Arduino/C2/Arduino-components-and-IDE/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Arduino components and IDE वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Arduino आणि कॉम्पुटर दरम्यान फिजिकल जोडणी कशी सेट करावी. |
00:16 | Arduino hardware आणि Arduino प्रोग्रामिंग लँग्वेज. |
00:21 | येथे मी Arduino UNO Board, उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Arduino IDE वापरत आहे. |
00:31 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक, Arduino UNO Board, USB power cable आणि कॉम्पुटरचे ज्ञान असले पाहिजे. |
00:43 | प्रथम, येथे दर्शविल्याप्रमाणे USB केबल वापरून आपल्याला कॉम्पुटरशी Arduino board जोडायचे आहे. |
00:51 | हिरवा power LED चालू होतो. हे सूचित करते की जोडणी (कनेक्शन) कार्यरत आहे. |
00:59 | आता Arduino हार्डवेअरमध्ये उपलब्ध असलेले विविध घटक पाहू. |
01:06 | सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ATMEGA 328 microcontroller chip आहे. |
01:13 | हे Arduino चे हृदय आहे जिथे आपण त्यास भिन्न गोष्टी करण्यासाठी प्रोग्राम करू शकतो. |
01:20 | या microcontroller अंतर्गत ROM, RAM आणि एक Arduino BootLoader देखील समाविष्ट आहे. |
01:29 | Arduino BootLoader काय आहे?
हा पहिला प्रोग्राम आहे जो डिव्हाइसला वीज पुरवठाशी जोडण्यात कार्यान्वित करतो. |
01:40 | हे digital pins आहेत. यापैकी प्रत्येकाला एकतर input किंवा output म्हणून प्रोग्राम केले जाऊ शकते. |
01:49 | Digital म्हणजे ते ON किंवा OFF, उच्च किंवा कमी असू शकतात. |
01:55 | उदाहरणार्थ, LED मंद करणे, audio signals निर्माण करणे इत्यादी. |
02:02 | पिन क्रमांक 0 आणि 1 serial communication साठी इतर डिव्हाइसेससह वापरले जाऊ शकते. |
02:10 | येथे, 0-RX रिसिविंगसाठी आहे,
1-TX ट्रान्समिटिंगसाठी आहे. |
02:20 | हे Analog pins आहेत. जे A0 ते A5 पर्यंत चिन्हांकित केले आहेत. हे केवळ इनपुटसाठी वापरले जातात. |
02:31 | ते analog signals घेतात आणि त्यांना digital signals मध्ये रूपांतरित करतात जे कॉम्प्युटर समजू शकतो. |
02:40 | हे ट्रान्स्मिट आणि रिसिव्ह LED s आहेत जे बोर्डवर एम्बेड केलेले आहेत.
जेव्हा आपण डेटा पाठवतो किंवा प्राप्त करतो तेव्हा हे लुकलुकणारे होईल. |
02:51 | हे troubleshooting साठी खूप उपयोगी आहे. |
02:55 | तुम्ही हे reset बटण दाबल्यावर, प्रोग्राम थांबेल आणि पुन्हा सुरु (रीस्टार्ट)होईल. |
03:03 | board च्या बाहेर काहीही मिटणार नाही. |
03:08 | बाह्य उर्जा स्त्रोत वापरण्यासाठी Arduino board मध्ये हा इनपुट व्होल्टेज आहे. |
03:16 | हे Ground pins आहेत जे बोर्डवरील सर्वात कमी व्होल्टेजमध्ये प्रवेश देतात. |
03:23 | USB interface चा वापर board प्रोग्रामिंगसाठी केला जाऊ शकतो.
आणि बोर्ड व कॉम्पुटर दरम्यान सिरीयल कोम्मुनिकेशन साठी देखील वापरला जाऊ शकतो. |
03:35 | आमच्याकडे बोर्डला चालू करण्यासाठी हा एक्सटर्नल power adapter आहे. |
03:41 | पुढे आपण Arduino प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल पाहू. |
03:46 | Arduino प्रोग्रामला तीन मुख्य भागांमध्ये विभागता येते.
Control Structure statements , Operators, variables आणि constants, |
03:57 | आणि, Functions. |
04:00 | कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत: if, if..else, for, while, do..while, switch case इत्यादी. |
04:11 | हे कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेसारखेच आहे. |
04:16 | नंतर आपल्याकडे अरथमेटिक ऑपरेटर्स, कंपॅरिजन ऑपरेटर्स आणि बुलियन ऑपरेटर्स आहेत. |
04:24 | आपल्याकडे इतर प्रोग्रामिंग भाषेप्रमाणेच variables आणि constants आहे. |
04:31 | हे built-in functions आहेत जसे कि pinMode(), digitalWrite(), digitalRead(), delay(), analogRead(), analogWrite() इत्यादी. |
04:46 | हे मुख्य फंक्शन्स आहेत जे बहुतेक Arduino प्रकल्पांमध्ये वापरले जातात. |
04:52 | Arduino IDE ची प्रोग्रामिंग भाषा कशी वापरायची ते मी आपल्याला दाखवते. |
04:58 | आता Arduino IDE उघडू. |
05:01 | Arduino IDE मध्ये Help मेनूवर क्लिक करा. नंतर Reference वर क्लिक करा. |
05:08 | हे तुमच्या ब्राऊजरमध्ये offline page उघडते. |
05:12 | उदाहरणासाठी, जर तुम्हाला 'digitalWrite()' built-in function वापरायचे असेल, तर फक्त function नावावर क्लिक करा. |
05:22 | येथे तुम्ही digitalWrite() फंक्शनचे वर्णन, सिंटॅक्स (वाक्यरचना) आणि एक साधा प्रोग्राम पाहू शकता. |
05:31 | बरेच built-in functions आहेत आणि आमच्या आवश्यकतानुसार आम्ही या मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतो. |
05:39 | पुढील ट्युटोरियल्समध्ये आपण काही महत्त्वाचे built-in functions बद्दल शिकणार आहोत. |
05:47 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
05:52 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Arduino आणि कॉम्पुटर दरम्यान फिजिकल जोडणी कशी सेट करावी याबद्दल शिकलो. |
06:00 | Arduino hardware आणि Arduino प्रोग्रामिंग लँग्वेज. |
06:05 | असाइन्मेंट म्हणून - Arduino IDE उघडा. |
06:09 | Help मेनूवर क्लिक करा आणि Reference निवडा. |
06:14 | built-in functions जसे कि delay(), pinMode() आणि digitalRead() इत्यादींना पहा. |
06:22 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
06:30 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
06:42 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
06:47 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
06:57 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:07 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |