OpenFOAM/C3/Creating-and-Meshing-aerofoil-in-Gmsh/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:36, 5 February 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Creating and Meshing aerofoil in Gmsh या पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत: Gmsh च्या सहाय्याने aerofoil तयार करणे,
00:14 आणि तयार केलेली aerofoil मेश करणे.
00:17 या पाठासाठी युजरला aerofoil आणि Gmsh चे ज्ञान असायला हवे.
00:23 नसल्यास Gmsh साठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवरील Installing and running Gmsh हा पाठ बघा.
00:31 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 आणि Gmsh वर्जन 2.8.3 वापरत आहे.
00:42 आता aerofoil बद्दल जाणून घेऊ.
00:45 Aerofoils हे स्ट्रीमलाईन आकाराचे पंख आहेत जे विमान आणि टर्बो मशिनरीमधे वापरले जातात.
00:53 ह्यांचे आकार असे असतात की त्यांच्यावरील drag force हा lift चा अल्पांश असतो.
00:59 हे aerofoil चे चित्र आहे.
01:03 aerofoil चे पूर्वनिर्धारित कोऑर्डिनेटस ".dat" हे एक्सटेन्शन असलेल्या साध्या टेक्स्ट फाईलमधे उपलब्ध आहेत.
01:11 मी .dat फाईल आणि Python स्क्रिप्ट या url वरून डाऊनलोड करणार आहे:
01:19 मी वेबसाईट उघडत आहे.
01:22 .dat फाईल आणि Python स्क्रिप्ट डाऊनलोड करा आणि डाऊनलोडस फोल्डरमधे जा.
01:31 डाऊनलोडस फोल्डरमधून या दोन्ही फाईल्स कॉपी करून डेस्कटॉपवर पेस्ट करा.
01:37 .dat फाईल उघडा.
01:40 या फाईलमधे प्रत्येक पॉईंटच्या गणना करून मिळवलेल्या X आणि Y च्या

को-ऑर्डिनेटसचा समावेश आहे जे aerofoil ची निश्चिती करतात. Z को-ऑर्डिनेट शून्य ठेवला आहे.

01:51 X, Y आणि Z चे को-ऑर्डिनेटस Gmsh मधे स्वीकृत फॉरमॅटमधे असणे गरजेचे आहे.
01:56 हे स्वतः करता येते परंतु ह्यात वेळ जातो.
02:01 आता Python स्क्रिप्ट उघडा.
02:04 Python स्क्रिप्ट, डेटा .dat फाईलमधे रूपांतरित करते आणि आऊटपुट Gmsh ला समजेल अशा वेगळ्या फाईलमधे देते.
02:14 आता टर्मिनल विंडो उघडा. टाईप करा: cd space Desktop.
02:21 आता python space dat2gmsh.py space पुढे dat फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
02:31 टाईप करा ls. naca5012xyz.dat .geo नावाची नवी फाईल तयार झालेली आपण बघू शकतो.
02:43 ही geo फाईल उघडा.
02:46 यामधे Gmsh फॉरमॅटमधील को-ऑर्डिनेटसचा समावेश आहे.
02:50 येथे nac_lc ही कॅरॅक्टरीस्टिक लेंथ आहे जी पहिल्या ओळीत 0.005 अशी निश्चित केली आहे.
02:59 मी ही व्हॅल्यू बदलून 0.5 करत आहे.
03:03 कारण आपल्याला coarser mesh ची गरज आहे.
03:07 तुम्ही ही व्हॅल्यू तुमच्या मेशच्या गरजेनुसार बदलू शकता. आता ही फाईल सेव्ह करा.
03:15 टर्मिनल विंडोमधे gmsh space आणि geo फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
03:25 हे aerofoil असलेले gmsh उघडेल.
03:29 आता aerofoil च्या टोकाच्या भागावर स्क्रॉल करून झूम इन करा.
03:35 लक्षात घ्या aerofoil चा टोकाचा भाग उघडा आहे.
03:40 gmsh बंद करा. आता पुन्हा geo फाईलवर जाऊन खाली स्क्रॉल करा.
03:48 आपण अंतिम बिंदू समाविष्ट करून ते जोडणार आहोत.
03:53 आता spline च्या वर टाईप करा Point open close bracket 1046 space = open close curly bracket space 1.005 comma space -0.0005 comma space 0.00000 comma space nac_lc आणि सेमीकोलनच्या सहाय्याने ही ओळ संपवा.
04:26 spline मधे Spline(1000) = curly braces open 1000 colon 1046 comma 1000 close the curly bracket semicolon असा बदल करा.
04:44 geo फाईल सेव्ह करा.
04:47 थोडे बदल केलेली फाईल Gmsh मधे उघडा. आपल्याला टोक जोडले गेल्याचे दिसेल.
04:56 आता पॉईंटसच्या सहाय्याने aerofoil भोवती बाऊंडरी तयार करू.
05:02 4, 3, 0 हे को-ऑर्डिनेटस टाईप करा. prescribed mesh element size ची व्हॅल्यू बदलून 0.5 करून एंटर दाबा.
05:17 अशाचप्रकारे इतर पॉईंटस समाविष्ट करा.

4 -3 0 -4 -3 0 -4 3 0

05:29 सरळ रेषेच्या सहाय्याने हे बिंदू जोडा.
05:44 आता Plane surface वर क्लिक करून सरफेस बाऊंडरी सिलेक्ट करा.
05:52 झूम इन करून aerofoil हे hole boundary म्हणून सिलेक्ट करा.
05:58 सिलेक्शन संपवण्यासाठी e चे बटण दाबा. आता आपल्याकडे आपला सरफेस आहे.
06:04 आता सरफेस 3D बनवण्यासाठी तो extrude करणार आहोत. त्यासाठी Translate मधील Extrude Surface वर जा.
06:14 ट्रान्सलेशनसाठीचे को-ऑर्डिनेटस विचारणारी नवी विंडो उघडेल.
06:19 आपल्याला Z डायरेक्शनमधील सरफेस extrude करायचा असल्यामुळे Z डायरेक्शनचे को-ऑर्डिनेट म्हणून 1 ही व्हॅल्यू द्या आणि सरफेसच्या बाऊंडरीवर क्लिक करा.
06:30 सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा.
06:33 जॉमेट्री हलवण्यासाठी माऊसचे डावे बटण वापरा.
06:37 जॉमेट्री extrude झाल्याचे दिसेल.
06:42 हे बंद करा. gmsh विंडो बंद करा.
06:45 geo फाईल उघडा.
06:48 खाली स्क्रॉल करा आणि Extrude वर जा.
06:52 Extrude च्या आत ह्या ओळी समाविष्ट करा:

Layers{1}; एंटर दाबा. Recombine; ही फाईल सेव्ह करा.

07:09 ह्यामुळे मेश एक एलिमेंट जाड असल्याचे सुनिश्चित होईल.
07:14 आता टर्मिनल विंडोमधे geo फाईल उघडा.
07:19 आपल्याकडे आपली जॉमेट्री आहे. आपण मेशिंग करणार आहोत.
07:23 निश्चित केलेल्या जॉमेट्रीसाठी Gmsh आपोआप मेश तयार करते.
07:28 Mesh वर जा.
07:30 1D mesh, 2D mesh आणि 3D mesh वर क्लिक करा.
07:36 mesh तयार झाले आहे.
07:39 असे दिसेल की मेश हे aerofoil जवळ बारीक असून बाऊंडरीकडे जाताना मोठे होत जात आहे.
07:48 मेश मेनूमधील Refine by Splitting या पॅरामीटरवर क्लिक करून मेश रिफाईन देखील करू शकतो.
07:56 आपले काम सेव्ह करू.
07:59 फाईल मेनूमधे जाऊन Save as वर क्लिक करा.
08:05 एक नवी विंडो उघडेल. ड्रॉपडाऊन मधील पर्याय बदलून mesh फॉरमॅट निवडा.
08:11 फाईलचे नाव म्हणून aerofoil.msh असे टाईप करा.
08:17 लक्षात ठेवा येथे msh हे mesh फाईल टाईपसाठी आहे.
08:22 OK वर क्लिक करा. पुन्हा OK वर क्लिक करा.
08:26 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:29 असाईनमेंट म्हणून वेगळ्या आकाराच्या aerofoil साठी वेगळी dat फाईल वापरून दुसरी aerofoil बनवा.
08:37 या पाठात शिकलो:

Gmsh मधे aerofoil तयार करणे. Gmsh मधे मेशिंग करणे.

08:45 URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.

यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

08:52 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
08:56 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

09:00 ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.
09:03 अधिक माहितीसाठी कृपया लिहा:

contact@spoken-tutorial.org

09:06 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
09:19 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana