Firefox/C2/Setting-General-Privacy-Options/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:52, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Firefox General Privacy Options

Author: Manali Ranade

Keywords: Mozilla Firefox


Visual Clue
Narration
00:00 Mozilla Firefox च्या या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्युटोरियलमध्ये आपण General preferences आणि Privacy preferences कसे सेट करायचे ते शिकणार आहोत.
00:11 या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.04 वर Firefoxचे version 7.0 वापरणार आहोत.
00:18 Mozilla Firefox मध्ये Preferences सेट केल्याने वारंवार कराव्या लागणा-या क्रिया सोप्या होतात.
00:24 विंडोजमध्ये या वैशिष्ट्यांना Options असे म्हणतात.
00:29 उदाहरणार्थ आपल्याला emailचे login page आपले होमपेज म्हणून सेट करायचे आहे.
00:33 त्यासाठी Edit वर क्लिक करून Preferences वर जा.
00:37 विंडोजच्या युजर्सनी Tools वर क्लिक करून Options वर जा.
00:42 Preferences किंवा Options चा डायलॉग बॉक्स उघडेल. डायलॉग बॉक्सच्या वरच्या बाजूला अनेक टॅब्ज आहेत.
00:50 प्रत्येकाचे असे वेगवेगळे फंक्शन आहे.
00:53 General panel मध्ये सर्वसाधारणपणे उपयोगात आणल्या जाणा-या सेटिंग्ज संबंधित Preferencesआहेत जसे की, Firefoxचे होमपेज सेट करणे. फाईल डाऊनलोड करताना त्याचे लोकेशन ठरवणे.
01:04 आता Gmail हे होमपेज म्हणून कसे सेट करायचे ते पाहू.
01:08 Start up खाली When Firefox starts या drop down menu मधून, Show my home page हा पर्याय निवडा.
01:16 डिफॉल्ट रूपात होमपेज फिल्ड Mozilla Firefox Start Page वर सेट केलेले असते.
01:22 होमपेज फिल्डवर क्लिक करून तेथे www.gmail.com असे टाईप करा.
01:29 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
01:33 आपली सर्व सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील.
01:36 आता Firefox विंडो बंद करा.
01:40 आणि नवी Firefox विंडो उघडा.
01:42 आता Gmail login page आपले होमपेज झाले आहे.
01:46 आपण Firefox डाऊनलोडसना कसे हाताळते ते पाहू या.
01:51 Edit वर क्लिक करून Preferences वर जा.
01:54 विंडोजच्या युजर्सनी Tools वर क्लिक करून Options वर जा.
01:58 General tab वर क्लिक करा.
02:02 डाऊनलोड खालील Show the Downloads window when downloading a file हा पर्याय निवडा.
02:09 आता सेव्ह फाईल्सच्या radio बटणावर क्लिक करा.
02:12 Browse या बटणावर क्लिक करा आणि डिफॉल्ट फोल्डर बदलून तो Desktop करा.
02:18 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
02:24 आपली सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील.
02:28 ब्राऊजरच्या सर्चबार मध्ये flowers टाईप करा आणि उजवीकडील magnifying lens वर क्लिक करा.
02:34 पहिल्या रिझल्टवर माऊसने राईट क्लिक करा.
02:38 आणि Save Link As वर क्लिक करा.
02:40 तुमच्या लक्षात येईल की डिफॉल्ट रूपात ती लिंक डेस्कटॉपवर डाऊनलोड होईल.
02:46 सेव्ह वर क्लिक करा. म्हणजे फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल.
02:51 Tabs panel मध्ये tabbed browsing संबंधित preferences समाविष्ट असतात.
02:56 वेबसाईट कशा प्रकारे दर्शवल्या जाव्यात, या संबंधीचे preferences कंटेट पॅनेलमध्ये उपलब्ध असतात.
03:02 Applications panel मध्ये तुम्हाला Firefoxने वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स कशा हाताळाव्यात ते सांगता येते.
03:11 ते एखादे PDF document किंवा audio file असू शकते.
03:13 या पाठाची assignment म्हणून हे टॅब किंवा ही पॅनेल्स आणि त्यातील पर्याय वापरून बघा.
03:19 Privacy panel मध्ये तुमच्या वेब प्रायव्हसी संबंधित preferences समाविष्ट असतात.
03:25 Tracking खालील Tell web sites I do not want to be tracked हा पर्याय निवडा.
03:30 हा पर्याय निवडल्याने आपल्या ब्राऊजिंग सवयीं बद्दलची माहिती वेबसाईटना पाठवली जाणार नाही.
03:37 History खाली अनेक पर्याय आहेत.
03:41 Firefox will या field मधील Never remember history हा पर्याय निवडा.
03:45 हा पर्याय निवडण्याचा अर्थ तुम्ही केलेल्या ब्राऊजिंगची हिस्ट्री तुमच्या संगणकावर राहणार नाही.
03:53 जर आपण Clear all current history वर क्लिक केले तर आपल्या संगणकावरील सर्व उपलब्ध ब्राऊजिंग हिस्ट्री डिलिट होईल.
04:01 आता लोकेशन बारवर जा.
04:04 When using the location bar, suggest: या fieldमध्ये, ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा. आणि Nothing हा पर्याय निवडा.
04:11 असे केल्यामुळे जेव्हा कधी तुम्ही address bar वर नवी URL टाईप कराल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना मिळणार नाही.
04:19 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा.
04:23 आता तुमची प्रायव्हसी पूर्णपणे सुरक्षित आहे.
04:26 आपले वेब ब्राऊजिंग सुरक्षित ठेवण्यासंबंधीचे preferences, Security panel मध्ये समाविष्ट असतात.
04:32 Sync panel द्वारे आपण Firefox Sync account चे व्यवस्थापन करू शकतो.
04:36 Firefox Sync द्वारे ब्राऊजिंगची history, bookmarks आणि passwords यासारखी माहिती इतर devices ना दिली जाते.
04:45 Advanced Panel मध्ये काही Firefoxच्या महत्त्वाच्या सेटिंग्जचा समावेश होतो.
04:49 यात Firefoxचे कामकाज नियंत्रित करणा-या ब्राऊजिंग आणि सिस्टीम डिफॉल्ट सेटिंग्ज समाविष्ट आहेत.
04:57 तसेच आपण Network या पर्यायाच्या सहाय्याने Firefoxला इंटरनेटशी जोडण्याचा मार्ग configure करू शकतो.
05:03 Network tab मध्ये, Connections खालील सेटिंग्ज या बटणावर क्लिक करा.
05:09 Connection Settings नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
05:11 येथे आपणProxies, configure करू शकतो.
05:15 Proxies चा उपयोग कार्यक्षमता वाढविणे आणि चांगली सुरक्षितता देणे यासाठी होतो.
05:21 डिफॉल्ट रूपात Use system proxy settings हा पर्याय निवडलेला असतो.
05:26 हा पर्याय आपण operating system साठी configure केलेल्या सेटिंग्जचा उपयोग करतो.
05:31 proxy settings स्वतः एंटर करण्यासाठी , Manual proxy configuration हा पर्याय निवडा.
05:38 आता आपण या फिल्डमध्ये proxy settings भरू शकतो.
05:42 Connection Settings चा डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close या बटणावर क्लिक करा.
05:49 पुन्हा Close या बटणावर क्लिक करून preferences किंवा Options डायलॉग बॉक्स बंद करा.
05:55 आपली सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील.
05:58 आणि शेवटी आपण Advanced panel मधील Update tab च्या सहाय्याने Firefox अद्ययावत बनवू शकतो.
06:05 अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:08 या ट्युटोरियलमध्ये आपण General preferences आणि Privacy preferences कसे सेट करायचे ते शिकलो.
06:15 COMPREHENSION TEST ASSIGNMENT.
06:19 नवी ब्राऊजर विंडो उघडा.
06:21 तुमचे होमपेज बदलून spoken-tutorial.org करा.
06:28 डिफॉल्ट डाऊनलोडचे लोकेशन बदलून ते होम फोल्डर करा.
06:30 When using the location bar, suggest: चे सेटिंग बदलून History आणि Bookmarks करा.
06:38 सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:41 ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06:50 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:54 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:58 अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा.
07:04 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
07:07 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
07:12 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:27 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana, Sneha