Filezilla/C2/File-Handling-and-Bookmarks/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:51, 18 September 2018 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 FileZilla मधील File Handling आणि Bookmarks वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरिअलमध्ये आपण रिमोट मशीनमध्ये फाईल्स पाहणे, एडिट करणे, रिनेम करणे व डिलीट करणे आणि Bookmarks जोडणे (ऍड) व मॅनेज करणे याबद्दल शिकूया.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी Ubuntu Linux OS व्हर्जन – 14.04, FileZilla व्हर्जन – 3.10.2 आणि चालू स्तिथितील इंटरनेट कनेक्शन वापरत आहे .
00:39 या ट्युटोरियलचे सराव करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही एका ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:46 Linux OS बद्दल शिकण्यासाठी, कृपया या वेबसाईट वरील Linux spoken tutorials पहा.
00:54 आता सुरवात करूया. मी आधीच FileZilla इंटरफेस वर आहे.
01:00 मी तुम्हाला दाखवते कि कश्या प्रकारे कितीही तपशील न टाकता, रिमोट मशीनशी जोडणी कशी करायची.
01:07 Quickconnect bar मध्ये Quickconnect बटण वर जा.
01:12 आता, त्याच्या पुढील ड्रॉप-डाउन एरो निवडा.
01:17 हे रिमोट मशीनची एक सूची प्रदर्शित करेल, ज्यात आपण आधी कनेक्ट होतो.
01:23 आपण फक्त एका मशीनशी कनेक्ट आहोत आणि ते येथे प्रदर्शित केले आहे. ते निवडा.
01:31 विचारल्यास रिमोट मशीनचे पासवर्ड द्या आणि OK दाबा.
01:37 जसे कि मी यापूर्वी हे सेव्ह केले होते म्हणून, ते मला येथे विचारणार नाही. आता आपण रिमोट मशीनशी कनेक्ट झालो आहोत.
01:47 रिमोट मशीन मध्ये SpokenTutorial फोल्डर ब्राउज करा, जे आम्ही पूर्वी तयार केले होते.
01:54 आता, माझ्या लोकल मशीन मधून, मी एक document अपलोड करेल. हे आधीच येथे स्पष्ट केले आहे.
02:03 येथे लक्ष्य द्या - डॉक्युमेंट sample.odt रिमोट मशीनवर अपलोड केले गेले आहे.
02:11 मला या डॉक्युमेंटचे नाव रिनेम करायचे आहे. असे करण्यासाठी, फाईल वर राइट-क्लीक करून Rename पर्याय निवडते.
02:20 फाईलनेम आता एडिट होऊ शकते.
02:24 मी script.odt म्हणून रिनेम करेल आणि Enter कि दाबेल.
02:32 आता sample.odt ही फाइल script.odt म्हणून रिनेम करण्यात आली आहे.
02:41 त्याचप्रमाणे, आपण कोणत्याही फाईल किंवा फोल्डरचे, लोकल आणि रिमोट दोन्ही मशीनमध्ये नाव बदलू शकतो.
02:48 रिमोट लोकेशनवरून फाइल्स पाहणे किंवा एडिट (संपादित) करणे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे!
02:56 हे कसे करायचे ते पाहू. Script.odt फाईलवर राइट-क्लिक करा.
03:03 view/edit निवडा.
03:06 script.odt नावाची फाईल डाउनलोड होण्यास सुरु होते. हे लोकल मशीनच्या टेम्पररी फोल्डरमध्ये सेव्ह होते.
03:16 यानंतर हे आपल्या डिफॉल्ट ऍप्लिकेशन मध्ये उघडते. जसे की मी Writer डॉक्युमेंट डाउनलोड केले होते, त्यामुळे ते LibreOffice Writer मध्ये उघडेल.
03:29 उघडलेल्या डॉक्युमेंट मध्ये, मी पहिल्या दोन ओळी डिलीट करते आणि Save वर क्लीक करते.
03:37 आता Writer डॉक्युमेंट बंद करू.
03:40 लगेच पॉपअप डायलॉग बॉक्स उघडेल.
03:45 हे दाखवते कि, फाइल माहितीसह, “A file previously opened has been changed” (आधी उघडलेली फाइल बदलली आहे). हे देखील दाखवते कि “Upload this file back to server?” (ही फाइल सर्व्हरवर परत अपलोड करा?)
03:59 आणि एक चेक बॉक्स आहे, “Finish editing and delete local file” (एडिटिंग समाप्त करा आणि लोकल फाईल डिलीट करा). मी चेक बॉक्स निवडेल आणि Yes वर क्लिक करेन.
04:10 आता लोकल रूपशी एडिट केलेली फाईल रिमोट मशीनवर पुन्हा अपलोड केली आहे.
04:16 त्यामुळे रिमोट मशीनमध्ये फायली पहाणे आणि एडिट (संपादित) करणे बरेच सोपे आहे.

नोट: फाइलला व्यू / एडिट करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर आपल्या लोकल मशीनमध्ये स्थापित असले पाहिजे.

04:31 माझ्यासाठी हे LibreOffice Writer होते.
04:36 file permissions सेट करण्यासाठी, फाईल वर राईट-क्लीक करा आणि File Permissions निवडा.
04:44 Change file attributes डायलॉग बॉक्स उघडेल.
04:50 आपल्या गरजेनुसार permissions बदला. permissions बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Linux series मध्ये File attributes ट्युटोरिअल पहा.
05:02 मी permissions जसे आहेत तसेच ठेवेल आणि OK वर क्लिक करेल.
05:08 रिमोट मशीन मधून कोणतीही फाईल डिलीट करण्यासाठी, फाईल वर राईट-क्लीक करा आणि Delete निवडा.
05:15 Confirmation needed नावाचा एक डायलॉग बॉक्स उघडेल.
05:21 Yes वर क्लीक करा.
05:23 आता फाईल script.odt रिमोट मशीन मधून डिलीट केली आहे. कृपया लक्षात ठेवा: हे डिलिशन कायम आहे.
05:35 आपल्याला फाइल ट्रान्सफर कारण्यासाठी नेहमी विशिष्ट लोकेशन ब्राउज करण्याची गरज आहे? नाही, आम्ही लोकेशनना bookmark करू शकतो आणि नंतर सहजपणे त्यावर ऍक्सेस करू शकतो.
05:48 bookmarks जोडण्याआधी, आपल्याला सध्याचे कनेक्शन Site Manager मध्ये कॉपी करावे लागेल.
05:55 असे करण्यासाठी, File menu वर क्लीक करा. “Copy current connection to Site manager” निवडा.
06:04 Site Manager विंडो उघडेल.
06:07 डाव्या बाजूवर, New site ला “my site” म्हणून रिनेम करा.
06:13 OK वर क्लीक करा.
06:16 आता Main menu bar मध्ये, Bookmarks निवडा.
06:21 हे २ पर्यय सूचिबद्ध करते – Add bookmark आणि Manage bookmarks.
06:29 आता मी Add bookmark निवडेन.
06:32 New bookmark डायलॉग बॉक्स उघडेल.
06:36 याचे दोन प्रकार आहेत-

Global bookmark – हे bookmark सर्व कनेक्ट केलेल्या मशीनसाठी कार्य करेल. Site-specific bookmark – हे विशिष्ट रिमोट मशीनसाठी आहे.

06:50 मी “Site-specific bookmark” निवडेल.
06:54 Name फील्ड मध्ये, मी Spoken टाईप करेल.
07:00 पुढील सेगमेंट Paths आहे. हे लोकल मशीन आणि रिमोट मशीनचे वर्तमान पाथ दर्शवते.
07:09 जर तुम्हाला ते बदलायचे असेल, तर Browse वर क्लीक करा. मला फक्त वर्तमान लोकेशन्सना bookmark करायचे आहेत, तर मी ते स्किप करेल.
07:19 OK वर क्लीक करा.
07:21 आता ही लोकेशन बुकमार्क आहेत.
07:25 bookmarks ऍक्सेस करण्यासाठी, Menubar वर जा आणि Bookmarks निवडा.
07:32 येथे तुम्ही bookmark - spoken चे नाव पाहू शकता - जे आम्ही तयार केले आहे. त्यावर क्लिक करा.
07:40 आता आपण स्वतः bookmarked लोकेशन वर रिडायरेक्ट झालो आहोत.

आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

07:49 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण रिमोट मशीनमध्ये फाईल्स पाहणे, एडिट करणे, रिनेम करणे व डिलीट करणे आणिBookmarks जोडणे (ऍड) व मॅनेज करणे याबद्दल शिकलो.
08:06 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
08:14 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
08:26 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का??

कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा. तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.

08:34 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:48 या ट्युटोरिअलचे भाषांतर आणि आवाज मी रंजना उके ने दिला असून आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana