LaTeX/C2/Report-Writing/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या रिपोर्ट रायटिंग LaTeX वरील पाठात आपले स्वागत. मी याचा उच्चार latek करत आहे latex नव्हे. |
00:09 | कन्नन मौदगल्या ह्या ट्युटोरिअलचे प्रमुख आहेत. |
00:13 | या पाठात डॉक्युमेंट कसे तयार करावे हे जाणून घेऊ. |
00:19 | विशेषतः, रिपोर्ट आणि आर्टिकल क्लास कसा वापरावा, सेक्शन्स कसे तयार करावे, सेक्शन्सना स्वयंचलित क्रमांक देणे, अनुक्रमणिका आणि टायटल पेज तयार करणे. |
00:38 | हा पाठ मी 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या लॅपटॉपवर तयार करत आहे. |
00:44 | आणि यासाठी मीउबंटु लिनक्स, TeXworks आणि LaTeX वापरत आहे. |
00:51 | तुम्ही TeXworks विंडोज किंवामॅकवर सुध्दा याचप्रकारे वापरू शकता. |
00:57 | आपण LaTeX हे TeXworks शिवायही वापरू शकतो. |
01:02 | तुम्ही यासाठी जास्त किंमतीचे लिनक्स संगणकही वापरू शकता. |
01:07 | यासाठी पुढील पूर्वतयारीची गरज आहे: या पाठाचा सराव करण्यासाठी LaTeX ची ओळख करून देणारे स्पोकन ट्युटोरियल, report dot tex ही फाईल, side-by-side method ची माहिती असावी. |
01:23 | spoken tutorial dot org या वेबसाईटवर या सर्वांबद्दल माहिती उपलब्ध आहे. |
01:32 | आता आपण TeXworks विंडोवर जाऊ. |
01:36 | मी report.tex ही फाईल आधीच उघडली आहे. कृपया ही डाऊनलोड करून माझ्याबरोबर सराव करा. |
01:44 | मी 12 point हा फाँट साईज, ‘a4 paper’ आणि article class वापरत आहे. |
01:55 | 'usepackage' कमांडद्वारे समास सेट करण्यासाठी मी geometry package वापरत आहे. |
02:02 | प्रत्येक कमांडच्या सुरूवातीला reverse slash चिन्ह वापरले जाते. |
02:07 | मी दरवेळी ह्याचा स्पष्टपणे उल्लेख केला नाही तरी तुम्ही reverse slash देण्यास विसरू नका. |
02:13 | तसेच मी कंसांचा उल्लेख दरवेळी केला नाही तरी तुम्हाला ते वापरायचे आहेत. |
02:20 | व्हिडिओमधे दाखवल्याप्रमाणेच तुम्ही कृती करा. |
02:25 | usepackage कमांडमधे चौकटी कंसात पर्यायी पॅरामीटर्स आहेत. |
02:31 | पॅकेजचे नाव महिरपी कंसात असते. |
02:35 | मी आडवा आणि उभा समास प्रत्येकी 4.5 सेमीवर सेट केला आहे. |
02:41 | डाव्या कोप-यात बाजूला वर असलेल्या "TexWorks" या विंडोमधे पहा. |
02:47 | pdfLaTeX हा पर्याय निवडलेला नसल्यास कृपया ड्रॉपडाऊन मेनूमधून तो निवडा. |
02:55 | डाव्या बाजूला बाण असलेले हिरव्या रंगाचे एक वर्तुळ आहे. |
02:59 | त्या बाणावर क्लिक करून ही फाईल कंपाईल करा. |
03:04 | ‘report.pdf’ ही फाईल मिळेल जी आपण उजव्या बाजूला बघू शकतो. |
03:09 | आऊटपुट फाईलमधील सेक्शन, सब-सेक्शन आणि सब-सब-सेक्शन ही टायटल्स पहा. |
03:18 | हे सोर्सफाईलमधे दिलेल्या कमांडस वापरून तयार केले गेले आहे. |
03:23 | 'pdf' फाईलमधील ‘सेक्शन’ या टायटल्सच्या विविध वैशिष्ट्यांकडे लक्ष द्या. |
03:30 | या टायटल्सचे आकार प्रमाणात आणि आपोआप तयार केले जातात. |
03:37 | तसेच सेक्शनटायटल सर्वात मोठे आहे आणि सब-सब-सेक्शनटायटल सर्वात लहान आहे. |
03:45 | सोर्सफाईलमधील रिकाम्या ओळी विचारात न घेता, आऊटपुट तसेच राहते.
|
03:50 | येथील एक ओळ डिलिट करूनकंपाईल करू. |
03:55 | येथे काहीही बदल झालेला नाही. |
03:57 | मी पेपरचा साईज बदलून a5 करत आहे. |
04:02 | हे आऊटपुटमधील प्रत्येक ओळीची रुंदी कमी करेल. |
04:06 | मागे केल्याप्रमाणे हे टेक्स्ट कंपाईल करू. |
04:10 | आऊटपुट नीट दिसण्यासाठी control + दाबून हे मोठे करून घेत आहे. |
04:17 | आता हे मध्यभागी आणू. |
04:20 | उर्वरित पाठासाठी आपण a5 पेपरच वापरणार आहोत. तुम्ही तो बदलून a4 करू शकता. |
04:28 | कृपया लक्षात घ्या, मी फाईल सेव्ह केलेली नव्हती. याचे कारण TexWorks कंपाईल करण्यापूर्वी फाईल आपोआप सेव्ह करून घेते. |
04:37 | आता फाँटचा आकार कमी करून तो 10 point ठेवा आणि कंपाईल करा. |
04:44 | अरेच्या, फाँटचा आकार लहान झाला- आश्चर्य वाटले? पण, आकार प्रमाणबध्द आणि अंतर समान राहिले. |
04:54 | फाँटचा आकार पुन्हा 12 point करू. |
04:59 | आता आपण सेक्शनटायटल्सच्या आणखी एका महत्वाच्या घटकाबद्दल जाणून घेऊ. |
05:04 | हे सेक्शन क्रमांक आपोआप दिले गेलेले आहेत. |
05:09 | हे अधिक स्पष्ट करण्यासाठी मी इन्सर्टेड सेक्शन हा नवा सेक्शन समाविष्ट करणार आहे. |
05:18 | कंपाईल केल्यावर येथे अंक योग्य क्रमाने आलेले दिसतील. अशाप्रकारे LaTeX नंबरिंगची देखील काळजी घेते. |
05:29 | LaTeX टेबल ऑफ कंटेन्टससाठी toc एक्सटेन्शनची फाईल तयार करते. |
05:36 | ‘टेबल ऑफ कंटेन्टस’ हे शब्द येथे समाविष्ट करू. |
05:42 | कंपाईल करा. |
05:44 | कंटेन्टस या शब्दाव्यतिरिक्त आऊटपुट फाईलमधे काही दिसत नाही. |
05:50 | पुन्हा एकदा कंपाईल करू. |
05:53 | आता टेबल ऑफ कंटेन्टसमधे पेज नंबर सहित सर्व टायटल्स उपलब्ध आहेत. |
05:59 | योग्य पेज नंबर मिळण्यासाठी आपल्याला तिस-यांदा कंपाईल करणे आवश्यक आहे. |
06:05 | तीन वेळा कशासाठी? त्यासाठी कृपया असाईनमेंट पहा. |
06:09 | एकच सांगतो, ‘table of contents’ याची आवश्यकता आहे. |
06:14 | LaTeX मधे किती आश्चर्यकारक क्षमता आहे. |
06:17 | टेबल ऑफ कंटेन्टससाठी LaTeX वापरत असलेल्या toc एक्सटेन्शनद्वारे हे केले जाते. |
06:24 | अनेकवेळा कंपायलेशनच्या प्रक्रियेद्वारे टायटल्समधले बदलही केले जातात. |
06:30 | सेक्शनटायटल बदलून मॉडिफाईड सेक्शन असे करा. |
06:36 | हे कंपाईल करा. टेबल ऑफ कंटेन्टस बदलणार नाही. |
06:42 | पुन्हा एकदा कंपाईल करा आणि हा प्रश्न सुटेल. |
06:46 | आता येथे मॉडिफाईड सेक्शन आहे. |
06:49 | आपण या डॉक्युमेंटसाठी टायटल बनवणार आहोत. हे आपण ‘begin document’ च्या आधी बनवू या. |
06:57 | हे मी टायटल, लेखकाची माहिती आणि तारीख असे बनवणार आहे. |
07:13 | त्यासाठी मी या तीन कमांडस समाविष्ट केल्या आहेत. |
07:17 | ह्या कोणत्या क्रमाने येतात किंवा कोणत्या ठिकाणाहून आल्या आहेत ह्याने काही फरक पडत नाही. |
07:22 | परंतु त्या ‘begin document’ कमांडच्या आधी असल्या पाहिजेत. |
07:26 | सर्व कमांडस मधे reverse slash द्यायला विसरू नका. |
07:31 | येथे Double slash म्हणजे पुढील ओळ. हे आपण कंपाईल करू. |
07:38 | ‘pdf’ फाईलमधे कोणताही बदल झालेला नाही. |
07:42 | याचे कारण आपण LaTeX ला या माहितीचे काय करायचे हे सांगितलेले नाही. |
07:47 | म्हणून मी ‘begin document’ कमांडच्या लगेच नंतर ‘make title’ हा एक शब्द कमांड म्हणून समाविष्ट करणार आहे. |
07:55 | हे कंपाईल करू या. |
07:58 | ज्या ठिकाणी आपण ही कमांड समाविष्ट केलेली होती तेथे आऊटपुटमधे टायटल दिसेल. |
08:03 | जसे की, डॉक्युमेंटच्या सुरूवातीला. |
08:07 | आता आपण या डॉक्युमेंटचा article हा class बदलूनतो report करू. |
08:15 | त्याचबरोबर, 'Chapter First Chapter' कमांडने chapter घोषित करणार आहोत. |
08:24 | Report style साठी किमान एक chapter असणे आवश्यक आहे. |
08:27 | हे कंपाईल करून आऊटपुट पाहू. |
08:31 | आऊटपुटमधे झालेले बदल लक्षात घ्या. |
08:35 | संपूर्ण पेजवर टायटल दिसत आहे, ज्याला पेज नंबर नाही. |
08:40 | Contents देखील संपूर्ण पेजवर दिसत आहेत, ज्याचा पेज नंबर 1 आहे. |
08:47 | येथे कृपया पॉज करा आणि 'Contents' मधील किती एंट्रीज चुकीच्या आहेत ते शोधा. |
08:54 | आता पुढील पेजवर जाऊ या. chapter ची सुरूवात कशाप्रकारे झाली आहे याकडे लक्ष द्या. |
09:00 | आपण किती वेगवेगळी वैशिष्ट्ये ओळखू शकता? तुम्हाला किमान 5 तरी शोधता आली पाहिजेत. |
09:08 | हे दुस-यांदा कंपाईल करू या. |
09:12 | आता Contents पेजवर योग्य माहिती आली आहे हे बघा. आता पेज नंबर्स बरोबर दिसत आहेत. |
09:21 | आता ‘New Chapter’ नावाचा chapter समाविष्ट करू या. |
09:32 | हे कंपाईल करा. |
09:34 | हे पुन्हा एकदा कंपाईल करा आणि हे नवीन पेजवर आलेले बघा. |
09:47 | appendix ही कमांड या नवीन chapter च्या आधी समाविष्ट करा. |
09:53 | कंपाईल केल्यावर आपल्याला Appendix हा शब्द आलेला दिसेल. |
09:59 | chapter चा नंबर A आहे. |
10:02 | आता स्लाईडसवर जाऊ या. |
10:05 | थोडक्यात, आपण या पाठात काय शिकलो ते पाहू. |
10:08 | LaTeX मधे डॉक्युमेंट लिहिणे, चॅप्टर आणि सेक्शन टायटल्स स्वयंचलित पध्दतीने तयार करणे, स्वयंचलित नंबरिंग, टेबल ऑफ कंटेंन्टस, टायटल पेज तसेच Appendix तयार करणे. |
10:21 | ह्या काही असाईनमेंटस करून बघा. |
10:24 | ही असाईनमेंट a4 पेपर आणि letter paper वर करायची आहे. |
10:29 | व्हिडिओ पॉज करून स्लाईड वाचा आणि असाईनमेंट करा. |
10:35 | ही असाईनमेंट font size वर आहे. |
10:41 | ही report dot toc वर आहे. |
10:47 | ही कंपायलेशनच्या संख्येवर आधारित आहे. |
10:52 | ही Table of Contents च्या स्थानावर आधारित आहे. |
10:59 | ही असाईनमेंट रिपोर्ट आणि आर्टिकलमधे 'chapter' कमांड वापरण्यासंदर्भात आहे. |
11:07 | ही असाईनमेंट रिपोर्ट class मधे 'appendix' कमांडचा परिणाम बघण्याच्या संदर्भातील आहे. |
11:15 | ही असाईनमेंट आधी केलेल्या असाईनमेंट सारखीच आहे, परंतु ती article class मधे करायची आहे. |
11:22 | ही geometry package संदर्भातील आहे. |
11:27 | ही असाईनमेंट सर्वसाधारण LaTeX classes संदर्भातील आहे. |
11:34 | अशाप्रकारे आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:38 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
11:46 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवितो.प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:53 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? |
11:56 | कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा. |
12:03 | तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
12:09 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
12:13 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
12:19 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
12:28 | या पाठात न आलेल्या टॉपिक्ससाठी या पत्त्यावरील stack exchange वापरावे. |
12:35 | LaTeX वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही उत्तम जागा आहे. तुम्हाला कार्यशाळा, प्रमाणपत्र इत्यादी संबंधीही प्रश्न असतील. |
12:45 | त्यासाठी आमच्याशी इमेलद्वारे संपर्क साधा. |
12:50 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेलेआहे. |
12:56 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना उके यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |