Synfig/C2/Draw-a-Toy-train/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:00, 17 September 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Synfig वापरून “Draw a Toy train” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत
00:09 मूलभूत आकृत्या काढणे, आकृत्यांना रंगवणे, ग्रुप (समूह) आणि डुप्लिकेट ऑब्जेक्ट्स आणि
00:14 Guideline वापरून आकृत्या अलाइन करणे.
00:17 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी
00:20 उबंटू लिनक्स 14.04 OS
00:24 Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:27 Synfig उघडू.
00:29 प्रथम, आपण टॉय ट्रेनचा compartment (डब्बा) काढू.
00:33 यासाठी, Rectangle tool निवडा.
00:36 Tool options मध्ये Create a region layer निवडले असल्याचे तपासा.
00:42 आता, कॅनव्हस वर आयत काढा.
00:46 लेअरचे नाव Part-1 मध्ये बदला.
00:50 Parameters panel वर जा आणि कलर हिरव्यामध्ये बदला.
00:56 आता Transform tool वर क्लिक करा.
00:58 नंतर आकृती डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा.
01:02 कॅनव्हस वर कोणतीही आकृती काढल्यानंतर ही स्टेप लक्षात ठेवा.
01:07 आपली फाईल सेव्ह करा.
01:09 File वर जा. Save as वर क्लिक करा.
01:13 फाईलनेम Toy-Train-animation मध्ये बदला.
01:18 हे तुमच्या Desktop वर सेव्ह करा.
01:21 आता, पुन्हा एकदा Rectangle tool निवडा.
01:26 पूर्वीच्या आयताप्रमाणे मध्यभागी एक आयत काढा.
01:32 ही ट्रेनची विंडो असेल.
01:35 या लेअरला Window म्हणून रिनेम करा.
01:41 Polygon tool वर क्लिक करू.
01:43 Tool options मध्ये Create a region layer निवडले असल्याचे तपासा.
01:50 दाखवल्याप्रमाणे आयतच्या वरती ट्रिपिझियम काढा.
01:54 ट्रिपिझियम बंद करण्यासाठी सुरुवातीच्या बिंदूवर क्लिक करा.
01:59 या लेअरला Part-2 म्हणून रिनेम करा.
02:03 मी कलर लाल मध्ये बदलेल.
02:07 आता Transform tool निवडा.
02:10 Layers panel वर जा.
02:12 सर्व लेअर्स निवडा आणि त्यांना एकत्र करा.
02:15 Group लेअरला Compartment-3 म्हणून रिनेम करा.
02:20 handle च्या नारिंगी बिंदूचा वापर करुन लेअरचा आकार बदला.
02:24 handleच्या हिरव्या बिंदूचा वापर करून कॅनव्हसच्या डाव्या बाजूला हलवा.
02:30 Ctrl आणि S कीज दाबून फाईल सेव्ह करा .
02:35 पुढे ट्रेनचा चाक काढू.
02:38 कोणतीही आकृती काढल्यानंतर आकृती डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करणे लक्षात ठेवा.
02:44 Circle tool निवडा.
02:46 टूल पर्यायांमध्ये, Create a region layer निवडले पाहिजे.
02:50 दर्शविल्याप्रमाणे वर्तुळ काढा आणि कलर गडद निळ्या रंगात बदला.
02:56 आता Star tool निवडा.
02:59 टूल पर्यायांमध्ये, Create a region layer निवडले पाहिजे.
03:05 कर्सर वर्तुळाच्या मध्यभागी ठेवा आणि एक स्टार (तारा) काढा.
03:09 आता Transform tool निवडा.
03:12 लक्ष द्या तिथे एक हँडल आणि 2 बिंदू आहेत.
03:16 आकृतीची स्थिती बदलण्यासाठी हँडलच्या हिरव्या बिंदूवर क्लिक करून ड्रॅग करा.
03:22 रोटेशनसाठी हँडलमधील निळा बिंदू वापरा.
03:26 मध्य भागी असलेला हिरवा बिंदू स्टार(तारा) आकृतीच्या बाहेरील काठचे आकार कमी जास्त करण्याची परवानगी देते.
03:31 अंतिम बिंदूचा आकार बदलण्यासाठी वापरला जातो.
03:34 स्टार आणि सर्कल लेअर्स दोन्ही निवडा.
03:37 त्यांना ग्रुप(एकत्र) करा आणि नंतर Wheel-1 म्हणून रिनेम करा.
03:41 या ग्रुप लेअरचा आकार बदलून त्यास कंपार्टमेंटच्या खाली ठेवा.
03:47 आता Wheel-1 group layer हुबेहूब(डुप्लिकेट) तसेच करा.
03:50 Wheel-2 म्हणून रिनेम करा आणि कंपार्टमेंटच्या दुसऱ्या टोकाकडे हलवा.
03:56 आता सर्व ग्रुप लेअर्स निवडा.
03:59 पुन्हा त्यांना ग्रुप करून Compartment-3 म्हणून रिनेम करा.
04:04 आता Duplicate आयकॉन वर दोनदा क्लिक करा.
04:08 डुप्लिकेट केलेले ग्रुप लेअर्स अनुक्रमे Compartment-2 आणि Compartment-1 म्हणून रिनेम करा.
04:17 Compartment-2 ग्रुप लेअर निवडा.
04:20 शिफ्ट 'कि' वापरून हँडलच्या मधल्या हिरव्या बिंदूला ड्रॅग करा.
04:24 तसेच Compartment-1 ग्रुप लेअर साठी करा.
04:30 Ctrl आणि S कीज दाबून फाईल सेव्ह करा.
04:34 पुढे इंजिन काढा.
04:36 कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा.
04:39 Circle tool निवडा आणि दाखवल्याप्रमाणे वर्तुळ काढा.
04:43 लेअरला Engine-part-1 म्हणून रिनेम करा.
04:47 कलर पिंक मध्ये बदला
04:50 नंतर Rectangle tool वर क्लिक करा आणि वर्तुळाच्या अर्ध्या भागात शीर्षस्थानी एक आयत काढा.
04:59 लेअरला Engine-part-2 म्हणून रिनेम करा आणि कलर पिवळ्यामध्ये बदला.
05:06 वर्तमान आयत शीर्षस्थानी आणखी एक आयत काढा.
05:10 लेअरला Engine-part-3 म्हणून रिनेम करा आणि कलर हिरव्यामध्ये बदला.
05:17 समान रेक्टैंगगल टूल वापरून, दर्शविल्याप्रमाणे खिडकी काढा.
05:22 लेअरला Engine-window म्हणून रिनेम करा.
05:26 इंजिनच्या लेअर्स निवडून त्यांना ग्रुप(गटबद्ध) करा.
05:29 नंतर Engine म्हणून रिनेम करा.
05:32 Ctrl आणि S कीज दाबून फाईल सेव्ह करा.
05:37 कंपार्टमेंटच्या कोणत्याही एका ड्रॉप डाउन लिस्टवर क्लिक करा.
05:40 Wheel-1 आणि Wheel-2 ग्रुप लेअर्स दोन्ही निवडून कॉपी करा.
05:45 Engine group layer मध्ये पेस्ट करा.
05:49 Shift key वापरुन हे सर्व व्हील इंजिनच्या खाली ड्रॅग करा.
05:54 आता, शीर्ष रुलरकडून guideline ड्रॅग करून त्यास कंपार्टमेंटच्या तळाशी ठेवा.
06:03 हे guideline आपल्याला एका सरळ रेषेत कंपार्टमेंट आणि इंजिन संरेखित करण्यास मदत करेल.
06:10 पुढे, Compartment-1 च्या पुढील Engine ला पुढे सरकवा.
06:16 मग सर्व कंपार्टमेंट्सना जोडण्यासाठी एक आयत काढा.
06:20 लेअरला Belt म्हणून रिनेम करा आणि कलर काळ्यामध्ये बदला.
06:27 Belt लेअरला 'लेअर्स' सूचीच्या तळाशी हलवा.
06:31 शेवटी, ट्रैन काढा.
06:33 Rectangle tool वर क्लिक करा.
06:36 येथे दाखवल्याप्रमाणे व्हीलच्या खाली एक आयत काढा.
06:40 लेअरचे नाव Rail म्हणून बदला आणि कलर काळ्यामध्ये बदला.
06:47 आता ट्रैनचे चित्रण पूर्ण झाले आहे.
06:50 शेवटी, आपली फाइल पुन्हा एकदा सेव्ह करण्यासाठी Ctrl + S दाबा.
06:56 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:00 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो
07:04 मूलभूत आकृत्या काढणे
07:06 आकृत्यांना रंगवणे
07:08 ग्रुप (समूह) आणि डुप्लिकेट ऑब्जेक्ट्स आणि
07:10 Guideline वापरून आकृत्या अलाइन करणे
07:13 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे-
07:14 या ट्युटोरियलमध्ये सांगितल्यानुसार Synfig मध्ये एक बस काढा.
07:20 तुमची पूर्ण झालेली असाइन्मेंट अशी दिसली पाहिजे.
07:24 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:28 कृपया डाउनलोड करून पहा.
07:30 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

07:36 अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
07:39 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
07:43 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:48 या विषयी अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
07:53 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Arthi, Ranjana