Scilab/C4/Interpolation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:28, 18 August 2017 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. Numerical Interpolation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 पाठाच्या शेवटी तुम्ही शिकणार आहात:
00:10 वेगवेगळ्या न्युमरिकल इंटरपोलेशन अल्गोरिदम्ससाठी Scilab कोड तयार करणे.
00:16 दिलेल्या डेटा पॉईंटसवरून फंक्शन्सच्या व्हॅल्यू मिळवणे.
00:21 या पाठासाठी मी,
00:24 उबंटु 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम
00:27 आणि Scilab चे 5.3.3 हे व्हर्जन वापरणार आहे.
00:31 पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याला,
00:34 Scilab चे प्राथमिक ज्ञान असावे.
00:36 तसेच न्युमरिकल इंटरपोलेशनबद्दल माहिती असावी.
00:40 Scilab शिकण्यासाठी कृपया स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली संबंधित ट्युटोरियल्स बघा.
00:47 न्युमरिकल इंटरपोलेशन ही
00:51 नवीन डेटा पॉईंटस तयार करण्याची मेथड आहे, जे
00:53 ज्ञात डेटा पॉईंटसच्या discrete set च्या रेंजमधे असतील.
00:59 आपण न्यूमरिकल मेथडसच्या सहाय्याने इंटरपोलेशनचे प्रॉब्लेम्स सोडवू शकतो.
01:05 Lagrange इंटरपोलेशनमधे,
01:07 आपण N पॉईंटसमधून N – 1 डिग्री असलेली बहुपदी पास करतो.
01:12 नंतर आपण N order y of x चा युनिक पॉलिनॉमियल शोधतो जो डेटा सँपल्स इंटरपोलेट करेल.
01:22 आपल्याला 9, 9.5 आणि 11 यांच्या natural logarithm व्हॅल्यूज दिलेल्या आहेत.
01:29 आपल्याला 9.2 च्या natural logarithm ची व्हॅल्यू काढायची आहे.
01:35 हा प्रॉब्लेम आपण Lagrange इंटरपोलेशन मेथडच्या सहाय्याने सोडवू.
01:41 Lagrange इंटरपोलेशनचा कोड पाहू.
01:46 आपण x zero, x, f आणि n ही अर्ग्युमेंटस असलेले Lagrange फंक्शन घोषित केले आहे.
01:53 X zero म्हणजे इंटरपोलेशन पॉईंट.
01:57 x हा डेटा पॉईंटस असलेला व्हेक्टर आहे.
02:01 f ह्या व्हेक्टरमधे डेटा पॉईंटसशी संबंधित फंक्शनच्या व्हॅल्यूज समाविष्ट आहेत.
02:08 आणि n ही इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियलची ऑर्डर आहे.
02:14 m आणि व्हेक्टर N इनिशियलाईज करण्यासाठी आपण n चा उपयोग करणार आहोत.
02:19 इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियलची ऑर्डर तयार केलेल्या नोडसची संख्या निश्चित करते.
02:25 नंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज मिळवण्यासाठी,
02:29 Lagrange इंटरपोलेशनचे सूत्र वापरणार आहोत.
02:35 नंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा भागाकार करून L ची व्हॅल्यू मिळवणार आहोत.
02:41 आपण L चा उपयोग दिलेल्या डेटा पॉईंटसाठी y फंक्शनची व्हॅल्यू मिळवण्यासाठी करणार आहोत.
02:48 शेवटी आपण L आणि f of x f(x) ची व्हॅल्यू दाखवणार आहोत.
02:53 आता फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू.
02:57 हे उदाहरण सोडवण्यासाठी Scilab कंसोलवर जाऊ.
03:02 डेटा पॉईंट व्हेक्टर घोषित करू.
03:05 कंसोलवर टाईप करा:
03:07 x बरोबर चौकटी कंसात 9.0 comma 9.5 comma 11.0 चौकटी कंस पूर्ण.
03:18 एंटर दाबा.
03:21 नंतर टाईप करा: f बरोबर चौकटी कंसात 2.1972 comma 2.2513 comma 2.3979 चौकटी कंस पूर्ण.
03:39 एंटर दाबा.
03:41 नंतर टाईप करा x zero बरोबर 9.2
03:46 एंटर दाबा.
03:48 आपण quadratic polynomial interpolating polynomial वापरू.
03:53 टाईप करा n बरोबर 2.
03:58 एंटर दाबा.
04:00 फंक्शन कॉल करण्यासाठी टाईप करा:
04:02 y बरोबर Lagrange कंसात x zero comma x comma f comma n कंस पूर्ण.
04:14 एंटर दाबा.
04:16 x बरोबर 9.2 यासाठी y ही फंक्शनची व्हॅल्यू दाखवली जाईल .
04:22 आता न्यूटन्स डिव्हायडेड डिफरन्स मेथड पाहू.
04:26 या पध्दतीत डिव्हायडेड डिफरन्सेस रिकर्सिव्ह मेथड वापरली जाते.
04:32 Lagrange मेथडपेक्षा यामधे कमी आकडेमोड करावी लागते.
04:38 असे असले तरी, यातही Lagrange मेथड सारखाच इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियल तयार करतात.
04:47 हे उदाहरण डिव्हायडेड डिफरन्स मेथड वापरून सोडवू.
04:52 आपल्याला डेटा पॉईंटस आणि
04:54 त्या डेटा पॉईंटसवरील फंक्शन्सच्या संबंधित व्हॅल्यूज दिलेल्या आहेत.
05:00 आपल्याला x बरोबर 3 साठी फंक्शनच्या व्हॅल्यू मिळवायच्या आहेत.
05:05 न्यूटन्स डिव्हायडेड डिफरन्स मेथडचा कोड पाहू.
05:11 Scilab एडिटरवर Newton underscore Divided dot sci ही फाईल उघडा.
05:18 आपण न्यूटन अंडरस्कोर डिव्हायडेड हे फंक्शन x, f आणि x zero ह्या अर्ग्युमेंटस सहित घोषित केले आहे.
05:29 x हा डेटा पॉईंटस असलेला व्हेक्टर आहे.
05:33 f म्हणजे संबंधित फंक्शन व्हॅल्यू आणि
05:36 x zero हा माहित नसलेला इंटरपोलेशन पॉईंट आहे.
05:41 आपण व्हेक्टरची length काढून ती n ला देऊ.
05:46 व्हेक्टरची पहिली व्हॅल्यू a of one a(1) ला देऊ.
05:51 नंतर डिव्हायडेड डिफरन्स अल्गोरिदम लागू करणार आहोत आणि डिव्हायडेड डिफरन्स टेबल मिळवणार आहोत.
05:57 नंतर न्यूटन पॉलिनॉमियलची coefficient list मिळवणार आहोत.
06:03 दिलेल्या डेटा पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू मिळवण्यासाठी coefficient list ची बेरीज घेणार आहोत.
06:10 Newton underscore Divided dot sci ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू.
06:16 Scilab कंसोलवर जाऊ.
06:19 स्क्रीन क्लियर करण्यासाठी टाईप करा c l c.
06:22 एंटर दाबा.
06:24 डेटा पॉईंटस व्हेक्टर एंटर करू.
06:27 टाईप करा: x बरोबर चौकटी कंसात 2 comma 2.5 comma 3.25 comma 4 चौकटी कंस पूर्ण.
06:39 एंटर दाबा.
06:41 नंतर फंक्शनच्या व्हॅल्यूज टाईप करा.
06:44 f बरोबर चौकटी कंसात 0.5 comma 0.4 comma 0.3077 comma 0.25 चौकटी कंस पूर्ण.
07:01 एंटर दाबा.
07:03 टाईप करा x zero बरोबर 3
07:06 एंटर दाबा.
07:08 नंतर फंक्शन कॉल करण्यासाठी टाईप कराः
07:11 I P बरोबर Newton underscore Divided कंसात x comma f comma x zero कंस पूर्ण.
07:23 एंटर दाबा.
07:25 x बरोबर 3 साठी y ची व्हॅल्यू येथे दाखवली जाईल.
07:30 या पाठाचा सारांश पाहू.
07:33 आपण इंटरपोलेशन मेथडससाठी Scilab कोड डेव्हलप करणे,
07:40 तसेच नवीन डेटा पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू कशी काढायची ते जाणून घेतले.
07:46 येथे दिलेला हा प्रॉब्लेम Lagrange मेथड आणि न्यूटन्स डिव्हायडेड डिफरन्स मेथडने तुम्ही सोडवून बघा.
07:54 खाली दिलेल्या लिंकवर व्हिडिओ पाहू शकता.
07:57 हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.
08:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


08:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
08:07 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


08:10 ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.


08:14 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.


08:22 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:26 यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी., एम .एच. आर. डी. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
08:33 अधिक माहिती http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro वर उपलब्ध आहे.
08:38 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे.


08:41 सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana