Drupal/C4/RESTful-API-Implementation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:44, 21 January 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 RESTful API Implementation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये, आपण RESTful API म्हणजे काय ते समजावून सांगू.
00:11 Views वापरून RESTful API इम्पलेमेंटेशन (अंमलबजावणी) करणे शिकू.
00:16 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04
00:22 Drupal 8 आणि Firefox web browser
00:25 तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
00:29 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्याकडे Drupal चे मूलभूत ज्ञान असावे.
00:34 नसल्यास, संबंधित Drupal ट्युटोरिअल्ससाठी, दर्शविलेल्या लिंकला भेट द्या.
00:40 तुमच्याकडे कार्यरत इंटरनेट कनेक्शन देखील असावे.
00:44 RESTful API म्हणजे काय?
00:47 RESTful API हे REpresentational State Transfer (i.e REST) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
00:55 त्याला RESTful web service म्हणून देखील संदर्भित केले जाते.
01:00 RESTful API हे बाह्य clients ना server वर डेटा आणण्यासाठी, जोडण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी पद्धती प्रदान करते.
01:08 उदाहरणार्थ: सामान server वापरून, आपण मोबाईल अॅप्स किंवा डेस्कटॉप वेबसाइट वापरुन बँक व्यवहार करू शकतो.
01:17 RESTful API एक सामान्य उद्देशाने वापरली जाणारी API आहे.
01:20 तर कोणतेही एप्लिकेशन, जसे कि इतर वेबसाईट, मूळ mobile apps आणि IoT devices तुमच्या server सह डेटाची देवाणघेवाण करू शकतात.
01:31 आपण क्रमाक्रमाने RESTful API implementation process शिकू.
01:37 खालील पायऱ्या Bitnami Drupal Stack वर लागू आहेत.
01:41 परंतु बहुतांश पायऱ्या इतर कोणत्याही Drupal इंस्टॉलेशनवर देखील लागू होतात.
01:47 Step No. 1

प्रथम आपण आपली Drupal8 site उघडू आणि आवश्यक core modules इन्स्टॉल करू.

01:55 असे करण्यासाठी, Extend टॅबवर जा.
01:59 खाली स्क्रोल करा आणि WEB SERVICES विभाग वर जा.
02:03 खालील मॉड्यूल्सवर चेक मार्क ठेवा: HAL, HTTP Basic Authentication, RESTful Web Services आणि Serialization.
02:15 नंतर त्यांना सक्षम करण्यासाठी खाली Install बटणावर क्लिक करा.
02:20 आपल्याला REST UI module स्वतः इन्स्टॉल करण्याची आवश्यकता असेल.
02:25 मी आधीच माझ्या मशीनमध्ये इन्स्टॉल आणि सक्षम केले आहे.
02:29 module कसे इन्स्टॉल करायचे ते जाणून घेण्यास, या सिरीजमधील Creating Dummy Content चे ट्युटोरिअल पहा.
02:37 Step No. 2

पुढे आपण REST client च्या विनंत्या स्वीकारण्यासाठी REST resources कॉन्फिगर करू.

02:45 असे करण्यासाठी, Configuration टॅबवर जा. WEB SERVICES अंतर्गत REST वर क्लिक करा.
02:52 REST resources पृष्ठ आता दिसत आहे.
02:55 Content च्या Edit बटणावर क्लिक करून formats ना प्रतिबंधित करू.
03:01 खाली स्क्रोल करा. Accepted request formats अंतर्गत json वर एक चेक मार्क द्या.
03:08 ते सेव्ह करण्यासाठी खाली Save configuration बटणवर क्लिक करा.
03:13 आता आपली Drupal site ही REST client कडून json format requests स्वीकारेल.
03:19 Step No. 3

पुढे आपल्याला authenticated users साठी उचित परवानग्या सेट करण्याची आवश्यकता आहे.

03:26 सामान्यपणे, तीन प्रकारचे users असतात जे RESTful API वापरू शकतात.
03:32 anonymous user
03:34 authenticated user आणि
03:36 कन्टेन्ट मध्ये बदल करण्यासाठी परवानगीसह authenticated users.
03:41 आता आपण आपली Drupal एक authenticated user साठी सेट करू जे स्वतःच्या कन्टेन्टला बनवू शकते, एडिट करू शकते आणि रद्ध करू शकते.
03:50 असे करण्यासाठी, People टॅबवर जा.
03:53 Permissions टॅबवर क्लिक करा.
03:57 खाली स्क्रोल करा आणि AUTHENTICATED USER साठी, दिलेल्यावर चेकमार्क करा.Basic Page: Create new content
04:04 Basic Page: Delete own content
04:07 Basic Page: Edit own content
04:10 खाली Save permissions बटणावर क्लिक करा.
04:13 मी authenticated users त्यांचे स्वतःचे कन्टेन्ट तयार करण्यास,एडिट करण्यास आणि रद्द करण्यास सक्षम केले आहे.
04:20 तुम्ही तुमच्या गरजेनुसार permissions देऊ शकता.
04:24 Step No. 4

आता आपल्याला content type ची आवश्यकता आहे ज्यावर आपल्याला RESTful API इम्पलिमेन्ट करायचे आहे.

04:32 Structure टॅबवर जा आणि Content types वर क्लिक करा.
04:37 मी RESTful API इम्पलिमेन्ट करण्यासाठी Events content type वापरणार आहे.
04:42 तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कोणतेही content type वापरू शकता.
04:47 Step No. 5

आता आपल्या Events content type साठी View आवश्यक आहे.

04:53 Views बद्दल जाणून घेण्यासाठी, या सिरीजमधील Displaying Contents using Views ट्युटोरिअल वर जा.
05:00 नवीन view, तयार करण्यासाठी, Structure आणि Views वर जा.
05:06 Add view वर क्लिक करा आणि त्यास Events underscore view म्हणून नाव द्या.
05:12 content of type बदलून All ते Events करा.
05:17 REST EXPORT SETTINGS अंतर्गत, Provide a REST export चेक करा.
05:22 REST export path आपण events म्हणून टाईप करू.
05:27 खाली Save and edit बटणवर वर क्लिक करा.
05:30 आता आपण आपले इव्हेंट्सचे डिस्प्ले (प्रदर्शन) सेटअप करू.
05:34 FORMAT विभागात, Show पर्यायमध्ये, Entityवर क्लिक करा.
05:39 दिसत असलेल्या REST export डायलॉग बॉक्समध्ये, Fields पर्याय निवडा.
05:45 Apply बटणवर क्लिक करा.
05:47 Row style options डायलॉग बॉक्समध्ये, सेटिंग्ज त्याप्रमाणे ठेवा.
05:53 नंतर Apply बटणवर क्लिक करा.
05:55 हे आपल्याला आपल्या view मध्ये fields जोडण्यास सक्षम करेल.
06:00 आता आपण आपल्या Events content type च्या सर्व fields जोडू शकतो.
06:04 Add बटणवर क्लिक करा.
06:06 हे उपलब्ध fields ची सूची उघडेल.
06:10 Search बॉक्समध्ये, टाईप करा body.
06:13 सूचीतुन Body निवडा, नंतर Add and configure fields बटणवर क्लिक करा.
06:20 Apply बटणवर क्लिक करा.
06:22 पुन्हा दुसरी फील्ड जोडण्यासाठी Add बटणवर क्लिक करा.
06:27 id साठी शोधा आणि सूचीमधून ID निवडा.
06:32 Add and configure fields बटणवर क्लिक करा.
06:36 नंतर Apply बटणवर क्लिक करा.
06:38 आपण आपल्या events view चा पाथ पाहू शकतो.
06:43 ही view सेव्ह करण्यासाठी आपण Save बटणवर क्लिक करू.
06:47 Step No. 6

पुढे डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी आपण एक नवीन view तयार करू.

06:54 Displays पॅनलमध्ये Add बटणवर क्लिक करा.
06:59 REST export पर्याय निवडा.
07:02 आता ही नवीन view कॉन्फिगर करू.
07:05 FORMAT विभागात, Entity वर क्लिक करा.
07:09 Fields पर्याय निवडा आणि Apply बटणवर क्लिक करा.
07:14 हे सर्व fields चेक करा जे आपल्याला आपल्या content type मध्ये पाहिजे.

आणि Apply बटणवर क्लिक करा.

07:20 येथे आपण पाहू शकता की आपले आवश्यक fields आता समाविष्ट आहेत.
07:25 PATH SETTINGS अंतर्गत, No path is set लिंकवर क्लिक करुन आपण पाथ सेट करू.
07:31 Path फील्डमध्ये, टाईप करा events slash percentage sign.
07:37 Percentage चिन्हाचा वापर व्हॅल्यूज सादर करण्यासाठी केला जातो जो contextual filter साठी वापरला जाईल.
07:44 तळाशी Apply बटणवर क्लिक करा.
07:47 आता उजव्या बाजूस, ADVANCED पर्यायावर क्लिक करा.
07:51 CONTEXTUAL FILTERS अंतर्गत, Add बटणवर क्लिक करा.
07:56 आपल्या node चा संदर्भ घेण्यासाठी आपण contextual filter साठी एक ID जोडू.
08:00 id साठी शोधा आणि सूचीमधून ID निवडा.
08:05 Apply बटणवर क्लिक करा.
08:07 इतर सेटिंग्ज त्याप्रमाणे ठेवा.
08:10 नंतर Apply बटणवर क्लिक करा.
08:13 हे कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी Save वर क्लिक करा.
08:17 यासह, आपण Views' चा वापर करून आपल्या Drupal साईटमध्ये RESTful API यशस्वीरीत्या इम्पलिमेन्ट (अंमलात) केले आहे.
08:24 नंतर सिरीजमध्ये , आपण REST Client वापरून आपले RESTful API कसा तपासावा हे शिकू.
08:31 यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:34 थोडक्यात.
08:36 या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो- RESTful API आणि Views वापरून RESTful API इम्पलेमेंटेशन (अंमलबजावणी).
08:45 असाइन्मेंट म्हणून- Article content type वर RESTful API इम्पलिमेन्ट करा.
08:51 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
08:58 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

09:09 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD आणि NVLI , Ministry of Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:19 या ट्यूटोरियलचे योगदान विशाल जिंदल यांनी केले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana