Health-and-Nutrition/C2/Nipple-conditions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:55, 15 October 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 स्तनदा मातेच्या 'स्तनाग्रांची स्थिती' (निप्पल) यावरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू - वेदनादायक आणि चिरा पडलेली स्तनाग्रे(निप्पल) आणि
00:11 सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे.(निप्पल)
00:15 पहिली स्तनाग्रांची स्थिती आहे - वेदनादायक आणि चिरा पडलेली स्तनाग्रे(निप्पल).
00:20 हि एक अशी स्थिती आहे जिथे आईच्या स्तनाग्रांवर(निप्पल) चिरा पडतात आणि रक्त निघते.(रक्तस्त्राव होतो)
00:26 यामुळे स्तनाग्रांवर खाज येते आणि ती कोरडी होते.
00:30 आता आपण वेदनादायक आणि चिरा पडलेल्या स्तनाग्रांच्या विविध कारणांवर चर्चा करूया.
00:36 स्तनाग्राशी स्तनपान करणे,
00:38 बुरशी किंवा जिवाणूंचे संसर्ग,
00:41 प्रत्येक स्तनपानानंतर स्तनाग्रांना साफ करण्याची सवयी आणि,
00:45 बाळाची चिटकलेली जीभ.
00:47 आपण स्तनाग्राशी स्तनपान करण्यासह सुरवात करू.
00:50 स्तनाग्राशी स्तनपान करणे, वेदनादायक आणि चिरा पडलेल्या स्तनाग्रांसाठी हे पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण आहे.
00:56 स्तनाग्राशी स्तनपानादरम्यान - बाळाच्या तोंडातल्या कडक टाळूवर स्तनाग्र घासतो.
01:03 बाळ कडक टाळू आणि जिभेच्या मध्ये या स्तनाग्राला दाबून ठेवतो.
01:08 आणि त्यामुळे स्तनपान खूप वेदनादायी बनते आणि स्तनाग्रावर चिरा पड्तात.
01:17 स्तनाग्राशी स्तनपान हे बाळाची व्यवस्थित पकड नसल्याचे परिणाम आहे.
01:20 म्हणूनच स्तनाग्राशी स्तनपान केल्यामुळे जे वेदनादायी आणि चिरा पडलेली स्तनाग्रे होतात ते टाळण्यासाठी योग्य पकड खूप महत्वाची आहे.
01:29 लक्षात घ्या, आम्ही याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये 'स्तनावर बाळाने घट्ट पकड करण्यासाठी योग्य पद्धतींची' चर्चा केली आहे.
01:37 लक्षात ठेवा, वेदनादायी किंवा चिरा पडलेल्या स्तनाग्रांमुळे योग्य पकड केली असली तरी दुखापत होईल.
01:43 आईच्या स्तनावर बाळाची पकड योग्यरीत्या सतत तशीच असेल तर हळू हळू दुखणे थांबेल.
01:51 पुढे आहे बुरशी किंवा जीवाणूंचे संसर्ग.
01:56 जर आईला बुरशी किंवा जीवाणूंचे संसर्ग झाले तर तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
02:03 पुढे, काही मातांना प्रत्येक स्तनपानापूर्वी स्तनाग्रे साफ करण्याची सवय असते.
02:09 या कारणामुळे स्तनाग्रे कोरडी होतात.
02:13 त्यामुळे, ही सवय टाळली पाहिजे.
02:16 लक्षात ठेवा, आई अंघोळीच्या वेळेच एकदा स्तनाग्रे साफ करू शकते.
02:21 स्तनाग्रांवर चिरा पडल्याकि, प्रत्येक स्तनपानानंतर आईने तिचे स्तनाग्रे साफ केले पाहिजे.
02:28 साफ केल्यानंतर, आईने जखमेवर तिचे मागील घट्ट दूध लावावे.
02:32 मागील घट्ट दुधात असे काही पदार्थ असतात कि ते जखम बरे करण्यास आणि संसर्गास लढण्यासाठी सहाय्य करतात.
02:39 अशा प्रकारे, बाळाच्या तोंडातले जिवाणू स्तनाग्रांच्या चिरांमध्ये पसरण्यापासून रोखतात.
02:46 नंतर आहे बाळाची चिटकलेली (चिपकलेली) जिभेची समस्या.
02:50 चिटकलेली जीभ (टंग टाय) हि एक अशी स्थिती - जिथे बाळाच्या जिभेचा टोक तोंडाच्या आतल्या खालच्या बाजूशी जुडलेला असतो.
02:58 अशी स्थिती खूप कमी बघायला मिळते.
03:01 ज्या बाळाची जीभ चिटकलेली असते सामान्यपणे ते बाळ स्तनाग्रातून स्तनपान करतांना पाहायला मिळतात.
03:06 बाळाची जीभ चिटकलेली असेल तर- फक्त योग्य पकड पुरेशी नसून शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.
03:16 त्यामुळे अशा बाबतीत, आईने नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
03:22 आता वेदनादायक किंवा चिरा पडलेल्या स्तनाग्रांच्या उपचारांबद्दल चर्चा करू.
03:27 जर आईच्या स्तनाग्रांवर वेदनादायी किंवा चिरा पडल्या असतील तर, आरोग्य कार्यकर्त्याने आईची छाती आणि स्तनाग्रे तपासली पाहिजे.
03:37 आईला स्तनपानापूर्वी तिच्या हाताने स्तनातून थोडे दूध काढायला सांगावे.
03:42 त्याने स्तन नरम होतील आणि बाळ सहजपणे पकड करेल.
03:47 या व्यतिरिक्त हाताने दूध काढल्याने संसर्ग, स्तनाग्रांवर चिरा आणि स्तनदाह होण्याचा धोका कमी होतो.
03:55 नंतर, आईने तिच्या बाळाला स्तनाशी योग्यरीतीने पकड करण्यास (स्तनपान) मार्गदर्शन करा.
04:01 लक्षात ठेवा, वारंवार स्तनपान करण्याची प्रक्रिया हे स्तनातील दुधाचा पुरवठा ठरवते.
04:09 म्हणून, आईने स्तनपान करणे बंद केले नाही पाहिजे.
04:13 स्तनपानादरम्यान- आईने कमी वेदनादायी स्तनाच्या बाजूने स्तनपान करायला सुरवात केले पाहिजे.
04:20 जर अजूनही स्तनपान करणे वेदनादायक असेल तर- आई तिच्या हाताने स्तनातील दूध काढू शकते आणि ते बाळाला चमचा किंवा कपने पाजू शकता.
04:32 तसेच, आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्तनपानानंतर मागील घट्ट दुधाचे काही थेंब बाधित जागेवर लावा.
04:42 लक्षात ठेवा, खालील गोष्टी वेदनादायक आणि चिरा पडलेल्या व स्वस्थ स्तनाग्रांवर देखील करू नका-
04:49 साबण, तेल, लोशन, बाम आणि सुगंधी द्रव्य(परफ्यूम्स)
04:54 त्यात जळण होण्यासारखे (त्रासदायक)पदार्थ असू शकतात.
04:57 जर आईला वेदनादायक किंवा चिरा पडलेली स्तनाग्रे असतील तर तिची स्थिती आणखी बिघडेल.
05:03 गंभीर परिस्थिती मध्ये, आईने डॉक्टर किंवा आरोग्य कार्यकर्त्याची सल्ला घ्यावी.
05:09 वेदनादायक किंवा चिरा पडलेली स्तनाग्रे रोखण्यासाठी, प्रसूतीनंतर लगेच स्तनपानास सुरवात करा.
05:15 नेहमी स्तनपान करतांना, बाळाने व्यवस्थित पकड केली असल्याची खात्री करा.
05:22 आपण पुढे सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे यावर चर्चा करणार आहोत.
05:28 सपाट स्तनाग्रे एरिओलाच्या स्तरापासून बाहेर आलेले नसतात.
05:33 तर आतमध्ये वळलेले स्तनाग्रे सहसा आतल्या बाजूला वळलेले असतात.
05:38 आईसाठी खरं काय ते समजून घेणे फार महत्वाचे आहे- स्तनपानाकरिता सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे हे अडथळा नाही.
05:48 जसे कि, स्तनावर योग्य पकड दरम्यान बाळ एरिओलाशी पकड करतो न कि स्तनाग्रेशी.(निप्पल)
05:56 लक्ष द्या, सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रेच्या बाबतीत- प्रसूतीच्या पहिल्या आठवड्यात आईला मदतीची गरज आहे.
06:03 या दरम्यान - आरोग्य कार्यकर्त्याने आईला योग्य पकड करण्याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे.
06:08 यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल.
06:11 लक्षात ठेवा, जर आईचे सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे असेल तर व्यवस्थित आणि चांगल्या पकडसाठी सर्वात महत्वाचे पकड म्हणजे - क्रॉस क्रेडल होल्ड
06:22 फुटबॉल पकड (होल्ड) आणि अर्ध-टेकलेली (टेकून बसलेली)स्थिती.
06:26 पूर्वीच्या ट्यूटोरियल मध्ये सांगितल्या प्रमाणे, कोणत्याही पकड मध्ये, हे अत्यंत महत्वाचे आहे की - आईने स्तन योग्य पद्धतीने पकडले पाहिजे.
06:37 जिथे बाळाचे ओठ आणि आईची बोटे एकाच दिशेने असतील.
06:42 लक्षात ठेवा, अयोग्य पकडमुळे वेदनादायी स्तनाग्रांची समस्या होईल.
06:47 लक्षात ठेवा - दुधाची बाटली किंवा स्तनाग्रे कवच (निप्पल शिल्ड) वापरू नये.
06:52 यामुळे बाळाला सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे असलेल्या स्तनातून स्तनपान करणे खूप अवघड जाईल.
07:00 आईने बाळाशी जास्तीत जास्त त्वचेशी स्पर्श केला पाहिजे.
07:04 यामुळे मातांमध्ये ऑक्सिटोसिन रेफ्लेक्स (प्रतिक्रिया) तयार होतो आणि स्तनातील दूध सहजपणे बाहेर येते.
07:12 नेहमी लक्षात घ्या कि, या सर्व स्तनाग्रांची स्थितींना टाळण्यासाठी स्तनपान करण्याची योग्य पकड हीच महत्वाची गोष्ट आहे.
07:19 आपण स्तनदा मातेच्या 'स्तनाग्रांची स्थिती' यावरील ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:26 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो-वेदनादायक आणि चिरा पडलेली स्तनाग्रे(निप्पल) आणि
07:31 सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे.(निप्पल)
07:34 या ट्युटोरिअलचे योगदान स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट आयआयटी बॉम्बे द्वारे करण्यात आले आहे.
07:40 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
07:47 ह्या मिशन वरील अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे.
07:52 या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन यांच्याकडून देखील उदार अनुदान मिळालेले आहे.
07:59 हे ट्युटोरिअल 'माँ और शिशु पोषण' या प्रोजेक्टचा भाग आहे.
08:04 ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक आणि डॉक्टर तरू जिंदल, एमएस प्रसूतितज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ.

आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Ranjana