Firefox/C2/Tabbed-Browsing-Blocking-Pop-ups/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:51, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: to Mozilla Firefox - Tabbed Browsing and pop-ups

Author: Manali Ranade

Keywords: Mozilla Firefox


Visual Clue
Narration
00:00 Mozilla Firefoxच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्युटोरियलमध्ये आपण Tabbed Browsing, off-line घटक स्टोअर करणे आणि pop-ups ब्लॉक करणे शिकणार आहोत.
00:13 या ट्युटोरियलमध्ये आपण UBUNTU Linux 10.04 मध्ये Firefox Version 7.0 चा वापर करणार आहोत.
00:21 Mozilla Firefox एकाच ब्राऊजर विंडोमध्ये अनेक वेब पेजेस वेगवेगळ्या टॅबमध्ये उघडू शकते.
00:29 या टॅब ब्राउजिंगचा मोठा फायदा असा की तुम्हाला ब्राऊजरच्या अनेक विंडोज उघडाव्या लागत नाहीत.
00:36 त्यामुळे तुम्हाला डेस्कटॉप स्टेटसबारवरील आयकॉनची गर्दी टाळता येते.
00:40 प्रत्येक टॅबमध्ये आपण ब्राऊजरचा पूर्ण viewing area वापरू शकतो.
00:45 त्यामुळे विंडोज वारंवार लहान मोठ्या करण्याचा किंवा त्या हलवण्याचा त्रास वाचतो.
00:52 आपण जर एकाच वेळेला अनेक टॅब उघडून ठेवले नसतील तर
01:00 Tabbed Browsing, tiled-window browsing पेक्षा ऑपरेटिंग सिस्टीमवर कमी भार टाकतो व कमी मेमरी वापरतो.
01:05 समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट वेबपेजवर आहात.
01:08 त्यात “Firefox for Desktop” ही लिंक आहे.
01:11 तुम्ही ही लिंक नव्या टॅबमध्ये उघडू शकता.
01:14 हे करण्यासाठी लिंकवर माऊसचे उजवे बटण दाबा.
01:17 Context मेनूमधील open link in new tab वर क्लिक करा.
01:21 आता त्यात ब्राऊजर विंडोमध्ये उपलब्ध टॅबच्या उजवीकडे नवीन टॅब उघडला आहे.
01:28 अशा प्रकारे तुमची विंडो बंद न करता किंवा न हलवता त्याच विंडोमध्ये तुम्ही दुसरे वेब पेज उघडू शकता.
01:34 तुम्ही नवीन टॅब उघडण्यासाठी प्रथम File वर आणि नंतर New Tabवर क्लिक करा.
01:40 त्यासाठी Ctrl + T ही शॉर्टकट की आहे.
01:44 तुम्ही नवीन टॅब उघडला की तो तत्काळ कार्यान्वित होतो.
01:50 आता URL बारवर जाऊन ‘www.google.com’ टाईप करा.
01:56 आता आपल्याकडे ३ टॅब आहेत व प्रत्येकात वेगवेगळी वेबपेजेस आहेत.
02:01 सगळ्यात उजवीकडील टॅबच्या उजव्या बाजूचे '+' हे बटण दाबून तुम्ही नवीन टॅब उघडू शकता.
02:08 तसेच आपण आपल्या आवश्यकतेनुसार टॅबचा क्रम बदलू शकतो.
02:11 त्यासाठी केवळ टॅबवर क्लिक करा. आणि माऊसचे बटण दाबून ठेवून तो टॅब योग्य ठिकाणी हलवा.
02:17 आता माऊसचे बटण सोडून द्या.
02:20 आता सदर टॅब आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी आला आहे.
02:23 आता आपण Mozilla Firefox मधील काही बेसिक ऑपरेशन्स बघू या.
02:29 सर्च इंजिन बदलून ते गुगल करू या.
02:32 सर्च बारवर 'e-mail wikipedia' असे टाईप करा. आणि उजवीकडील magnifying glass च्या चिन्हावर क्लिक करा.
02:40 Result मध्ये सगळ्यात प्रथम विकिपीडियाचे संबंधित पान दिसेल.
02:44 लिंकवर क्लिक करून ते पान उघडू या.
02:48 आता File वर क्लिक करून Save page as वर क्लिक करा.
02:52 फाईल search.html या नावाने डेस्कटॉपवर सेव्ह करा.
02:59 आता ब्राउजर विंडोमध्ये File वर आणि मग new Tab वर क्लिक करून नवीन टॅब उघडा.
03:05 आता आपण सेव्ह केलेले पान या नव्या टॅब विंडोमध्ये उघडू या.
03:10 File मधील Open File वर क्लिक करा.
03:12 आपली सेव्ह केलेली फाईल शोधा आणि उघडा.
03:17 तुम्हाला दिसेल की URL बारवर दिसणारा address हा इंटरनेट address नसून तो आपल्या कॉम्प्युटरमधील लोकेशन address आहे.
03:25 आता ऑफलाईन असताना देखील हे पान तुम्ही वाचू शकता.
03:29 pop-up म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय आपोआप येणारी एक विंडो असते.
03:34 फायर फॉक्सच्या Preferences window मधील Content tab खालील पर्याय वापरून pop-ups आणि pop-unders नियंत्रित करता येतात.
03:42 विंडोजमध्ये हा पर्याय Options मध्ये असेल.
03:46 डिफॉल्ट रूपात pop-ups ब्लॉक केलेले असतात.
03:50 येथे Edit वर क्लिक करून Preferences मध्ये जा.
03:52 विंडोजवरील युजरनी कृपया Tools व नंतर Options वर क्लिक करा.
03:56 येथे content टॅबमधील पहिला पर्याय block pop-up विंडो डिफॉल्ट रूपात निवडलेला असतो.
04:02 जर नसेल तर कृपया block pop-up हा पर्याय निवडा.
04:05 या डायलॉग बॉक्समधील इतर पर्याय आपण दुस-या ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत.
04:11 क्लोज बटणावर क्लिक करा.
04:13 अशा प्रकारे आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
04:16 आपण काय शिकलो त्याबद्दल थोडक्यात.
04:19 Tabbed Browsing, off-line घटक स्टोअर करणे आणि pop-up block करणे.
04:25 COMPREHENSIVE TEST ASSIGNMENT
04:29 नवीन टॅब उघडा.
04:30 सर्च इंजिन बदलून ते गुगल करा.
04:33 'The history of e-mail' साठी शोध घ्या.
04:36 आलेला पहिला रिझल्ट सेव्ह करा. आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा.
04:43 सर्च इंजिन बदलून ते 'bing' करा.
04:46 पुन्हा The history of e-mailसाठी शोध घ्या.
04:49 आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा.
04:58 सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:02 ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:04 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:14 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:18 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
05:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
05:29 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
05:37 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:48 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha