद्वारा या तपशीलांचा वापर देखील केला जाऊ शकतो. |
03:26 | Email id फील्ड अनिवार्य नाही, जसे कि तुम्ही पाहू शकता. |
03:31 | तथापि, तुमच्या द्वारे तयार केलेल्या लायब्ररीसाठी email id असणे अत्यंत महत्वाचे आहे. |
03:38 | हा email id आहे ज्यामधून सदस्यांना नोटीस (अधिसूचना) दिल्या जातात आणि येतात. |
03:45 | Gmail id हे अधिक चांगले आहे कारण ते मेल पाठविण्यासाठी आणि / किंवा मेल प्राप्त करण्यासाठी सहजपणे कॉन्फिगर केले जाऊ शकते. |
03:54 | Email id फील्डच्या खाली, आपल्याकडे Reply-To आणि Return-Path फिल्ड्स आहेत. |
04:01 | Reply-To - तुम्ही नोटिसांच्या सर्व उत्तरांसाठी आणखी एक email address निर्दिष्ट करू इच्छित असल्यास, तुम्ही ते येथे करू शकता. |
04:11 | मी Reply-To email id मध्ये stlibreoffice@gmail.com प्रविष्ट करेल. |
04:20 | हे रिक्त सोडल्यास, सर्व उत्तरे उपरोक्त दिलेल्या Email id वर जातील. |
04:27 | Return-Path वर या- हा email address आहे जेथे सर्व बाऊन्स झालेले संदेश जातील. |
04:34 | हे रिक्त सोडल्यास, सर्व बाऊन्स झालेले संदेश उपरोक्त दिलेल्या Email id वर जातील. |
04:42 | तर, मूलत: तीन वेगवेगळ्याemail ids वापरल्या जाऊ शकतात. |
04:48 | Email id , |
04:50 | Reply-To आणि |
04:52 | Return-Path. |
04:55 | तरीही, जर केवळ एक email id प्रदान केला असेल तर, डिफॉल्ट रूपात, Koha सर्व तिन्ही fields साठी तेच वापरेल. |
05:04 | पुढे, field मध्ये तुमच्या लायब्ररीचा URL प्रविष्ट करा, जसे मी येथे केले आहे. |
05:10 | URL field भरल्यावर, विशिष्ट लायब्ररीचे नाव OPAC वर holdings table मध्ये जोडले जाईल. |
05:18 | यानंतर, आपल्याला OPAC info भरायचा आहे. |
05:23 | येथे आपल्याला आपल्या लायब्ररीविषयी माहिती द्यायची आहे. |
05:28 | मी येथे माझ्या लायब्ररीबद्दल काही माहिती प्रविष्ट केली आहे. |
05:33 | ही माहिती OPAC मध्ये दिसेल जेव्हा आपण holdings table मध्ये लायब्ररीच्या नावावर कर्सर नेतो. |
05:41 | जर एखाद्या विशिष्ट branch साठी URL ह्या फिल्डमध्ये ठेवली असेल तर, OPAC आपल्याला branch लायब्ररी सांगेल जिथे पुस्तक उपलब्ध आहे. |
05:52 | hyper-link address माहिती मिळविण्यास, माऊसला लिंकवर फिरवा. |
05:58 | हे विशिष्ट branch लायब्ररीचा पत्ता देईल जिथे पुस्तक जारी केले जाऊ शकते. |
06:05 | Koha interface वर परत जाऊ. |
06:09 | पुढे आपल्याकडे IP address आहे. |
06:12 | जर तुम्ही Koha admin access एका विशिष्ट IP address वर प्रतिबंधित करू इच्छित असाल तर तुम्ही येथे IP निर्दिष्ट करू शकता. |
06:22 | अन्यथा, तुम्ही त्यास रिक्त सोडू शकता. |
06:25 | मी ते रिक्त सोडेन |
06:28 | शेवटी, आपल्याकडे Notes field आहे. |
06:32 | येथेच आपण भविष्यातील संदर्भासाठी कोणत्याही नोट्स भरू शकता. |
06:37 | हे OPAC मध्ये प्रदर्शित होणार नाहीत. |
06:40 | सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, Submit बटणावर क्लिक करा. |
06:46 | नवीन लायब्ररीचे नाव Libraries पृष्ठावर दिसते. |
06:51 | आमच्या बाबतीत, Spoken Tutorial Library |
06:55 | आता आपण Group Library पर्यायाचा वापर कसा करावा ते पाहू या. |
07:00 | जर तुम्हाला एक नवीन group जोडायचे असे, तर '+ New Group' टॅबवर क्लिक करा. |
07:07 | समजा तुमच्याकडे काही branch लिब्ररीज आहेत, उदाहरणार्थ - Chemistry Library, Physics Library आणि Biology Library आणि तुम्हाला त्यांचा group बनवायचा आहे. |
07:19 | अशा परिस्थितीत Group Library पर्याय वापरा. |
07:24 | या ग्रुपला Science library असे नाव द्या जे मुख्य लायब्ररीच्या अंतर्गत येते. |
07:31 | ग्रुपिंग समानता आणि / किंवा समान वैशिष्ट्ये इत्यादींच्या आधारावर केले जाऊ शकते. |
07:40 | Database administrative user म्हणून तुमच्या वर्तमान सत्रातून लॉगआउट करा. |
07:45 | असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा आणि No Library Set वर क्लिक करा. |
07:52 | ड्रॉप-डाउन मधून, Logout वर क्लिक करा. |
07:57 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:01 | थोडक्यात |
08:03 | या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो-
library तयार करणे आणि नवीन Group तयार करणे. |
08:11 | असाइन्मेंट म्हणून- एक नवीन लायब्ररी तयार करा आणि एक नवीन group तयार करा. |
08:17 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
08:25 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:35 | संबंधित प्रश्नांसाठी फोरम:
या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? |
08:42 | कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा. |
08:49 | तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
08:51 | आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
08:55 | संबंधित प्रश्नांसाठी फोरम: |
08:58 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
09:03 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
09:08 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. |
09:11 | फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
09:17 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:23 | या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:28 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |