Ubuntu-Linux-on-Virtual-Box/C2/Installing-VirtualBox-in-Windows-OS/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Windows Operating System मध्ये Installing VirtualBox वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत VirtualBox कसे डाउनलोड करणे आणि Windows OS वर ते कसे install करणे. |
00:18 | हे ट्युटोरिअल Windows OS व्हर्जन 10 , |
00:24 | VirtualBox व्हर्जन 5.2.18, |
00:29 | Firefox वेब ब्राउजर वापरून रेकॉर्ड केले आहे. |
00:32 | तुम्ही तुमच्या पसंतीचा इतर कोणताही ब्राउजर वापरू शकता. |
00:38 | सुरवात करण्यापूर्वी, कृपया खात्री करून घ्या की तुम्ही Internet शी जुडलेले आहात. |
00:44 | 'VirtualBox म्हणजे काय?
Virtualization साठी VirtualBox हे मुक्त आणि ओपन सोर्स (स्रोत) सॉफ्टवेअर आहे. |
00:52 | हे आपल्याला base machine i.e. (host) मध्ये एकाधिक OS इन्स्टॉल आणि वापरण्याची परवानगी देते. |
01:00 | base machine मध्ये एकतर Windows, Linux किंवा MacOS असू शकते. |
01:07 | VirtualBox मध्ये OS install करण्यासाठी, base machine मध्ये खालील कॉन्फिगरेशन असावे. |
01:15 | i3 processor किंवा उच्चतर, |
01:19 | RAM 4GB किंवा उच्चतर, |
01:23 | Hard disk मध्ये 50GB फ्री स्पेस किंवा अधिक आणि Virtualization BIOS वर एनेबल असले पाहिजे. |
01:34 | हे खात्री करेल कि VirtualBox सहजतेने कार्य करेल. |
01:40 | जर base machine मध्ये Windows OS आहे, तर खालील व्हर्जन्सपैकी ती कोणतीही एक असावी: |
01:47 | Windows 7, |
01:49 | Windows 8 किंवा Windows 10. |
01:53 | आता इंस्टॉलेशन सुरू करूया. |
01:56 | VirtualBox ची नवीनतम व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी, वेब ब्राउजरमध्ये खालील लिंकवर जा.
www dot virtualbox dot org slash wiki slash Downloads |
02:14 | मी माझ्या मशीनवर Firefox web browser मध्ये आधीच ही url उघडली आहे. |
02:21 | हे पृष्ठ एकाधिक hosts साठी VirtualBox चे नवीनतम व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी लिंक प्रदर्शित करते. |
02:30 | या रेकॉर्डिंगच्या वेळी, VirtualBox चे नवीनतम व्हर्जन 5.2.18 आहे. |
02:39 | भविष्यात आपण हे ट्यूटोरियल पहाल तेव्हा हे भिन्न असू शकते. |
02:44 | आता Windows hosts लिंकवर क्लिक करा. |
02:48 | हे Windows OS साठी VirtualBox डाउनलोड करेल. |
02:53 | तुमच्या इंटरनेट स्पीडच्या आधारावर डाउनलोड होण्यास काही वेळ लागू शकतो. |
02:58 | महत्त्वपूर्ण टीप: VirtualBox इन्स्टॉल करण्यापूर्वी, आपल्या मशीनवर Virtualization एनेबल (सक्षम) आहे याची आपण खात्री केली पाहिजे. |
03:08 | Windows 8 किंवा 10 machine मध्ये Virtualization एनेबल (सक्षम) आहे की नाही हे तापासूया. |
03:16 | विंडोच्या खाली डाव्या बाजूस Taskbar वर जा.
राईट-क्लिक करा आणि Task Manager निवडा. |
03:25 | Task manager विंडो उघडेते. |
03:29 | जर तुम्ही ते पहिल्यांदा उघडत आहात, तर या विंडोच्या तळाशी More details वर क्लिक करा.
नंतर Performance टॅबवर क्लिक करा. |
03:40 | Performance टॅबमध्ये, खाली उजवीकडे, Virtualization वर जा. |
03:46 | हे आपल्याला सांगेल कि Virtualization आपल्या मशीनमध्ये एनेबल आहे कि नाही. |
03:53 | हे एनेबल नसल्यास, कृपया ते BIOS settings मध्ये एनेबल करा. |
03:59 | जसे कि BIOS सेटिंग्स वेग वेगळ्या कॉम्पुटरमध्ये भिन्न असते, आपण याचा एक demo दर्शवू शकत नाही. |
04:06 | तुम्ही एक तांत्रिक व्यक्ती नसल्यास, कृपया System Administrator च्या मदतीने हे करा. |
04:13 | जर Virtualization ऑपशन BIOS मध्ये उपलब्ध नसेल तर, आपण त्या मशीनमध्ये VirtualBox इन्स्टॉल करू शकत नाही. |
04:22 | माझ्या बाबतीत हे आधीच एनेबल आहे. |
04:26 | आता वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या x आयकॉनवर क्लिक करून Taskbar बंद करा. |
04:33 | आता VirtualBox इन्स्टॉल करूया. |
04:37 | folder वर जा जेथे आपण VirtualBox.exe फाईल डाउनलोड केली आहे. |
04:43 | आता फाईल वर राईट-क्लिक करा आणि Run as Administrator निवडा. |
04:49 | प्रदर्शित User Account Control डायलॉग बॉक्समध्ये, Yes वर क्लिक करा. |
04:56 | वेलकम मेसेज सह Oracle VM VirtualBox 5.2.18 Setup विंडो प्रदर्शित होते. |
05:06 | पुढे जाण्यासाठी विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा. |
05:12 | पुढील स्क्रीन Custom Setup आहे. |
05:16 | जर आपण इंस्टॉलेशनचे स्थान बदलू इच्छितो, तर आपण तसे करू शकतो. |
05:22 | Browse बटणावर क्लिक करा आणि नंतर इंस्टॉलेशनसाठी इच्छित स्थान निवडा. |
05:29 | मी हे सोडून देईल, मी ते default लोकेशनमध्ये इन्स्टॉल करण्यास प्राधान्य देत आहे. |
05:35 | पुढे जाण्यासाठी विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा. |
05:40 | पुढे Custom Setup स्क्रीनमध्ये, आपण आपल्या गरजेनुसार काही वैशिष्ट्ये निवडू शकतो.
डीफॉल्टनुसार, सर्व पर्याय निवडले जातील. |
05:52 | विंडोच्या तळाशी असलेल्या Next बटणावर क्लिक करा. |
05:56 | पुढील विंडो Network शी संबंधित काही चेतावणी मेसेज दर्शवते. |
06:01 | हा मेसेज सांगते की इंस्टॉलेशन दरम्यान Internet तात्पुरते डिस्कनेक्ट होईल. |
06:09 | विंडोच्या तळाशी Yes बटणावर क्लिक करा. |
06:13 | आता आपल्याला Ready to Install स्क्रीनवर पुनर्निर्देशित केले आहे. |
06:18 | इंस्टॉलेशन सुरू करण्यासाठी Install वर क्लिक करा. |
06:22 | या इंस्टॉलेशनमध्ये काही वेळ लागू शकतो. |
06:25 | तुम्हाला Windows Security नावाची पॉप-अप विंडो मिळू शकेल. |
06:30 | हे विचारते कि का आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू इच्छितो.
Install बटणावर क्लिक करा. |
06:39 | एकदा पूर्ण झाल्यानंतर, आपण “Oracle VM VirtualBox installation is complete” मेसेज पाहू शकतो. |
06:47 | या स्क्रीनमध्ये, येथे एक “Start Oracle VM VirtualBox after installation” पर्याय आहे.
डीफॉल्टनुसार, ते निवडलेले असेल. |
06:58 | मी VM त्वरित लॉन्च करू इच्छित नाही, म्हणून मी ते निवड रद्द करेल. |
07:03 | शेवटी, Finish बटणावर क्लिक करा. |
07:08 | आता, Desktopवर, आपण VirtualBox साठी shortcut icon पाहू शकतो. |
07:16 | application लाँच करण्यासाठी VirtualBox icon वर डबल क्लिक करा. |
07:21 | VirtualBox एप्लिकेशन उघडते. हे सूचित करते की इंस्टॉलेशन यशस्वी झाली आहे. |
07:28 | या सह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात |
07:34 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:
Virtualization एनेबल आहे कि नाही ते तपासणे आणि |
07:41 | VirtualBox ला Windows 10 मशीनमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे शिकलो. |
07:46 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
07:54 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:02 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:06 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
08:12 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
08:23 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
08:29 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
08:34 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
08:43 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:55 | या ट्युटोरियलसाठी स्क्रिप्ट आणि व्हिडिओचे योगदान NVLI आणि स्पोकन ट्युटोरियल टीम द्वारे करण्यात आले आहे.
आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |