Linux-Old/C2/Desktop-Customization-14.04/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:22, 6 September 2018 by Nancyvarkey (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार. उबंटू लिनक्स OS मधील ‘Desktop Customization’ वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत
'Launcher ' बद्दल 'Launcher ' मध्ये अँप्लिकेशन्सना कसे काढणे आणि जोडणे विविध 'डेस्कटॉप' वापरणे 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी' 'साऊंड सेटिंग्ज' 'टाइम आणि डेट सेटिंग्ज आणि अन्य युजर अकाउंट्स वर कसे स्विच करणे. |
00:27 | ह्या ट्युटोरिअल साठी मी वापरणार आहे 'उबंटू लिनक्स OS' varjan 14.04. |
00:34 | आता लाँन्चर सह सुरवात करूया. |
00:36 | लाँन्चर, 'उबंटू लिनक्स डेस्कटॉप' मध्ये डावीकडील वाला डिफॉल्ट पॅनल आहे, जो काही डिफॉल्ट अँप्लिकेशन्स ठेवतो. |
00:44 | 'लाँन्चर' वारंवार वापरलेल्या अँप्लिकेशन्सना सोप्या पदतीने ऍक्सेस करतो. |
00:49 | त्यामुळे, आपण 'लाँन्चर' वर त्याच्या 'डेस्कटॉप शॉर्टकट' वर क्लीक करून एक प्रोग्रॅम लाँच करू शकतो. |
00:56 | डिफॉल्ट रूपात, लाँन्चर कडे काही अँप्लिकेशन्स आहेत. |
01:00 | आपण आपल्या आवश्यकतेवर आधारित 'लाँन्चर' ला 'कस्टमाइज' करणे शिकू. |
01:06 | माझ्या नियमित कामासाठी, मला काही अँप्लिकेशन्सची गरज आहे जसे 'टर्मिनल, लिबर ऑफीस राइटर, जीएडीट आणि अन्य. |
01:15 | आता 'लाँन्चर' वर हे अँप्लिकेशन्स जोडूया. |
01:19 | असे करण्यापूर्वी, मी काही अँप्लिकेशन्सना काढून टाकेल जे मला नको हवेत. |
01:25 | म्हणा, मी VLC अँप्लिकेशनला काढू इच्छित आहे. |
01:30 | त्यामुळे, 'VLC' अँप्लिकेशन आईकन वर राइट क्लिक करा आणि 'Unlock from launcher' निवडा. |
01:37 | तुम्ही पाहू शकता कि 'VLC' अँप्लिकेशन आईकन लाँन्चर मधून काढले आहे. |
01:43 | त्याच प्रकारे, आपण सर्व शॉर्टकट्स काढून टाकू शकतो जे आपण वारंवार वापरत नाहीत. |
01:49 | जसे कि तुम्ही येथे पाहू शकता, मी माझ्या 'डेस्कटॉप' वरून 'लाँन्चर' मधून काही अँप्लिकेशन्स काढले आहेत. |
01:55 | आता, मी 'लाँन्चर' वर 'टर्मिनल' शॉर्टकट जोडेल. |
02:00 | 'Dash Home' वर क्लीक करा. |
02:02 | 'search bar' मध्ये टाईप करा 'terminal'. |
02:05 | हे उघडण्यास 'टर्मिनल' आईकन वर क्लीक करा. |
02:09 | तुम्ही 'लाँन्चर' वर 'टर्मिनल' आइकन पाहू शकता. |
02:13 | 'लाँन्चर' वर 'टर्मिनल' आइकन फिक्स करण्यास, प्रथम त्यावर राईट क्लीक करा. |
02:18 | नंतर 'Lock to launcher' वर क्लीक करा. |
02:21 | 'लाँन्चर' वर अँप्लिकेशन शॉर्टकट्स फिक्स करण्याचा दुसरा मार्ग ड्रग्जगिंग आणि द्रोपंपींग करणे आहे. मी आता हे दाखवते. |
02:30 | 'डॅश होम' उघडा आणि 'सर्च बार' मध्ये टाईप करा 'libreOffice'. |
02:37 | 'LibreOffice' आइकन ला लाँन्चर वर ड्रॅग करा. |
02:42 | जेव्हा आपण असे करतो तेव्हा 'Drop to Add application' सह हेल्प टेक्स्ट दिसू शकते. हेल्प टेक्स्ट दिसत नसल्यास काळजी करू नका. |
02:51 | आता, 'लाँन्चर' वर 'लिबरऑफिस' आइकन ड्रॉप करा. |
02:55 | तुम्ही पाहू शकता की शॉर्टकट आता लाँन्चर मध्ये जोडलेला आहे. |
03:00 | अशा प्रकारे आपण 'लाँन्चर' वर शॉर्टकट्स जोडू शकतो. |
03:04 | 'उबंटु लिनक्स OS' मध्ये पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'multiple desktop' किंवा 'Workspace Switcher'. |
03:12 | कधीकधी आपण विविध अँप्लिकेशन्स वर काम करू शकतो. |
03:17 | आणि आपल्याला एक अँप्लिकेशन मधून दुसऱ्या मध्ये जाण्यास कठीण वाटू शकते. |
03:22 | हे अधिक उपयुक्त करण्यास, आपण 'Workspace Switcher' वापरू शकतो. |
03:27 | आता 'लाँन्चर' वर परत येऊ. |
03:30 | 'लाँन्चर' वर, 'Workspace Switcher' आइकन शोधा. त्यावर क्लीक करा. |
03:36 | हे 4 डेस्कटॉप सह 4 क्वाड्रैंट्स दाखवते |
03:40 | डिफॉल्ट रूपात, वरील डावा डेस्कटॉप निवडले आहे. |
03:44 | हा तो डेस्कटॉप आहे ज्यात सध्या आपण काम करीत आहोत. |
03:48 | आता, दुसऱ्या डेस्कटॉपवर क्लीक करून ह्याला निवडू. |
03:53 | येथे मी 'लाँन्चर' मध्ये 'टर्मिनल' आइकन वर क्लीक करून ह्याला उघडेल. |
03:59 | आता, पुन्हा 'Workspace Switcher' वर क्लीक करा |
04:02 | तुम्ही दुसऱ्या 'Workspace Switcher' वर 'टर्मिनल' आणि पहिल्या वर आमचा डेस्कटॉप पाहू शकता. |
04:09 | या प्रमाणे, तुम्ही 'विविध डेस्कटॉप' वर कार्य करू शकता. |
04:12 | आता पहिल्या 'डेस्कटॉप' वर परत येऊ. |
04:15 | 'Trash', लाँन्चर वर एक अन्य महत्वपूर्ण आइकन आहे. |
04:19 | 'Trash' सर्व डिलीट केलेल्या फाइल्स आणि फोल्डर्सला ठेवतो. |
04:23 | जर आपण चुकून 'फाइल' डिलीट केली, तर आपण त्यास ट्रॅश मधून पुन्हा प्राप्त करू शकतो. |
04:28 | हे दाखवण्यास, मी 'DIW' फाइल डिलीट करेल, जी माझ्या डेस्कटॉप वर आहे. |
04:33 | फाइल वर राइट क्लीक करा आणि 'Move to trash' पर्याय वर क्लीक करा. |
04:38 | हे पुन्हा प्राप्त करण्यास, लाँन्चर मधील ट्रॅश आइकन वर फक्त क्लीक करा. |
04:43 | 'ट्रॅश' फोल्डर उघडेल. |
04:46 | फाइल निवडा, त्यावर राईट क्लीक करा आणि 'Restore' वर क्लीक करा. |
04:50 | ट्रॅश विंडो बंद करा आणि 'डेस्कटॉप' वर परत या. |
04:54 | आपण पाहू शकतो कि जी फाइल आपण आधी डिलीट केली होती ती आता पुनर्संचयित झाली. |
04:59 | आपल्या सिस्टम वरून कायमची फाईल डिलीट करण्यास, प्रथम ती निवडा आणि नंतर 'Shift + Delete' दाबा. |
05:07 | एक डायलॉग बॉक्स जो विचारत आहे “Are you sure you want to permanently delete 'DIW'” दिसेल 'Delete' वर क्लीक करा. |
05:15 | पुन्हा एकदा 'ट्रॅश' आइकन वर क्लीक करा |
05:18 | आपल्याला 'ट्रॅश' फोल्डर मध्ये फाइल भेटू शकत नाही, कारण कि ती आपल्या सिस्टिम मधून कायमची डिलीट झाली आहे. |
05:24 | आता, 'डेस्कटॉप' च्या वरच्या उजव्या कोपर्यात उपलब्ध असलेले काही अँप्लिकेशन्स दिसतील. |
05:31 | प्रथम 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी' आहे. |
05:34 | काँनेकशन स्थापित होते जर तुम्ही 'Lan' किंवा 'Wifi' नेटवर्कशी जुडलेले असणार. |
05:39 | तुम्ही येथे हे पाहू शकता. |
05:42 | तुम्ही तो 'नेटवर्क' निवडू शकता ज्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस करायचे आहे . |
05:46 | नेटवर्क ला 'Enable/ Disable' करण्यास, 'Enable Networking' पर्यायला चेक/ अनचेक करा. |
05:52 | आपण 'Edit Connections' पर्याय वापरून नेटवर्क्सला एडिट देखील करू शकतो. |
05:57 | पुढील पर्याय 'Sound' आहे. त्यावर क्लीक करा. |
06:00 | तुम्ही इथे एक स्लायडर पाहू शकता. हे आपल्या निवडीनुसार ऑडिओ लेवलला वाढविण्यास किंवा कमी करण्यास मदत करते. |
06:07 | आपण 'Sound Settings' वर क्लीक करून आपल्या सिस्टिमच्या साऊंड लेवलला अजून समायोजित करू शकतो. |
06:14 | ह्या विंडो मध्ये सेटिंग्जला स्वतः शोधा. |
06:17 | पुढील आइकन 'Time आणि date आहे. |
06:20 | आपण ह्या आइकन वर क्लीक केल्यास कॅलेंडर उघडेल. आपण येथे वर्तमान तारीख, महिना आणि वर्ष पाहू शकतो. |
06:29 | आपल्या निवडीनुसार एरो बटन आपल्याला इतर महिने आणि वर्षांवर जाण्याची परवानगी देतात. |
06:35 | 'Time & Date Settings' वर क्लीक करून आपण तारीख आणि वेळ एडिट करू शकतो. ह्या पर्यायला स्वतःहून अन्वेषण करा. |
06:44 | पुढे, 'wheel' आइकन वर क्लीक करा. |
06:47 | येथे आपण 'Log Out' आणि 'Shut Down' पर्यायांसह काही शॉर्टकट पर्यायांना पाहू शकतो. |
06:53 | आपण आपल्या सिस्टिम मध्ये उपलब्ध सर्व 'User accounts' ना देखील पाहू शकतो. |
06:59 | आपण त्या विशिष्ट युजर वर क्लीक करून, आपल्या आवडीच्या युजर अकाउंट वर स्विच करू शकतो. |
07:05 | थोडक्यात, |
07:07 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो,
'Launcher' बद्दल 'Launcher' मध्ये अँप्लिकेशन्सना कसे काढणे आणि जोडणे विविध 'डेस्कटॉप' वापरणे 'इंटरनेट कनेक्टिविटी' 'साऊंड सेटिंग्ज' 'टाइम आणि डेट' सेटिंग्ज आणि अन्य 'युजर अकाउंट्स' वर कसे स्विच करणे. |
07:26 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
07:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:39 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:53 | ह्या ट्युटोरिअलचे भाषांतर आणि आवाज मी रंजना उके ने दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |