OpenFOAM/C3/Installing-and-Running-PyFoam/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या installing and running PyFoam वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात PyFoam इन्स्टॉल करणे, तपासणे तसेच त्यासाठी लागणा-या आवश्यक स्टेप्स जाणून घेऊ. |
00:17 | PyFoam म्हणजे काय? |
00:19 | OpenFOAM चे इन्स्टॉलेशन तपासणे. |
00:22 | Python, Numpy आणि Gnuplot इन्स्टॉल करणे. |
00:27 | pip च्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे. |
00:30 | सोर्सेसच्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे. |
00:33 | आणि PyFoam कार्य करते की नाही हे तपासणे. |
00:38 | या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 |
00:45 | तसेच OpenFOAM वर्जन 2.3.0 वापरत आहे. |
00:48 | लक्षात ठेवा PyFoam हे OpenFoam वर्जन 1.6 आणि त्यावरील वर्जनवर देखील कार्य करते. |
00:55 | या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल कमांडसचे प्राथमिक ज्ञान तसेच, |
01:02 | OpenFOAM केसेस कार्यान्वित करून त्यांचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा. |
01:07 | नसल्यास या वेबसाईटवरील लिनक्स या विषयावरील पाठांचा संदर्भ घ्या. |
01:13 | PyFoam म्हणजे काय? |
01:15 | PyFoam हे Python लायब्ररीज आणि युटिलिटीजचे संकलन आहे. |
01:20 | याचा उपयोग OpenFOAM सिम्युलेशन्स हाताळण्यासाठी करता येतो. |
01:25 | OpenFOAM बरोबर सहजपणे काम करण्यासाठी हे बनवण्यात आले आहे. |
01:29 | PyFoam चा उपयोग सिम्युलेशन्स iterative रीतीने कार्यान्वित करण्यासाठी देखील करता येतो. |
01:34 | स्वयंचलित डेटा संग्रहासाठी, |
01:37 | केस फाईल्समधे पॅरामेट्रिकली बदल करण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या इतर अनेक उपयोगी क्रियांसाठी देखील करता येतो. |
01:44 | लक्षात ठेवा PyFoam हे OpenFOAM वर कार्य करते. |
01:48 | त्यामुळे आपल्या संगणकावर OpenFOAM इन्स्टॉल असणे गरजेचे आहे. |
01:54 | OpenFOAM योग्य प्रकारे इन्स्टॉल झाले आहे का ते तपासू. |
02:00 | टर्मिनल उघडून icoFoam space hyphen help असे टाईप करा. |
02:07 | आपल्याला icoFoam आणि OpenFOAM वर्जनचा तपशील आणि हेल्प टेक्स्ट मिळाले पाहिजे. |
02:15 | आता PyFoam साठी आवश्यक असणारे घटक टर्मिनलच्या सहाय्याने इन्स्टॉल करू. जसे की, Python, Pip, Numpy आणि Gnuplot. |
02:29 | प्रथम टाईप करा - sudo apt-get install python hyphen dev आणि एंटर दाबा. |
02:39 | नंतर टाईप करा sudo apt-get install python-pip आणि एंटर दाबा. |
02:49 | pip install Numpy असे टाईप करा. |
02:53 | sudo apt-get install gnuplot space gnuplot hyphen x11 टाईप करून एंटर दाबा. |
03:04 | अशाप्रकारे आवश्यक घटकांचे इन्स्टॉलेशन आपण पूर्ण केले आहे. |
03:09 | आता pip च्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करू. |
03:13 | टर्मिनल उघडून pip install PyFoam असे टाईप करा. |
03:20 | source मधून देखील PyFoam इन्स्टॉल करू शकतो. |
03:24 | त्यासाठी ब्राउजर उघडा आणि URL विंडोमधे http://www.pypi.com असे टाईप करा.
आणि PyFoam सर्च करा. |
03:38 | PyFoam-0.6.5.tar.gz डाऊनलोड करा. |
03:46 | टर्मिनलमधे, Downloads फोल्डरमधे जाऊन टाईप करा tar -xvf space PyFoam hyphen 0.6.5.tar.gz |
04:00 | नंतर टाईप करा cd त्यानंतर फोल्डरचे नाव PyFoam hyphen 0.6.5 |
04:07 | त्यानंतर टाईप करा sudo python setup dot py' space install |
04:16 | आता PyFoam हे OpenFoam ला डिटेक्ट करते का आणि ते नीट कार्य करते का हे तपासू. |
04:22 | पुन्हा टर्मिनलवर जा. |
04:25 | python टाईप करून import PyFoam टाईप करा.
नंतर import PyFoam dot FoamInformation टाईप करा. |
04:35 | print PyFoam dot FoamInformation dot foamTutorials टाईप करून पुढे ओपन आणि क्लोज ब्रॅकेटस टाईप करा. |
04:45 | हे OpenFOAM Tutorials ची डिरेक्टरी प्रिंट करेल. |
04:50 | आता थोडक्यात, या पाठात PyFoam बद्दल शिकलो. |
04:55 | तसेच OpenFoam चे इन्स्टॉलेशन तपासणे, |
05:00 | pip च्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे, |
05:03 | सोर्सेसच्या सहाय्याने PyFoam इन्स्टॉल करणे तसेच PyFoam कार्य करते का हे तपासून बघायला शिकलो. |
05:09 | कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा. |
05:13 | कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा. |
05:18 | FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते. |
05:22 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. |
05:33 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |