OpenFOAM/C2/Simulating-flow-in-a-Lid-Driven-Cavity/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या openFoam वापरून Simulating Flow in a Lid Driven Cavity वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण जाणून घेणार आहोत- |
00:09 | Lid Driven Cavity चे स्ट्रक्चर, |
00:12 | जॉमेट्री मेशिंग करणे. |
00:14 | प्रॉब्लेम सोडवणे आणि Paraview मधे रिझल्टसचे पोस्ट प्रोसेसिंग करणे. |
00:17 | स्प्रेडशीटवर रिझल्टचा आलेख बघणे आणि प्रमाणित करणे. |
00:21 | या पाठासाठी मी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 10.04, |
00:27 | ओपनफोम वर्जन 2.1.0, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे. |
00:32 | Lid driven cavity ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी 2D टेस्ट आहे. |
00:36 | या केसमधे CFD कोडचे प्रमाणीकरण करू. |
00:39 | ही Lid Driven Cavity ची आकृती आहे. |
00:41 | बाऊंडरी कंडिशन्स तशाच राहतील. |
00:44 | एक स्थलांतर होणारी आणि तीन स्थिर वॉल्स. |
00:46 | आपण हे Reynolds no (Re) = 100 साठी सोडवत आहोत. |
00:50 | स्थलांतर होणा-या वॉलचा वेग 1 मीटर प्रति सेकंद आहे. |
00:54 | इन्स्टॉलेशन संबंधित पाठातील Lid Driven Cavity साठीचा पाथच आपण येथे घेऊ. |
01:00 | आता कमांड टर्मिनल उघडू. |
01:02 | त्यासाठी तुमच्या कीबोर्डवरील Ctrl+Alt+t ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
01:08 | कमांड टर्मिनलमधे, lid driven cavity चा पाथ टाईप करा, |
01:12 | आणि "run" टाईप करून एंटर दाबा. |
01:15 | cd (space) tutorials टाईप करून एंटर दाबा. |
01:20 | cd (space) incompressible टाईप करून एंटर दाबा. |
01:26 | cd (space) icoFoam (लक्षात घ्या F कॅपिटल आहे) टाईप करून एंटर दाबा. |
01:33 | cd (space) cavity टाईप करून एंटर दाबा. |
01:38 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
01:41 | फाईल स्ट्रक्चरमधे 0 , constant आणि system हे तीन फोल्डर दिसतील. |
01:46 | आता cd (space) constant टाईप करून एंटर दाबा. |
01:52 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
01:55 | constant फोल्डरमधे polyMesh नावाचा फोल्डर आणि फ्लुइडचे भौतिक गुणधर्म सांगणारी फाईल आहे. |
02:01 | आता cd (space) polymesh टाईप करून एंटर दाबा. |
02:08 | PolyMesh मधे 'blockMeshDict' नावाची फाईल आहे. |
02:12 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
02:15 | तुम्ही blockMeshDict फाईल पाहू शकता. |
02:17 | blockMeshDict फाईल उघडण्यासाठी, gedit space blockMeshDict टाईप करून एंटर दाबा.
(लक्षात घ्या M आणि D येथे कॅपिटल आहेत) |
02:30 | हे blockMeshDict ही फाईल उघडेल. |
02:32 | हे capture area मधे ड्रॅग करून घेऊ. |
02:36 | ह्यामधे lid driven cavity चे कोऑर्डिनेटस, |
02:41 | ब्लॉकिंग आणि मेशिंग पॅरामीटर्स, |
02:44 | आणि बाऊंडरी पॅचेस यांचा समावेश आहे. |
02:47 | येथे arcs तसेच मर्ज करण्यासाठी पॅचेस उपलब्ध नसल्यामुळे, edges आणि mergePatchPairs हे घटक रिकामे ठेवू शकतो. |
02:56 | आता हे बंद करा. |
02:58 | कमांड टर्मिनलवर cd (space) .. (dot) (dot) टाईप करून एंटर दाबा. |
03:04 | असे दोन वेळा करा. हे तुम्हाला cavity फोल्डरवर घेऊन जाईल. |
03:09 | आता cd (space) system टाईप करून एंटर दाबा. |
03:15 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. ह्यामधे तीन फाईल्स आहेत- |
03:22 | controlDict, fvSchemes आणि fvSolutions. |
03:26 | controlDict मधे स्टार्ट/एंड टाईमच्या कंट्रोल पॅरामीटर्सचा समावेश आहे. |
03:30 | fvSolution मधे रन टाईममधे वापरल्या गेलेल्या discritization स्कीम्सचा समावेश आहे. |
03:35 | आणि fvSchemes मधे सॉल्व्हर्स, टॉलरन्स इत्यादीच्या समीकरणांचा समावेश आहे. |
03:40 | आता पुन्हा cd (space) (dot dot) .. टाईप करून एंटर दाबा. |
03:46 | आता cd ( space ) 0 (zero) टाईप करून एंटर दाबा. |
03:53 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
03:57 | यामधे दाब, वेग, तापमान इत्यादी बाऊंडरी कंडिशन्सच्या प्रारंभिक व्हॅल्यूजचा समावेश आहे. |
04:03 | cd ( space ) (dot dot) . . टाईप करून cavity फोल्डरवर परत जा. |
04:09 | आता जॉमेट्री mesh करावी लागेल. |
04:11 | येथे coarse मेश वापरत आहोत. |
04:14 | जॉमेट्री मेश करण्यासाठी टर्मिनलवर blockMesh असे टाईप करा. |
04:18 | blockMesh टाईप करून एंटर दाबा. (लक्षात घ्या M कॅपिटल आहे). |
04:25 | मेशिंग पूर्ण झाले आहे. |
04:27 | blockMesh फाईलमधे काही एरर्स असतील तर त्या टर्मिनलवर दाखवल्या जातील. |
04:31 | जॉमेट्री बघण्यासाठी paraFoam टाईप करून एंटर दाबा. लक्षात घ्या 'F' कॅपिटल आहे. |
04:40 | हे paraview विंडो उघडेल. |
04:44 | आता ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या Apply वर क्लिक करा. |
04:49 | lid driven cavity ची जॉमेट्री आपण पाहू शकतो. आता हे बंद करा. |
04:58 | टर्मिनलवर "checkMesh" टाईप करून मेश चेक करा. |
05:04 | लक्षात घ्या 'M' कॅपिटल आहे. एंटर दाबा. |
05:08 | तुम्हाला मेशशी संबंधित अनेक सेल्स, skewness आणि इतर पॅरामीटर्स दिसतील. |
05:15 | स्लाईडसवर परत जाऊ. |
05:17 | येथे icoFoam हा सॉल्व्हर वापरत आहोत. |
05:20 | icoFoam हा न्यूटोनियन फ्लुइडसचा इनकाँप्रीसिबल फ्लोसाठीचा Transient सॉल्व्हर आहे. |
05:26 | टर्मिनलवर परत जाऊ. |
05:29 | टर्मिनलवर टाईप करा "icoFoam". |
05:33 | लक्षात घ्या येथे 'F' कॅपिटल आहे. एंटर दाबा. |
05:37 | येथे टर्मिनल विंडोमधे कार्यान्वित होणारी Iterations बघता येतात. |
05:40 | प्रॉब्लेम सोडवून झाल्यावर जॉमेट्री आणि रिझल्टस बघण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा paraFoam. |
05:54 | ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूच्या डाव्या बाजूला असलेल्या, |
05:57 | Apply वर क्लिक करा. ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूवरील प्रॉपर्टीजखाली स्क्रॉल करा. |
06:02 | आपल्याला मेश पार्टस, व्हॉल्युम फिल्डस इत्यादी घटक दिसतील. |
06:07 | Lid driven cavity चे वेगवेगळे बाऊंडरी रिजन्स बघण्यासाठी मेश पार्टसमधील हे बॉक्सेस चेक किंवा अनचेक करा. |
06:15 | आता यानंतर, डाव्या बाजूला वरती ऍक्टीव्ह व्हेरिएबल कंट्रोलवरील ड्रॉपडाऊन मेनूमधे, solid color हा पर्याय बदलून p किंवा कॅपिटल U निवडा. ज्या दाब, वेग यासारख्या इनिशियल कंडिशन्स आहेत. |
06:31 | मी कॅपिटल 'U' निवडत आहे. वेगाची इनिशियल कंडिशन दाखवली जाईल. |
06:37 | paraview विंडोच्या वरील भागात VCR कंट्रोल दिसेल. |
06:44 | play बटणावर क्लिक करा. |
06:47 | आता हा lid driven cavity साठी वेगाचा अंतिम रिझल्ट आहे. |
06:52 | ऍक्टिव्ह व्हेरिएबल कंट्रोल मेनूच्या डावीकडे वरती color legend वर क्लिक करून ते टॉगल करून बघा. |
07:03 | हा U चा color legend आहे. |
07:07 | आपल्याला मिळालेले रिझल्टस प्रमाणित करणे गरजेचे आहे. |
07:09 | त्यासाठी U आणि V हे वेग प्लॉट करू. |
07:12 | असे करण्यासाठी Filters मधे जाऊन खाली स्क्रॉल करा. Data Analysis पर्यायांतून Plot Over line पर्याय निवडा. |
07:21 | त्यावर क्लिक करा. |
07:23 | X , Y आणि Z अक्ष दिसतील. |
07:25 | एकेक करून X आणि Y अक्ष निवडा. |
07:31 | मी X अक्ष निवडून Apply वर क्लिक करत आहे. |
07:37 | दाब आणि वेग यांचा आलेख बघू शकतो. |
07:42 | हे नॉन डायमेंशनल ऍनालिसीस असल्यामुळे रेनॉल्डस नंबर =100 साठी u/U v/s y/L आलेख काढणे गरजेचे आहे. |
07:52 | प्लॉट डेटामधे हे करण्यासाठी Y अक्षावर क्लिक करा. |
07:58 | आणि APPLY वर क्लिक करा. |
08:01 | आपण आलेख बघू शकतो. |
08:03 | आता मेनूबारमधे फाईल मेनूमधील Save Data वर क्लिक करा. |
08:09 | तुमच्या फाईलला योग्य नाव द्या. |
08:11 | मी याला "cavity" नाव देत आहे. |
08:15 | ही फाईल ".csv" (dot csv) म्हणून सेव्ह करणार आहोत. |
08:19 | आता OK क्लिक करून पुन्हा OK क्लिक करा. |
08:23 | आता ओपन फोम डिरेक्टरीच्या cavity फोल्डरवर जाऊ. |
08:29 | खाली स्क्रॉल करा. cavity.csv फाईल आपण बघू शकतो. |
08:34 | हे ओपन ऑफिस किंवा लिबर ऑफिस स्प्रेडशीटमधे उघडा. |
08:39 | लिबर ऑफिस स्प्रेडशीटमधून U0 (u वेग) आणि उजवीकडील पॉईंटस 1(Y-अक्ष) हे कॉलम्स दुस-या स्प्रेडशीटमधे कॉपी पेस्ट करा. |
08:48 | आता या दोन कॉलम्सचे विभाजन करा म्हणजेच u zero बाय कॅपिटल U आणि points 1 बाय कॅपिटल L |
08:59 | आणि मेनूबारमधे वरच्या बाजूला असलेल्या लिबर ऑफिस चार्टमधे याचा रिझल्ट प्लॉट करा. |
09:08 | आता स्लाईडसवर परत जाऊ. |
09:10 | मिळालेले रिझल्ट हे या आकृतीसारखेच असतील. |
09:16 | हे रिझल्टस Lid Driven Cavity by : Ghia et al. (1982) या प्रसिध्द झालेल्या शोध निबंधात तसेच Fluent यांच्या रिझल्टसशी प्रमाणित करा. |
09:24 | या पाठात आपण शिकलो: |
09:26 | Lid Driven cavity चे फाईल स्ट्रक्चर |
09:28 | सोडवलेली lid driven cavity. |
09:30 | मिळालेल्या सोल्युशन्सचे पोस्ट प्रोसेसिंग |
09:32 | आणि व्हॅलिडेशन. |
09:34 | असाईनमेंट म्हणून, lid driven cavity मधील काही पॅरामीटर्स बदला. |
09:38 | जसे की, 0 फोल्डरमधील वेगाचा आकार. |
09:41 | constant फोल्डरमधील ट्रान्सपोर्ट प्रॉपर्टीजमधील Kinematic viscosity . |
09:45 | आणि u/U आणि y/L चे रिझल्ट प्लॉट करा. |
09:50 | http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:54 | यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
09:57 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:00 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम: |
10:02 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. |
10:05 | ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. |
10:09 | अधिक माहितीसाठी कृपया: contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10:15 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:23 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
10:27 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. |
10:30 | सहभागासाठी धन्यवाद. |