Health-and-Nutrition/C2/Cross-cradle-hold/Marathi
|- |00:01 |नमस्कार मित्रानो, स्तनपानासाठी क्रॉस क्रेडल स्थिती या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
|- |00:07 |या ट्युटोरिअल मध्ये आपण आज शिकणार आहोत - आई व बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे,
|-
|00:16
|स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि
|- |00:20 | क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
|-
|00:24
|चला तर मग सुरुवात करूयात,
|-
|00:26
|जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितीचा वापर करतात.
|-
|00:32
| आई व बाळासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती तीच आहे, ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होई पर्यंतचा काळ आरामदायक असेल,
|- |00:43 |बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल,
|-
|00:48
|आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
|-
|00:51
|आज आपण स्तनपानाच्या क्रॉस कराडले स्थिती बद्दल शिकू,
|-
|00:56
| क्रॉस क्रेडल स्थिती बाळाच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आईच्या स्तनाला योग्य रीतीने पकडण्यासाठी आणि बाळाला स्तनावर घट्ट पकड करण्यासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती आहे.
|-
|01:06
|स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात योग्यरीत्या स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि सुकवावेत.
|- |01:12 |मग तिने ग्लासभर उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
|-
|01:16
|स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये दररोज सर्वसाधारणपणे ७५०-८५० मिलिलिटर दूध बनते.
|-
|01:24
|म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.
|-
|01:29
|चला तर आता आपण आईने स्तनपान करताना कसे बसावे यावर चर्चा करू.
|-
|01:33
|आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे,
|-
|01:38
|किंवा खुर्चीवर बसावे पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावेत.
|-
|01:43
|जर खुर्ची इतक्या उंची वर असेल कि तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर, ती एक छोटे टेबले किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते.
|-
|01:54
|बसताना तिने पुढील गोष्टी सुनिश्चित कराव्यात-
बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठदुखी होणार नाही.
|-
|02:03
|तिचे खांदे आरामशीर असावेत, वर केलेले किंवा झुकलेले नसावेत.
|- |02:08 |आणि हि आरामदायी स्थिती स्तनपान संपेपर्यंत अशीच ठेवावी.
|-
|02:13
|आईने ज्या स्तना ने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
|-
|02:19
|आईने कपडे काढताना सुनिश्चित करावे कि तिच्या ब्लॉऊस किंवा ब्रा मुले स्तनांवर दबाव येऊ नये.
|-
|02:26
|व्यवस्थित बसल्यानंतर बाळाला आई जवळ आणावे.
|-
|02:31
|आईने बाळाचे डोके ती बाळाला स्तनपान करेल त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हाताने पकडावे.
|-
|02:39
|त्याच हाताच्या काखे मध्ये बाळाचे पाय ठेवलेले असावेत.
|-
|02:45
|या चित्रामध्ये, आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तना ने स्तनपान करणार आहे,
म्हणून बाळाचे पाय आईच्या डाव्या काखेमध्ये ठेवलेले आहेत.
|- |02:57 |आणि तिने तिच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटे यांचा वापर करून बाळाच्या डोक्याचा खालील भाग पकडला आहे.
|-
| 03:05
|जर बाळाला वर उचलले असताना आईला अतिरिक्त आधाराची गरज लागल्यास ती बाळाखाली व
मांडीवर उशी घेऊ शकते.
|-
|03:15
|लक्षात ठेवा, आईने तिचे खांदे झुकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये.
|-
|03:21
|हे तिच्यासाठी त्रासदायक ठरून तिला पाठदुखी होऊ शकते.
|-
|03:26
|नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे.
|-
|03:33
|पुढे आपण आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती बघुयात.
|-
|03:39
|आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानांमागे असावीत.
|- |03:46 |तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नयेत.
|-
|03:52
|तिचे मनगट बाळाच्या खान्द्यांमध्ये असावे.
|-
|03:56
|आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये.
|-
|04:04
|यामुळे स्तनपान करताना बाळाला आराम मिळेल.
|-
|04:08
|पुढे आपण शिकू, बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.
|-
|04:15
|आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे.
|-
|04:20
|जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील.
|-
|04:26
|आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
|-
|04:32
|बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे, बाळाच्या शरीराची संरेखना.
|-
|04:37
|जेव्हा आपण अन्न खातो, आपले डोके, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असतात.
|-
|04:43
|पण स्तनपान करताना बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपवून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात.
|-
|04:50
|यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल.
|- |04:55 |यामुळे स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत.
|-
|05:01
|यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
|-
|05:05
|आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये तिसरा मुद्द्यावर आलो आहोत.
|-
|05:10
|आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
|-
|05:14
|नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल.
|-
|05:22
|पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटी च्या स्थिती बद्दल बोलू.
|-
|05:28
|बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
|-
|05:33
|आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.
|- |05:38 |यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओला चा खालचा भाग जास्त तोंडात घेईल .
|-
|05:45
|आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
|- |05:51 |कृपया लक्षात घ्या, एरिओला निप्प्लच्या आजूबाजूचा गडद भाग आहे.
|-
| 05:57
|आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर, चला आपण शिकूया, स्तनाला कसे पकडावे -
|-
|06:04
|दुसऱ्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून U आकारात पकडावे.
|- |06:12 |या चित्रामध्ये आई तिच्या उजव्या हाताने उजवे स्तन पकडेल.
|-
|06:19
|अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी -
कल्पना करा कि आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्यभागी निप्पल आहे.
|-
|06:31
|आईने तिचा उजवा अंगठा या घड्याळावरील ९ या अंकावंर ठेवावा.
|- |06:38 |आणि अंगठ्याच्या बाजूची दोन बोटे ३ या अंकावर ठेवावीत.
|- |06:46 |आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत.
असे का,
|-
|06:51
|हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघुयात,
|-
|06:56
|जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो.
|-
|07:02
|आपण वडापाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठा घास घेऊ शकू.
|-
|07:08
|इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.
|-
|07:12
|जर आपण वडापाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
|-
|07:19
|तसेच इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशेकडे बघुयात.
|-
|07:25
|इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत. म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे.
|-
|07:34
|यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
|-
|07:39
|बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत -
आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.
|-
|07:50
|पुन्हा, वडापाव किंवा बर्गर खाताना-
आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
|-
|08:00
|आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.
|-
|08:07
|म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.
|-
|08:12
|तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाळासाठी, स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.
|-
|08:20
|हे अंतर सुनिश्चित करेल कि, आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल.
|-
| 08:29
|आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.
|- |08:35 |आई एरिओला च्या खालील मोठ्या दुग्धनलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते
|-
|08:42
|आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते.
|- |08:49 |आईचा अंगठा स्तनाच्या ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावा जेथे बाळाचे नाक आहे .
|-
|08:59
|आणि तिची दोन बोटे निप्पल पासून ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावीत जेथे बाळाची हनुवटी आहे.
|- |09:09 |चला पुन्हा आपण वडापाव किंवा बर्गर च्या उदाहरणाकडे जाऊया,
|-
|09:13
|वडापाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर आपण मोठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो.
|- |09:21 |तसेच आईने स्तनाला खालून U आकारात पकडून हळुवारपणे दबाव द्यावा.
|- |09:28 |यामुळे बाळाला स्तनाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
|-
|09:34
|पण लक्षात ठेवा,आईने तिचे स्तन V आकारात दाबू नये.
|-
|09:39
|v आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.
|-
|09:45
|हे सुद्धा निश्चित करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.
|-
|09:52
|नाहीतर निप्पल उजव्या किंवा डाव्या बाजूस सरकून बाळाची पकड अयोग्यरीत्या होईल.
|- |10:00 |लक्षात ठेवा, कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये.
|-
|10:08
|Always bring the baby towards the breast.
नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे.
|-
|10:12
|आता बाळ क्रॉस क्रेडल स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
|-
|10:18
|स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये सांगितली आहे.
|-
|10:24
एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरीत्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत.
|-
|10:40
|या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत,
|-
|10:46
|यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल / हि स्थिती स्तनपान करताना तिच्यासाठी आरामदायक असेल.
|- |10:50 |चला तर आपण या ट्युटोरिअलच्या शेवटी पोहोचलो आहोत.
|-
|10:54
|या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, बाळ व आईसाठी स्तनपानाची योग्य स्थिती निवडणे,
|-
|11:03
|स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
|-
|11:09
|या ट्युटोरिअलला स्पोकन ट्युटोरिअल संघ, आई आई टी बॉम्बे यांचे योगदान आहे.
|-
|11:15
|स्पोकन ट्युटोरिअल संघाला भारत सरकारच्या एन एम इ आई सी टी ,एम एच आर दि यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
|-
|11:23
|या मिशन वरील अधिक माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे.
|-
|11:28
|या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फौंडेशन यांकडूनदेखील उदार अनुदान मिळालेले आहे.
|- |11:34 |हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्ट चा भाग आहे.
|-
|11:39
|या ट्युटोरिअल च्या कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल एम डी - बालरोगचिकित्सा.
|- |11:45 |या ट्युटोरिअलचे ऍनिमेशन शीतल जोशी यांनी केले आहे.
|-
|
|हे ट्युटोरिअल आहार तज्ज्ञ तसनीम शेख यांनी बनविले आहे.
|-
| मी रजनी सावंत, स्पोकन ट्युटोरिअल संघाची सदस्य आपला निरोप घेते.
सहभागासाठी धन्यवाद.