Avogadro/C2/Edit-molecules/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Edit molecules वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत – अणूंना (एटम्स) जोडणे आणि डिलिट (गाळणे) करणे. |
00:14 | बॉन्ड्स जोडणे आणि डिलिट करणे |
00:16 | बॉन्ड्स फिरवणे (रोटेट करणे) |
00:18 | बॉन्डची लांबी बदलणे |
00:20 | हायड्रोजन मीथाइल ग्रुप मध्ये बदलणे |
00:23 | कॉपी, पेस्ट करणे आणि स्ट्रक्चर्सना जोडणे. |
00:27 | येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS version 14.04 Avogadro version 1.1.1 |
00:37 | या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे. |
00:43 | नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:49 | येथे मी तुम्हाला Terminal वापरून Avogadro कसे उघडायचे हे दाखवेल. |
00:55 | टर्मिनल उघडण्यास, CTRL, ALT आणि T कीज एकत्रित दाबा. |
01:03 | प्रॉम्प्ट वर avogadro टाइप करा आणि एंटर दाबा. |
01:08 | Avogadro अँप्लिकेशन विंडो उघडेल. |
01:12 | दाखवण्यासाठी, मी Fragment लायब्ररी मधून n-butane ची रेणू दाखवेन. |
01:19 | Build मेनू वर क्लीक करा . Insert->Fragment पर्यंत जा. |
01:25 | Insert fragment डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:29 | फ्रॅगमेंट्सच्या सूची मधून, alkanes फोल्डर उघडण्यासाठी, या वर डबल क्लीक करा. |
01:35 | दिसणार्या ड्रॉप डाउनमधून butane.cml निवडा. |
01:41 | Insert बटण वर क्लीक करा. Insert Fragment डायलॉग बॉक्स बंद करण्यास X वर क्लीक करा. |
01:49 | Butane रेणू निळ्या रंगात हायलाईट होऊन पॅनल वर दिसतो. |
01:54 | हायलाइटिंग काढण्यासाठी, Ctrl, Shift आणि A कीज एकत्रित दाबा. |
02:02 | योग्य अलाइनमेन्ट मिळवण्यासाठी Navigation टूल वापरून स्ट्रक्चरला फिरवा. |
02:09 | आता आपण रेणू मध्ये अणूंना कसे जोडायचे ते शिकू. |
02:14 | टूल बार मधील Draw tool आयकॉन वर क्लीक करा. |
02:18 | अंतिम Carbon अणू वर क्लीक करा आणि पॅनल वर ड्रॅग करा. |
02:23 | आवश्यक जोडलेले हायड्रोजन्स सह कार्बन अणू आहेत. |
02:27 | आपल्याकडे पॅनल वर pentane रेणू आहे. |
02:32 | त्याचप्रमाणे एल्किन्सची सूची बनवण्यासाठी तुम्ही Draw tool वापरून अणूंना जोडू शकता. |
02:39 | एक नवीन विंडो उघडा. Draw tool वापरून प्रोपेन ड्रॉ करा. |
02:45 | Ethane चा रेणू मिळण्यासाठी अंतिम कार्बन अणू हायड्रोजन्सशी डिलीट करा. |
02:52 | अणूंना डिलीट करण्यासाठी, टूल बार वरील Selection tool आयकॉन वर क्लीक करा. |
02:57 | क्लिक करा आणि निवड करण्यासाठी अंतिम कार्बन अणूंवर ड्रॅग करा. |
03:02 | निवडलेले अणू निळ्या रंगात दिसतात. |
03:06 | डिलीट करण्यासाठी Backspace दाबा. वैकल्पिकपणे तुम्ही Edit मेनूमध्ये clear पर्याय वापरू शकता. |
03:14 | पुन्हा करण्यासाठी Ctrl आणि Z कीज एकत्रित दाबा. |
03:20 | आपण रेणू मध्ये बॉन्ड्स कसे जोडायचे आणि डिलीट करायचे ते दाखवू. |
03:26 | बॉन्ड्स जोडण्यास टूल बार वरील Draw tool आयकॉन निवडा. |
03:31 | डावीकडे Draw Settings मेनू उघडतो. |
03:35 | डिफॉल्ट रूपात Element ड्रॉप डाउन सूचि मध्ये Carbon निवडलेला आहे. |
03:40 | एक डबल बॉन्ड जोडण्यासाठी Bond Order ड्रॉप डाउन मधून Double निवडा. |
03:46 | डबल बॉन्ड मध्ये बदलण्यासाठी C-1 आणि C-२ यांच्यातील मधल्या बॉन्डवर क्लीक करा. |
03:52 | डबल बॉन्डला ट्रिपल बॉन्ड मध्ये बदलण्यासाठी, Bond Order मधून Triple निवडा. बॉन्ड वर क्लीक करा. |
03:59 | बॉन्ड्स डिलीट करण्यासाठी, माउसचा उजवा बटण धरून बॉन्ड्स वर क्लीक करा. |
04:04 | ह्याचा परिणाम दोन वेगवेगळे रेणू आहेत. |
04:08 | आता रेणूंना पुन्हा जोडूया. |
04:11 | एका रेणूच्या कार्बन वर क्लीक करा, इतर रेणूच्या कार्बन वर क्लीक करून ड्रॅग करा . |
04:18 | आपण Bond Centric Manipulation टूल वापरून बॉन्ड्सला फिरवू आणि बॉन्ड्सची लांबी बदलू शकतो. |
04:24 | टूल बार वरील Bond Centric Manipulation tool वर क्लीक करा. |
04:29 | डाव्या बाजूला Bond Centric Manipulate सेटिंग्स मेनू उघडतो. |
04:34 | डिफॉल्ट रूपात, Show Angles' आणि Snap-to Bonds चेक केलेले आहे. |
04:39 | Snap-to Threshold हे 100(10 डिग्री) वर सेट आहे. |
04:43 | वापरकर्ते गरजेनुसार आपल्या आवडीची सेटिंग्स करु शकतात. |
04:49 | अँगल्स दाखवण्यासाठी, दोन अणूमधील बॉन्ड वर क्लीक करा. |
04:55 | आपल्याला बॉन्ड्सच्या प्लेन ऑफ रोटेशन बदलण्याची गरज आहे. |
04:59 | जर तुम्हाला प्लेन फिक्स करायचे असेल तर, बॉन्ड वर क्लीक करा आणि वरच्या किंवा खालच्या दिशेने फिरवा. |
05:05 | अणूच्या दरम्यानचे प्लेन निळे किंवा पिवळे रंगात दिसेल. |
05:11 | रोटेट करण्यासाठी, कोणत्याही एका अणूवर क्लीक करा आणि फिरवा. |
05:16 | संलग्न बॉड अणूंसह स्थिर प्लेन मध्ये रोटेट होते. |
05:21 | बॉन्डची लांबी बदलण्यासाठी माउसचा उजवा बटण पकडून ड्रॅग करा. |
05:27 | आता आपण दाखवू मीथाइल ग्रुप मध्ये हायड्रोजन्स कसे बदलतात. |
05:32 | Build मेनूवर क्लीक करा आणि Change H To Methyl वर क्लीक करा. |
05:38 | सर्व Hydrogens आता Methyl ग्रुप द्वारा बदलले आहेत. |
05:43 | बदल अंडू करण्यासाठी CTRL आणि Z कीज एकत्रित दाबा. |
05:49 | आपण एक विशिष्ट् hydrogen अणू देखील बनवू शकतो आणि त्याला methyl ग्रुपमध्ये बदलू शकतो. |
05:55 | टूल बार वरील Selection tool आयकॉन वर क्लीक करा. |
05:59 | निवडण्यासाठी अंतिम कार्बन अणू सह संलग्न hydrogen वर क्लीक करा. |
06:04 | Build मेनू वर जा आणि Change H to Methyl वर क्लीक करा. |
06:10 | निवडलेला Hydrogen हा methyl ग्रुप द्वारा बदलला आहे. |
06:15 | डि सिलेक्ट करण्यास, Ctrl, Shift आणि A कीज एकत्रित दाबा. |
06:22 | आता पाहू कि कॉपी,पेस्ट कसे करणे आणि स्ट्रक्चर्स कसे जोडणे. |
06:28 | एक नवीन विंडो उघडण्यास File-> New वर क्लीक करा. |
06:33 | आपण Maltose रेणू तयार करायला शिकू. |
06:37 | Maltose दोन glucose रेणूने बनलेले आहे. |
06:41 | glucose रेणू समाविष्ट करण्यास, Build मेनू वर क्लीक करा. |
06:46 | खाली स्क्रोल करून Insert -> Fragment वर क्लीक करा. |
06:51 | Insert -> Fragment डायलॉग बॉक्स दिसेल. |
06:55 | सूची खाली स्क्रोल करा आणि Cyclic sugar फोल्डर्स वर क्लीक करा. |
07:01 | एक सब मेनू दिसेल. |
07:04 | खाली जाऊन beta-d-glucopyranose.cml निवडा. |
07:10 | Insert बटण वर क्लीक करा. डायलॉग बॉक्स बंद करा. |
07:16 | beta-D-glucopyranose.cml निळ्या रंगात पॅनल वर हायलाईट झालेले दिसते. |
07:24 | हॅन्ड टूल वापरून त्याला केंद्रात ट्रान्सलटे करा. |
07:28 | आता आपण आणखी एक glucose रेणू कॉपी पेस्ट करू. |
07:33 | मेनू बार वरील Edit मेनू वर क्लीक करा. |
07:36 | आणि Copy वर क्लीक करा. पुन्हा एडिट मेनू मध्ये खाली स्क्रोल करा आणि नंतर Paste वर क्लीक करा. |
07:44 | कृपया लक्षात घ्या कॉपी, पेस्ट ऑपरेशन दरम्यान काही क्षणासाठी विंडो अंधुक होते आणि नंतर आणि पुन्हा व्यवस्थित होते. |
07:51 | पॅनेलवर विद्यमान रेणूवर एक नवीन रेणू कॉपी आणि पेस्ट झाली आहे. |
07:58 | कर्सर एक हॅन्ड टूल मध्ये बदलतो. |
08:01 | कॉपी केलेला रेणू मूळ रेणूमधून हटवा. |
08:06 | आता आपल्याकडे पॅनेलवर दोन वेग वेगळे रेणू आहेत. |
08:10 | डि - सिलेक्ट करण्यास, Ctrl, Shift आणि A कीज एकत्रित दाबा. |
08:17 | आता रेणूंचे लेबल करूया. लेबलिंगमुळे सर्व अणूंच्या स्थानांची ओळख पटविण्यात मदत होते. |
08:25 | लेबल करण्यास, Display Types ड्रॉप डाउन मधून Label चेक बॉक्स वर क्लीक करा. |
08:32 | Maltose तयार करण्यासाठी पाणी मधल्या रेणूला काढायचे आहे. |
08:37 | पहिल्या रेणूच्या C-1 वर OH ग्रुप आणि दुसऱ्या रेणूच्या C-9 वर हायड्रोजन डिलीट करा. |
08:46 | Draw tool settings मध्ये Carbon निवडा. |
08:50 | Bond Order मध्ये Single निवडा. |
08:54 | Adjust Hydrogens चेक बॉक्स अनचेक करा. |
08:58 | पहिल्या रेणूच्या C-1 आणि दुसऱ्या रेणूच्या C-9 ला oxygen अणू द्वारे जोडण्यासाठी क्लीक करून ड्रॅग करा. |
09:07 | आपल्याला जोमेट्री ऑप्टीमाइज करायची आहे. |
09:11 | Auto Optimization tool निवडा. |
09:15 | डाव्या बाजूला Auto Optimization settings मेनू दिसते. |
09:20 | MMFF94 फोर्स फील्ड निवडा आणि Start वर क्लीक करा. |
09:27 | ऑप्टिमायझेशनला पूर्ण होण्यास काही सेकंद लागतील. तुम्ही आता लेबल्स काढू शकता. |
09:35 | आता आपल्याकडे पॅनल वर Maltose चे ऑप्टीमाइज स्ट्रक्चर आहे. |
09:40 | थोडक्यात. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: अणूंना जोडणे व डिलीट करणे |
09:47 | बॉन्ड्स जोडणे आणि डिलीट करणे. |
09:50 | बॉन्ड्स रोटेट करणे. |
09:52 | बॉन्डची लांबी बदलणे |
09:54 | हायड्रोजनला मीथाइल ग्रुप मध्ये बदलणे |
09:56 | कॉपी, पेस्ट करणे आणि स्ट्रक्चर्सना जोडणे |
10:00 | असाईंमेन्ट म्हणून, ड्रॉ टूल वापरून ब्यूटेन रेणू तयार करा. |
10:06 | त्याला 2,3 dimethyl Butane मध्ये बदला. |
10:10 | बॉन्ड्सला रोटेट आणि बॉन्डची लांबी बदला. |
10:14 | cellulose चा रेणू तयार करा (संकेत: इन्सर्ट फ्रॅगमेंट लायब्ररी मध्ये 'डि - ग्लुकोस मोनोमर' उपलब्ध आहे) |
10:22 | UFF फोर्स फील्ड वापरून जोमेट्री ऑप्टिमाइज करा. |
10:27 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
10:36 | स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:52 | मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |