Arduino/C2/First-Arduino-Program/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | First Arduino Program वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू:
एक Arduino प्रोग्राम कसा लिहावा, प्रोग्राम Compile आणि upload कसा करावा. आणि LED कसे ब्लिंक(लुकलुकणे) करावे. |
00:19 | येथे मी वापरत आहे:
Arduino UNO Board, |
00:23 | उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Arduino IDE. |
00:30 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यास तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे मूलभूत ज्ञान असावे, |
00:36 | C किंवा C++ प्रोग्राम लिहिण्याचे मूलभूत ज्ञान असावे, |
00:41 | आणि Arduino UNO Board सह USB power cable . |
00:46 | आपला पहिला प्रोग्राम लिहिण्यासाठी Arduino IDE उघडू. |
00:52 | येथे, आपण मेन्यूबार मधील विविध मेनू पाहू शकतो. |
00:57 | Arduino वातावरणात, प्रत्येक प्रोग्राम Sketch म्हणून सेव्ह केला जातो. |
01:03 | डीफॉल्टनुसार, ते Sketch underscore आणि नाव म्हणून नाव तयार करते. |
01:11 | तुम्ही File वर क्लिक करून आणि नंतर Save वर क्लिक करून नाव बदलू शकता. |
01:18 | BlinkLed म्हणून फाईलचे नाव टाईप करा.
आता Save बटणवर क्लिक करा. |
01:26 | हे दोन रिक्त फंक्शनसह डीफॉल्ट प्रोग्राम एन्व्हायरन्मेंट आहे - void setup आणि void loop. |
01:35 | आता आपण LED ब्लिंक (लुकलुकणे) करण्यास एक Arduino प्रोग्राम लिहू. |
01:41 | मी माझा IDE आणि Arduino board बाजूला ठेवला आहे. |
01:47 | हे आपल्याला प्रोग्रामचे execution आणि board मधील output पाहण्यासाठी मदत करेल. |
01:54 | या LED प्रोग्रामसाठी, मला पिन क्रमांक 13 ला ब्लिंक करायचे आहे. |
02:00 | या LED अंतर्गत ते digital input/output pin जोडलेले आहे. |
02:07 | मार्करसह हायलाइट लक्षात घ्या. |
02:10 | आता आपल्याला आपला कोड लिहायचा आहे. |
02:13 | void setup फंक्शन म्हणजे microcontroller सेट अप करण्यासाठी आहे. |
02:18 | आमच्या बाबतीत, पिन क्रमांक 13 प्रथम सेट करावा लागेल. |
02:24 | हे करण्यासाठी, आम्ही pinMode नावाच्या इन-बिल्ट फंक्शनचा वापर करू. |
02:31 | यात दोन पॅरामीटर्स आहेत - pin number कॉमा mode. |
02:36 | तर टाईप करा: pinMode कंस उघडा 13 कॉमा output कंस बंद करा semicolon. |
02:48 | आपण मोडला output म्हणून का ठेवावे? |
02:51 | हे असे आहे कारण पिन क्रमांक 13 आंतरिकपणे LED शी जोडलेले आहे. |
02:58 | व्होल्टेज उच्च असेल तेव्हा ते चमकेल परंतु व्होल्टेज शून्य असेल तेव्हा ते चमकणार नाही. |
03:05 | आपल्याला "LED" च्या व्होल्टेजची सेवा देण्यासाठी मोडला ‘output’ म्हणून कॉन्फिगर करावे लागेल. |
03:12 | पुढे आपण void loop फंक्शनसाठी कोड लिहू. |
03:17 | आपण LED ला लुकलुक करण्याआधी, LED ला चमकवू. |
03:22 | digitalWrite नावाचा एक फंक्शन आहे जो digital pin वर लिहिेल. |
03:29 | या फंक्शनमध्ये pin number आणि value किंवा state म्हणून दोन पॅरामीटर्स आहेत. |
03:36 | आधीच आपल्याला पिन क्रमांक 13 असल्याचे माहित आहे. व्हॅल्यू HIGH किंवा LOW असावी. |
03:44 | तर टाईप करा: digitalWrite कंस उघडा १३ कॉमा HIGH कंस बंद करा semicolon. |
03:55 | आम्हाला LED चमकवायचा आहे. तर, व्होल्टेज HIGH असावा. |
04:00 | हे सर्व आहे. कोड अतिशय सोपा आहे. |
04:04 | पुढील स्टेप प्रोग्राम कंपाइल करणे आहे. |
04:08 | प्रोग्राम तपासण्यासाठी मेनू बारवरील 'टिक' चिन्हावर क्लिक करा. |
04:14 | हे आपल्या प्रोग्रामला binary format मध्ये कंपाइल करेल जे microcontroller द्वारे समजण्यासारखे आहे. |
04:22 | तुम्ही IDE च्या तळाशी कंपाइलेशन स्थिती पाहू शकता. |
04:27 | पुढे आपल्याला प्रोग्राम microcontroller वर अपलोड करणे आवश्यक आहे. |
04:32 | अपलोड करण्यासाठी मेनूबार वरील उजव्या एरो बटणवर क्लिक करा.
अन्यथा तुम्ही Sketch मेनू आणि नंतर upload निवडू शकता. |
04:48 | तुम्ही पाहू शकता कि TX RX थोड्या वेळासाठी चमकत आहे. हे दर्शविते कि ट्रान्समिशन ON आहे. |
04:57 | आता तुम्ही पाहू शकत कि LED चमकत आहे. |
05:01 | LED कसे बंद करावे?
आपल्याला हा प्रोग्राम बदलावा लागेल जेणेकरून दुसऱ्या पॅरामीटरची व्हॅल्यू LOW असेल. |
05:11 | आता आपण कंपाइल करून हा प्रोग्रॅम अपलोड करू. |
05:16 | तुम्ही पाहू शकता कि LED बंद आहे. |
05:20 | आम्हाला ON आणि OFF करून LED कसे चालू करायचे हे माहित आहे. |
05:25 | पुढे आपण LED लुकलुकण्यासाठी प्रोग्राम बदलूया. |
05:31 | म्हणजेच एक सेकंद अंतराने ON आणि OFF करूया. |
05:36 | दाखवल्याप्रमाणे आपण प्रोग्राम बदलूया. Delay हा built-in function आहे जे प्रोग्रामला विशिष्ट वेळेसाठी थांबवते. |
05:46 | मी टाईप करेल: delay कंस उघडा 500 कंस बंद करा semicolon.
इथे 500 म्हणजे 500 मिलीसेकंद म्हणजे डिलेचा अर्धा सेकंद. |
06:01 | पुढे, टाईप करा digitalWrite कंस उघडा 13 कॉमा LOW कंस बंद करा semicolon. |
06:12 | यामुळे digital pin 13 OFF मोड मध्ये बनते. |
06:17 | आपल्याला किती वेळे पर्यंत OFF करून ठेवायचे आहे.
टाईप करा: delay कंस उघडा 500 कंस बंद करा semicolon. |
06:28 | पुन्हा, आपल्याला 500 मिलीसेकंदांसाठी OFF करायचे आहे. |
06:34 | आता मी पुन्हा ओळी दर ओळी Void loop प्रोग्राम समजावून सांगते. |
06:40 | Void loop हे एक अनंत लूप आहे आणि ते सतत कार्यान्वित होईल. |
06:45 | LED शी जोडलेले पिन क्रमांक 13 , 500 मिलीसेकंदांसाठी HIGH स्टेट मध्ये असेल.
आणि नंतर, 500 मिलीसेकंदांसाठी LOW स्टेट मध्ये असेल. |
06:57 | हा प्रोग्राम लूपमध्ये वारंवार कार्यरत आहे. |
07:02 | प्रोग्राम अपलोड करूया. |
07:05 | आपण पाहू शकतो कि आपला LED चमकत आहे. |
07:10 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
07:16 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: एक Arduino प्रोग्राम कसा लिहावा, |
07:21 | प्रोग्राम Compile आणि upload कसा करावा आणि LED कसे ब्लिंक(लुकलुकणे) करावे. |
07:27 | पुढील असाइनमेंट करा. वरील Blink LED प्रोग्राममध्ये विलंब वेळेस 1500 वर बदला. |
07:37 | प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा आणि LED चमकत(ब्लिंक) आहे हे पहा. |
07:45 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
07:53 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:06 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या. |
08:13 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
08:24 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:35 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |