Linux-AWK/C2/Variables-and-Operators-in-awk/Marathi
|
|
00:01 | नमस्कार awk command मधील व्हेरिएबल्स आणि ऑपरेटर्स वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत- User defined variables |
00:12 | Operators
BEGIN आणि END statements |
00:17 | आपण हे काही उदाहरणांद्वारे करू. |
00:20 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 |
00:26 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्ही या वेबसाईटवरील पूर्वीचे Linux ट्युटोरिअल्स पहा. |
00:33 | तुम्ही C किंवा C++ सारखे सामान्य प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वापरल्या जाणाऱ्या basic operators शी परिचित असावे. |
00:41 | नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा. |
00:47 | awk फिल्टरचे आणि प्रोग्रामिंग लँग्वेजचे प्रभाव (शक्ती) एकत्र करते. |
00:52 | म्हणून ते variables, constants, operators, इत्यादीचे समर्थन करते. |
00:58 | awk मध्ये variable काय आहे हे पाहू. |
01:02 | variable हे एक ओळखकर्ता (अभिज्ञापक) आहे जे एक मूल्य संदर्भित करते. |
01:07 | Awk user-defined variables आणि built-in variables दोन्हीचे समर्थन करते. |
01:12 | या ट्युटोरिअलमध्ये आपण user-defined variables बद्दल शिकू. |
01:17 | user-defined variables साठी, variable डिक्लेरेशन आवश्यक नाही. |
01:22 | Variables स्पष्टपणे प्रारंभ करण्याची गरज नाही. |
01:26 | Awk स्वयंचलितपणे त्यांना शून्य किंवा null string मध्ये सुरू करते. |
01:32 | variable एक अक्षराने सुरू होणे आवश्यक आहे आणि अक्षरे, अंक आणि अंडरस्कोअरसह सुरू ठेवणे आवश्यक आहे. Variables केस-सेन्सेटिव्ह असतात. |
01:43 | तर, Salary capital “S” सह आणि salary small “s” सह दोन वेगवेगळे variables आहेत. |
01:50 | आता आपण काही उदाहरणे पाहू. |
01:53 | CTRL + ALT आणि T कीज दाबून terminal उघडा. |
01:58 | terminal वर टाईप करा, - awk space सिंगल कोट उघडा करली ब्रेस उघडा small x equal to 1 semicolon capital X equal to डबल कोट्समध्ये capital A semicolon small a equal to डबल कोट्समध्ये awk semicolon small b equal to डबल कोट्समध्ये tutorial.
Enter दाबा. |
02:25 | टाईप करा print x Enter दाबा. |
02:29 | print capital X Enter दाबा. |
02:34 | print a Enter दाबा. |
02:37 | print b Enter दाबा. |
02:40 | print a space b Enter दाबा. |
02:44 | print small x space b Enter दाबा. |
02:49 | print small x plus capital X करली ब्रेस बंद करा सिंगल कोट बंद करा आणि एंटर दाबा. |
02:57 | आम्ही फाइलचे नाव दिले नाही म्हणून, awk ला standard input मधील काही इनपुटची आवश्यकता असेल. |
03:03 | आणि म्हणून आपण कोणताही अक्षर टाईप करू शकतो, जसे a आणि नंतर एंटर दाबा. |
03:10 | हे उदाहरणकाही गोष्टी दाखवते.
Variables एका संख्येने प्रारंभ करता येऊ शकतो. |
03:18 | हे एका कॅरेक्टर किंवा string सारख्या व्हॅल्यू सह देखील प्रारंभ केले जाऊ शकते. |
03:23 | जर व्हॅल्यू कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग असेल, तर व्हेरिएबल double quotes मध्ये व्हॅल्यू सह प्रारंभ केले जाते. |
03:31 | आपण variables चे व्हॅल्युज पाहू शकतो. |
03:35 | लक्षात घ्या की लहान x आणि कॅपिटल X हे वेगवेगळ्या व्हेरिएबल्स म्हणून मानल्या जातात. |
03:41 | हे सिद्ध करते की variables हे case sensitive असतात. |
03:45 | तसेच, हे दर्शविते की हे दोन strings concatenated (एकत्रित) कसे असू शकतात. |
03:50 | येथे variables लहान a आणि लहान b concatenated (एकत्रित)आहेत. |
03:55 | तर, string concatenation operator हे space आहे. |
04:00 | त्याचप्रमाणे, जेव्हा आपण लहान x concatenate करतो, जे एक संख्या असते आणि string b, x हे string मध्ये स्वयं-रूपांतरित केले आहे.
आणि concatenated आउटपुट 1tutorial बनतो. |
04:13 | string चे स्वयं-रूपांतरण(ऑटो-कन्व्हर्शन) का घडते? |
04:16 | कारण येथे x आणि b च्या दरम्यान awk ला string concatenation operator space मिळतो. |
04:25 | आता लहान x plus capital X च्या आउटपुटकडे पहा.
येथे, आपल्याकडे arithmetic operator plus आहे. |
04:33 | तर, X स्वयंचलितरित्या अंकीय शून्यमध्ये रूपांतरित केले आहे.
आणि जोडण्याचे आउटपुट अंकीय 1 बनते. |
04:42 | आतापर्यंत, आम्ही काही operators पाहिल्या आहेत.
आता इतर कोणते operators वापरू शकतो ते पाहू या. |
04:49 | expressions मध्ये विविध प्रकारच्या operators चा वापर केला जाऊ शकतो. |
04:53 | कृपया येथे व्हिडिओ थांबवा आणि येथे नमूद केलेल्या सर्व operators वर एक नजर टाका. |
04:58 | मी असे गृहीत धरते की आपण या मूलभूत operators शी परिचित आहात. |
05:02 | नसल्यास, कृपया C आणि C++ सिरीजमधील operators वरील ट्युटोरिअल्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
05:09 | मी या सर्व operators च्या कामकाजावर तपशीलमध्ये चर्चा करणार नाही. |
05:14 | string matching operator केवळ अपवाद आहे, जो आपल्यासाठी नवीन असू शकतो.
आपण हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
05:23 | Code files लिंकमध्ये awkdemo.txt नावाची फाईल दिली आहे.
कृपया तुमच्या कॉम्पुटरवर ते डाउनलोड करा. |
05:31 | terminal वर जाऊ.
Ctrl आणि D कीज दाबून मागील प्रक्रिया समाप्त करू. |
05:38 | मी terminal क्लिअर करते. |
05:41 | आता ज्या फोल्डरमध्ये तुम्ही cd कमांड वापरून awkdemo.txt फाइल सेव्ह केली आहे त्या फोल्डरवर जा. |
05:48 | आता ही फाईल पाहू. |
05:52 | समजा आपल्याला 80 पेक्षा कमी गूण असलेल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शोधायचे आहे. |
05:58 | या केसमध्ये, आपल्याला दोन वेगवेगळ्या फील्डची तुलना करण्याची गरज आहे. |
06:02 | अशा परिस्थितींसाठी, आपण awk's relational operators वापरू शकतो. |
06:07 | हे operators strings आणि numbers दोन्हीशी तुलना करू शकतात. |
06:12 | तर टर्मिनलवर टाईप करा
awk space hyphen capital F डबल कोट्समध्ये vertical bar space सिंगल कोट्समध्ये dollar 5 equal to equal to डबल कोट्समध्ये Pass space ampersand ampersand space dollar 4 less than 80 space करली ब्रेसेसमध्ये print space plus plus x coma dollar 2 coma dollar 4 coma dollar 5 space awkdemo.txt आणि एंटर दाबा. |
06:54 | हा कमांड अनेक गोष्टी दर्शवितो.
पहिले, आपण पाचव्या फिल्डसह string ची तुलना करतो. |
07:01 | दुसरे, आपण फक्त चौथ्या फिल्डची तुलना एका संख्येने करतो. |
07:06 | तिसरे म्हणजे, आपण पाहतो की ampersand operator चा वापर करून आपण दोन किंवा अधिक तुलना करू शकतो. |
07:13 | विशिष्ट संख्या किंवा strings च्या ऐवजी, आपण regular expressions ची तुलना देखील करू शकतो. |
07:19 | आपण स्लाईडमध्ये पाहिल्याप्रमाणे, आपल्याकडे या उद्देशासाठी tilde आणि exclamation tilde ऑपरेटर्स आहेत. |
07:27 | आता समजा, आपल्याला पास होणारे कॉम्पुटर साईन्स विद्यार्थी शोधायचे आहेत. |
07:32 | कॉम्प्युटर्सकडे लहान आणि कॅपिटल C दोन्ही असू शकतात म्हणून आपण regular expression वापरू. |
07:40 | आपण टाईप करू
awk space hyphen capital F डबल कोट्समध्ये pipe symbol space सिंगल कोट्समध्ये dollar 5 equal to equal to डबल कोट्समध्ये Pass ampersand ampersand space dollar 3 tilde slash चौकोनी कंसात small c capital C computers slash space करली ब्रेसमध्ये print space plus plus small x comma dollar 2 comma dollar 3 coma dollar 5 space awkdemo.txt आणि एंटर दाबा. |
08:24 | आपण तुलना नाकारू इच्छित असल्यास, आपण exclamation tilde operator वापरुन असे करू शकतो. |
08:30 | सांगा आता आम्हाला पास झालेल्या सर्व नॉन-कॉम्पुटर विद्यार्थ्यांची यादी हवी आहे. |
08:35 | मागील कमांड मिळवण्यासाठी अप एरो वापरा. |
08:39 | dollar 3 च्या पुढे exclamation symbol जोडा आणि एंटर दाबा. |
08:47 | पुढे, त्या फाईलमधील रिकाम्या ओळींची संख्या मोजू. |
08:52 | फाईल उघडा आणि किती रिकाम्या ओळी आहेत ते तपासा.
तर, त्यात 3 रिकाम्या ओळी आहेत. |
09:00 | आता awk वापरुन रिकाम्या ओळींची संख्या मोजण्यासाठी, टाईप करा
awk space सिंगल कोटमध्ये फ्रंट स्लॅशमध्ये caret symbol dollar space करली ब्रेसेसमध्ये x equal to x plus 1 semicolon space print x space awkdemo.txt Enter दाबा. |
09:26 | आपल्याला आपले अंतिम उत्तर म्हणून 3 मिळाले. |
09:30 | कॅरेट साइनचा अर्थ एका ओळीचे सुरवात दाखवतो तर डॉलर एका ओळीचे शेवट दाखवतो. |
09:37 | म्हणूनच रिकामी ओळ regular expression caret-dollar द्वारे जुळविली जाईल. |
09:43 | लक्षात घ्या, आपण x चे व्हॅल्यू प्रारंभ केले नाही.
Awk ने x ला परंभीक व्हॅल्यू शुन्यमध्ये सुरवात केले आहे. |
09:51 | हा कमांड आपल्याला रिकाम्या ओळींची चालू संख्या देतो.
याचे कारण असे की प्रत्येक वेळी रिंकामी ओळ आढळल्यास, x वाढविले जाईल आणि नंतर प्रिंट केले जाईल. |
10:02 | आपल्या शेवटच्या कमांडमध्ये, आपण रिकाम्या ओळींची चालू संख्या पहिली आहे.
परंतु आपल्याला फक्त रिकाम्या ओळींची एकूण संख्या प्रिंट करायची आहे. |
10:12 | मग संपूर्ण फाईल ट्रॅव्हर्स(पार करणे) झाल्यानंतर आपल्याला केवळ एकदाच x प्रिंट करायचे आहे. |
10:19 | आपल्याला आउटपुट म्हणजे काय असे हेडिंग देखील द्यायचे आहे. |
10:25 | अशा आवश्यकतांसाठी awk BEGIN आणि END सेक्शन प्रदान करतो. |
10:30 | BEGIN सेक्शनमध्ये पूर्व-प्रक्रियेसाठी प्रक्रिया समाविष्ट आहे. |
10:34 | main input loop कार्यान्वित केल्याआधी हा सेक्शन कार्यन्वित केला जातो. |
10:40 | END सेक्शनमध्ये पोस्ट-प्रक्रियेसाठी प्रक्रिया समाविष्ट असू शकते. |
10:45 | मुख्य इनपुट लूप समाप्त झाल्यानंतर हा सेक्शन कार्यान्वित केला जातो.
BEGIN आणि END प्रक्रिया वैकल्पिक (ऑपशनल) आहेत. |
10:55 | आता हे कसे करायचे ते शिकूया.
टर्मिनलमध्ये टाईप करा. awk space सिंगल कोट उघडा BEGIN incaps करली ब्रेसमध्ये print space डबल कोट्समध्ये The number of empty lines in awkdemo are एंटर दाबा. |
11:14 | फ्रंट स्लॅशमध्ये caret symbol dollar symbol space करली ब्रेसेसमध्ये x equal to x plus 1
एंटर दाबा. |
11:26 | end space करली ब्रेसेसमध्ये print space x close सिंगल कोट space awkdemo.txt आणि एंटर दाबा. |
11:39 | पहा, आपल्याला अपेक्षित आउटपुट मिळाला नाही!
आपल्याला आउटपुट 3 असे मिळाले पाहिजे कारण आपल्याकडे फाईलमध्ये 3 रिकाम्या ओळी आहेत. |
11:48 | तुम्हाला काय वाटतं काय झाले आहे?
प्रत्यक्षात, आपण अप्पर केस END म्हणून end लिहिले पाहिजे. |
11:54 | तर आता आपण कमांड बदलू. |
11:57 | terminal वरील मागील कार्यान्वित कमांड मिळवण्यासाठी अप अॅरो की दाबा. |
12:03 | आता लोअर केस end अप्पर केस END मध्ये बदल करा.
आणि एंटर दाबा. |
12:11 | आता आऊटपुटमध्ये रिकाम्या ओळींची एकूण संख्या प्रदर्शित केली आहे. |
12:16 | पुढे, आपण awkdemo.txt फाइलमध्ये आढळलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वेतन शोधा. |
12:24 | ते मिळवण्यासाठी, टर्मिनल मध्ये दर्शविल्याप्रमाणे कमांड टाईप करा.
आणि एंटर दाबा. आणि आपल्याला इच्छित आउटपुट मिळते. |
12:35 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात |
12:40 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो
awk मध्ये User defined variables . |
12:45 | Operators
BEGIN आणि END statements |
12:49 | असाईनमेंट म्हणून प्रत्येक ओळ प्रिंट करा जेथे अंतिम फील्डचे व्हॅल्यू 5000 पेक्षा अधिक आहे.
आणि विद्यार्थी Electrical department चे आहे. |
13:00 | आउटपुटमध्ये “Average marks” शीर्षक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण प्रिंट करा. |
13:07 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
13:14 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13:23 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:27 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
13:32 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
13:42 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
13:47 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
13:51 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
13:59 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
14:10 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |