Ubuntu-Linux-on-Virtual-Box/C2/Installing-VirtualBox-in-Windows-OS/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:19, 14 February 2019 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Windows Operating System मध्ये Installing VirtualBox वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत VirtualBox कसे डाउनलोड करणे आणि Windows OS वर ते कसे install करणे.
00:18 हे ट्युटोरिअल Windows OS व्हर्जन 10 ,
00:24 VirtualBox व्हर्जन 5.2.18,
00:29 Firefox वेब ब्राउजर वापरून रेकॉर्ड केले आहे.
00:32 तुम्ही तुमच्या पसंतीचा इतर कोणताही ब्राउजर वापरू शकता.
00:38 सुरवात करण्यापूर्वी, कृपया खात्री करून घ्या की तुम्ही Internet शी जुडलेले आहात.
00:44 'VirtualBox म्हणजे काय?

Virtualization साठी VirtualBox हे मुक्त आणि ओपन सोर्स (स्रोत) सॉफ्टवेअर आहे.

00:52 हे आपल्याला base machine i.e. (host) मध्ये एकाधिक OS इन्स्टॉल आणि वापरण्याची परवानगी देते.
01:00 base machine मध्ये एकतर Windows, Linux किंवा MacOS असू शकते.
01:07 VirtualBox मध्ये OS install करण्यासाठी, base machine मध्ये खालील कॉन्फिगरेशन असावे.
01:15 i3 processor किंवा उच्चतर,
01:19 RAM 4GB किंवा उच्चतर,
01:23 Hard disk मध्ये 50GB फ्री स्पेस किंवा अधिक आणि Virtualization BIOS वर एनेबल असले पाहिजे.
01:34 हे खात्री करेल कि VirtualBox सहजतेने कार्य करेल.
01:40 जर base machine मध्ये Windows OS आहे, तर खालील व्हर्जन्सपैकी ती कोणतीही एक असावी:
01:47 Windows 7,
01:49 Windows 8 किंवा Windows 10.
01:53 आता इंस्टॉलेशन सुरू करूया.
01:56 VirtualBox ची नवीनतम व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी, वेब ब्राउजरमध्ये खालील लिंकवर जा.

www dot virtualbox dot org slash wiki slash Downloads

02:14 मी माझ्या मशीनवर Firefox web browser मध्ये आधीच ही url उघडली आहे.
02:21 हे पृष्ठ एकाधिक hosts साठी VirtualBox चे नवीनतम व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी लिंक प्रदर्शित करते.
02:30 या रेकॉर्डिंगच्या वेळी, VirtualBox चे नवीनतम व्हर्जन 5.2.18 आहे.
02:39 भविष्यात आपण हे ट्यूटोरियल पहाल तेव्हा हे भिन्न असू शकते.
02:44 आता Windows hosts लिंकवर क्लिक करा.
02:48 हे Windows OS साठी VirtualBox डाउनलोड करेल.
02:53 तुमच्या इंटरनेट स्पीडच्या आधारावर डाउनलोड होण्यास काही वेळ लागू शकतो.
02:58 महत्त्वपूर्ण टीप: VirtualBox इन्स्टॉल करण्यापूर्वी, आपल्या मशीनवर Virtualization एनेबल (सक्षम) आहे याची आपण खात्री केली पाहिजे.
03:08 Windows 8 किंवा 10 machine मध्ये Virtualization एनेबल (सक्षम) आहे की नाही हे तापासूया.
03:16 विंडोच्या खाली डाव्या बाजूस Taskbar वर जा.

राईट-क्लिक करा आणि Task Manager निवडा.

03:25 Task manager विंडो उघडेते.
03:29 जर तुम्ही ते पहिल्यांदा उघडत आहात, तर या विंडोच्या तळाशी More details वर क्लिक करा.

नंतर Performance टॅबवर क्लिक करा.

03:40 Performance टॅबमध्ये, खाली उजवीकडे, Virtualization वर जा.
03:46 हे आपल्याला सांगेल कि Virtualization आपल्या मशीनमध्ये एनेबल आहे कि नाही.
03:53 हे एनेबल नसल्यास, कृपया ते BIOS settings मध्ये एनेबल करा.
03:59 जसे कि BIOS सेटिंग्स वेग वेगळ्या कॉम्पुटरमध्ये भिन्न असते, आपण याचा एक demo दर्शवू शकत नाही.
04:06 तुम्हाला तंत्रज्ञान नसल्यास, कृपया System Administrator च्या मदतीने हे करा.
04:13 जर Virtualization ऑपशन BIOS मध्ये उपलब्ध नसेल तर, आपण त्या मशीनमध्ये VirtualBox इन्स्टॉल करू शकत नाही.
04:22 माझ्या बाबतीत हे आधीच एनेबल आहे.
04:26 आता वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या x आयकॉनवर क्लिक करून Taskbar बंद करा.
04:33 आता VirtualBox इन्स्टॉल करूया.
04:37 folder वर जा जेथे आपण VirtualBox.exe फाईल डाउनलोड केली आहे.
04:43 आता फाईल वर राईट-क्लिक करा आणि Run as Administrator निवडा.
04:49 प्रदर्शित User Account Control डायलॉग बॉक्समध्ये, Yes वर क्लिक करा.
04:56 वेलकम मेसेज सह Oracle VM VirtualBox 5.2.18 Setup विंडो प्रदर्शित होते.
05:06 पुढे जाण्यासाठी विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा.
05:12 पुढील स्क्रीन Custom Setup आहे.
05:16 जर आपण इंस्टॉलेशनचे स्थान बदलू इच्छितो, तर आपण तसे करू शकतो.
05:22 Browse बटणावर क्लिक करा आणि नंतर इंस्टॉलेशनसाठी इच्छित स्थान निवडा.
05:29 मी हे सोडून देईल, मी ते default लोकेशनमध्ये इन्स्टॉल करण्यास प्राधान्य देत आहे.
05:35 पुढे जाण्यासाठी विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा.
05:40 पुढे Custom Setup स्क्रीनमध्ये, आपण आपल्या गरजेनुसार काही वैशिष्ट्ये निवडू शकतो.

डीफॉल्टनुसार, सर्व पर्याय निवडले जातील.

05:52 विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा.
05:56 पुढील विंडो Network शी संबंधित काही चेतावणी मेसेज दर्शवते.
06:01 हा मेसेज सांगते की इंस्टॉलेशन दरम्यान Internet तात्पुरते डिस्कनेक्ट होईल.
06:09 विंडोच्या तळाशी Yes बटणावर क्लिक करा.
06:13 आता आपल्याला Ready to Install स्क्रीनवर पुनर्निर्देशित केले आहे.
06:18 इंस्टॉलेशन सुरू करण्यासाठी Install वर क्लिक करा.
06:22 या इंस्टॉलेशनमध्ये काही वेळ लागू शकतो.
06:25 तुम्हाला Windows Security नावाची पॉप-अप विंडो मिळू शकेल.
06:30 हे विचारते कि का आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू इच्छितो.

Install बटणावर क्लिक करा.

06:39 एकदा पूर्ण झाल्यानंतर, आपण “Oracle VM VirtualBox installation is complete” मेसेज पाहू शकतो.
06:47 या स्क्रीनमध्ये, येथे एक “Start Oracle VM VirtualBox after installation” पर्याय आहे.

डीफॉल्टनुसार, ते निवडलेले असेल.

06:58 मी VM त्वरित लॉन्च करू इच्छित नाही, म्हणून मी ते निवड रद्द करेल.
07:03 शेवटी, Finish बटणावर क्लिक करा.
07:08 आता, Desktopवर, आपण VirtualBox साठी shortcut icon पाहू शकतो.
07:16 application लाँच करण्यासाठी VirtualBox icon वर डबल क्लिक करा.
07:21 VirtualBox एप्लिकेशन उघडते. हे सूचित करते की इंस्टॉलेशन यशस्वी झाली आहे.
07:28 या सह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात

07:34 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:

Virtualization एनेबल आहे कि नाही ते तपासणे आणि

07:41 VirtualBox ला Windows 10 मशीनमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे शिकलो.
07:46 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
07:54 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

08:02 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:06 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

08:12 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.

08:23 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
08:29 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
08:34 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
08:43 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

08:55 या ट्युटोरियलसाठी स्क्रिप्ट आणि व्हिडिओचे योगदान NVLI आणि स्पोकन ट्युटोरियल टीम द्वारे करण्यात आले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, Ranjana