OpenFOAM/C2/Creating-simple-geometry-in-OpenFOAM/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या creating simple geometry in OpenFOAM वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण जाणून घेणार आहोत- |
00:08 | सिंपल जॉमेट्री तयार करणे. |
00:11 | paraview मधे जॉमेट्री बघणे. |
00:15 | या पाठासाठी मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु वर्जन 10.04, OpenFOAM वर्जन 2.1.0, ParaView वर्जन 3.12.0 वापरत आहे.
|
00:27 | CFD पूर्व-प्रक्रियेच्या भागात जॉमेट्री तयार करून त्याचे मेशिंग (meshing) करावे लागते. |
00:33 | उदाहरणादाखल आपण मागील पाठातील Lid driven cavity ही केस घेऊ या. |
00:38 | त्यासाठी मागील पाठातील path घेऊ. |
00:40 | मी आधीच कमांड टर्मिनल उघडले आहे आणि lid driven cavity चा path टाईप केला आहे. |
00:48 | येथे '0, constant' आणि 'system' हे तीन फोल्डर्स आहेत. 'Geometry' ची फाईल 'constant' फोल्डरमधील 'polymesh' फोल्डरमधे आहे. |
00:55 | कमांड टर्मिनलमधे टाईप करा: cd space constant आणि एंटर दाबा. |
01:03 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
01:06 | यामधे 'polyMesh' नावाचा आणखी एक फोल्डर आहे. |
01:10 | आता cd space polymesh टाईप करून एंटर दाबा. |
01:18 | आता "ls" टाईप करून एंटर दाबा. |
01:22 | यामधे 'blockMeshDict' नावाची 'geometry' फाईल उपलब्ध आहे. |
01:26 | 'blockMeshDict' ही फाईल तुमच्या पसंतीच्या एडिटरच्या सहाय्याने उघडा. |
01:30 | टर्मिनलवर टाईप करा: gedit space blockMeshDict( लक्षात घ्या M आणि D हे कॅपिटलमधे लिहिले आहेत) आणि एंटर दाबा. |
01:45 | आपण हे capture area मधे ड्रॅग करून घेऊ. |
01:49 | हे मिनिमाईज करा. |
01:53 | स्लाईडवर परत जाऊ. |
01:55 | openfoam मधे संपूर्ण geometry ब्लॉक्समधे विभागलेली आहे. |
01:59 | आकृतीत दाखवल्याप्रमाणे ब्लॉकसना 0 (zero) पासून सुरूवात करून नंबर दिले गेले आहेत. |
02:08 | लक्षात घ्या, OpenFOAM मधे 2D जॉमेट्री तयार करताना आपल्याला z अक्षावर युनिट सेल थिकनेसची व्हॅल्यू देणे गरजेचे असते. |
02:19 | lid driven cavity ची लांबी 1 आणि उंची 1 आहे. स्लाईड मिनीमाईज करू. |
02:29 | तुमच्या डेस्कटॉपवर एक रिकामी फाईल तयार करण्यासाठी राईट क्लिक करून क्रिएट डॉक्युमेंटमधील Empty फाईलवर क्लिक करा. त्याला 'blockMeshDict' असे नाव द्या. (लक्षात घ्या M आणि D येथे कॅपिटलमधे आहेत) |
02:48 | ही फाईल उघडा. lid driven cavity 'blockMeshDict' फाईल मधील मूळ डेटा कॉपी करून तो नव्या 'blockMeshDict' फाईलमधे लाईन 0 वर पेस्ट करा. |
02:59 | वरती स्क्रॉल करून लाईन 0 पासून 'convertTometers' पर्यंत कॉपी करून येथे पेस्ट करा. |
03:15 | खाली स्क्रॉल करा. आता 'converttometers' नंतर थोडी स्पेस सोडा. |
03:21 | ही जॉमेट्री मीटर्समधे असल्यामुळे येथे 1 टाईप करा. सेमीकोलन देऊन एंटर दाबा. |
03:30 | पुन्हा एंटर दाबा. फाईलमधे टाईप करा "vertices" आणि एंटर दाबा. |
03:39 | ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. |
03:43 | टॅबचे बटण दाबा. पॉईंट 0 पासून सुरूवात करा, ओपन क्लोज ब्रॅकेटस समाविष्ट करून टाईप करा, |
03:52 | 0 space 0 space 0 एंटर दाबा. पुन्हा टॅबचे बटण दाबून टाईप करा ओपन व क्लोज ब्रॅकेटस. |
04:02 | धन x अक्षावर पुढे point 1 वर जा आणि 1 space 0 space 0 टाईप करून एंटर दाबा. |
04:12 | पुन्हा टॅबचे बटण दाबा आणि ओपन क्लोज ब्रॅकेट टाईप करा. धन x-y plane मधे पुढे point 2 वर जा आणि 1 space 1 space 0 टाईप करून एंटर दाबा. |
04:26 | पुन्हा टॅबचे बटण दाबा. ओपन क्लोज ब्रॅकेट टाईप करा. धन y अक्षावर तिसरा बिंदू देण्यासाठी 0 space 1 space 0 टाईप करून एंटर दाबा. |
04:39 | पुन्हा टॅबचे बटण दाबा. ओपन क्लोज ब्रॅकेटमधे front face वर चौथा पॉईंट देण्यासाठी 0 space 0 space 0.1 टाईप करून एंटर दाबा. |
04:51 | अशा प्रकारे धन z अक्षावर 1 युनिट व्हॅल्यू असलेले इतर पॉईंटस द्या. |
04:56 | क्लोज ब्रॅकेट टाईप करून त्यानंतर सेमीकोलन द्या. एंटर दाबून पुन्हा एकदा एंटर दाबा. |
05:03 | vertices च्या खाली ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स टाईप करून एंटर दाबा. ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. |
05:16 | स्लाईडसवर परत जाऊ. |
05:19 | लक्षात घ्या Lid driven cavity हा एक सिंगल ब्लॉक म्हणून घेण्यात आला आहे. |
05:24 | 'blockmeshdict' वर परत जाऊ. |
05:27 | ब्लॉकसाठीचे पॉईंट क्लॉकवाईज पध्दतीने टाईप करा. |
05:31 | येथे आपण मेशिंगसाठी hexa hedral ब्लॉक्स वापरत आहोत. |
05:34 | आता "hex" टाईप करा. थोडी स्पेस सोडा. कंसात, 0 space 1 2 3 4 5 6 7 टाईप करून पुन्हा थोडी स्पेस सोडा. |
05:53 | लक्षात घ्या, एकापेक्षा अनेक ब्लॉक्स असल्यास पॉईंटस अनेक असतील. |
05:58 | त्यानंतर x, y आणि z डायरेक्शन्समधे grid पॉईंटस द्या. |
06:02 | ओपन क्लोज ब्रॅकेटसमधे 30 space 30 space 1 असे टाईप करा. थोडी स्पेस सोडा. तुम्ही ग्रीडमधे गरजेनुसार बदल करू शकता. |
06:16 | z अक्षामधे ग्रीड पॉईंट 1 घेता येऊ शकतो. |
06:22 | आता काही स्पेस सोडून "simple Grading" असे टाईप करा. थोडी स्पेस सोडून ओपन क्लोज ब्रॅकेटमधे 1 space 1 space 1 टाईप करा. |
06:36 | हे x, y आणि z डायरेक्शनमधील ग्रीड स्पेसिंग आहे. एंटर दाबा. |
06:43 | क्लोज ब्रॅकेट समाविष्ट करून पुढे सेमीकोलन द्या आणि एंटर दाबा. |
06:48 | पुन्हा एंटर दाबा. आता "edges" टाईप करून एंटर दाबा. |
06:55 | ही सिंपल जॉमेट्री असल्यामुळे edges रिकाम्या ठेवता येऊ शकतात. |
07:00 | ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. क्लोज ब्रॅकेट देऊन पुढे सेमीकोलन द्या आणि एंटर दाबा. |
07:07 | पुन्हा एंटर दाबा. edges खाली बाऊंडरी कंडिशन्स आहेत. |
07:11 | येथे फेसेससाठी बाऊंडरी नेम्स देणे गरजेचे आहे. |
07:15 | "boundary" टाईप करून एंटर दाबा . |
07:19 | ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. |
07:23 | स्लाईडसवर परत जाऊ. |
07:26 | जॉमेट्रीमधे वरची वॉल स्थलांतर करत आहे आणि इतर तीन वॉल्स स्थिर आहेत. |
07:31 | हा 2D प्रॉब्लेम असल्यामुळे फ्रंट अँड बॅक फेसेसला 'empty' नाव दिले आहे. |
07:39 | पुन्हा नवी 'blockMeshDict' फाईल उघडा. |
07:42 | boundary मधे 'moving wall' असे patch चे नाव द्या. एंटर दाबा. |
07:51 | आता ओपन कर्ली ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. |
07:56 | आता moving wall साठी type देण्यासाठी "type" space "wall" असे लिहा. |
08:06 | सेमीकोलन समाविष्ट करून एंटर दाबा. |
08:09 | आता ओपन ब्रॅकेट समाविष्ट करून एंटर दाबा. टॅबचे बटण दाबून ओपन क्लोज ब्रॅकेटस द्या. |
08:20 | या ब्रॅकेटमधे फेसेससाठीचे पॉईंटस भरा. |
08:24 | स्लाईडसवर परत जाऊ. |
08:27 | लक्षात घ्या, पॉईंटसचा क्रम असा असेल की अंगठा फेसशी काटकोनात असेल, |
08:34 | आणि बोटे आकृतीत दाखवल्याप्रमाणे वळलेली असतील. |
08:39 | कर्ल हे क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज असू शकतात. |
08:43 | शिवाय लक्षात घ्या, vertices मधे समाविष्ट केलेल्या पॉईंटसशी हे बिंदू मॅच होतील. |
08:48 | आता मी नव्या 'blockMeshDict' फाईलवर परत जात आहे. |
08:52 | आता फेसेसमधे टाईप कराः 3 space 7 space 6 space 2. |
09:01 | स्लाईडसवर परत जाऊ. 3, 7, 6, 2 हे स्थानांतरित होणा-या वॉलचे पॉईंटस आहेत. |
09:09 | हे मिनिमाईज करा. लक्षात घ्या, त्या फेसवर तुम्ही कुठल्याही पॉईंटपासून सुरूवात करू शकता. आता एंटर दाबा. |
09:17 | क्लोज ब्रॅकेट द्या. पुन्हा एंटर दाबा. क्लोज कर्ली ब्रॅकेट द्या. |
09:22 | आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की फेसेससाठी पॉईंटस समाविष्ट केल्यावर सेमीकोलन देणे गरजेचे आहे. आता कर्ली ब्रॅकेटसनंतर एंटर दाबून पुन्हा एकदा एंटर दाबा. |
09:35 | आता अशाचप्रकारे स्थिर वॉल्ससाठी बाऊंडरी कंडिशन्स आणि फेसेसच्या व्हॅल्यूज भरा. |
09:40 | हा 2D प्रॉब्लेम असल्यामुळे फ्रंट अँड बॅक फेसेसची type of boundary रिकामी ठेवता येईल. |
09:46 | स्लाईडमधे दाखवलेल्या आकृतीचा संदर्भ घ्या. पॉईंटस एंटर करण्यासाठी हे मिनिमाईज करून घ्या. |
09:52 | क्लोज ब्रॅकेटस समाविष्ट करून सेमीकोलन द्या आणि एंटर दाबा, पुन्हा एंटर दाबा. |
09:59 | आता "mergePatchPairs" टाईप करून एंटर दाबा. |
10:04 | कोणतेही पॅचेस मर्ज करायचे नसल्यामुळे हे रिकामे ठेवता येऊ शकते. |
10:08 | ओपन आणि क्लोज ब्रॅकेटस समाविष्ट करून सेमीकोलन समाविष्ट करा. एंटर दाबा. |
10:14 | आपली 'blockMeshDict' फाईल तयार झाली आहे. ही सेव्ह करा. |
10:18 | येथे ही संपूर्ण 'blockMeshDict' फाईल आहे. |
10:26 | दोन्ही 'blockMeshDict' फाईल्स बंद करा. |
10:29 | लक्षात घ्या, blockMeshDict फाईल बंद केल्याशिवाय कमांड टर्मिनल कार्य करणार नाही. |
10:35 | टर्मिनलवर परत जा. आता cd space दोन वेळा (dot) (dot) टाईप करा. हे 'cavity' फोल्डरवर घेऊन जाईल. आता Mesh the geometry. |
10:45 | त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा: "blockMesh" आणि एंटर दाबा. |
10:53 | आता geometry बघण्यासाठी कमांड टर्मिनलवर paraFoam टाईप करून एंटर दाबा. |
10:59 | हे ParaView विंडो उघडेल. |
11:03 | आता डावीकडील ऑब्जेक्ट इन्स्पेक्टर मेनूवरील Apply वर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही जॉमेट्री बघू शकता. |
11:13 | स्लाईडसवर परत जाऊ. |
11:16 | या पाठात आपण शिकलो: |
11:18 | OpenFOAM मधे सिंपल जॉमेट्री तयार करणे. |
11:22 | Paraview मधे ती जॉमेट्री बघणे. |
11:25 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:29 | असाईनमेंट म्हणून - |
11:31 | lid driven cavity ची डायमेंशन्स बदला. ग्रीड साईज बदलून तो 50 50 1 करा आणि paraView मधे ती जॉमेट्री बघा. |
11:41 | [1] या URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
11:44 | यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
|
11:46 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
11:51 | स्पोकन ट्युटोरियला प्रोजेक्ट टीम:
|
11:53 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
|
11:55 | ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. |
11:59 | अधिक माहितीसाठी कृपया
contact@spoken-tutorial.org वर लिहा.
|
12:05 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
12:09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे |
12:15 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. URL:http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
|
12:19 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |