Single-Board-Heater-System/C2/Accessing-SBHS-through-Scilab-on-Windows/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:18, 5 April 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 'Accessing SBHS through Scilab on Windows' वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 'SBHS ' म्हणजे 'Single Board Heater System.'
00:10 या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत 'Scilab' आणि 'SBHS' यांच्यात सीरियल संचार सेटअप करणे.
00:17 'Step Test' प्रयोग करणे.
00:20 या ट्यूटोरियल साठी मी 'Windows-7 Operating System' आणि 'Scilab' 5.3.3. वापरत आहे.
00:28 आपण 'www.scilab.org' वरून सायलॅब डाउनलोड करू शकतो.
00:34 सायलॅब इन्स्टॉल करण्यासाठी 'http://spoken-tutorial.org' वरून सायलॅब स्पोकन ट्युटोरियलची शृंखला पहा.
00:44 या ट्युटोरियलमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला 'Introduction to Xcos', 'Connecting SBHS to computer' पाहिले पाहिजे.
00:52 स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर यासाठी संबंधित ट्यूटोरियल या शृंखलेत उपलब्ध आहे.
00:59 सुरवात करण्यासाठी, आम्हाला 'Scilab Step Test code' डाउनलोड करावा लागेल. यामुळे एक वेब ब्राऊजर उघडू.
01:06 ऍड्रेस बारमध्ये टाइप करा: 'os-hardware.in'. SBHS प्रोजेक्ट वर क्लिक करा आणि नंतर डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
01:19 'SBHS Local Code' सेक्शन मधील उपलब्ध फाईल डाऊनलोड करा आणि फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करा.
01:29 लक्षात घ्या की डाउनलोड केलेली फाईल 'zip' फॉरमॅट मध्ये असेल.
01:34 या फाईलवर राईट-क्लिक करा आणि येथे 'Extract here' निवडा.
01:38 'scilab codes local' नावाचे एक फोल्डर तयार होईल.
01:43 आता आपण आपला प्रयोग सुरू करण्यास तयार आहोत.
01:47 'SBHS' आपल्या संगणकाशी जोडलेला आहे आणि त्याची पॉवर ऑन आहे याची खात्री करा.
01:53 प्रथम, आपण चेक करूया कि SBHS ला 'communication port' नंबर असाइन केलेला आहे.
01:58 हे करण्यासाठी 'My Computer' वर राईट क्लिक करून नंतर 'Properties' वर क्लिक करा'.
02:05 एक विंडो उघडेल. या विंडोमध्ये 'Device Manager' वर क्लिक करा.
02:11 कृपया नोंद घ्या की 'Windows 7' चे स्वरूप आणि अनुभव इतर 'Windows' व्हर्जनशी पूर्णपणे भिन्न आहे.
02:19 तुम्ही त्या स्टेप्सला देखील बदलू शकता जे मी तुमच्या विंडोस व्हर्जनच्या अनुरूप येथे दाखवते.
02:28 'device manager' तुम्हाला तुमच्या कॉम्पुटरवरील हार्डवेअर डिव्हाइसेसची सूची दाखवेल.
02:33 'Ports (COM & LPT)' पर्याय निवडा.
02:38 हे येथे आहे, त्यास उघडण्यासाठी या पर्यायावर डबल क्लिक करा.
02:42 जर आपण 'RS232' केबल कनेक्ट केला असेल तर 'communications Port COM1' ला पहा अन्यथा, 'USB Serial Port' ला पहा.
02:52 RS232 कनेक्शनसाठी, पोर्ट नंबर मुख्यतः 'COM1' राहते.
02:59 'USB' कनेक्शनसाठी ते दुसर्या क्रमांकावर बदलू शकते.
03:03 योग्य 'COM' नंबर ची नोंद घ्या, माझ्या बाबतीत तो 'COM14' आहे.
03:09 आता, कधीकधी 'USB' केबल कनेक्ट केल्यानंतर आपल्याला एक दोन डिजिटचा 'COM' पोर्ट नंबर मिळतो.
03:17 'serial tool box' जो आपल्या बोर्ड आणि कॉम्पुटरला कनेक्ट करतो केवळ एकच-अंकी पोर्ट नंबर हाताळू शकतो.
03:24 म्हणून आपला 'COM port number' बदलणे आवश्यक आहे.
03:28 मी 'COM' पोर्ट नंबर बदलण्याची पद्धत दाखवते.
03:31 त्या विशिष्ट 'COM' पोर्टवर डबल-क्लीक करा.
03:34 'Port Settings' टॅबवर क्लिक करा आणि नंतर 'Advanced' वर क्लिक करा.
03:40 'COM port number' ड्रॉप-डाउन मेनूमधील, पोर्ट नंबरला कोणत्याही एका डिजिट नंबरमध्ये निवडा.
03:46 'Windows' आपल्याला दाखवतो की सर्व पोर्ट सध्या वापरात आहेत परंतु वास्तविकतेत हे केवळ जुने स्टेटस आहे.
03:55 त्यामुळे जर अन्य 'USB' डिव्हाईस जोडलेले नसेल तर, आपण सक्तीने एक विशेष COM पोर्ट नंबर वापरू शकतो.
04:03 या सेटिंग्ज लागू करण्यासाठी 'OK' वर क्लिक करा.
04:07 'Properties' विंडो बंद करण्यासाठी 'OK' वर क्लिक करा.
04:11 'Device Manager' आणि उर्वरित विंडो बंद करा.
04:14 आता 'SBHS' वापरून 'Step Test' प्रयोग करण्यासाठी सायलॅब कॉन्फिगर कसे करणे हे आपण शिकूया.
04:23 डेस्कटॉपवर आपण सेव केलेले 'Scilab local codes' फोल्डर उघडा.
04:28 'Step test' फोल्डर उघडा.
04:31 'ser underscore init dot sce' फाईल शोधून त्यावर डबल क्लिक करा.
04:37 हे आपोआप Scilab लॉन्च करेल आणि 'Scilab editor' मध्येही फाइल उघडेल.
04:43 फाईल उघडत नसल्यास 'File' मेन्यूवर क्लिक करा नंतर 'Open a file' वर क्लिक करा.
04:50 'ser underscore init' फाइल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा.
04:57 'scilab workspace' वर जा आणि खालील कमांड 'execute' करा.
05:03 'get d space dot dot slash common underscore files' टाइप करा आणि 'Enter' की दाबा.
05:10 नंतर टाइप करा: 'exec space dot dot slash common underscore files slash loader dot sce' आणि 'Enter' दाबा.
05:21 आपण पाहू शकता की तो एक संदेश देतो की त्याने 'serial port toolbox' लोड केला आहे.
05:26 सायलॅब एडिटर वर जा.
05:28 'ser underscore init dot sce' फाईलमध्ये त्या ओळीवर जा ज्यात व्हेरिएबल 'port2' ची व्हॅल्यू विचारली आहे.
05:36 'port2' व्हेरिएबलची व्हॅल्यू ओळखण्यासाठी 'COM port number' सह बदलणे आवश्यक आहे.
05:44 'port' नंबर त्या नम्बरशी बदला जो आपण ओळखलेला आहे जो आपण काही सेकंदांपूर्वी सेट केला आहे.
05:52 हे सिंगल कोट्स मध्ये आहे याची खात्री करा.
05:55 या फाईलच्या सामग्रीमध्ये कोणतेही इतर बदल करू नका.
05:59 आता फाइल save करा.
06:01 मेनूबारवर फाईलला कार्यान्वित करण्यासाठी 'Execute' बटणावर क्लिक करा.
06:06 'Scilab workspace' वर आपल्याला 'COM Port Opened' मॅसेज मिळेल.
06:12 तथापि, असेही होऊ शकते कि आपल्याला एक एरर मॅसेज मिळेल.
06:16 मी स्लाइड्स वापरुन समजावून सांगते कि एक सामान्य एरर कसे हाताळाल.
06:21 मी स्लाईडस वर जाते.
06:23 'TCL/TK' संबंधित एरर दर्शविली जाते, 'SBHS' शी जुडलेल्या 'USB' केबलला पुन्हा जोडा आणि ही फाइल पुन्हा कार्यान्वित करा.
06:33 'COM' 'पोर्ट नंबर बदलला आहे का ते एकदा तपासा.
06:37 जर हे आताही कार्य करत नसल्यास, 'Scilab' ला पुन्हा सुरु करा आणि प्रक्रिया पुन्हा करा.
06:42 'Scilab workspace' मध्ये, खालील कमांड्स कार्यान्वित करा.
06:46 टाइप करा: 'exec space step underscore test dot sci' आणि 'Enter' दाबा.
06:54 नंतर टाइप करा: 'xcos space step underscore test dot xcos' आणि 'Enter' दाबा.
07:03 हे 'step test' प्रयोगासाठी बनवलेल्या 'xcos interface' ला लॉन्च करेल.https://translate.google.co.in/?hl=mr#en/mr/one%20mitre%20per%20second
07:09 तुम्ही 'blocks' वर डबल-क्लिक करून 'block parameters' बदलू शकता.
07:13 तुम्हाला पहिल्यांदाच पॅरामीटर्स न बदलण्याची सल्ला दिली जाते
07:18 'Xcos' विंडोच्या मेनूबारमध्ये, 'Simulation' पर्यायावर क्लिक करा, आता 'Start' पर्याय निवडा.
07:27 'Xcos' फाईल यशस्वीरित्या कार्यान्वित केल्यावर, तीन ग्राफसह एक 'plot window' दिसेल.
07:35 पहिला ग्राफ 'Heater in percentage' आहे.
07:40 दुसरा ग्राफ 'Fan in percentage' आहे आणि
07:44 तिसरा ग्राफ 'Temperature in degree Celsius' आहे.
07:49 नोंद करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. मी स्लाईडस वर जाते.
07:54 इमेजमध्ये दर्शविल्याप्रमाणे 'SBHS' डिस्प्लेवर 'Fan, Heater' आणि 'Temperature' दिसते.
08:01 कृपया लक्षात घ्या की ग्राफमध्ये दर्शविलेली व्हॅल्यू 'SBHS' डिस्प्लेवर दाखवल्याप्रमाणेच असावीत.
08:08 जर असे नसेल तर याचा अर्थ 'Scilab' चा 'SBHS' सह संप्रेषण (संपर्क) होत नाही.
08:14 तुम्ही हे देखील तपासू शकता जर संप्रेषण 'LEDs' वेळोवेळी चमकतात.
08:19 तुम्हाला या इमेजमध्ये दर्शविल्याप्रमाणे 'SBHS' वर 'USB' कनेक्टरच्या पुढे हि LEDs मिळेल.
08:26 हा प्रत्यक्ष प्रयोग आहे आणि परिणांमांना देण्यासाठी काही वेळ घेईल.
08:30 मी काही वेळेसाठी रेकॉर्डिंग थांबवेल.
08:35 पुरेश्या वेळेसाठी प्रयोग रन केल्यानंतर, अंतिम ग्राफ्स येथील प्रमाणे दाखवले जातील.
08:41 आपण पाहू शकतो की 'heat' व्हाल्यूमध्ये तापमानाने 'step change' वर प्रतिसाद दिला आहे.
08:47 बहुतेक प्रक्रिया जी आपण पाहिली ती फक्त एकच फाईल कार्यान्वित करून पूर्ण केली जाऊ शकते.
08:53 मी तुम्हाला ही फाईल दाखवते. 'step test' फोल्डरवर जा.
08:58 'scilab' लाँच केल्यानंतर 'xcos' उघडे पर्यंत, स्टेप्स 'start.sce' फाईल वापरून कार्यान्वित केली जाऊ शकते.
09:07 मी स्लाईड्सवर परत जाते.
09:10 आपल्याला 'start dot sce' फाइल वापरण्याची सल्ला, प्रक्रिया समजून घेतल्यानंतरच दिली जाते.
09:17 ही फाइल गृहीत धरते की 'ser underscore init dot sce' फाईलमध्ये दिला गेलेला 'port' नंबर योग्य आहे.
09:26 आता, प्रयोग बंद करण्यासाठी, 'Xcos' विंडोच्या मेनू बारमध्ये उपलब्ध 'Stop' पर्यायवर क्लिक करा.
09:35 प्रयोग पूर्ण केल्यानंतर, 'SBHS' ला रीसेट करूया.
09:40 हे पुन्हा स्पष्ट करण्यासाठी मी स्लाइड्सवर जाते.
09:44 चित्रात दर्शविल्याप्रमाणे 'SBHS' वर 'Reset' पुश बटण दिलेले आहे.
09:49 रीसेट करण्यासाठी, 1 किंवा 2 सेकंदांसाठी 'Reset' बटण दाबा आणि नंतर ते सोडा.
09:55 'reset' ऑपरेशन 'Heat' 0% आणि 'Fan' 100% करते.
10:00 तथापि 'LCD' वर दोन्हीसाठी '0' दिसत आहे.
10:05 या प्रयोगासाठी डेटा फाइल 'Step test' फोल्डरमध्ये सेव केला जातो.
10:10 मी तुम्हाला ही फाईल दाखवते.
10:13 डेटा फाईलचे नाव 'time stamp' फॉरमॅट मध्ये आहे.
10:17 डेटा फाइलचे नाव 'Year Month Date Hours Minutes Seconds dot txt' ह्या प्रकारे वाचा.
10:27 मी डेटा फाईलची विषय वस्तू उघडून दाखवते.
10:31 यात प्रत्येक सॅम्पलसाठी 'heat, fan' आणि 'temperature' व्हल्यूज आहेत.
10:36 म्हणूनच, ही फाईल विश्लेषण हेतूसाठी वापरली जाऊ शकते.
10:40 थोडक्यात.
10:42 या ट्यूटोरियल मध्ये, आम्ही 'Scilab' आणि 'SBHS' यांच्यातील 'serial communication' सेट करायला शिकलो.
10:48 'Step Test' प्रयोग करायला शिकलो.
10:52 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ 'Spoken Tutorial' प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा.
10:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम वर्कशॉप आयोजित करते आणि ऑनलाइन परीक्षा पास करणार्यांना प्रमाणपत्र देते.
11:04 अधिक माहितीसाठी, आम्हाला संपर्क करा.
11:08 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:13 या मिशन विषयी अधिक माहिती [1] या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
11:17 हे भाषांतर किशोर भांबळे यांनी केले असून, मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana